( अजोबांची काठी )

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जे न देखे रवी...
16 Jul 2008 - 12:40 pm


'गुळाचा गणपती' या चित्रपटातील पं. भिमसेन जोशी यांनी गायलेले माझे अतिशय आवडते गाणे
' इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, ज्ञानेशाची '
त्याच चालीत पण एका वेगळ्या शब्दात मांडायचा प्रयत्न
-----------------------------------------------------------------------

अजोबांची काठी, घेऊन चालती
साथ देती काठी, संध्याछायी !!

अजोबांचा नातू, खेळतो काठिनं,
धावती उत्साहानं, मागे पुढे.!!

मागे पुढे दाटे आठवणींचा मेळ
कुटुंबाला आधार आजोबांचा !!

सोडुन राहिले पाश तेची सर्व
निवृत्ती- वेतन, आजीबाई !!
--------------------------------------------------------------------------
मुळ गाणे -

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी, ज्ञानेशाची

ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव
नाचती वैष्णव, मागेपुढे

मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड कैवल्याचे

उजेडी राहिले उजेड होऊन
निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई

गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - पु. ल. देशपांडे
स्वर - पं. भीमसेन जोशी
चित्रपट - गुळाचा गणपति (१९५३)

विडंबनप्रकटन

प्रतिक्रिया

ईश्वरी's picture

16 Jul 2008 - 1:38 pm | ईश्वरी

इंद्रायणी काठी ....फारच सुंदर गाणे आहे. विडंबनाने तेवढी मजा नाही आणली.
बाकी --
अजोबांची काठी, घेऊन चालती
साथ देती काठी, संध्याछायी !!
अजोबांचा नातू, खेळतो काठिनं,
धावती उत्साहानं, मागे पुढे.!!
या ओळी जमल्या आहेत.

तुमच्या या विडंबनावरून लहानपणी वाचलेली ही कविता आठवली --
आजोबांची काठी घोडा घोडा ,
आजोबांच्या मिशा ओढा ओढा
खुशीतले आजोबा घेतात गालगुच्चा
मलाच म्हणतात लबाडलुच्चा---
ईश्वरी

अमोल केळकर's picture

16 Jul 2008 - 1:46 pm | अमोल केळकर

आपल्या मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!
पुढच्या वेळेला काळजी घेईन.

( शिकाऊ विडंबनकार ) अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विसोबा खेचर's picture

17 Jul 2008 - 8:14 am | विसोबा खेचर

केळकरसाहेब, नेहमी येते तशी मौज या टायमाला काही आली नाही!

असो, पुलेशु...

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jul 2008 - 8:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजोबांची काठी, घेऊन चालती
साथ देती काठी, संध्याछायी !!

मस्त !!!

बकुळफुले's picture

17 Jul 2008 - 2:51 pm | बकुळफुले

केळकर साहेब
काही मजा आली नाही.
सुधारणेला खूपच वाव आहे