कलेने माणसं जोडली जातात असं म्हणतात. संगीत हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण. जगभरात अनेक प्रकारचं संगीत बनवलं ऐकलं जातं. अगदी रॉक, पॉप, जॅझ सारख्या पाश्चिमात्य संगीतापासून सुफ़ी, हिंदुस्थानी शास्त्रीय पर्यंत कुठलंही संगीत अतिशय श्रवणीय आहे.
अर्थात शास्त्रीय बाज आणि प्रगल्भ परंपरा असणा-या हिंदुस्थानी संगीताची जगावर भुरळ पडली नाही तरच नवल. असाच हिंदुस्थानी संगीताची भुरळ पडलेला एक अवलिया म्हणजे आला वर्दी. मुळचा जॉर्डनचा आणि कट्टर संगीतप्रेमी. जगभरातलं विविध प्रकारचं संगीत ऐकून नवनवीन धुन बनवणं हा त्याचा छंद आहे. २०११ मध्ये यूट्यूबवर वर्दी आणि आणखी ४ संगीतप्रेमींचा हयाजान (Hayajan) हा अरेबिक रॉक बॅंड त्यांनी सुरू केला, आणि तो अल्पावधीतच बराच लोकप्रियसुद्धा झाला.
स्वत: उत्कृष्ट गायक, सिन्थेसायझर आणि गिटार वादक असणा-या वर्दीला भारतीय संगीताबद्दल विलक्षण प्रेम आहे. त्यातही ९० च्या दशकातील सर्वात यशस्वी संगीतकार नदीम श्रवण, ए.आर.रहमान आणि आमीर खान यांचा हा प्रचंड चाहता आहे. संगीतात नवीन प्रयोग करण्याची इच्छा असणा-या वर्दीने कुठलंही वाद्य न वापरता केवळ हात, शरीरावर दिलेला ठेका आणि आवाजाचा वापर करून पहला नशा हे गाणं बनवलं.
http://www.youtube.com/watch?v=c1GNDPXDYdY
त्यानंतर त्याने जब तक है जान मधलं जिया रे हे गाणं बनवलं.
http://www.youtube.com/watch?v=oVlCE_Ft0hc
नुकतंच अमेरिकन पॉप गायक पीटर हॉलन्स सोबत त्याने स्लमडॉग मिलीनेयर मधलं जय हो हे गाणंसुद्धा अशाच पद्धतीने बनवलंय.
http://www.youtube.com/watch?v=ln41c-7uQ64
अशा अवलिया आला वर्दीची हयाजान मधली सगळी गाणी यूट्यूबवर आहेत. शिवाय www.alaawardi.com या त्याच्या संकेतस्थळावरून डाऊनलोडसुद्धा करता येतात.
प्रतिक्रिया
22 Oct 2013 - 1:40 pm | स्पंदना
अतिशय श्रवणीय आहे हे संगीत. इतके दिवस कस काय माहीत नव्हत?
आला वर्दीचा आवाज मुळत: अतिशय गोड आहे, अन हिंदी उच्चार अतिशय स्पष्ट.
मस्तु!
22 Oct 2013 - 1:45 pm | नानबा
त्याच्या संकेतस्थळावरून हयाजान ची गाणी डालो करून ऐका. ही गाणी निदान आपल्याला माहित असलेली, शब्दांचे अर्थ उमजणारी आणि आधी अनेकदा कानावरून गेलेली असल्यामुळे श्रवणीय आहेत. पण हयाजानची गाणी त्यातला मधला मध्यपूर्व संगीताचा बाज, अरबी शब्द असल्यामुळे अर्थ न कळतासुद्धा मनात बसतात.
22 Oct 2013 - 1:43 pm | मुक्त विहारि
आपली ते इंटरनेट ची ओळख राहीलीच की...
22 Oct 2013 - 1:46 pm | नानबा
इंटरनेटचा पुढला भाग येऊ घातलाय... लवकरच... :)
22 Oct 2013 - 2:05 pm | क्रेझी
मस्तच :)
22 Oct 2013 - 6:35 pm | बापु देवकर
खुप मस्त...
22 Oct 2013 - 10:16 pm | मदनबाण
आला वर्दी सुरेखच गातो... :)
22 Oct 2013 - 11:21 pm | किलमाऊस्की
धन्यवाद वर्दीची वर्दी दिल्याबद्द्ल. बेबसाईटही झक्कास आहे.
22 Oct 2013 - 11:37 pm | एस
ताबडतोब शेअर करण्यात आलं आहे.
22 Oct 2013 - 11:48 pm | अत्रुप्त आत्मा
व्हेरी व्हेरी ठांकू! :)
23 Oct 2013 - 12:11 am | अग्निकोल्हा
.
23 Oct 2013 - 11:01 pm | चिगो
लै गोड.. जबरा कलाकार आहे हा वर्दी..
24 Oct 2013 - 4:40 am | बहुगुणी
एकाच कलाकाराने (जेसन यांग) Game of Thrones थीमचे बरेच व्हायोलिन पीसेस वाजवून ते जोडून केलेला हा व्हिडिओ आठवला:
25 Oct 2013 - 7:41 pm | पैसा
छान ओळख!
28 Oct 2013 - 3:33 am | आदूबाळ
मला वाटलं नवाब आला वर्दीबद्दल लेख आहे म्हणून उघडला. पण याचं संगीत आवडलंच!