तुझपे दिल कुरबान
भारतीय फिल्म संगीतातील गायनाचार्य माननीय श्री मन्ना डे यांचे गुरूवारी दु:खद निधन झाले. या काळातील समर्थ , शैलीदार गायकांच्या रत्नहारातील एक रत्न आज गळून पडले. उत्पती, वधेन व लय या चक्रातून सर्व चराचराना जावे लागते हे जरी खरे असले तरी काही जण आपला एक खास ठसा जनमानसावर व इतिहासावर उमटवितात. मन्ना डे हे नाव गेली साठ सत्तर वर्षे संगीत रसिकांच्या गळ्यातील ताईत बनून राहिले होते. खास करून ज्या रसिकाना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची थोडीफार आस आहे ,जाण आहे त्याना तर मन्ना दां चे निर्वाण हा आपला नातेवाईक गेल्याचे दु:खाचा अनुभव देणारे असणार आहे.
१९४३ पासून सतत गायन करणार्या मन्ना डे यानी. ३५०० चे वर गीते गायली आहेत. त्यात शास्त्रीय संगीतावर आधारलेली, विनोदी शैलीची, प्रेमगीते, देशभक्तीपर गीते, कव्वाल्या, या सर्व प्रकारच्या गीतांचा समावेश आहे. हिन्दीप्रमाणेच
मराठी तही. अ आ आई म म मका, प्रीत रंगली गं, मन माझे सजणी तुजवर जडे, मज लोटू नको गे दूर हे माते भारत भूमी, नम्बर फिफटी फोर,रघुकुल दीपक येता द्वारी, घन घन माला नभी दाटल्या, ई अनेक गीते त्यानी गाउन आपल्या सारख्या रसिकाना आनंद दिलेला आहे.
विविध गान प्रकारांचा निकष धरता खालील गीतांचा आठवण ही मन्ना दा ना आदरांजली ठरावी.
१) पूछो न कैसे मैने रैन बितायी ( आर्तता )
२)तू प्यारका सागर है ( भक्ति)
३)जननी जन्म भूमी स्वर्गसे महान है ( देश भक्ति)
४)चलत मुसाफिर ( लोकगीत )
५)ये रात भीगी भीगी ( युगल गीत)
६)जोडी हम्मारी जमेगा कैसे जानी ( विनोदी युगल गीत )
७)कस्मे वादे प्यार वफा सब ( निराशा गीत )
८)लागा चनरीमे दाग ( शास्त्रीय संगीत)
९) ऐ मेरे जोहरा जबीं ( कवाली )
१०)केतकी गुलाब जुही ( शास्त्रीय जुगलबंदी )
मन्ना दा , आपल्या स्मृतीला अभिवादन !
प्रतिक्रिया
24 Oct 2013 - 9:12 am | प्रचेतस
मन्ना डे यांना विनम्र आदरांजली.
24 Oct 2013 - 9:18 am | उद्दाम
श्रद्धांजली
24 Oct 2013 - 9:35 am | मदनबाण
मन्ना डे यांना विनम्र श्रद्धांजली...
24 Oct 2013 - 9:49 am | रुमानी
मन्ना डे यांना विनम्र श्रद्धांजली...
24 Oct 2013 - 10:10 am | संजय क्षीरसागर
ये शोखियां ये बांकपन जो तुझमे है, कहीं नही
दिलोंको जितनेका फन जो तुझमे है, कहीं नही
मैं तेरी.., मैं तेरी.., आखोंमे पा गया दो जहां
ऐ मेरी जोहराजबी, तुझे मालूम नही
तू अभितक है हंसि और मैं जवां..
तुझपे कुरबान मेरी जान, मेरी जान!
मन्ना दा, हे गाणं प्रत्येक सखा ज्या ज्या वेळी त्याच्या सखीसाठी म्हणेल त्या त्या वेळी तुम्ही पुन्हा पुन्हा व्यक्त व्हाल.
द मेलडी नेव्हर डाईज, इट जस्ट एक्स्प्रेसेस इटसेल्फ इन अ न्यू फॉर्म.... मन्ना दा यू विल कीप सिंगींग फ्रॉम एवरी यंग हार्ट... ऑलवेज अँड ऑल द टाईम!
24 Oct 2013 - 10:36 am | मृत्युन्जय
हे काय चौरा एक चतुर नार विसरलात? किशोर इतकेच ते गाणे मन्नादांचे सुद्धा होते.
मन्नादांना श्रद्धांजली
24 Oct 2013 - 12:15 pm | चौकटराजा
मालक , माफी .... पण मन्ना दा हा विषयच मोठा आहे.
चतुर बोलू की घोडा वोलू असा पेंच पडलेला
चौ रा .
24 Oct 2013 - 10:39 am | मुक्त विहारि
आवडली.....
24 Oct 2013 - 10:40 am | चतुरंग
गानक्षेत्रातला अजून एक मोहरा अस्तंगत झाला. :(
अतिशय साफ, सुरेल आवाज, गोड गळा. गाणी आठवत राहतील.
(दु:खी)रंगा
24 Oct 2013 - 8:09 pm | मृगनयनी
*~*~* भावपूर्ण श्रद्धांजली *~*~*
24 Oct 2013 - 10:44 am | योगी९००
मन्नादांना श्रद्धांजली..
आजच सकाळी पडोसन मधले "सावरीया आओ.." ऐकत होतो तेव्हा मनात विचार पण आला नाही की आज ही बातमी कळेल...
24 Oct 2013 - 10:58 am | बॅटमॅन
आयला............श्रद्धाञ्जली.
24 Oct 2013 - 11:03 am | किसन शिंदे
यांची लागा चुनरी में दाग आणि छनक छनक तोरी बाजे पायलिया हि दोन्ही गाणी अंत्यत आवडती. पंडीत भीमसेन जोंशीसोबत गायलेलं केतकी गुलाब जुही चंपक बन फुले हे गाणंही अंत्यत श्रवणीय!
मन्ना डे यांना विनम्र श्रध्दांजली..!
24 Oct 2013 - 12:10 pm | प्रभाकर पेठकर
असंख्य, अगणित सुप्रसिद्ध गाण्यांची मेजवानी देणारा सुमधूर आणि सर्वपट्टीत गाणारा स्वर्गिय आवाज अनंतात विलीन झाला. फार फार दु:खद बातमी.
24 Oct 2013 - 1:09 pm | तिमा
ते माणूस म्हणूनही फार थोर होते. त्याची अनेक गाणी आवडीची आहेत, पण आत्ता आठवतं आहे ते
'सूर ना सजे क्या गाऊं मैं'
जुन्या जमान्यातला शेवटचा महान गायकही काळाच्या पडद्याआड गेला.
24 Oct 2013 - 1:28 pm | मोहनराव
श्रद्धांजली.
24 Oct 2013 - 2:56 pm | बापु देवकर
जुन्या काळात स्वतःची वेगळी ओळख असणारा आवडता गायक..
श्रद्धांजली
24 Oct 2013 - 3:19 pm | भावना कल्लोळ
श्रद्धांजली
24 Oct 2013 - 3:24 pm | प्यारे१
आदरांजली.
माणूस म्हणून पण फार चांगलं व्यक्तिमत्व.
24 Oct 2013 - 3:28 pm | अग्निकोल्हा
.
24 Oct 2013 - 3:33 pm | आदित्य पाध्ये
अनेक उत्तम गाण्यांसाठी धन्यवाद.
24 Oct 2013 - 3:35 pm | धन्या
मन्ना डे यांना विनम्र आदरांजली.
24 Oct 2013 - 6:08 pm | चिप्लुन्कर
विनम्र आदरांजली.
24 Oct 2013 - 6:20 pm | भ ट क्या खे ड वा ला
अनेक उत्तम गाणी कायम स्मरणात राहतील .
24 Oct 2013 - 7:19 pm | चित्रगुप्त
मन्नाडे यांना श्रद्धांजली.
चौरासाहेब, तुम्ही मन्नाडे यांच्या जीवनाबद्दल (आणि गायनशैली बद्दलही) आणखी विस्तृतपणे लिहा ना. त्यांची गाणी ऐकली आहेतच, पण अन्य काही माहिती नाही. कोणकोणत्या संगीतकारांकडे ते कोणकोणती विशेष गाणी गायले, ओपी-मन्नाडे अशी गाणी आहेत का? मंगेशकर भगिनी सोडून अन्य कोणत्या गायिकांबरोबर त्यांची युगल गीते आहेत? त्यांचा खास काळ (ज्यात त्यांची सर्वोत्कृष्ट गाणी निर्माण झाली तो) कोणता ?
24 Oct 2013 - 7:52 pm | चौकटराजा
नय्यर साहेबांकडे ते फक्त पाचेक गाणी गायले. तीन रफी बरोब्रर एक आशा बाईंबरोबर .पण गाजले एकच
तू है मेरा प्रेम देवता हे राग ललत वर आधारलेले .