खेळी.

स्वाती फडणीस's picture
स्वाती फडणीस in जे न देखे रवी...
15 Jul 2008 - 2:22 pm

खेळी.

पळत होते मी........
नियती चकवत होती.

तेजाळ कवडसे!!
कधीच हाती न येणारे.

मग ठरवल,
बास!.
आता नाही पळायचे,
पुरे झाला उन-सावल्यांचा खेळ,
आणि थांबले.
एका जागी निश्चल.
जिंकल्या सारखी.
:
:
:
खुप उशिरा कळलं,
ती ही तिचीच खेळी.

पुन्हा बरोबर पडलेली.

========================
स्वाती फडणीस......................१९-०१-२००८

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

15 Jul 2008 - 2:44 pm | आनंदयात्री

नियतीने केलेला गेम आवडला.
छान कविता.

केशवसुमार's picture

15 Jul 2008 - 2:53 pm | केशवसुमार

स्वातीताई ,
खूप छान कविता.. खेळी आवडली
नेहमी प्रमाणे आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचा
(खेळकर)केशवसुमार

स्वाती फडणीस's picture

15 Jul 2008 - 3:51 pm | स्वाती फडणीस

सुंदर विडंबन
आवडले..

ऋषिकेश's picture

15 Jul 2008 - 3:54 pm | ऋषिकेश

सुंदर ओळी!
एकदम आवडून गेल्या! मस्त
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

स्वाती फडणीस's picture

15 Jul 2008 - 5:16 pm | स्वाती फडणीस

:)मनापासून आभार

चतुरंग's picture

15 Jul 2008 - 5:57 pm | चतुरंग

वेगळा विचार आवडला!:)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

16 Jul 2008 - 11:02 am | विसोबा खेचर

हेच म्हणतो..

प्राजु's picture

15 Jul 2008 - 6:33 pm | प्राजु

आवडल्या ओळी..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती फडणीस's picture

15 Jul 2008 - 7:05 pm | स्वाती फडणीस

अश्या ओळींच्या संचाला (बहूतेक) कविता म्हणतात.. :P

सर्किट's picture

15 Jul 2008 - 10:43 pm | सर्किट (not verified)

कविता आवडली. आणि

अश्या ओळींच्या संचाला (बहूतेक) कविता म्हणतात..

आपली खिलाडू वृत्तीही. ("यमक" वर खाली आपण दिलेला प्रतिसादही असाच ठ्ठॉ करायला लावणारा.)

- सर्किट

राधा's picture

15 Jul 2008 - 7:03 pm | राधा

स्वाती छान लिहिलस्.......तुझी फॅन म्हणुन १ सांगते..... १ -२ ठिकाणी यमक नाही ग जुळले.......पण भाव खुप छान व्यक्त केलास्.......मी तुझ्या पुढच्या कवितेच्या प्रतिक्शेत आहे.......

स्वाती फडणीस's picture

15 Jul 2008 - 7:08 pm | स्वाती फडणीस

लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करेन... :)

स्वाती फडणीस's picture

15 Jul 2008 - 11:20 pm | स्वाती फडणीस

पळत होते मी........
नियती चकवत होती.

तेजाळ कवडसे!!
कधीच न येणारे हाती .

मग ठरवल,
बास!.
आता पळायचे नाही ,
पुरे झाला उन-सावल्यांचा खेळ,
आणि थांबले.
निश्चल एका जागी .
जिंकल्या सारखी.
:
:
:
खुप उशिरा कळलं,
ती ही तिचीच खेळी.

पुन्हा बरोबर पडलेली.

========================
स्वाती फडणीस......................१९-०१-२००८

स्वाती फडणीस's picture

15 Jul 2008 - 11:24 pm | स्वाती फडणीस

चूका सुधारायला प्रवृत्त केल्या बद्दल :)

राघव१'s picture

8 Aug 2008 - 6:49 pm | राघव१

आवडली कविता. शुभेच्छा. :)

धनंजय's picture

8 Aug 2008 - 8:24 pm | धनंजय

छान!