शनिवार असल्याने गाडीला तुरळक गर्दी होती. पुढील स्टेशनावर मला उतरायचे असल्याने मी दरवाजातच उभा होतो. एवढ्यात माझ्या बाजूला दोन्ही पायाने अपंग असलेला एक तरुण मुलगा आपली चारचाकी ढकलगाडी (Trolly )घेवून दरवाजाजवळ येवून बसून राहिला. त्यालाही पुढील स्टेशनावर उतरायचे होते. डब्यातील सर्वांचे लक्ष त्या मुलाकडे लागले होते काहीजण कुतूहल म्हणून तर काहीजण चिंता म्हणून. कारण जे त्याच्या मागे येवून उभे राहिले होते ते हा कधी उतरणार आणि त्यानंतर मग आपल्यला कधी उतरायला मिळणार याच चिंतेत होते. त्याला मात्र त्याची फिकीर नव्हती, तो बिनधास्त होता. आपल्याला मिळालेली चिल्लर रक्कम हातात खुळखुळवत बाहेरील पळणारी दृश बघत होता. आता गाडीचा वेग मंदावला कारण पहिला डबा स्टेशनात शिरत होता.
तसा तो पैसा खिशात ठेवून उतरण्यास सज्ज झाला. एक हात दरवाजाला धरून एका हातात त्याने ढकलगाडी (Trolly ) घेतली. गाडीचा वेग आता हळूहळू कमी होत असतानाच त्याने विजेच्या चपळाईने फलाटावर ढकलगाडीसकट उडी मारली आणि ती ढकलगाडी आपल्या बुडाखाली ठेवून तो तिच्यावर स्वार झाला आणि आम्ही सर्व उतरे पर्यंत दोन्ही हाताने रेटा देत पुढील डब्याकडे रवाना झाला. आता त्या डब्यातील सर्व माणसे चढून झाल्यावर त्याने त्याच चपळाईने उलट क्रिया केली आधी त्याने ढकलगाडी आत ठेवली व मधल्या खांबाचा आधार घेत त्याने आपले बूड आत टेकले.
हा प्रकार फक्त २० ते २५ सेकंदात झाला. कारण प्रत्येक फालाटा वर गाडी एवढा वेळच थोड्या फार कमी अधिक फरकाने थांबते. धडधाकट पाय असून सुद्धा ज्यांना गाडीत निट चढता, उतरता येत नाही तिथे हा अपंग मुलगा सराईत पणे आपला प्रवास या मुंबईच्या धकधकीच्या आणि धक्का धक्कीच्या जीवनात रोज करतो. आपल्या रोजच्या रोजीरोटीसाठी सगळेच जण मेहनत करत असतात. याच जगण्यासाठी त्याची चाललेली धडपड, जिद्द आणि उमेद याला माझा सलाम!
प्रतिक्रिया
7 Oct 2013 - 4:18 pm | अनिरुद्ध प
अनुभवाचे यथायोग्य वर्णन्,धन्यवाद पु ले शु
8 Oct 2013 - 10:44 pm | आदूबाळ
+१
7 Oct 2013 - 4:48 pm | मदनबाण
ह्म्म... हे बर्याच वेळा पाहिले आहे. या लोकांची ती ढकल गाडी मात्र सर्वांनकडे सारखीच आहे असे का कोणास ठावुक पण वाटते.लहान आंधळी मुले हातात टिपर्या घेउन गाणं म्हणत पैसे मागतत्,काही आंधळे मात्र एखीदी चीजवस्तु विकताना आढळुन येतात... कधी कधी वाटते यांना कोणी जबरदस्तीने पैसे मागायला तर लावत नसेल ना ? {याची शक्यता वाटते खरी !)तसेच खांद्यावर एखाद तान्ह झोपलेल मुल आणि हातात छोट्या ताटलीत कुंकवान माखलेल्या देवीची तसबीर घेउन पैसे मागणार्या स्त्रीया देखील पाहिल्या आहेत.
जाता जाता :- जो पर्यंत शरिरात प्राण आहे आणि पोटात भूक तो पर्यंत जगण्याची धडपड ही करावीच लागते !
8 Oct 2013 - 3:46 am | स्पंदना
आई ग!
एकदा नखरा म्हणुन नेसलेली साडी माझ्या आधी आत गेल्याने मला ट्रेनमध्ये ओढलेली आठ्वते आहे लेडीज डब्यात. हे रडु फुटल होतं.
8 Oct 2013 - 3:50 am | फारएन्ड
सलाम अशा लोकांना!
8 Oct 2013 - 10:46 am | मदनबाण
पोटासाठी वेगवेगळी कामे माणसाला करावी लागतात ! मध्यंतरी तू-नळीवर असाच एक व्हिडीयो माझ्या पाहण्यात आला होता. मोठ्या स्कायस्क्रेपरवर जे उंच टॉवर बांधलेले असतात त्यात लाल दिवा बसवलेला असतो ते बदलण्याचे काम जे कामगार करतात ते फारच भितीदायक वाटते. त्यांच्या डोक्यावरच्या टोपीत बसवलेल्या कॅमेराने हा व्हिडीयो रेकॉर्ड करण्यात आला आहे.
9 Oct 2013 - 10:22 am | दादा कोंडके
असहमत. तो स्वाभिमानाने कष्ट करून खात असेल तर सलाम-बिलाम. जास्त *भीक मिळते म्हणून या स्टेशना वरून त्या स्टेशनावर स्टंट करत विनातिकिट प्रवास करत असेल तर कसलं कौतुक? मग भलेही तो फिजिकली चॅलेंज्ड असला म्हणून काय झालं? याच न्यायानं उद्या भर गर्दीत वेगात जाणार्या वाहनाची पर्वा न करता लहानग्यांना कडेवर घेउन (हाय पोटेंशिअल असलेल्या गिर्र्हाइका समोर ती रडावीत म्हणून प्रसंगी त्यांना चिंमटा घेउन) सिग्नलला भीक मागणार्या बायकांनाही सलाम कराल.
*
यावरून तो भिकारी असावा असं वाटतं. तसं नसल्यास वरचा प्रतिसाद बिनशर्त मागं घेतो.