१
दम लिया था न क़यामत ने हनोज़
फिर तेरा वक्त़-ए-सफर याद आया.
आस्वाद
यात गालिब असे म्हणतोय की मी आज कयामत (जगाचा शेवट होइल तो अखेरचा दिवस) आली आहे आणि तीची भीषणता मी अनुभवतोय आणि ती नुकतीच संपली आहे की अचानक मला परत एकदा तुझ्या बरोबर व्यतीत केलेल्या काळाची ( वक्त़-ए-सफर) ची आठवण आली.म्हणजे तो काळ ही माझ्या साठी कयामत पेक्षा काही कमी भीषण नव्ह्ता.तुझ्या बरोबर चा तो प्रवास हा ही असाच मला प्रचंड दु:ख देणारा होता आणि असाच ध़़्क्कादायक होता.
२
जिन्दगी यु भी गुजर ही जाती
क्यु तेरा रहगुज़र याद आया.
आस्वाद
अर्थ असा की माझ जिवन तर असही आणि तसही चालुच होत आणि ते तस चार चौघांप्रमाणे संपुन ही गेल असत पण झाल काय की मला तुझ्या घराची वाट आठवली आणि मग काय परत एकदा माझा त्याच मला वेदना देणार्या वाटेवर माझा प्रवास सुरु झाला तर ते तक्रार करतात की का मला तुझी वाट आठवली.
३
क्या ही रिजवॉ से लढा़ई होंगी
घ्रर तेरा खुल्द मे अगर याद आया.
आस्वाद
हा सुंदर शेर आहे यात गालिब गमतीने असे विचारतात की जर मी मेल्यानंतर जेव्हा स्वर्गात (खुल्द-स्वर्ग) पोहोचेल.(बघा काय confidence आहे साहेबांचा नरकात जाण्याचा प्रश्न च नाही) तेव्हा जर तिथे स्वर्गात जर मला तुझे घर आठवले आणि मग मी तुला भेटायला अधीर झालो. तर काय माझी तिथल्या guards शी ( रिजवॉ -स्वर्गा चा पहारेकरी) लढाई होणार की काय? म्हणजे तो रिजवॉ काही मला तिथुन बाहेर येउ देणार नाही आणि मी त्याच्या शी भांडेन.( आणि एक तुझ्या घरा पुढे स्वर्ग ही तुच्छ च आहे)
४
कोइ वीरानी सी वीरानी है
दश्त को देख के घ्रर याद आया.
आस्वाद
या अप्रतिम शेर मध्ये गालिब असे म्हणतो की एक माझ्या घराची वीरानी (निर्जनता, एकाकी भयाण भासणे) अशी काही आहे की अगदी एका जंगला सारखी च कारण जेव्हा मी जंगलात गेलो तर ते दश्त ( जंगल) बघुन त्याची निर्जनता भयाण शांतता बघुन गालिबला आपले अगदी तसेच विरान झालेले ओसाड झालेले घर आठवले (जसे कवि ग्रेस चे घर थकलेले संन्यासी) आणि त्यातील भयाण शांतता (निरव नव्हे) आठवली.
५
मैने मजनु पे लडकपन मे "असद"
संग उठाया था की सर याद आया.
आस्वाद
या सुंदर शेर मध्ये गालिब म्हणतो की मी (असद- असद उल्ला खॉ गालिब) पोरकटपणाने अल्लडपणे ( लडकपन मे) मजनु ला मारण्यासाठी हातात दगड उचललाच होता की मला माझ्या स्वतःचच डोक आठवल. हे प्रतिकात्मक आहे की जस मजनु हा प्रेमात पुर्णपणे वेडा झालेला आहे (आणि निरागस वेड्यांना दगड मारणे ही आपली शहाणी परंपरा आहे) आणि जेव्हा त्याला दगड मारायला गेलो तर मला जाणिव झाली की अरे हा तर माझ्या च डोक्याला लागणार कारण मी स्वतः मजनु च तर झालेलो आहे गालिब ला मजनु त स्वतःचेच प्रतिबिंब दिसले.गालिब स्वतःला मजनु शी identify करत आहे दोघांच passion सारखच तर आहे. गालिब ही आपल्या प्रेयसीच्या प्रेमात आकंठ बुडालेला आहे
थोडा शब्दच्छ्ल
कयामत का दिन - हा इस्लाम मध्ये एक असा दिवस मानला जातो की या दिवशी जगाचा अंत होणार आणि प्रत्येक माणसाच्या पाप-पुण्याचा हीशोब या दिवशी मांडला जाणार.इंग्रजी त याला doomsday म्हणतात याचा मुबलक वापर शायर लोक करतात. जसे की "हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक खुदा करे के कयामत हो और तु आये" किंवा गालिब जसे म्हणाला होता एका शेर मध्ये जाते हुए कह्ते हो के कयामत को मिलेंगे क्या खुब क्या कयामत का दिन है कोइ ओर? (तुझ कायमच जाण हीच मोठी कयामत आहे आता याहुन मोठी कयामत काय होणार) हा गालिब ज्यावर अत्यंत जीवापाड प्रेम करीत होता अशा त्याच्या एका पुतणच्या अगदी कोवळ्या वयात झालेल्या मरणानंतर लिहेलेला शेर आहे ) त्याचे नाव आठवत नाही बहुधा आरिफ होते त्याच्यावर एक पुर्ण गझल च लिहीलेली आहे.
प्रतिक्रिया
13 Oct 2013 - 10:09 am | माझीही शॅम्पेन
वाह क्या बात है - इर्शद दसर्याची मेजवानी आताच सुरू झाली अस वाटताय !!!
इथे थोडी गडबड आहे का मला अस वाटल कयामत थोडी उसंत घेते ना घेते तर तर तुझा बरोबर व्यतित केलेला काळ आठवून आणखीन व्याकुळ झाल अस असाव ?
14 Oct 2013 - 6:05 pm | गुल-फिशानी
मी आपले लक्ष हनोज या शब्दाकडे वेधु इछितो या ला केंद्रीत करुन अर्थ लावा बघा तो म्हणतो की अजुन ही पहीली कयामत ने अभि तक तो दम ही लिया था की तुझा तो प्रवास आठ्वला आंणि मग दुसरी कयामत सुरु झालि एक प्रकारे जिच्या समोर ही काही च नाही.
14 Oct 2013 - 1:08 am | चाणक्य
बरोबर. आरिफ च होते त्याचे नाव. पूर्ण गझल नाहिये पण त्यातले २ शेर माहिती आहेत -
लाजिम था की देखो मेरा रस्ता कोई दिन और |
तनहा गये क्यों अब रहो तनहा कोई दिन और ||
अर्थ- अरे जग सोडण्यापूर्वी काहि दिवस तरी माझी वाट पहायची होतीस. आता तिथेसुद्धा तुला काही दिवस एकटे रहावे लागेल
हाय! ए फल्क-ए-पीर ! जवां था अभी आरिफ |
क्या तेरा बिगडता, जो न मरता कोई दिन और ||
अर्थ- अरे काळा, आरिफ तर तरूण होता. आणखी काही दिवस थांबला असतास तर तुझ काय बिघडलं असतं.
14 Oct 2013 - 5:51 pm | गुल-फिशानी
चाणक्यजी
मला आरिफवरची ही गझल सापडली फारच सुंदर आहे सर ही गझल हे बघा यातील च आणखी २ शेर
तुम माह-ए-शब-ए-चार दुहुम थे, मेरे घर के
फिर क्यु ना रहा घर का वो नक्शा कोइ दिन और.
अर्थ- तुम तो मेरे घ्रर के (माह-ए-शब-ए-चार दुहुम = चौदहवी के चाँद थे) तो मेर घ्रर का ये खुशी का माहौल कुछ और दिन क्यु नहि रहा? (तुम इतने जल्दी क्यो चल बसे)
नादॉ हो जो, कह्ते हो ,कि क्यो जीते हो गालिब
किस्मत मे है, मरने की तम्मना कोइ ( कुछ) दिन और
अर्थ- लोक मला वेड्यासारख विचारतात की जर एवढा दु:खी आहेस तरी का अजुनही जगतोस? तर तो म्हणतो की आता काय सांगु यांना माझ्या नशिबात ही मरण्याची इछा देखील कुठे लगेच पुर्ण होणार या इछे च्या पुर्ति साठी ही काही दिवस वाट पाहण माझ्या नशिबी आहेच की.(मरने की तम्मना कुछ दिन और दिल मे रखना है)
14 Oct 2013 - 11:09 am | मिसळलेला काव्यप्रेमी
हे वाचून मला माझी हि रचना आठवली:
तुमचे लेखन परत एकदा गालिब छळायला लागलाय.
14 Oct 2013 - 5:55 pm | गुल-फिशानी
मि.का. जी
मै आपसे फिर एक बार गुजारिश करता हु के आप गालिब की सीरिज फिर से शुरु कीजीए मजा आएगा!
14 Oct 2013 - 4:24 pm | पैसा
मस्त! या निमित्ताने आणखीही शेर वाचायला मिळत आहेत. धन्यवाद!
14 Oct 2013 - 5:57 pm | गुल-फिशानी
ज्योति कामतजी
आपकी हौसला अफ्जाइ के लिए तहे दिल से शुक्रिया !