माज आलाय म्हशीला सालीला.
लहानपणी गाय, म्हैस किंवा अगदी एखादया लहान मुलीचा किंवा स्त्रीचा काही कारणास्तव प्रचंड राग आला की ही शिवी आम्ही मुलं देत असू. गाय किंवा म्हशीला दयायची असेल तर समोरासमोर. स्त्री किंवा लहान मुलगी असेल तर ती व्यक्ती नजरेआड झाल्यावर. त्या वयात शब्दांच्या अर्थाशी काही देणं घेणं नसायचं. अर्थात जेव्हा प्रौढ व्यक्तीसुद्धा जेव्हा एखादयाला आई किंवा बहिणीवरुन शिव्या देते तेव्हा त्या व्यक्तीला तरी कुठे त्या शिवीच्या अर्थाशी घेणे देणे असते. शिवी देण्याचा उद्देश मुळी समोरच्या व्यक्तीला "प्रोवोक" करणे हा असतो.
परंतू म्हशीला खरोखरीच माज येणे हा मात्र वैतागवाणा प्रकार होता.
दिडेकशे उंबरठयाचं गाव आमचं. गावाचा मुख्य व्यवसाय शेती. शेतीला जोड म्हणून शेकडा नव्वद घरांमध्ये गुरं पाळली जायची. गुरं म्हणजे प्रामुख्याने म्हशीच. म्हशीच्या दुधाचा व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून केला जायचा. तीन चार म्हशींच्या जोडीला गोठयात एक बैल जोडी आणि एखाद दुसरी गायही असायची. म्हशींच्या दोन जाती असायच्या. एक गावठी आणी दुसरी गुजरी. म्हणजे तशा म्हशींच्या बर्याच जाती असतात, जाफराबादी, मेहसाणा ईत्यादी. परंतू या सार्या बाहेरच्या जाती गुजरी मानल्या जायच्या. गावठी म्हशीला दुध कमी असायचे. म्हणून गावठी म्हशींच्या जोडीला गुजरी म्हशीही पाळल्या जायच्या. गायींच्याही अशाच दोन जाती. एक गावठी आणि दुसरी जर्सी. जर्सी गायी खुपच महाग असल्याने आख्ख्या गावात जेमतेम दोन तीन जर्सी गायी असायच्या. गावठी गायीही तशा कमीच असायच्या. गावठी गाय एका वेळेला जेमतेम अर्धा लिटर दुध देते. म्हशीचं दुध पचायला जड असा एक समज असल्यामुळे लहान मुलांना गायीचं दुध दिलं जायचं. तसेच शेतीला बैलही हवे असायचे. म्हणून गायींना फारसं दुध नसतानाही गायी पाळल्या जायच्या.
म्हशी बहुधा जोडीने पाळल्या जायच्या. म्हणजे दोन, चार अशा. या जोडयांमधील एक म्हैस दुभती असायची जिला तानी म्हैस म्हटले जायचे. दुसरी म्हैस दुध न देणारी किंवा दुध देणं नुकतंच बंद केलेलं असायची जिला पाडशी म्हैस म्हटलं जायचं. दुध देणं बंद करुन एखाद दुसरा महिना निघून गेला की ही पाडशी म्हैस माजावर यायची. तिला रेडा लावला की गाभण राहायची. म्हशींची अशी जोडी पाळायचे कारण असायचे. म्हैस व्याली की जवळपास दहा महिने दुध देते. या दुध देणार्या तान्या म्हशीने पाडशी होऊन दुध देणं बंद करेपर्यंत दुसरी दुध न देणारी पाडशी म्हैस गाभण राहून व्यायल्यानंतर दुध देउ लागायची. या तानी पाडशीच्या चक्रामुळे दर वेळी नविन म्हैस घ्यायची गरज नसायची. त्यामुळे पंधरा वीस हजार वाचायचे. अर्थात या चक्रात कधी कधी खंडही पडायचा. कधी म्हैस चरायला गेली असताना हरवायची, कधी तिवा य गुरांच्या जिवघेण्या रोगाने मरायची तर कधी कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर रेल्वेच्या धडकेने मरायची. अशा वेळी नवी म्हैस घेण्याशिवाय पर्याय नसायचा.
आम्हा लहान मुलांना गुरं चरायला न्यावी लागायची. सकाळी शाळेत जाण्यापूर्वी दोन तीन तास वेळ असायचा. सकाळी सातला गुरं चरायला नेली की दहा वाजेपर्यंत चरायची. दहाला त्यांना पाण्यावर नेऊन सव्वा-दहा साडे दहा पर्यंत शाळेत जाण्यासाठी घरी. गुरांकडे गेल्यावर गुरे डोंगरावर किंवा माळरानावर लावून देऊन आम्ही खुप धमाल करायचो. विटी दांडू खेळायचो. बाजूच्या काळ नदीत मनसोक्त डुंबायचो. आंबा करवंदांच्या हंगामात तर मज्जाच असायची.
हे असं चालू असताना दहाएक महिने झाल्यानंतर तानी म्हैस दुध देणं बंद करायची. अजून एखादा महिना झाला की माजावर यायची. पाडशी झालेली म्हैस थोडयाच दिवसात माजावर येणार हे आम्हालाही कळायचं. अशा म्हशीचं जननांग सुजू लागायचे. शेपटीच्या खाली जननांगाच्या बाजूला चिकट द्रव जमा होऊ लागायचा. आणि अचानक एक दिवस म्हैस सतत ओरडू लागायची. दर दोन तीन मिनिटांनी हंबरडा फोडायची. जर म्हैस चरायला नेली असेल तर बेफाम उधळायची, वाट सापडेल तिकडे पळायची. ही सारी म्हैस माजावर आल्याची लक्षणं असायची.
ही माजावर आलेललीम्हैस गोठयातच बांधलेली असेल तर ठीक. जर ती चरायला नेली असताना माजावर आली तर मात्र आम्हा मुलांना मोठी डोकेदुखी असायची. बेफाम उधळलेल्या म्हशीला आवरुन घरी आणणं खुप अवघड काम असायचं. हे सारं होत असताना म्हशीचा हंबरडा अखंड चालूच असायचा. जशी काय ती रेडयाला सादच घालत असायची. म्हैस पाळणे हा व्यवसाय असल्यामुळे माजावर आलेल्या म्हशीला चांगला रेडा लावणे आवश्यक असायचे. आजुबाजूच्या दोन चार गावांपैकी एखादया गावामध्ये खास म्हशीला लावण्यासाठी एखादा मस्तवाल रेडा पाळलेला असायचा. रेडयाचा मालक रेडयाला म्हशीवर सोडण्याचे पन्नास रुपये घ्यायचा.
माजावर आलेल्या म्हशीला मग बैलगाडीला बांधून रेडा असलेल्या गावी नेले जायचे. सोबत आम्हा गुराख्यांची वरात असायचीच. म्हशीचं रेडयाला साद घालणंही अखंड चालू असायचं. ही वरात जात असताना आजूबाजुने जाणारेही विचारायचे, "माज आलाय काय?". त्या रेडयाच्या गावात पोहोचेपर्यंत दोघे तीघे जण तरी असं विचारायचे. बैलगाडी रेडयाच्या मालकाच्या गोठयाजवळ थांबायची. म्हशीला जवळच्याच एखाद्या मोठया झाडाच्या बुंध्याला घट्ट बांधले जायचे. रेडयाच्या मालकाला बोलावले जायचे. म्हशीच्या अखंड साद घालण्याने गोठयात बांधलेला रेडाही एव्हाना अस्वस्थ होउन थयथय नाचू लागलेला असायचा. रेडयाचा मालक कसाबसा त्या रेडयाचं दावं सोडायचा. दावं सुटताच रेडा थेट म्हशीकडे धाव घ्यायचा.
रेडा व्यवस्थित लागण्यावर पुढचा वर्षभराचा दुधाचा व्यवसाय अवलंबून असल्याने म्हैसवाले आणि रेडयाचा मालक कुठलाच धोका पत्करायला तयार नसायचे. एव्हाना त्या गावातील रिकामटेकडयांचीही गर्दी जमलेली असायची. म्हशीच्या शेपटीमुळे रेडयाचं काम अडू नये म्हणून गर्दीतील कुणीतरी हौशी म्हशीची शेपटी वर उचलत उचलत असे. कहर म्हणजे रेडयाचा मालक रेडयाचं जननांग हातात पकडून त्याला दिशा दाखवत असे. रेडयाचं काम एकदा झालं की रेडा शांत व्हायचा. पण म्हशीकडची मंडळी एव्हढयावर समाधानी नसायची. शेवटी वर्षभराच्या दुधाच्या व्यवसायाचा प्रश्न असायचा. न जाणो रेडयाच्या एका दमाने काम झालं नाही तर. म्हणून रेडयाला पुन्हा पुन्हा म्हशीजवळ नेलं जायचं. त्या बिचार्याची पुढे काही करायची ईच्छा नसायची म्हणून मग आजुबाजूचे बघे "हुर्र हुर्र" असा विचित्र आवाज काढायचे. कसं कोण जाणे पण त्या आवाजाने रेडयाला पुन्हा चेव यायचा. आणि पुन्हा सारं व्हायचं. हे असं तीन वेळा झालं की "झक्कास झालं" असं म्हणून रेडयाच्या मालकाला पैसे दिले जायचे. म्हशीचा हंबरडा बंद झालेला असायचा. रेडाही म्हशीपासून दुर गेलेला असायचा. म्हशीला पुन्हा एकदा बैलगाडीला बांधून आम्ही परतीच्या प्रवासाला लागायचो.
*********************************************************************************
यथावकाश माझं शिक्षण पुर्ण झालं. शिक्षणाने जगण्याचा कॉन्टेक्स्ट पुर्णपणे बदलून गेला. बालपणीच्या सार्या आठवणी कुणा परक्याच्या बालपणीच्या आठवणींचं पुस्तक मिटून ठेवावं अशा मनाच्या कप्प्यात बंद झाल्या. परवा बाईकवरुन सिंहगड प्रदक्षिणा करताना पाबे घाटात वल्लीने गाय आणि बैलाचं बागडणं दाखवलं आणि मी त्याला वर्षातून किमान दोन वेळा होणार्या म्हशीला रेडा लावण्याच्या सोहळ्याचे वर्णन केले. योगायोगाची गोष्ट अशी की पाबे घाट उतरुन राजगड आणि तोरणा मागे टाकल्यावर एका गावी हे रेडा लावणे पाहायला मिळालं. इथेही फार वेगळं नव्हतं. वल्ली यावर लिहि अस म्हणाला. अशा वेगळ्या विषयावर लिहिणं थोडं अवघड होतं. पण विचार केला, जे आपण वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी पाहिलं ते मिपाचे वाचकही समजून घेतील. लेखात कुठे खटकण्याजोगं जाणवलं तर ती माझ्या लेखनाची मर्यादा समजून सांभाळून घ्यावं.
प्रतिक्रिया
15 Oct 2013 - 4:41 pm | अनिरुद्ध प
याला झोम्बी लावणे असे म्हणतात का?
15 Oct 2013 - 4:49 pm | धन्या
कोकणात नाही म्हणत.
15 Oct 2013 - 5:00 pm | अनिरुद्ध प
हे मी कोकणातच ऐकले आहे म्हणुनच विचारले आणि मी सुद्धा कोकणातलाच आहे (रत्नागिरिचा).
15 Oct 2013 - 5:02 pm | धन्या
आमच्या रायगड जिल्ह्यात याला म्हशीला टोणगा लावणे असे म्हणतात. टोणगा शब्द तितकासा प्रचलित नसल्यामुळे मी लेखात रेडा शब्द वापरला आहे. :)
16 Oct 2013 - 3:51 pm | आनन्दा
भरवश्याच्या म्हशीला लावतात तोच न?
15 Oct 2013 - 5:06 pm | अग्निकोल्हा
इंटरेस्टिंग... अन मी झाँबी हे अमेरिकन निर्मीती आहे समजायचो.
15 Oct 2013 - 5:16 pm | पैसा
संदर्भः
15 Oct 2013 - 5:51 pm | धन्या
गाय/बैल/म्हैस/रेडा यांच्या झुंजीला झोंबी म्हणतात.
जर या गुरांची शिंगे बाकदार असतील तर अशा झोंबीच्या वेळी ती दुसर्या गुराच्या शिंगात अडकतात आणि मग बाका प्रसंग ओढवतो. :)
15 Oct 2013 - 4:49 pm | सौंदाळा
सामन्य शेतकरी जर म्हशीला रेडकु झाले तर त्याला सांभाळायला तयार नसतात. रेडा लावायला देणारे लोक असतात त्यांनाच ते रेडकु विकले जाते नाहीतर कसायाकडे जाते असे ऐकले होते. हे खरे आहे का?
रेड्याचा शेतकर्याला आणखी काही उपयोग होतो का?
15 Oct 2013 - 4:58 pm | धन्या
प्रजनन सोडलं तर रेडयाचा शेतकर्याला काहीच उपयोग नसतो. कुणा शेतकर्याचा अगदीच नाईलाज झाला, नांगरणीच्या वेळी बैल मिळाला नाही तर रेडयाला नांगराला जुंपले जाते. परंतू म्हैस किंवा रेडा प्रचंड आळशी असतात. हा प्राणी एकदा चिखलात बसला की त्याला उठवणं हे एक मोठं दिव्य असतं.
15 Oct 2013 - 5:24 pm | वसईचे किल्लेदार
मळणि साठि तसेच चिखला साठि अतिशय ऊपयुक्त असतो. निदान ठाणे (ग्रामिण) जिल्ह्यात तरी.
16 Oct 2013 - 3:53 pm | आनन्दा
आम्ही पण एक बैल आणि एक रेडा असे जोत वापरायचो... बैलाचा चपळपणा, समज, आणि रेड्याची ताकद.. छान जोडी.
16 Oct 2013 - 11:03 am | खटपट्या
रेडकू कसायाकडे दिले जाते हे खरे आहे. आणि थोडा अमानुष प्रकार म्हणजे कसाई त्या रेड्काच्या कातड्याची छोटी पिशवी शिवून मालकाला देतात. मालक दुध काढताना हि पिशवी म्हशीला हुंगायला देतो आणि मग म्हशीला पान्हा फूटतो. हा प्रकार मी हैद्राबाद ला बघितला आहे.
16 Oct 2013 - 11:37 am | अभ्या..
कातड्याची पिशवी अजुन वापरतात. पुर्वी पेंढा भरलेले रेडकू असायचे पान्ह्यासाठी.
लहान रेड्याला मराठवाड्यात वाघार किंवा वाघरु म्हणतात.
रेडा अगदीच बिन्कामाचा नसतो. काहीजण अगदी हौसेने हालगट पाळतात. टकरी आता बंद झाल्यात पण दारु पाजलेल्या हाल्याच्या टकरी मी पाहील्यात. किती अमानुष ताकद असते हाल्यात ते त्या आवाजातच जाणवते.
अगदी परवा परवा घाटात अडकलेला ट्रेलर बाहर काढने ट्रक्टर वापरून जमना. बैल सुधा फेस काढत होते तेव्हा चार हालगट वापरून विंड मिल असणारा मोठा ट्रेलर रस्त्यावर आणलेला मी पाहिला आहे.
फ़क्त हाल्या जू लवकर लावून घेत नाही. वेसण आन कासराच लावतात.
16 Oct 2013 - 12:17 pm | बॅटमॅन
वाईट :( :( :(
च्यायला, दिवसाच्या सुरुवातीलाच हे मी का वाचले. साला आता दूधही धडपणी पिववणार नाही.
16 Oct 2013 - 12:36 pm | प्रचेतस
गाईचं दूध पी. मग उगा अपराधी भावना जाणवणार नाही. हाकानाका.
16 Oct 2013 - 12:52 pm | अभ्या..
गाई काय चितळ्याकडुन दूध आणून देतात काय? का पावडर विकत घेतात?
तिथे पण अशाच कहाण्या असतात. :-(
एकेक डेअरी पाह्यली तर दूध प्यायचे डेअर करनार नैस ;-)
गोकुळ नंदाचे नाही आता. विनयरावाचे आहे.:)
16 Oct 2013 - 1:16 pm | प्रसाद गोडबोले
मी हेच म्हणणार होतो ..
इतना शेन्टीमेन्टली नई होनेका . गाय म्हैश बकरी बस्स फक्त उपयोगी पशु हय .
( नाही तर , रेडकु / खोंड मारलं जात नाही अशा प्राण्याचा दुध पिण्याशिवाय पर्याय राहणार नाही ... ;) )
16 Oct 2013 - 2:42 pm | अभ्या..
वईच तो बता रिया मै. :)
दूध हेच त्यांचे यूएस्पी. कुठल्याहि पशुखाद्याच्या (दुधाळ) जाहिराती बघ. मुख्य मुद्दा दुधाचे प्रमाण वाढविणे हाच. जास्तीत जास्त दुधाचा दर्जा वाढविणे, परत गायींना इंजेक्शने दूध वाढविण्यासाठी, संकरीत जाती कुठल्या तर जास्त दूध देणार्या, मग त्या रिप्रॉड्क्शन न करणार्या (टर्मिनेटर बियाणे आठवले का?) असतील तरी चालेल. साधा कडबा, मका, आस्ट्रेलिअन ब्ल्यु ग्रास नायतर मुरघास कशासाठी तर जास्त दुधासाठी. एकूण काय तर आपण खाऊ न शकणार्या खाद्याचे रुपांतर खाद्यात करणारे मशीन ते. कशाला उगीच शेण्टीमेण्टल व्हायचे?
त्यो कुठला टिंग्या का काय तो पिक्चर मल्टीप्लेक्समध्ये डेरीमिल्क खात बघायचा. बस्स. :)
(बाकी नैसर्गिक शेतीचे अन दुग्ध व्यवसायाचे अजून कुतूहल असणार्यानी अंकोली (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील अरुण देशपांड्याच्या प्रकल्पाला भेट द्यावी. खूप सारी माहिती मिळेल ही ग्यारंटी. :) )
16 Oct 2013 - 9:31 pm | खटपट्या
खालील लेख वाचा. आता अमेरिकेत मान्साहारी दुध मिळते. कारण गायी शाकाहारी राहील्या नाहीत.. अजबच
http://epaper.loksatta.com/166067/indian-express/29-09-2013#page/26/2
16 Oct 2013 - 1:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
उगा कायबी काहान्या ऐकू नगा... सगलं दूद बाटलितुन नायतं पिशवितुन नायतं डब्यातुनच येतंय बगा. हाकानाका ;)
--- (नीडोच्या डब्यातलं दूध आवडनारा) इस्पिकचा यक्का
16 Oct 2013 - 8:27 pm | शेखर
शेळीचे दुध पिणे बघा जमतय का? गांधीवादी (थिंकर) लोक तुम्हाला प्रतिवाद करणार नाहीत ;)
16 Oct 2013 - 9:20 pm | मुक्त विहारि
आपण पण किंचीत का होईना पण विचार करायला लागलात......
17 Oct 2013 - 10:17 am | डॉ सुहास म्हात्रे
असं कसं ? असं कंसं ?
कोणत्याही गोष्टीला (अगदी त्यांच्या भल्याची असली तरीसुद्धा) प्रतिवाद करणे या टिंकर... आपलं... थिंकर लोकांच्या हक्काला बाधा पोच्विल्ल्य्याबद्दल तुम्चा टीव्र णीशेढ ;)
19 Oct 2013 - 1:20 pm | विजुभाऊ
एक माणुस दूध पिता पिता मेला.
कारण म्हैस अचानक खाली बसली
15 Oct 2013 - 4:56 pm | बॅटमॅन
अतिशय रोचक लेखन! हे प्रत्यक्ष पाहिले नव्हते कधीच. पार्ट ऑफ लाईफ, दुसरे काय. बाकी माजावर आलेली असो किंवा नसो, गाय अथवा म्हैस सांभाळणे म्हंजे तसा औघडच प्रकार, तो लीलया केलेल्या धनाजीरावांना एक कडक सलाम!
15 Oct 2013 - 5:02 pm | मदनबाण
हा प्रकार माहिती होता, टोणगा लावणे असे बहुतेक याला म्हंटले जाते.तसेच भरवश्याच्या म्हशीला टोणगा ही म्हण देखील आहे.कोणाला जास्तीची उत्कंठा असेल तर मदतील तू-नळी आहेच म्हणा... ;)
जाता जाता :- रेडकु/टोणगा याचे बिचार्याचे हाल होतात... आधीच काही मिळत नाही,बाजारात किंमत नाही शिवाय एकदा काम होउन देखील वरुन जबरदस्ती ! ;)
15 Oct 2013 - 5:04 pm | धन्या
बाणा, तुझं बरोबर आहे. टोणगा लावणे हेच जास्त प्रचलित आहे.
15 Oct 2013 - 5:07 pm | परिंदा
"माज आलाय काय?"
या वाकप्रचाराचा अर्थ आता कळला.
एक प्रश्न.
रेड्याबरोबरच्या एका दिवसातल्याच प्रयत्नात म्हैस गाभण राहते का? अर्थात मला यातले काहीच माहिती नाही.
इतर प्राण्यांत माजाच्या दिवसात अनेक वेळा केलेल्या प्रयत्नांनंतर (एकाच दिवशी नाही) गर्भधारणा होते. तसे म्हशींमध्ये नसते का?
शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणार्या बैलांच्या जननेंद्रियांची काहीतरी शस्त्रक्रिया करावी लागते असे ऐकले आहे. त्याबाबत काही माहिती आहे का?
15 Oct 2013 - 5:59 pm | धन्या
एकाच प्रयत्नात म्हैस गाभण राहण्याचं प्रमाण खुपच जास्त असतं. अगदी नव्वद पंच्याण्णव टक्के म्हणावे इतपत. एखादी म्हैस एकदा रेडा लावल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा माजावर आली तर त्याला "म्हैस पलटली" असे म्हणतात. भरवशाच्या म्हशीला टोणगा या म्हणीचं मुळ या म्हैस पलटण्याच्या प्रकारात आहे.
या प्रकाराला "बैल बडवणे" असे म्हणतात. ही शस्त्रक्रिया नसून खरं तर एक वाईट प्रकार असतो. नुकतंच वासरुपण संपलेल्या वयात आलेल्या खोंडाला खोडयात अडकवून आडवे पाडले जाते. त्याचे पाय जाड दोर्यांनी करकचून बांधले जातात आणि लाकडी हातोडयाने त्या खोंडाचे वृषण चेचले जातात. नंतर त्यावर हळद चोळली जाते.
या सार्या प्रकारामागे त्या खोंडाचे लैंगिक खच्चीकरण होऊन तो गायीच्या मागे जाऊ नये हा उद्देश असतो.
15 Oct 2013 - 6:17 pm | जयंत कुलकर्णी
//भरवशाच्या म्हशीला टोणगा या म्हणीचं मुळ या म्हैस पलटण्याच्या प्रकारात आह////
तसे नसावे. म्हशीला म्हैसच व्हावी अशी इच्छा असते. काही म्हशीलापण लागोपाठ म्हैसच होते. अशा या भरवशाच्या म्हशीला जर टोणगा झाला तर ..... त्या म्हणीचा उगम असा आहे... (आपण म्हटलेलेच आहे की टोणग्याचा काही उपयोग नसतो).....
15 Oct 2013 - 6:17 pm | जयंत कुलकर्णी
किंवा आपण म्हणता तसाही अर्थ काढता येईल म्हणा............
15 Oct 2013 - 6:23 pm | धन्या
भरवशाच्या म्हशीला टोणगा ही म्हण माझ्या माहितीप्रमाणे "ज्याच्याकडून फार अपेक्षा आहेत त्याच्याकडूनच अपेक्षाभंग होणे" अशा अर्थाने वापरली जाते.
ज्या म्हशीला एकदा टोणगा लावल्यावर ती गाभण राहनारच अशी खात्री असताना ती म्हैस पलटल्यामुळे त्या "भरवशाच्या म्हशीला टोणगा" लावावा लागला असं काहीसं.
15 Oct 2013 - 7:21 pm | प्यारे१
जयंतरावांचं बरोबर आहे.
घरी म्हैस असणारांची म्हशीकडून असणारी अपेक्षा म्हणजे दुसरी म्हैस कारण ती देत असलेलं दूध नि त्यापासून मिळणारं उत्पन्न. एक म्हैस हमखास म्हैसच जन्माला घालत असेल तर साहजिकच ती भरवशाची वाटू लागते नि अशा वेळी तिच्या पोटी टोणगा आला तर आत्यंतिक अपेक्षाभंग होतो. (टोणगा दूध देत नाही, बैलाप्रमाणेच. काही मिसळपाव सदस्यांचा शेरभर देत असला तरी) त्यामुळे उत्पन्नाचे मार्ग खुंटतातच वर त्या प्राण्याचा फारच कमी उपयोग होतो.
म्हणून भरवशाचा म्हशीला टोणगा! (महिष--- महिषासुर--- महिषासुरमर्दिनी ) आली आठवण देवीची! :)
16 Oct 2013 - 4:28 pm | आनन्दा
म्हशीचे मुख्य उत्पन्न आहे दूध. एखादी तान्ही म्हैस आपण दूधासाठी घरात थेवावी, आणि तिलाच टोणगा लागावा, आणि ति गाभण राहावी.. असे काहीतरी ध्वनित होते.
16 Oct 2013 - 4:42 pm | गणपा
मी ही असच ऐकलं होतं आजवर आजी आजोबांकडुन.
बाकी अगदी धन्यासारखी गायीगुरं चरायला नेली नसली तरी त्याने वर्णन केलेल्या बर्याच गोष्टी पहाण्यात आल्या आहेत बालपणी.
वेगळ्या विषयावरचं लेखन आवडलं धनाजीराव. :)
तुला ते करण्यास उद्युक्त केल्याबद्दल वल्लीशेटचेही आभार. :)
टोणगा हा शब्दही फारा दिवसांनी ऐकला. लहानपणी येता जाता 'उद्धार' व्हायचा आमचा. ;)
15 Oct 2013 - 6:32 pm | arunjoshi123
बैल बडवणे पाहायला मला आजही जमणार नाही. एकदा कुतुहलाने पाहिले होते तेव्हा धीर धरुन शेवटपर्यंत थांबून र्हायलो. मग असा हळहळायला लागलो कि विचारता सोय नाही.
16 Oct 2013 - 11:07 am | खटपट्या
बैलाचा जन्म नकोरे बाबा
16 Oct 2013 - 12:56 pm | श्रीगुरुजी
>>> या प्रकाराला "बैल बडवणे" असे म्हणतात. ही शस्त्रक्रिया नसून खरं तर एक वाईट प्रकार असतो. नुकतंच वासरुपण संपलेल्या वयात आलेल्या खोंडाला खोडयात अडकवून आडवे पाडले जाते. त्याचे पाय जाड दोर्यांनी करकचून बांधले जातात आणि लाकडी हातोडयाने त्या खोंडाचे वृषण चेचले जातात. नंतर त्यावर हळद चोळली जाते.
या सार्या प्रकारामागे त्या खोंडाचे लैंगिक खच्चीकरण होऊन तो गायीच्या मागे जाऊ नये हा उद्देश असतो.
स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस इतका क्रूर आणि निर्दयी का होतो याचे मला कायम दु:ख वाटत आले आहे. बैल इतर प्राण्यांप्रमाणेच फक्त ठराविक दिवसातच माजावर येत असणार. तो काही वर्षाचे ३६५ दिवस गायीच्या मागे जाणार नाही. निसर्गनियमाप्रमाणे फक्त त्या ठराविक दिवसातच तो गायीच्या मागे जाणार असेल तर माणसाने त्याला इतक्या वेदना देऊन अत्याचार का करावा?
16 Oct 2013 - 1:27 pm | धन्या
असाच वाईट प्रकार गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर होतो. गायीचं किंवा म्हशीचं पिल्लू जन्माला आल्यानंतर तासभरात ठणठणीत होऊन उडया मारु लागतं. गाय/म्हैस व्यायल्यानंतर पहिल्यांदा जे दुध काढलं जातं ते खुपच घट्ट आणि चिकट असते. या पहिल्या दुधाला कोकणात चिक म्हणतात. या चिकापासूनच खरवस बनवला जातो.
मादी व्यायल्यानंतर तिच्या दुधावर तिच्या पिल्लाचा हक्क असतो. दुर्दैवाने हा नियम माणूस आपण पाळळेल्या प्राण्यांच्या बाबतीत पाळत नाही. गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर तिचे दुध काढले जाते. तिला पान्हा फुटावा म्हणून अगदी थोडा वेळ वासरु किंवा रेडकूच्या तोंडात त्याच्या आईचे आचळ दिले जाते. आनि नि जेमतेम अर्धा कप दुध ते पिल्लू प्यायले नसेल तर त्याला "आखडले" जाते म्हणजे आचळापासून दूर केले जाते. ते वासरु आपल्या आईच्या आचळापर्यंत जाण्यासाठी केविलवाणी धडपड करत राहते. पण माणसाच्या अमानुषतेपुढे त्याचे काही चालत नाही.
यावर दुधाचा व्यवसाय करणारे शेतकरी त्यातल्या त्यात एक व्यवहारीक तोडगा काढतात. गाय किंवा म्हशीच्या चार आचळांपैकी एका आचळाचे दुध तिच्या पिल्लाला पिऊ दिले जाते. उरलेले तीन आचळांचे दुध चरवीत काढले जाते.
16 Oct 2013 - 4:55 pm | चौकटराजा
आणि चरवीत दुधाची धार पडायला लागल्यावर चरवी सूर पकडते.जस जसे दूध साठत जाते मग चरवीचे गायन कमी होत जाते.
16 Oct 2013 - 5:15 pm | धन्या
छान बारकावा टीपलात. वरच्या पट्टीतील "चर्र चर्र" असा काहीसा आवाज असतो तो.
17 Oct 2013 - 3:36 am | अर्धवटराव
पशुपालन करणारे तो व्यवसाय म्हणुन करतात. चीकाला किंमत मिळते, ते पौष्टीक असते म्हणुन रेडकुच्या तोंडातला घास माणसाच्या तोंडी घातला जातो. असं प्रत्येक व्यवसायात होतं... प्रमाणाचा काय तो फरक. त्यात अमानुषपणा अजीबात नाहि. तो सच्चा माणुषपणाच आहे.
18 Oct 2013 - 4:24 pm | आनन्दा
तेव्हढं सगळं दूध वासराला पचतच असं नाही.
18 Oct 2013 - 4:30 pm | बॅटमॅन
माणूस असा वागतो की त्यापुढे अमानुष म्ह्ञ्जे वाईट ही अर्थच्छटाच बदलावी वाटते.
19 Oct 2013 - 1:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
निसर्गनियमाप्रमाणे बैल वर्षाचे ३६५ दिवस "माजलेला"च असतो. पण बॉटलनेक गायींमुळे येते. गायी ठराविक वेळी माजावर येतात तेव्हाच बैलांना संधी साधता येते. (बहुतांश प्राणीजगतात हेच होतं.) बाकीच्या वेळेस बैलाने काही करायचा प्रयत्न केल्यास गायी स्वत:च्या "शीलरक्षणा"साठी पुरेशा ताकदवान असतात. भाव न देणाऱ्या गायींच्या मागेमागे जाण्याची बैलांची नैसर्गिक वृत्ती नसते.
बैल बडवतात तो शेतीच्या कामांना उपयोगी पडावा म्हणून.
---
ही वर्णनं वाचून ज्यांना दूध नकोसं होत असेल त्यांनी सोयाचं दूध प्यावं. चहा, कॉफीत घालून पिण्याची माझी अजून हिंमत झालेली नाही; पण ब्रेकफास्ट सिरीयलमधे किंवा पेय म्हणून काही वाईट लागत नाही. पाव किंवा पोळीच्या कणकेतही सॉयचं दूध घातल्यामुळे चवीत फार फरक पडत नाही.
त्याशिवाय पोल्ट्रीत काय चालतं, कोंबड्या, नवजात कोंबडे यांचं काय होतं याची चौकशीही करू नये. व्हेगन आहाराच्या प्रसारासाठी जे माहितीपट बनवले जातात ते ही टाळलेले उत्तम.
शिवाय शेतीच्या यांत्रिकीकरणाचा पर्याय आता उपलब्ध आहे.
---
धनाजीशेठ, तुमच्या या वेगळ्या अनुभवांबद्दल जरूर लिहा.
19 Oct 2013 - 1:37 am | बॅटमॅन
विशिष्ट हंगाम सोडला तर बैल स्वतःहून गायीच्या मागे जातात याचा पुरावा असेल तरच बैल माजलेला असेल असे म्हणता येईल. तसा पुरावा आहे का?
19 Oct 2013 - 2:41 am | प्यारे१
त्यासाठी बैलाच्या मागे दावाकर्ता/कर्ती ला ३६५ दिवस तरी जावे लागेल असे दिसते. ;)
तुम्चं संख्या शास्त्र काहीच कसं सांगत नाही ब्यामॅशेट?
19 Oct 2013 - 3:34 am | बॅटमॅन
अहो विदा आणि निरीक्षणे असल्याखेरीज संख्याशास्त्र काहीच बोलत नै. त्याच्या नावाखाली कुणी तसे बोलत असेल तर नाइलाज आहे. "संख्याशास्त्र अॅब्यूजणे | जळो जिणे लाजिरवाणे ||" असे लोक म्हणून गेलेतच ;)
19 Oct 2013 - 9:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
जिवंत प्राणी, पक्षी, झाडांची एकमेव मूलभूत प्रेरणा असते, पुनरूत्पादन. आपली गुणसूत्र तगवणे, पुढच्या पिढीत पाठवणे. त्यासाठी जे काही "कष्ट, त्याग, बलिदान" करावे लागतात ते सगळे केले जातात. (ही नैसर्गिक प्रेरणा. मानवी मूल्यं निराळी.)
बहुतांश प्राणी जगत आणि सस्तन प्राण्यांमधे नर समागमासाठी नेहेमीच* तयार असतो. नरांना जास्तीत जास्त माद्यांशी संभोग करून आपली गुणसूत्र पसरवता येतात; माद्या कमी प्रजा तयार करतात पण उत्पन्न झालेल्या प्रजेची देखभाल करतात आणि आपली गुणसूत्र पुढच्या पिढीत पाठवतात. (या नर-मादी वर्गीकरणालाही अपवाद आहेत, पण कमी आहेत. आणि प्रस्तुत उदाहरण हा अपवाद नाही.)
बैल समागमासाठी, वीर्यासकट तयारच असतात. (चार गावांमधे एक रेडा पुरतो, हे त्यामुळेच.) पण गायी तयार नसतात. वासरू जन्माला आलं की गायी त्याची काळजी घेतात. हा काळ सर्वसाधारण प्राण्यांमधे वासरू स्वत: पुनरूत्पादनासाठी तयार होणं इतका असतो. (शेतकरी कुटुंबांमधले लोक या तपशीलाबाबत अधिक माहिती देऊ शकतील.) त्यानंतर गायी/माद्या पुन्हा माजावर येतात. बैलांच्या बाबतीत अशी डॉर्मंट स्थिती नसल्यामुळे त्याला माजवर येणं असं म्हणणं कितपत योग्य आहे याची मला कल्पना नाही. पण एकदा नर वयात आला की तो लैंगिकदृष्ट्या अॅक्टीव्हच असतो; कालवडींचं असं होत नाही. (लहानपणीच्या आठवणीनुसार) गायींचा असा विशिष्ट हंगामही नसतो. गायी कोणत्याही महिन्यात माजावर येऊ शकतात. एका वेळेला सगळ्या गायी माजावर आणि पुढे गाभण, असं दिसत नाही. लेख वाचून म्हशींच्या बाबतीत असं निश्चितच म्हणता येईल; एका म्हशीला माजावर यायला दहा (बारा नाही) महिने लागतात.
बैल बडवला की बहुदा (माणसाविरोधात, आज्ञा देणाऱ्याविरोधात) बंडखोरीची भावना उत्पन्न करणारी संप्रेरकं वृषणांमधे तयार होत नाहीत पण शारीरिक ताकद तशीच रहाते. त्यामुळे फार कष्ट न घेता माणसाला ही ताकद स्वत:च्या उपयोगासाठी वापरून घेता येते.
*एक समागम झाल्यावर वीर्य पुन्हा तयार होण्यासाठी जो काळ मधे जावा लागतो, तो वगळता. पण यालाही अपवाद आहेत. त्याचं वर्णनही सदर लेखात आलेलं आहेच. हा काळ माद्यांना माजावर यायला म्हणजेच पुढचं बीजांडं तयार (मच्युअर) होण्यासाठी लागणाऱ्या काळपेक्षा फारच कमी असतो. मनुष्यांमधे साधारण स्त्रियांना एक महिना लागतो, पुरुषांना फारतर एक दिवस.
---
हे फार त्रोटक लिहीलेलं आहे. पण gender evolution किंवा evolutionary psychology विषयावरच्या कोणत्याही मूलभूत पाठ्यपुस्तकांमधे याबद्दल फार तपशीलात माहिती मिळेल. मी सध्या हे पुस्तक वाचते आहे आणि त्यात या गोष्टी प्रयोगांसकट रंजकरित्या लिहीलेल्या आहेत.
19 Oct 2013 - 9:42 pm | बॅटमॅन
बाकी मीमांसा पटली. पण लैंगिकदृष्ट्या तयार असणे आणि गायीशी संभोगाचा प्रयत्न करणे हे दोन्ही एकच मानलेले दिसतेय. त्याला काय आधार? वीर्यासकट बैल १२ महिने तयार असतात हे रॉकेट सायन्स नाहीच. पण बैल जणू १२ महिने २४ तास गायींमागे धावतात आणि गायी त्यांपासून आपले संरक्षण करतात/करू पाहतात असा गैरसमज होऊ शकतो पहिली पोस्ट वाचून.
क्षमता असणे आणि ती वापरू पाहणे यातला फरक नजरेआड केला तर बायस तयार होतो. असो.
19 Oct 2013 - 10:00 pm | प्यारे१
ईट्स ऑल 'बिटवीन टु इअर्स' वगैरे वगैरे...! ;)
सातत्यानं एखाद्या गोष्टीवर विचार करणं नि तीच गोष्ट सातत्यानं करत राहणं ह्यामध्ये तत्वतः कोणताही फरक असत नाही असं विधान करावं का? :)
मुख्यत्वे मानसिक समाधान /असमाधान त्यावर अवलंबून असेल तेव्हा?
20 Oct 2013 - 1:09 am | बॅटमॅन
हा हा हा....तत्त्वतः जे असेल ते असो,या केसमध्ये फरक हा केलाच पाहिजे, नैतर कुणाबद्दल कामुक विचार सतत करत राहणे आणि प्रत्यक्ष त्या व्यक्तीवर बलात्कार करणे एकच अशीही तर्कटे निघतील नंतर ;) आणि समस्त
हस्त-जगन्नाथ अद्वैतवाद्यांवर बलात्कारीपणाची पाटी लागेल ते वेगळंच.
20 Oct 2013 - 4:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हे समजलं जातं तितकं खरं नाही असं अलिकडच्या काळातले काही psychologists मानतात. या विषयात उभी फूट पडलेली आहे, असं म्हणता येईल इतपत वेगवेगळी आणि टोकाची निरीक्षणं आहेत.
गायी-बैलांमधे लैंगिक बाबतीत मानसिक समाधान /असमाधान वगैरे काही असल्याचं मला माहित नाही. आपणांस माहित असल्यास संदर्भ वाचायला मला आवडेल.
स्वत:ची गुणसूत्रं पसरवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सर्व जीव करतात. ही नैसर्गिक प्रेरणा आहे. पण याचा जाणीवपूर्वक विचार अजिबात होत नाही. "मला मूल हवं" याचा विचार करताना कोणी मनुष्यही "चला, आपली गुणसूत्र ५०% का होईना, पुढच्या पिढीत पाठवू या" असा विचार करताना सापडलेला नाही. किंवा स्वत:च्या मुलांवर लोकांच्या मुलांपेक्षा अधिक माया करताना "याच्यात/हिच्यात माझी गुणसूत्रं आहेत म्हणून मी या पोराचं/पोरीचं अधिक कौतुक करते/तो" असं कोणी म्हणत असेल असंही मला वाटत नाही.
आपली गुणसूत्र पुढच्या पिढीत देऊन ही पुढची पिढी टिकवण्यासाठी कष्ट/अपत्यसंगोपन करण्यातून जे आपली सुटका करून घेतात, ते जास्तीत जास्त वेळा आणि प्राणी/व्यक्तींशी संभोग करतात. यात भावभावना, समधान/असमाधान याचा काहीही संबंध नाही. हा कोरडा व्यवहार आहे. मानवी मूल्यं, त्यातून येणाऱ्या चांगलं-वाईट या संकल्पना आणि भावभावना यांचा उत्क्रांतीजन्य वर्तनाशी काहीही संबंध नाही.
----
प्रस्तुत संदर्भ सोडून तुमचं विधान वाचल्यास, तुमच्या प्रश्नाचं उत्तर "फरक आहे" असं आहे. त्यातही समाधान/असमाधान यांचा काहीही संबंध नाही. अनेक लोकांच्या डोक्यात खून आणि अन्य प्रकारच्या गुन्ह्यांच्या फँटसीज असतात. अनेक लेखक आपल्या रागाला वाट करून देण्यासाठी कथा-कादंबऱ्यांमधे पात्राचा खून घडवून आणतात. पण प्रत्यक्षात एवढ्या प्रमाणात गुन्हे होत नाहीत.
पण पुन्हा एकदा, बैलांच्या फँटसीज काय असतात याचा अभ्यास कोणी केला असल्यास मला कल्पना नाही.
20 Oct 2013 - 3:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आपला असा समज का झाला हे समजण्यास जागा नाही. आधीच्या प्रतिसादाचा हा थोडा भाग:
बाकीच्या वेळेस बैलाने काही करायचा प्रयत्न केल्यास गायी स्वत:च्या "शीलरक्षणा"साठी पुरेशा ताकदवान असतात. भाव न देणाऱ्या गायींच्या मागेमागे जाण्याची बैलांची नैसर्गिक वृत्ती नसते.
बाकी sexual dimorphism, mating strategies वगैरे कीवर्ड्स शोधल्यास या विषयावर मुबलक संशोधन झालेलं आहे, आणि सुरू आहे त्याची माहिती मिळेल.
19 Oct 2013 - 7:56 am | मुक्त विहारि
"शिवाय शेतीच्या यांत्रिकीकरणाचा पर्याय आता उपलब्ध आहे."
लै भारी
15 Oct 2013 - 5:07 pm | जेपी
आमच्या गावात एक गवळ्याच घर आहे . शाळेत जातान त्याच्या घरावर लावलेली पाटी नेहमी दिसायची ,
` रेडा 20 रुपये `
हा नेमका काय प्रकाय आहे समजायला बरीच वर्ष लागली मला
15 Oct 2013 - 5:11 pm | प्यारे१
अनुभव'पूर्ण' लेख. :)
माज येणे म्हणा किंवा बडवणे म्हणा इतक्या सर्रास नि सहज वापरले जातात की त्यामागचा रोख बर्याचदा विसरलेला असतो.
15 Oct 2013 - 5:14 pm | पैसा
अगदी बारकी पोरेसुद्धा हा एखादा मनोरंजक प्रकार असल्यासारखी घोळक्याने उभी असायची हे पाहिले आहे. अर्थात त्यांना तेव्हा टीव्हीवरची हिंदी गाणी वगैरे बघायला मिळत नव्हती.
अनेक शब्द त्यांचा मूळ अर्थ विसरून वापरले जातात, "माज" हा त्यातलाच एक. पण मूळ अर्थ शोधायला गेलं तर तुम्ही अशा शब्दांच्या वाटेला पण जाणार नाही!
15 Oct 2013 - 5:15 pm | उपास
धन्याशेठ मस्त लिहिलय, अग्दी अनुभवाने शाबित..!
15 Oct 2013 - 5:26 pm | प्रचेतस
हुर्र हुर्र हुर्रे
लिहिल्याबद्दल धन्स रे:)
15 Oct 2013 - 5:35 pm | प्यारे१
उधळणे ते हेच का? :P
15 Oct 2013 - 8:05 pm | प्रचेतस
:)
15 Oct 2013 - 5:37 pm | चौकटराजा
एक वेगळ्याच विषयावरचा लेख. आपल्याला पेढे बर्फी खाणं फार सुखावह वाटतं. पण त्यांची ही कूळकथा कुणाला माहितै ?
लेख आवडला. दुध उप्तादनाचे चक्र ही माहिती नवी आहे.
15 Oct 2013 - 5:50 pm | वेताळ
कोल्हापुर भागात ह्याला काठी लावणे असे म्हणतात. रेड्याचा उपयोग शेती कामापेक्षा माजावरील म्हशीला शांत करण्यासाठी रेड्याचा वापर पुर्वी केला जात होता. सरकार दरमहा ५०० रुपये रेड्याचा चारा खर्च अजुनही ग्रामीण भागातील रेडा मालकांना देत आहे.
आजकाल म्हशी किंवा गायी गाभण घालवण्यासाठी मुरहा जातीच्या वळुचे वीर्य ट्युब मधुन म्हैशीच्या गर्भाशयात सोडले जाते. साधारण एक दोन प्रयत्नात म्हैस गाभण राहते.परंतु काही म्हैशी ह्या प्रकारात गाभण रहात नाहीत त्याना रेडा दाखवणे एकच पर्याय राहतो.मानव स्वःताच्या फायद्यासाठी जनावरांना त्याचे साधे नैसर्गिक सुख देखिल भोगु देत नाही
15 Oct 2013 - 8:44 pm | मुक्त विहारि
"मानव स्वःताच्या फायद्यासाठी जनावरांना त्याचे साधे नैसर्गिक सुख देखिल भोगु देत नाही"
नि:शब्द
15 Oct 2013 - 5:51 pm | मुक्त विहारि
आवडला.
(आता गाई-म्हशींच्या पण जाती प्रजाती असतात हे वाचल्यावर काही जण मुद्दाम गहन विचार करून इथे आले नाहीत म्हणजे मिळवली...)
15 Oct 2013 - 5:57 pm | arunjoshi123
लहानपणीच्या स्मृती जाग्या झाल्या. लेखकाचा मेंदू अगदी लख्ख प्रकाशासारखा आहे, इतकं व्यवस्थित समराईज केलं आहे.
निगडीत आठवणी -
१. लातूरला रेड्याला हाल्या म्हणतात. भरवश्याच्या म्हशीला हाल्या!
२. अण्णांनी दिवसात एकदा हा शब्द म्हटला नाही असा दिवस आठवत नाही.
३. बायकांना मूलगा झाल्यावर आनंद होतो, तेव्हा म्हशींनाही मुलगा (लातूरच्या भाषेत वंट्रू)व्हावा असे मला वाटे. गायी म्हशींच्या बाळंतपणापूर्वी (शब्द चुकला वाटतं) ब्राह्मण बोलतात ते खरे होते म्हणून मला शेतकरी काय होणार विचारत. मी कालवड न म्हणता वंट्रू म्हणे तेव्हा ते फार नाराज होत.
४. गर्भ बाहेर निघण्यापूर्वी मला गायी म्हशींच्या योनीभागाला स्पर्श करायला सांगत. त्याने डेलिव्हरीत तो गर्भ मरणार नाही, इ इ त्यांना वाटे.
५. गाभणला लातूरकडे गाबा घालणे इ इ म्हणतात.
६. माझ्या मित्राच्या वडिलांनी अशा बाळंतपणास मला खास बोलावले होते. 'हीला कुणी गाबा घातला?' च्या त्यांच्या मित्रांच्या उत्तराला ते सांगत होते कि हे तिच्याच वंट्राचे काम आहे (भाऊच बाप). त्यावेळी गायीसारख्या पवित्र प्राण्याबाबत असे व्हावे म्हणून मी कितीतरी वेळ अस्वस्थ होतो.
७. 'प्रियंका गांधी यांनी युवा काँग्रेसमधे प्रवेश घेतला' या बातमीनंतर (१९९२?+-)वडीलांच्या एका मित्राकडून मी एक भयंकर खवचट प्रतिक्रिया ऐकली होती.(इथे लिहू धजत नाही.) ते वाक्य आयुष्यात कधी विसरणार नाही. एक मोठा, प्रसिद्ध माणूस बनण्याचं माझं व्यक्तिगत स्वप्न मी त्या वाक्यानंतर गुंडाळलं.
15 Oct 2013 - 8:34 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
__/\__!!
15 Oct 2013 - 8:42 pm | भ ट क्या खे ड वा ला
दादांचा रेडा लावण्याचा व्यवसाय असतो, एक माणूस रोज म्हशीला घेऊन यायचा आणि त्याचा नंबर आला कि दादा 'बंद' ची पाटी लावायचे असा प्रसंग आहे .
हा गृहस्थ घरी गेला कि कारभारीण विचारायची "झाल का काम "
हा निराश होऊन नाही असे सांगायचा
एक दिवस आज काही झाल तरी काम फत्ते करायचं अस thrvun हा jato
दादा yacha नंबर aalyavr "बंद" ची पाटी lavtat
गृहस्थ आणि दादा यांची जुंपते ,दादा त्याला आत घेऊन जातात.
आत तोंडाला फेस आलेला रेडा दिसतो
म्हशीला घेऊन घरी पोचताच कारभारीण विचारते झाल का काम ,हा नाही सांगताच
कारभारीण : तो रेडा पण तुमच्या सारखाच अवसानघातकी असे उद्गारते.
कोणाला यात काही असभ्य वाटल्यास, संपादक मंडळी हि प्रतिक्रिया "बंद" करा
15 Oct 2013 - 8:47 pm | भ ट क्या खे ड वा ला
तिला कोकणात गौरीचे हात असे हि नाव आहे
या वनस्पतीचा कंद कापून त्याचा रस हाताला चोळून गाई म्हशी च्या गर्भ बाहेर येण्याच्या जागेला चोळतात यामुळे कला येण्यास मदत होते म्हणून हि "कळलावी"
आजकाल या वनस्पतीच्या बियांना फार मागणी आहे
पोटात गेल्यास विषारी आहे
15 Oct 2013 - 9:09 pm | बिपिन कार्यकर्ते
वा!
15 Oct 2013 - 9:58 pm | सुधीर
नवीन माहिती मिळाली. शहरात आयुष्य गेल्यामुळे या गोष्टी माहीत नव्हत्या.
16 Oct 2013 - 10:46 am | सुमीत भातखंडे
नवीन माहिती मिळाली तुमच्यामुळे. लिहिलयही छान
16 Oct 2013 - 10:52 am | मृत्युन्जय
मस्त जमला आहे लेख. प्रतिक्रिया देखील उद्बोधक. अश्लील वाटु शकणारा विषय नीट हाताळला आहेस याबद्दल अभिनंदन.
16 Oct 2013 - 11:54 am | मनीषा
माझ्या माहितीतील एक प्रतिष्ठित, सभ्यं, सदगृहस्थ .. घरातील आजीपासून नातवापर्यंत सार्यांना सांगायचे, "खाऊन माजा रे.. टाकुन माजू नका" . :(
16 Oct 2013 - 2:32 pm | किसन शिंदे
ओ तै, लेखातल्या शब्दाचा अनं तुमच्या माहीतीतल्या शब्दाचा वेगळा वेगळा अर्थ आहे.
16 Oct 2013 - 4:48 pm | धन्या
माज या मराठी शब्दाचा एकच अर्थ आहे.
31 Aug 2015 - 5:21 pm | प्रसाद गोडबोले
ह्यावरुन आठवले " माजघर " ह्या शब्दाची व्युत्पत्ती ही ह्याच माज शब्दावरुन झाली असावी काय ?
=))
31 Aug 2015 - 6:15 pm | बॅटमॅन
खी खी खी =)) =)) =))
(हे संस्थळची माझे माजघर वाले आयडी आठवून चिक्कार कर्मणूक जाहली =)) )
16 Oct 2013 - 12:37 pm | नंदन
लेख आणि प्रतिक्रिया - दोन्ही भन्नाट!
16 Oct 2013 - 1:19 pm | प्रसाद गोडबोले
छान माहीतीपुर्ण लेख आहे ...
16 Oct 2013 - 1:27 pm | झकासराव
चांगला लेखं :)
बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
बैल दाखवणे / रेडा दाखवणे (खरतर बैल दावायचा हाय / रेडा दावायचा हाय ही उच्चारी वाक्ये)
हा प्रकार एका उन्हाळ्याच्या सुट्टीत अगदीच अनपेक्षीतपणे सकाळी सकाळी पहायला मिळाला. (सातवीत असेन बहुतेक)
मग त्या सर्व प्रकाराची माहिती मावसभावाने दिली. तोपर्यंत मलाही माहिती नव्हते..
गुरं चारायला नेणे हा सुट्टीतील अत्याधिक आनंदाच काम होतं.
16 Oct 2013 - 1:58 pm | बॅटमॅन
एक म्हटले तर भाबडी शंका. शेतीसाठी बैलाचे वृषण फोडणे हे तितके गरजेचे आहे का? विशेषतः प्रजननाचा हंगाम फिक्स असताना? म्हशीच्या मारलेल्या रेडकाच्या कातड्याचा वास देऊन पान्हा फुटवणे हाही प्रकार तसाच.
अशा काही गोष्टी न केल्या तरी चालणार नाही का? की करणे अपरिहार्य असते?
16 Oct 2013 - 2:10 pm | धन्या
तुमच्या प्रश्नांची उत्तरे दुर्दैवाने माहिती नाहीत. जेव्हा त्या वातावरणात होतो, ज्या वयात होतो त्या वयात असले प्रश्न कधी पडलेच नाहीत. आता कुणाला तरी विचारावे लागेल. अचुक उत्तरे नाही मिळाली तरी तसं करण्यामागे त्यांची काय धारणा किंवा समजूत होती हे कळेल.
या निमित्ताने दया पवारांच्या एका कवितेतील ओळी आठवल्या:
कशाला झाली पुस्तकांशी ओळख
बरा ओहोळाचा गोटा
गावची गुरे वळली असती
असल्या इंगळ्या डसल्या नसत्या
16 Oct 2013 - 2:25 pm | बॅटमॅन
धन्यवाद. उत्तरांच्या प्रतीक्षेत आहे.
बाकी दया पवारांच्या ओळींच्या मूळच्या नव्हे परंतु प्रस्तुत संदर्भातील अर्थाने सहमत.
16 Oct 2013 - 2:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
वृषण फोडणे अमानूष आहे यात काही संशय नाही. ही पद्धत ज्यांना माजात आल्यावर सांभाळणे कठीण जाते अश्या सर्व पाळीव प्राण्यांत वापरली जाते असेच दिसते. नॉर्वेत स्लेजला जुंपलेल्या रेनडियरसंबंधातही हेच करतात असे समजले... नाहीतर काम (work या अर्थाने) सोडून नर एकमेकाशी झुंज घेण्यातच सगळा वेळ घालवतात म्हणे.
16 Oct 2013 - 4:34 pm | आनन्दा
हेच म्हणायला आलो होतो... आणि असेहि म्हणतात, की त्यामुळे जनावर कष्टाळू होते. आणि न थकता काम करण्याचा स्टॅमिना वाढतो.
19 Oct 2013 - 9:29 pm | पैसा
कुत्र्या-मांजरांची सुद्धा Neutering ऑपरेशन करतात. मग बैल, घोडा अशा मोठ्या प्राण्यांवर नाही का करत?
16 Oct 2013 - 3:00 pm | अभ्या..
वाटल्यास त्याला महाराजाच्या मठातील मांजरीचा सिध्दांत लावू शकतोस. ;)
कदाचित अनुभवाचे बोल पण असतील.
(एक छोटे उदाहरण आहे नात्यातच. एक लहान मुलगी आईने जवळ घेऊन झोपल्याशिवाय झोपायचीच नाही. नंतर नंतर फक्त आईची चादर असली कीच झोपायची. आता त्या चादरीचे बोंदरे झाले आहे. एक सुताचा छोटा गठ्ठा याशिवाय त्याला काही रुप नाही. ती मुलगी सध्या एमबीबीएस करतेय :) अजूनसुध्दा तिच्या ब्यागेत कायम असते. )
त्या पान्हा फुटवायच्या नकली रेडकाला पण कायतरी सॉलीड शब्द आहे. आठवला की सांगतो.