भाचीचा फोन ,मामा किती वेळ झाला तुझा फोनच लागत नाही.
एवढे अर्जंट काम काय असावे हा तर्क करत असतानाच भाचीचे शब्द कानी पडले.मामा बकूळी ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? आणि खारीक च्या झाडाला काय म्हणतात ?
दोन्ही प्रश्न ऐकून मी थोडासा हडबडलो ?
तुला आत्त्ताच कशाला हवी हि माहिती ,बघून सांगतो असे म्हणताच नाहीरे सई चा प्रोजेक्ट आहे त्यासाठी हवी आहे. आता मलाही राहवेना ५/६ वर्षाच्या मुलीचा प्रोजेक्ट तो काय असणार आणि त्यासाठी आईची धावाधाव.
मला सुद्धा पटकन आठवेना. बकुळ चे वानस शास्त्रीय नाव अंधुकसे आठवले काहीतरी "एलेंगी" हं "माय्मुसोप्स एलेंगी" पण हे नाव काही पटेना आणि भाची तर सांगत होती इंग्लिश नाव पाहिजे
बघून सांगतो थोड्यावेळाने असे सांगून फोन ठेवला. पुस्तके धुंडाळून नावे शोधली आणि सांगितली
बकुळ = spanish Cherry खारीक = dry Date आणि झाडाचे नाव Date Palm
हे सांगताच भाचीला झालेला आनंद मला फोन वर सुद्धा समजला ,आता माझेही कुतुहूल चाळवले गेले होते. काय आहे हा प्रोजेक्ट ? मी विचारले ?
पाच प्रकारच्या बिया वहीत चिकटवायच्या आणि त्या झाडांची इंग्लिश नावे लिहायची . भाचीने सांगितले .
बापरे .
ज्या वयात बकुळीच्या झाडाखाली हूनदड फुले वेचायची आणि "या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया" अशी गाणी गायची हे सोडून हा असला प्रोजेक्ट करत राहणे म्हणजे शिक्षाच वाटली मला.
हिंदीत शिक्षणाला शिक्षा का म्हणतात ते हि समजले. "सर्व शिक्षा अभियान" म्हणजे मुलां बरोबर आई बापाला पण शिक्षा या अर्थी म्हणत असावेत. असही वाटल.
आणि आधी बकूळ आणि मग Spanish Cherry असे शिकले तर होणारे फायदे हि अनेक आहेत हे हि समजले. Spanish Cherry हा शब्द कदाचित विसरला हि जाईल कारण या शब्दाशी तिचे नाते असेल ते फक्त गुणां पुरते पण बकुळिशि आमचे नाते इतके घट्ट आहे ते कधी विसरू शकत नाही.
अगदी लहानपणी वेचलेली ती नाजूक फूले, सुकल्यावरही राहणारा त्याचा मंद दरवळ , मग केशरी रंगाची ती पिठूळ फळे, खावीशी वाटणारी पण खाल्यावर घशाला पडणारी कोरड. तरुणपणी ऐकलेली आणि अजूनही ऐकल्यावर हविहवी वाटणारी "बकूळ फुला कधीची तुला शोधते वनात " या बकुळीच्या झाडाखाली " अशी सुगंधी गाणी. पुढे कधीतरी समजलेले बकुळीचे औषधी महत्व.
शेवटी भाचीला सांगितले बाईग तुझ्या लेकीला काळाची गरज म्हणून Spanish Cherry शिकव
पण सुटीत माहेरी जाशील तेव्हा तिला बकुळा बाई ला पण भेटव.
प्रतिक्रिया
5 Sep 2013 - 5:15 am | स्पंदना
सुरेख लेख!
(दर आठवड्याला मॅथ्स अन जनरल अॅबीलीटीत पारंगत होत जाणारी आई)
5 Sep 2013 - 11:09 am | भ ट क्या खे ड वा ला
धन्यवाद
5 Sep 2013 - 11:14 am | सौंदाळा
लेख आवडला.
5 Sep 2013 - 11:27 am | मुक्त विहारि
प्रोजेक्ट हे शिक्षणाला पुरक न राहता गुणांसाठी महत्वाचे, अशीच आजकाल शिकवण मिळते.. ह्याचे अजून एक उत्तम उदाहरण...
5 Sep 2013 - 11:31 am | पैसा
शिक्षा, हम्म.. खरंच!!
5 Sep 2013 - 10:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
खरं आहे...
5 Sep 2013 - 11:46 pm | अग्निकोल्हा
.
6 Sep 2013 - 7:46 am | यशोधरा
फार आवडला लेख.
6 Sep 2013 - 1:24 pm | सविता००१
बकुळ म्हटलं कीच इतक्या मस्त आठवणी जाग्या होतात की बास. सगळं लहानपण आजुबाजूला बागडायला लागत लगेच...
6 Sep 2013 - 2:16 pm | अनिरुद्ध प
सुन्दर लेख.