मागे म्हटल्याप्रमाणे २०१४ च्या निवडणूकीचे वेध सगळ्यांनाच लागले आहेत. सर्वच आघाड्यांवर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. मागील कित्येक वर्षात देशपतळीवर प्रभाव टाकेल असा खासदार पुण्याने दिलेला नाही. तरीही पुण्याची निवडणूक अनेक कारणांनी गाजते. यंदाच्याही निवडणूकीबाबत अशीच उत्सुकता आहे. कोण कोण आहेत इच्छुक ?
त्यापूर्वी हे जरूर पाहावे
यापूर्वीच्या गेम्स
सुरेश कलमाडी - सबसे बडा खिलाडी. क्रिडाक्षेत्राशी संबंधित असल्याने खिलाडी असा उल्लेख होत असावा. मागील कित्येक वर्षे पुण्याचे खासदार आहेत. केंद्रात मंत्री होते. पुणे शहराच्या राजकारणावर मजबूत पकड. १९९८ सालच्या लोकसभा निवडणूकीत अख्खे पुणे शहर भाजपा कलमाडी यांच्या पायाशी लोळत होते, अशी त्यांची ताकद आहे. यावेळी मात्र भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोप झाल्याने अडचणीत आलेत. आपल्या पक्षातच स्थान अस्थिर बनले आहे. पण सज्जनकुमार यांना कॉंग्रेस पक्षाकडून जशी दरवेळी क्लीन चिट मिळते आणि ते पावन होतात. तसाच चमत्कार कलमाडी यांच्याबाबतही होवू शकतो. श्रेष्ठींचा अंदाज कुणालाच येत नाही.
मोहन जोशी - पुण्यातले विधानपरिषदेचे आमदार आहेत. शहराध्यक्ष होते. अद्याप त्यांची इमेज पुण्यात चांगली आहे. सर्व पक्षामधे मित्र आहेत. पक्षाने संधी दिल्यास पक्षाला यश मिळवून देवू शकतील.
दीपक मानकर - अतिशय कार्यक्षम आणि अनुभवी नेता. पुण्यामधला कलमाडींखालोखालचा बलदंड नेता. कित्येक वर्षे नगरसेवक. पण एवढा प्रदीर्घ अनुभव असताना पक्षाने नगरसेवकपदापलिकडे संधी दिलेली नाही. सध्या उपमहापौर आहेत. पुण्यामधे कार्यकर्त्यांचे उत्तम नेटवर्क. बिल्डर व व्यावसायिकांशी उत्तम संबंध. कलमाडींचे स्थान पक्षातच अस्थिर झाल्यानंतर मानकरांच्या महत्त्वाकांक्षेला पंख फुटले. कलमाडींची जागा घेण्यास उत्सुक.
अभय छाजेड - अनेक वर्षे सलग नगरसेवक. कलमाडींना स्वतःला संधी न मिळाल्यास ते छाजेड यांच्या पारड्यात आपले वजन टाकतील. कलमाडींचीच प्रतिकृती. जे कर्तुत्त्व कलमाडी खासदार म्हणून दाखवतात तेच छाजेड नगरसेवक म्हणून दाखवतात. व्यापारी पद्धतीच्या राजकारणासाठी प्रसिद्ध. किती इन्वेस्ट केले किती रीटर्न मिळाले वगैरे. कलमाडी काँग्रेसमधे असताना छाजेडही काँग्रेसमधे होते. कलमाडी बाहेर पडले छाजेडही काँग्रेसबाहेर पडले. कलमाडी पुन्हा काँग्रेसमधे आले छाजेडही परत काँग्रेसमधे आले. पण यांना पक्षाकडून संधी मिळण्याची शक्यता कमी.
अनंत गाडगीळ - काँग्रेस पक्षात बर्यापैकी वरचे स्थान राखून आहेत. स्वतःच्या कर्तुत्वावर उभ्या असलेल्या गाडगीळांच्या तीन पिढ्या पुण्यात झाल्या त्यापैकी एक. न वि गाडगीळ हे अनंत गाडगीळ यांचे आजोबा. विट्ठलराव गाडगीळ हे वडील. अनंत गाडगीळ हे स्वतः आर्किटेक्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. जगभरात अनेक ठिकाणी या विषयाचे व्याख्याते म्हणूनदेखील काम करतात. काँग्रेस पक्षाने यांना संधी दिल्यास इतर पक्षाचे पारंपरिक मतदारही गाडगीळांच्या पारड्यात आपले मत टाकू शकतील. पण त्यांची स्वच्छ प्रतिमाच काँग्रेस पक्षामधे अडचणीची ठरू शकते अशी स्थिती आहे.
हे झाले काँग्रेसचे इच्छुक, आता थोडे भाजपाकडे पाहू.
गिरीश बापट - कॉग्रेस पक्षात पडझड झाल्याने यावेळी भाजपला मोठी संधी आहे. त्यामुळे खासदारकीच्या तिकिटासाठी अति उत्सुक असलेलं नाव म्हणजे बापट. सुरुवातीला नगरसेवक, नंतर मागील चार वेळा आमदार. भाजपाचे पूर्वीचे शहराध्यक्ष. वरच्यांशी जमवून घेत प्रदीर्घ काळ सत्तापदांवर. एवढी प्रदीर्घ कारकीर्द असूनही कर्तुत्व, नेतृत्व, धडाडीसाठी फारसे नाव घेतले जात नाही. 'मुंगी होवून साखर खावी' असे वर्णन केले पाहीजे. कुठल्याही छोट्या छोट्या कामाचे फ्लेक्स लावून, जाहीरात कशी करावी हे बापटांकडून शिकावे. गटारे साफ केली, खड्डे बुजवले अशा करून दाखवले स्वरुपाच्या बापटांच्या पाट्या जागोजागी दिसतात. सर्वात जमेची बाजू म्हणजे भाजपाचे ज्येष्ठ नेते असा उल्लेख अलिकडे केला जाऊ लागला आहे. पण वय वाढण्यासाठी मुद्दाम काहीच करावे लागत नाही.
असो.
निवडणूकीच्या आदल्या वर्षात बापटांचा संघाच्या हाफ पँटीतला फोटो हमखास झळकतो. बर्याच जणांसाठी संघनिष्ठा ही प्रत्यक्ष आचरणात आणण्यापेक्षा दाखविण्याची गोष्ट झाली आहे. कसबा हा बापटांचा विधानसभा मतदारसंघ. मागील निवडणूकीत निसटता विजय मिळाला. मनसेच्या धंगेकर यांनी तोंडाला फेस आणला. कारण इथला भाजपचा पारंपरिक मतदार आता भाजप चालेल पण बापट नकोत या मनस्थितीत आलेला आहे. त्यामुळे तिकीट मिळवले तरी यश मिळवणे अवघड.
अनिल शिरोळे - सध्याचे पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष. मागील वेळी भाजपाचे लोकसभेचे उमेदवार. २८००० मतांनी पडले. मनसेच्या उमेदवाराने ७६००० मते घेतली. काँग्रेसविरोधी मतांमधे विभाजन झाले नसते तर अनिल शिरोळे यांचा विजय निश्चित होता. पुणेकरांमधे शिरोळे यांच्याबद्दल सहानुभूती आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्यास मागील वेळच्या पराभवाची परतफेड करण्यास भाजपचा मतदार उत्सुक आहे.
शरद पवार - पुणे ही खरेतर पवारांची कर्मभूमी. त्यांच्या कारकीर्दीला इथूनच सुरुवात झाली. कारकीर्दीतून निवृत्ती पुण्याचे खासदार म्हणून घ्यावी अशी पवारांची तीव्र इच्छा आहे. आजवर कधीही पराभव न पाहीलेला असा हा खरोखरच सबसे बडा खिलाडी आहे. पवारसाहेब पुण्यात आल्यास पुण्याची खासदारकीची निवडणूक रंगतदार होणार हे नक्की.
जाता जाता - दोन पक्ष एकमेकांशी लढण्याऐवजी एकाच पक्षातील दोन गट परस्परांशी तुंबळ लढतील असा अंदाज आहे. त्यामुळे पक्षातल्याच विरोधकाशी लढण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल. पाहूया कुणाकुणाचा गेम होतो ते ...
प्रतिक्रिया
20 Aug 2013 - 12:34 am | आदूबाळ
हं...
मोहन जोशी विरुद्ध शिरोळे असा थेट सामना, आणि फोडणीला डी एस कुलकर्णी (बसपा किंवा मनसेकडून) असा माझा कयास आहे.
सुरेसभाई आपली "पुणे विकास आघाडी"ची खेळी परत खेळतील असंही वाटतं.
शरदराव पुण्यातून निवडणूक लढवण्याची शक्यता शून्य आहे. माढा / बारामतीसारखे सेफ मतदारसंघ असताना "जिथून कारकीर्दीची सुरुवात केली तिथून शेवट करावा" असा भावनिक वेडपटपणा पवारांच्या स्वभावात नाही.
20 Aug 2013 - 2:49 pm | मालोजीराव
शिरोळे यंदा बाजी मारतील असा अंदाज
20 Aug 2013 - 12:36 am | श्रीरंग_जोशी
पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पुढील निवडणूकीतील शक्यंतांवर भाष्य करणारा एक उत्तम धागा.
माजी खासदार प्रदीप रावत (कार्यकाळ १९९९ - २००४) यांना उमेदवारी मिळण्याबाबत काही शक्यता?
20 Aug 2013 - 9:26 am | योगी९००
शरद पवारांचे नाव भाजप उमेदवारांच्या यादीत पाहून डोळे पाणावले..
20 Aug 2013 - 1:01 pm | अनिरुद्ध प
+१११११११
20 Aug 2013 - 2:15 pm | कपिलमुनी
दीपक मानकर - अतिशय कार्यक्षम आणि अनुभवी नेता. पुण्यामधला कलमाडींखालोखालचा बलदंड नेता. कित्येक वर्षे नगरसेवक. पण एवढा प्रदीर्घ अनुभव असताना पक्षाने नगरसेवकपदापलिकडे संधी दिलेली नाही. सध्या उपमहापौर आहेत. पुण्यामधे कार्यकर्त्यांचे उत्तम नेटवर्क. बिल्डर व व्यावसायिकांशी उत्तम संबंध. कलमाडींचे स्थान पक्षातच अस्थिर झाल्यानंतर मानकरांच्या महत्त्वाकांक्षेला पंख फुटले. कलमाडींची जागा घेण्यास उत्सुक
लोक तर यांच्या बद्दल काहिही लिहितात
20 Aug 2013 - 2:18 pm | कपिलमुनी
मनसेचा एकहि उमेदवाराची चर्चा नाहिये ? अपक्ष , बंडखोर ..आणि पुरेसा विदा नाहिये ..
क्लिंटन कॉलींग :)
23 Sep 2014 - 1:03 pm | आशु जोग
दोन पक्ष एकमेकांशी लढण्याऐवजी एकाच पक्षातील दोन गट परस्परांशी तुंबळ लढतील असा अंदाज आहे. त्यामुळे पक्षातल्याच विरोधकाशी लढण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल.
कदमांना विचारा याबद्दल !
20 Aug 2013 - 2:43 pm | आशु जोग
आणखी एक गैर समज
अभय भागचंद छाजेड(स्वारगेट, आदिनाथनगर) आणि चंद्रकांत छाजेड(दापोडी, बोपोडी)
20 Aug 2013 - 2:48 pm | प्रसाद१९७१
कोणीही निवडुन आले तरी गेम पुणेकरांचा च होणार
6 Feb 2014 - 7:13 pm | आशु जोग
http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5357302421195375424&Sectio...
15 Mar 2014 - 8:34 pm | आशु जोग
पुण्याचा उमेदवार ठरतोय की नाही...
20 Mar 2014 - 4:59 am | बाळकराम
विश्वजित कदम- आता भाजपा उमेदवाराला ही निवडणूक सोपी जायला हरकत नाही!
20 Mar 2014 - 10:59 am | आशु जोग
अजून भाजपा वि भाजपा चालू आहे
16 May 2014 - 2:44 pm | आशु जोग
ऐतिहासिक निवडणूक
23 Sep 2014 - 2:07 pm | काळा पहाड
धाग्याला पुन्हा उकळी द्यायचं कारण?
23 Sep 2014 - 3:38 pm | आशु जोग
तो मोबाईल जुना झाला
23 Sep 2014 - 3:40 pm | आशु जोग
तिकडचा प्रतिसाद हिकडे आला
असो
पुन्हा निवडणूक आली आणि मागील निवडणूकीपूर्वी ८ महीने लिहीलेला लेख बराचसा खरा उतरलाय !