आय-टी इंजीनिअर आणि बँन्डवाले

अनंतसुत's picture
अनंतसुत in जनातलं, मनातलं
20 Aug 2013 - 11:42 am

"का रे बाबा? कसा असतो तुम्हा आय-टी इंजीनिअर लोकांचा जॉब?" ह्या प्रश्नाचं उत्तर देताना, खोचक वॄत्तीने म्हणा किंवा विनोदबुद्धीने म्हणा, मी नेहमी हेच उत्तर देतो की, "आय-टी इंजिनिअर आणि लग्नाच्या वरातीमध्ये बँन्ड वाजवणारे, ह्यांच्यामध्ये फारसा फरक नाहिये, कारण असं की, लग्नाच्या वरातीमध्ये मुलाचा एखादा मामा किंवा काका ह्याला नाचायचं असतं, पण त्याला गाणं मात्र ’बिलनची नागीन निघाली’ हेच हव असतं, म्हणजे तशी त्याची स्पेशालिटीच असते, नागिन डान्स वैगैरे (एरव्ही पाळलेल्या श्वाना सारखा असलेला काका किंवा मामा 'बिलनची नागीन' निघाली की फणा काढून नाचतो), तसचं नवर्‍या मुलाच्या मित्रांना 'चिकनी चमेली’ पाहिजे असते, (आता नेमकं पहुआ लगाके कोण आलेलं असतं? चमेली, की नवर्‍या मुलाचे मित्र-मंडळ? हा मुद्दा आपण तुर्तास बाजुला ठेउ), हा प्रकार एवढ्यावर थांबत नाही, बँडवाल्यांना, वधु-पित्याने (म्हणजे लग्नातल्या खर्चाने, वरपक्षाच्या फालतु लोकांचे फालतू रुसवे-फुगवे काढताना, किंवा दिड-दमडीच्या नवरदेवाचे जावई हट्ट, त्यातले काही त्याच्या स्वत:च्या विवेक बुदधीला सुचलेले आणि काही त्याच्या नावावर दुसर्‍यांनीच लादलेले असतात ते जावई हट्ट पुरवताना ज्याची आधीच भरपुर वाट लागलेली असते तो) मुलगी वाटी लावत असताना 'जा, मुली जा, दिल्या (तुच निवडलेल्या आणि आम्हाला फक्त कळवलेल्या) घरी (फ्लॅटमध्ये) सुखी (तुम्ही दोघेच नवरा आणि बायको) राहा', हे गाणं, न सांगता वाजवावच लागतं, (इथे वाक्यातला 'च’ फार महत्वाचा आहे, कारण हे एकमेव गाणं विनाफर्मीईशीच आणि कंपलसरी वाजवावं लागतं), तसचं 'आज मेरे यार की शादी है’, 'नेसली (फार प्रयत्न करुन पहिल्यांदा आणि अखेरची नेसवली किंवा घातली, हो!, कारण पुर्वी साडी हा नेसण्याचा प्रकार होता आता जिन्स पॅन्ट सारखी पटकन घालता येणारी नऊवारी साडी निघाली आहे म्हणे) माहेरची साडी’. ही सगळी गाणी तर बॅंन्डवाल्यांना यायलाच पाहिजेत आणि, आणि एवढचं नाही तर, सध्या चालू असलेले आयटम नंबरही बॅंन्डवाल्यांना शिकुन घ्यावे लागतात, एखादा ऑफबिट टेस्टचा कार्यकर्ता मध्येच ‘धनगरवाड्यात घुसला’, किंवा ‘डोकं फिरलया’ ची मागणी करु शकतो, म्हणजे थोडक्यात जुन्यात जुनं गाणं, ते अगदी काल आज आलेलं दणकेबाज गाणं, बॅंन्डवाल्यांना आलचं पाहिजे, दर दोन तीन महिन्याला एखादं नवीन गाणं येतं, आणि बिचार्‍या बॅंन्डवाल्यांना ते निमुटपणे शिकुन घ्यावंच लागतं, आय-टी इंजीनिअरचही तसचं आहे, दर दोन-तीन महिन्यात एखादी नवीन भानगड 'श्री गुरुदेव दत्त' म्हणुन समोर उभी राहते, (भानगड म्हणजे, नवीन टेक्नोलॉजी, किंवा नवीन प्रोसेस, किंवा नवीन स्टॅंन्डर्ड्स आणखी बरंच काही काही) आणि आम्हा आय-टी इंजिनिअर लोकांना ती भानगड निमुटपणे शिकुन घ्यावीच (’च’ पुन्हा महत्वाचा बरका) लागते, (म्हणजे आमच्याकडुन ज्यांना ते (लेखी) अपेक्षीत (तोंडी गॄहीतं) आहेच, असे समजणारे आमचे बॉस लोक, किंवा कंपनी, हे आमच्यासाठी वरपक्षाच्या मान्यवर सदस्या सारखेच असतातं, त्यामुळे त्यांची आज्ञा आम्हाला शिरोधार्य,
बँन्डवाले आणि आयटी इंजीनिंअर ह्यात तसा किंचींतसा फरकही आहे, उन्मत्त आणि मदमस्त लोंकाच्या हातातील नोटा पाहुन ‘बँन्डवाले बिचारे बजाते रहते है, और आय - टी इंजीनिअर साले बजते रहते है’”

- अनंतसुत . . .
Copy Rights Reserved

Comments (if any) - anantsut@gmail.com.

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

20 Aug 2013 - 12:03 pm | उगा काहितरीच

:) :) :) :D :D :D AWESOME....... :) :D

अनिरुद्ध प's picture

20 Aug 2013 - 12:53 pm | अनिरुद्ध प

+१

स्पा's picture

20 Aug 2013 - 12:27 pm | स्पा

आय-टी इंजीनिअर

लोकांविषयी आम्हाला भारी करुणा वाटते
जगातले सर्व दुक्ख ह्यांच्याच वाट्याला कसे काय आले, देवा यांचा उद्धार कर रे

तरी बरं हे मस्त गार एसीत बसुन काम करतात, इंडस्ट्रीत दोनेक वर्ष काम केलं की यांचा पगार वीस पंचवीस हजारावर जातो. ऑफीसच्या नियमित वेळेव्यतिरिक्त ऑफीसला जायचं यायचं झालं तर अगदी दारापर्यंत कुलकॅब येते. वर्ष दोन वर्षांनी परदेश वारी होतेच होते. हे एखादया बिल्डरकडे घर पाहायला गेले तर बिल्डर यांच्यासाठी पायघडया घालतो. कुठल्याही मोठया रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर ऑफीसचं ओळखपत्र दाखवलं की बिलात दहा टक्के सूट मिळते. नुसतं एक्सेल शीटवर काम केलं तरी भरभरुन सोडेक्सोचे पास मिळतात ते टेचात वापरता येतात.

ईकडे रुपया घसरला की तिकडे ऑनसाईटला गेलेला बाब्या घरच्यांना अजून एक फ्लॅट बुक करायला सांगतो.

एव्हढं सगळं मिळत असताना रडायचं म्हणजे जरा अतीच होतंय.

बॅटमॅन's picture

20 Aug 2013 - 3:37 pm | बॅटमॅन

अगदी सहमत आहे. विशिष्ट जमातीने विशिष्ट जमातीच्या कौतुकाकरिता काढलेला धागा.

(घिसाडी ब्रिगेडचा कार्यकर्ता) बॅटमॅन.

स्पंदना's picture

21 Aug 2013 - 4:33 am | स्पंदना

हो! हो!
पण बाकी सगळे एकदा {(च)येथेही च महत्वाचा) काय ते शिकुन मार्गाला लागतात.
आयटी इंजीनिअयर मात्र बिचारा जनमभर (मुद्दाम लिहीलयं) नुसता या वाटेने जाऊ की त्या वाटेने? या प्रश्नात अडकलेला असतो. जर वाट नाही निवडली तर दरी ठरलेली. स्टॅगनंट हा शब्द फार लवकर वाट्याला यायची शक्यता.

जॅक डनियल्स's picture

21 Aug 2013 - 7:14 am | जॅक डनियल्स

(घिसाडी ब्रिगेडचा कार्यकर्ता)

आम्ही पण त्याच लायनी मध्ये आहे, आणि शीमेंट राबिट थापतो आहे.

स्पा's picture

21 Aug 2013 - 12:37 pm | स्पा

सुख खुपत ते हेच असावं बहुधा

ईकडे रुपया घसरला की तिकडे ऑनसाईटला गेलेला बाब्या घरच्यांना अजून एक फ्लॅट बुक करायला सांगतो.

खिक्क

तरी बरं हे मस्त गार एसीत बसुन काम करतात, इंडस्ट्रीत दोनेक वर्ष काम केलं की यांचा पगार वीस पंचवीस हजारावर जातो. ऑफीसच्या नियमित वेळेव्यतिरिक्त ऑफीसला जायचं यायचं झालं तर अगदी दारापर्यंत कुलकॅब येते. वर्ष दोन वर्षांनी परदेश वारी होतेच होते. हे एखादया बिल्डरकडे घर पाहायला गेले तर बिल्डर यांच्यासाठी पायघडया घालतो. कुठल्याही मोठया रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर ऑफीसचं ओळखपत्र दाखवलं की बिलात दहा टक्के सूट मिळते. नुसतं एक्सेल शीटवर काम केलं तरी भरभरुन सोडेक्सोचे पास मिळतात ते टेचात वापरता येतात.

ईकडे रुपया घसरला की तिकडे ऑनसाईटला गेलेला बाब्या घरच्यांना अजून एक फ्लॅट बुक करायला सांगतो.

एव्हढं सगळं मिळत असताना रडायचं म्हणजे जरा अतीच होतंय.

सहमत. तिच्यायला आय.टी. वाल्यांसमोर आम्ही मेकॅनिकल वाले एसी मर्सिडिज मधून फिरणार्‍या बिझनेसमन समोर सेकंड क्लास चा पास काढून रेल्वेतून जाणारी माणसं. तरी मर्सिडिज वाल्यांनी रडगाणी गावीत म्हणजे आश्चर्य आहे.
माणूस विघ्नसंतोषी असतो हेच खरं.

बॅटमॅन's picture

22 Aug 2013 - 11:55 am | बॅटमॅन

विघ्नसंतोषी नाही सेल्फ-पिटीवाला असतो म्हणा.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Aug 2013 - 1:10 am | विश्वनाथ मेहेंदळे

माणूस विघ्नसंतोषी असतो हेच खरं

अल्पसंतुष्ट म्हणायचे आहे का ??

धन्याकाका लय इमोशनल केलं बै तुम्ही मला :-/

:D

कोमल's picture

20 Aug 2013 - 12:45 pm | कोमल

लै च भारी..
गाण्यांची चिर्फाड झक्कास जमलीये.. :))

‘बँन्डवाले बिचारे बजाते रहते है, और आय - टी इंजीनिअर साले बजते रहते है’

+१००

अनंतसुत's picture

26 Aug 2013 - 4:26 pm | अनंतसुत

धन्यवाद . . .

अद्द्या's picture

20 Aug 2013 - 12:47 pm | अद्द्या

और आय - टी इंजीनिअर साले बजते रहते है’”

:(

मालोजीराव's picture

20 Aug 2013 - 12:50 pm | मालोजीराव

उन्मत्त आणि मदमस्त लोंकाच्या हातातील नोटा पाहुन ‘बँन्डवाले बिचारे बजाते रहते है, और आय - टी इंजीनिअर साले बजते रहते है’”

इथे आयटी वाल्यांची तुलना डान्सबार च्या बारबालांशी व्हायला हवी…नाय का

पण आयटीवाल्यांवर दौलतजादा पण कुणी करत नै इतका...अनलेस दे गो ऑण सायीट ;)

मालोजीराव's picture

20 Aug 2013 - 4:37 pm | मालोजीराव

आयटीवाल्यांवर दौलतजादा पण कुणी करत नै इतका

अव पावनं तेंच्याव दौलतजादा करण्यासारकं तेंचेकडे असं काय असतंय तवा ;)
आन पैक्याची तुलना काय करावी…होंडा एकॉर्ड वाली बारबाला पायली आन तवाच डोलं पानावलं…

हाहाहा, त्येबी खरंच म्हना. बारबाला नाचली की दौलतजादा कर्णार, हिकडं काय चांगला कोड ल्हिला/कोडातली २-३ लुपे वाचवली म्हणून काय डॉलर फेकणारेत थोडीच =))

होंडा एकॉर्ड वाली बारबाला पायली आन तवाच डोलं पानावलं…

अगायायायाया, माजंबी डोळं भरून वाहाय लागलं आक्षी पुरातल्या कृष्णेगत...

आदिजोशी's picture

20 Aug 2013 - 1:29 pm | आदिजोशी

किती कुरवाळाल स्वतःला?

मालोजीराव's picture

20 Aug 2013 - 1:33 pm | मालोजीराव

:))

दादा कोंडके's picture

20 Aug 2013 - 2:04 pm | दादा कोंडके

किती कुरवाळाल स्वतःला?

सहमत. अशानी वैचारिक स्खलन होइल.

स्खलनाचे अस्खलित वर्णन वाचून जमिनीवर शरीराचे अध:पतन जाहले आहे.

जॅक डनियल्स's picture

21 Aug 2013 - 7:18 am | जॅक डनियल्स

लेख लिहिण्याची पद्धत आवडली पण सगळे नोकरदार बँन्डवालेच असतात. आमच्या लाईन मध्ये तर आम्ही वरातीत नाचणारे घोडेच आहोत. फटाक्यांची भीती वाटते तरी नाचावेच लागते.

अनंतसुत's picture

21 Aug 2013 - 11:15 am | अनंतसुत

धन्यवाद . . .

धमाल मुलगा's picture

21 Aug 2013 - 8:45 am | धमाल मुलगा

आमच्याकडं ऑनसाईटला सर्वसाधारण रिसोर्सला 'सोनु' अन स्पेशॅलिस्टला 'तरन्नुम' म्हणतात. आणि त्यांना प्रोजेक्टवर प्लेस करणार्‍यांना 'फटका'
आता बोला. :)

र्वसाधारण रिसोर्सला 'सोनु' अन स्पेशॅलिस्टला 'तरन्नुम' म्हणतात. आणि त्यांना प्रोजेक्टवर प्लेस करणार्‍यांना 'फटका'

ए धमाल मुला.( ऊर्फ मनमिळाऊ मारुती) का उगाच कोडवर्ड्स सांगतोयेस. दिस्ट्रीब्यूटर्स आणि एक्झीब्यूटर्स चे गुपीत उघडू नकोस.
....................( क्लायन्टच्या तालावर नाच करणारा बारबालक विजुभाऊ)

आनन्दिता's picture

27 Aug 2013 - 2:07 am | आनन्दिता

बारबालक

अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग.... कसला हा शब्द म्हणायचा.....

=)) =)) =))

पण बारबालक म्हंजे बारमध्ये नाच सोडून अन्य काही काम करणारा असेही असू शकते.

एशीत बसणारे माथाडी कामागार कम हमाल ! ;)

इरसाल's picture

21 Aug 2013 - 12:22 pm | इरसाल

आमच्याकडं ऑनसाईटला सर्वसाधारण रिसोर्सला 'सोनु' अन स्पेशॅलिस्टला 'तरन्नुम' म्हणतात. आणि त्यांना प्रोजेक्टवर प्लेस करणार्‍यांना 'फटका'

फटका तो "आसमानमे लाखो तारे टॅवडॅव वालाच ना ? सरफरोश मधला......

बॅटमॅन's picture

21 Aug 2013 - 12:28 pm | बॅटमॅन

येस तोच तो!!!

धमुशेठ, काय उपमा दिलीत तेच्यायला, दिल फटका फटका हो गया =)) =))

धमाल मुलगा's picture

21 Aug 2013 - 9:01 pm | धमाल मुलगा

श्रेय आमचं नाही! इकडं मुरलेल्या जुन्याजाणत्या सोनू लोकांनीच शिकवलं हे. :D

आदूबाळ's picture

21 Aug 2013 - 12:43 pm | आदूबाळ

मी आयटीवाला नसलो तरी ब्यांडवाला झाल्याची भावना होतीच. आमच्या कुंपणीमध्येही सरसकट सर्वांना "सोनू" म्हणायचे.

"जा सोनू, बैठ उसके साथ" या वास्तव शिणुमातल्या ड्य्वायलाकचा त्याला आधार होता. त्यावरचं विवेचन असं: "सोनू ही सोनू असते. एखादा संजय दत्त मिळाला तर ते सोनूचं नशीब. त्याजागी आर्य बब्बर किंवा नील नितीन मुकेश असता तरी सोनूला बैठण्या शिवाय पर्याय नाही."

आशु जोग's picture

21 Aug 2013 - 8:48 pm | आशु जोग

सध्या तुमच्या आय टी मधे दोन प्रकारच्या कंपन्या दिसतात. एक मालक कंपनी दुसरी नोकर कंपनी. तुम्ही कुठल्या कंपनीत आहात यावर तुमचा अनुभव अवलंबून असतो.

भारतातल्या सॉफ्टवेयर मजूरांनी आता आपण काही फंडू काम करत आहोत हे समजणे आणि इतरांसाठी तसा आभास निर्माण करणे बंद करावे. काही वर्षे फालतू काम केल्यावर त्या फालतू कामाचे तरी कुणी कौतुक करावे असे वाटणे साहजिक आहे. गर्दी कंपनीत काम करताना हाच अनुभव येणार आणि आय टी कशाला इतरही अनेक क्षेत्रातील कामगारांचा हा अनुभव असणार.

गर्दी कंपनी - जिथे हेडकाऊंटला महत्त्व असते, आतल्या मेंदूला नव्हे.
पी टी सी, गूगल, एच पी लॅब्स, मायक्रोसॉफ्ट, टेक्सास इंसट्रुमेंटस अशा ठिकाणी जाऊ शकलात तर हे प्रॉब्लेम येणार नाहीत.

बा द वे
फारच वैतागला असाल तर स्वतःचा बँड सुरू करा आणि नाचण्यासाठी लोक्स हायर करा.

भारतातल्या सॉफ्टवेयर मजूरांनी आता आपण काही फंडू काम करत आहोत हे समजणे आणि इतरांसाठी तसा आभास निर्माण करणे बंद करावे. काही वर्षे फालतू काम केल्यावर त्या फालतू कामाचे तरी कुणी कौतुक करावे असे वाटणे साहजिक आहे.

अगदी अगदी.
हापिसात जाऊन काहीतरी कॉपी पेस्ट करत असतात किंवा कुठल्या तरी सर्वरचा ब्याकप घेत असतात. पण बाहे मात्र असा आव आणतात की नासाचे अवकाशयान हेच उडवतात. हे करत असलेल्या फडतूस कामाचे त्यांच्या हापिसात कुणाला कौतुक नसते. मग बाहेर आम्ही यव करतो आणि त्यव करतो सांगत सुटतात.

शिल्पा नाईक's picture

22 Aug 2013 - 11:49 am | शिल्पा नाईक

रडायची खरच गरज आहे का? साले पगार अश्या स्पीड ने वाढतात तुम्हा लोकांचे की आत्ता नोकरीला लागलेला बाब्या १ वर्शात फ्ल्याट बूक करतो. जेवढे पैसे घेता तितक काम तर करायलाच हव न राव.

नाहीतर काय? उगाच रडत असतात.

बॅटमॅन's picture

22 Aug 2013 - 12:17 pm | बॅटमॅन

मस्त मूर्खागमनी प्रतिसाद!

ज्याचं जळतं ना त्यालाचं कळतं..
च्यायला, उगीच पैसे काढता सगळ्यांचे..
प्रोजेक्ट डिलिव्हरीला आले ना की दिलेल्या सगळ्या पैशांचं व्यवस्थित उट्टं काढतात कंपनी वाले..
२०-२२ तास सलग बसा डबड्या समोर, मग पैश्याचं गणित मांडा.. :|

२०-२२ तास सलग बसा डबड्या समोर

गार्गार एशी मध्येच बसता ना..??

सुख टोचते ते असे!

कोमल's picture

24 Aug 2013 - 2:14 am | कोमल

काय राव..
आधी पैके मग एशी,
अजून फारिन ट्रिप राहिलीये की.. आणि काय शिल्लक असेल तर ते बी होऊन जाउदे..
>:O

आशु जोग's picture

22 Aug 2013 - 6:29 pm | आशु जोग

एवढ्यात पाहिलेली २ आश्चर्ये आपल्याबरोबर शेअर करीत आहे.

१. एक पल्सारवाला अगदी हळू गाडी चालवीत होता.
२. एक सॉफ्टवेयर इंजिनीयर डोके चालवीत होता.

२. एक सॉफ्टवेयर इंजिनीयर डोके चालवीत होता.

या विधानावरुन दोन गोष्टी कळतातः

१. तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनीयर नाही.
२. सॉफ्टवेअर इंजिनीयर नेमकं काय काम करतो याची तुम्हाला अजिबात कल्पना नाही.

आशु जोग's picture

26 Aug 2013 - 5:47 pm | आशु जोग

यावरून २ गोष्टी कळतात.

१. तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनीयर आहात.
२. तुम्ही जगाचे २ भाग केले आहेत. आय. टी. वाले आणि इतर(काफर)

तुम्ही जगाचे २ भाग केले आहेत. आय. टी. वाले आणि इतर(काफर)

हा निष्कर्ष कसा काय काढलात बुवा..??

तुमच्या माहितीसाठी - मी सॉफ्टवेअर इंजीनीयर नाही.

('IT'त काम करणारा) मोदक.

हा निष्कर्ष कसा काय काढलात बुवा..??

काही लोक "मला वाटतं म्हणून" निष्कर्ष काढतात. त्यासाठी कुठल्याही माहितीची किंवा तर्काची गरज नसते.

आशु जोग's picture

26 Aug 2013 - 8:00 pm | आशु जोग

मोदक तुम्हाला नाही हो
धन्याला प्रतिसाद दिला होता

हे स्पष्टीकरण देण्यापेक्षा तुम्ही तो निष्कर्ष कसा काढलात हे सांगितलं असतंत तर ते जास्त चांगलं झालं असतं. :)

धनाजीराव - आशू जोग यांनी मला दिलेल्या प्रतिसादाला तुम्ही का प्रतिसाद देताय..?? ऑफिसची बँडविड्थ फुकट जाळण्यापेक्षा काहीतरी काम करा.

एक प्रश्न - आयटी कंपनीमध्ये (आरामात एसीमध्ये बसून!) ऑफीस इंटरनेटची बँडविड्थ अशी फुकट न घालवता वाचवली तर काही परकीय चलन वाचेल का..? वाचत असल्यास त्याचा रूपयाच्या कोसळण्यावर कितपत फरक पडेल..?

आशू जोगसाहेब - धन्यवाद! :-)

आशु जोग's picture

26 Aug 2013 - 11:22 pm | आशु जोग

हा होता धन्या यांचा प्रतिसाद

अगदी अगदी.
हापिसात जाऊन काहीतरी कॉपी पेस्ट करत असतात किंवा कुठल्या तरी सर्वरचा ब्याकप घेत असतात. पण बाहे मात्र असा आव आणतात की नासाचे अवकाशयान हेच उडवतात. हे करत असलेल्या फडतूस कामाचे त्यांच्या हापिसात कुणाला कौतुक नसते. मग बाहेर आम्ही यव करतो आणि त्यव करतो सांगत सुटतात.

ह्म्म्म.. श्रीयुत धनेश्वरजी यांचे एकांगी प्रतिसाद नेहमीच डोक्यात जातात. व्यक्तीगत निराशेपायी ते लोकांचा वेळ घेतात आणि अकारण दिशाभूल करण्याचा प्रयत्नही करतात.

जोगसाहेब.. थोडे दिवस थांबा, येथेही ते सपशेल शरणागती पत्करतीलच.

बादवे - तुम्ही धन्याचा प्रतिसाद येथे देण्याचे प्रयोजन कळाले नाही.

धन्या's picture

27 Aug 2013 - 12:17 am | धन्या

आशु जोग,

तुम्हाला माझ्या प्रतिसादातला उपहास कळला नाही.

असो. तुम्ही त्या निष्कर्षाप्रत कसे आलात हे तुम्ही अजून सांगितलं नाही.

आशु जोग's picture

27 Aug 2013 - 1:51 am | आशु जोग

मोदकराव
धन्या यांचा प्रतिसाद माझ्या प्रतिसादाला पूरक होता म्हणून त्यांचेच म्हणणे त्यांना सादर केले.

बा द वे
निष्कर्षाप्रत कसे आलो ? मनाचा अभ्यास.

निष्कर्षाप्रत कसे आलो ? मनाचा अभ्यास.

एक शंका - तुम्हालाही "स्व" गवसला आहे का..??

या बाबतीत काहीच अभ्यास नाही म्हणून अशा बेसीक शंका उद्भवतात - लैच बेसीक शंका असेल तर कृपया वाईट वाटून घेवू नये.

आशु जोग's picture

29 Aug 2013 - 12:06 am | आशु जोग

इथे ? भर रस्त्यात?'
इथेही आम्ही हा किस्सा काल्पनिक आहे असे शोधले होते. कारण अभ्यास.

आशु जोग's picture

29 Aug 2013 - 12:06 am | आशु जोग

इथे ? भर रस्त्यात?'
इथेही आम्ही हा किस्सा काल्पनिक आहे असे शोधले होते. कारण अभ्यास.

पैसा's picture

23 Aug 2013 - 11:47 pm | पैसा

लेख आणि प्रतिक्रिया जाम मजेशीर आहेत! खरे तर हे सगळे सोनु आणि तरन्नुम मिपावर दिवसभर हलचल चालू ठेवतात!

अत्रन्गि पाउस's picture

24 Aug 2013 - 8:35 am | अत्रन्गि पाउस

आय टी चे पगार भरमसाट वाढतात - गेले ते दिन गेले
प्रदेश प्रवास म्हणजे चैन - सुरुवातीला हो..मजा येते..पण नाविन्य संपले कि तर..कशाचीच मजा येत नही...
पण मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे...प्रत्येक गिऱ्हाईक फर्माईश वेगळी ..मुजरा वेगळा आणि सगळं लगेच आलाच पाहिजे...नाहीतर तरन्नुमची सोनू व्हायला एक चुटकी पुरते ..

आशु जोग's picture

27 Aug 2013 - 1:58 am | आशु जोग

मोदकराव
तुमच्या माहितीसाठी - मी सॉफ्टवेअर इंजीनीयर नाही

मग तुम्हाला डोके चालवायला परवानगी आहे.

मोदक's picture

27 Aug 2013 - 2:04 am | मोदक

धन्यवाद!

कोमल's picture

27 Aug 2013 - 10:24 am | कोमल

अगागागगा... :)) :)) :))

ब़जरबट्टू's picture

27 Aug 2013 - 10:54 am | ब़जरबट्टू

पण एक सांगा "सोनु आणि तरन्नुम" ची किंमत १० - १५ वर्षाने कमी होणारच की वाढत जाणार ? म्हणजे ते बघा "अब तुम्हारी जवानी ढला गयी है तरन्नुमबाई " असे गि-हाईकाने सांगितल्यावर "फटका" नविन सोनू शोधतोच की. आय टी मधी भी अशी गत व्हैइल का हो ? :)

(डोके चालवायचा परवाना असलेला) ब़जरबट्टू

आशु जोग's picture

27 Aug 2013 - 3:33 pm | आशु जोग

तरन्नुम, सोनूचे माहीत नाही पण मालक 'फटका' बदलतो.
कारण 'फटका'चा सोनू म्हणून वा तरन्नुम म्हणून कुठलाच उपयोग नसतो.

बाळ सप्रे's picture

27 Aug 2013 - 3:59 pm | बाळ सप्रे

आम्हा आय-टी इंजिनिअर लोकांना ती भानगड निमुटपणे शिकुन घ्यावीच (’च’ पुन्हा महत्वाचा बरका) लागते

कुठल्या नोकरी, व्यवसायात काळानुसार काहीच बदलावं लागत नाही?? आणि तरीही टिकून रहाता येतं, प्रगती करता येते?

अनंतसुत's picture

4 Sep 2013 - 10:50 am | अनंतसुत

पुर्ण वाक्य अस्स आहे,

आय-टी इंजीनिअरचही तसचं आहे, दर दोन-तीन महिन्यात एखादी नवीन भानगड 'श्री गुरुदेव दत्त' म्हणुन समोर उभी राहते, (भानगड म्हणजे, नवीन टेक्नोलॉजी, किंवा नवीन प्रोसेस, किंवा नवीन स्टॅंन्डर्ड्स आणखी बरंच काही काही) आणि आम्हा आय-टी इंजिनिअर लोकांना ती भानगड निमुटपणे शिकुन घ्यावीच (’च’ पुन्हा महत्वाचा बरका) लागते,

तुम्ही संदर्भ सोडुन अर्ध वाक्य काढत प्रश्न केलात?

असो, त्या निमित्ताने का होईना 'सखाराम गटनेची ' आठवण आली, पण तुम्ही म्हणताय ते पण खरं आहे, मी उदा. म्हणुन आय टी इंजीनिअर घेतले, बाकी काही नाही, घरोघरी मातीच्याच चुली . . . :)

बाळ सप्रे's picture

5 Sep 2013 - 7:22 am | बाळ सप्रे

कुठेही संदर्भ सुटलेला दिसत नाही.. जशा नव नवीन भानगडी आयटीत येत राहातात तसचं इतरही व्यवसायात नवनवीन अडचणी येतच असतात..
शेवटी म्हणणं पटलय ना मग ठीक आहे.. :-)

अनंतसुत's picture

5 Sep 2013 - 2:14 pm | अनंतसुत

:)