मित्रहो
आपण सर्वांनी Gas Cylinder च्या बाबतीत जागरूक असले पाहिजे या दृष्टीने मी आज एक गोष्ट महित झालि आहे ती तुम्हाला सांगू इच्छितो. आपण स्वतः बरोबर इतरांनाहि जागरूक करावे.
आपल्या रोजच्या वापरत येणारा Gas Cylinder हा कोणत्या दिवसा पर्यन्त कार्यक्षम राहाणार आहे हे कसे ओळखावे ते पहा.
१) Cylender च्या volve च्या भोवती ज्या 3 पट्ट्या असतात त्यावर A B C D अशा खुणा असतात आणि ज्या वर्षी Cylender expire होणार त्याचे वर्ष छापलेले असते. आकृती मध्ये पिवळ्या वर्तुळातील खुणा पहावी. म्हणजे जसे कि A /१२, किंवा D/१५ यापैकी पहिले A B C D म्हणजे वर्षाचे चार भाग केलेले असतात. म्हणून A म्हणजे जाने. फेब्रु. मार्चं आणि B म्हणजे एप्रिल मे जून होय तर "C" म्हणजे जुलै ,ऑगस्ट,सप्टेम्बर, आणि D म्हणजे ऑक्टोबर,नोव्हे.,डिसेंबर होय.
आता A /१२ म्हणजे तो Cylender साल २०१२ च्या जाने. फेब्रु. मार्चं पर्यंतच कार्यक्षम आहे. त्या नन्तर तो पुन्हा वापारात यायला नकोय असा होतो. आणि जर तुम्हाला असा Expiry date नन्तर ही भरलेला गॅस आढळला तर तो सुरक्षित रित्या वापरण्यास अयोग्य आहे असा होतो. तेव्हा पुढच्या वेळी गॅसवाला दारात आला असता प्रथम ती पट्टी तपासून पहावी.म्हणजे पुढील होणारा अपघात टाळ्ता येईल.
धन्यवाद!
प्रतिक्रिया
15 Oct 2013 - 1:19 pm | arunjoshi123
धन्यवाद
15 Oct 2013 - 1:25 pm | अनिरुद्ध प
माहिती साठी आभार
16 Oct 2013 - 8:13 pm | ताल लय
धन्यवाद
16 Oct 2013 - 8:17 pm | बलि
माहितीबद्दल धन्यवाद
याबद्दल रीतसर माहिती संबंधित अधिकार्यापर्यंत गेल्यास दुसर्या कोणाला हा सिलिंडर जाणार नाही
17 Oct 2013 - 11:15 pm | आनंद
सिलिंडर तयार करणार्या कंपन्या आणि फिलींग स्टेशन यांच्याशी संबध आल्या मुळे इतके सांगु शकतो कि अशी चुक होणे खुपच दुर्मिळ घटना असेल.
18 Oct 2013 - 10:08 am | नितिन थत्ते
सहमत आहे.
शिवाय ती तारीख म्हणजे सिलिंडर पुनर्तपासणी करण्याची तारीख असते. सिलिंडरचे आयुष्ञ संपल्याची तारीख (एक्सपायरी डेट) नसते.