जम्मू मधील सैन्य छावणीत (Caluchak) एक रात्र राहण्याचा योग २००२ साली आला होता. तेथील सर्व धर्म पार्थना स्थळ विशेष लक्षात राहिले ते तेथे भेटलेल्या एका धर्मगुरू मुळे. आज उत्तराखंड मधील आपत्ती नंतर त्यांची पुन्हा आठवण झाली. आमच्या अमरनाथ यात्रेला शुभेच्या देताना त्यांनी जे प्रबोधन केले तसे प्रबोधन भारतातील कोणी धर्मगुरू करेल का?
काय सांगितले होते त्या अवलियाने ?
भारत हा यात्रेकरूंचा देश आहे , प्रसार माध्यमे जेव्हा उपलब्ध नव्हती तेव्हा या यात्रांना खूप महत्व होते. या यात्रा म्हणजे समाज जोडण्याचे एक महत्वाचे साधन होते. संत महंतांनी संपूर्ण देशाची परिक्रमा करून का देश जोडला होता. सामन्य माणसे यात्रा करत ती संसारातील सर्व जबाबदारी पार पडली कि. परत नाही आलो तरी माझी चिंता करू नका असा संदेश घरात देऊन ती निघत असत. आपल्या गरजा कमीत कमी ठेऊन हि मंडळी यात्रेला निघत. Tourist म्हणून निघत नसत. जर सुखरूप परत आलीच तर देशाटना मुळे आलेले ज्ञान पुढील पिढीकडे देत आणि प्रवासाच्या निमित्ताने कमी केलेल्या गरजा पुन्हा वाढू न देता, भव्य निसर्गाच्या दर्शनाने माणसाचे खुजेपण समजून उमजून उर्वरित आयुष्य समाधानाने व्यतीत करत.
कोणते ज्ञान हि मंडळी देत पुढच्या पिढीला?
हे ज्ञान बहुतेक करून असे शेती बद्दल , जल संधारणाच्या वेगवेगळया प्रांतातील पद्धती , "पीकपाणी" ,हवामान , वनस्पती , रोगराई त्यावरील उपाय इत्यादी. पुढील पिढीचे जीवन समृद्ध होण्यासाठी त्यामुळे मदत होई.
जत्रा ,मेळा उत्सव हा प्रकार थोडा वेगळा असे. यामध्ये संसारी माणसे सहभागी होत. यात थोडे मनोरंजन थोडी भक्ती आणि इतर संसारिक देवाण घेवाण असे. जत्रेला आसपासच्या प्रांतातील मंडळी येत रोटी बेटी व्यवहार जमवणे , पिक , बी बियाणे यांची देवाण घेवाण हे उद्देश असत . या जत्रा मेळे यांचे वेळापत्रक साधारणपणे (हार्वेस्टिंग) पिके हाती आल्यावर असे. जसे लोहरि , ओणम,होळी, मकर संक्रांत,पोंगल
आज वाढलेल्या लोकसंख्ये मुळे,प्रसार माध्यमांच्या क्रांती मुळे, शेती व्यतिरिक्त इतर उद्योग धंद्यामुळे , या यात्रा ,जत्रा यांचे उपउक्तता मुल्य संपल्यात जमा आहे .
स्थानिकांना रोजगार थोडाफार उपलब्ध होतो हे सत्य पण यात्रेला जाणारा भाविक कमी आणि भोगी जास्त अशी परिस्थिती आहे. दर १०० फुटावर बंदूकधारी जवान उभा करून तुम्ही नक्की कोणते देवदर्शन करणार आहात ? (अमरनाथ यात्रा)
"मित्रा तुझी ट्रेकिंगची आवड सुरु ठेव पण हे धार्मिक? पर्यटन बंद कर, खऱ्या देवा पासून लांब जाशील हे असले पर्यटन करून. गर्दीची ठिकाणे टाळणे यात शहाणपण आहे.
खरच हा सल्ला पुढील आयुष्यात खूप उपयोगी पडला, तशी देव दर्शनाची फारशी आवड नव्हतीच त्यात या भेटी मूळे एक पक्की भुमिका मिळाली.
आज भारतात लोकसंख्ये च्या आतोनात वाढीमुळे यात्रा स्थाने , कुंभमेळा , अगदी पर्यटन स्थळे सुद्धा असुरक्षित आहेत.( रामोजी फिल्म सिटी येथे दिवाळी च्या आसपास एका दिवशी ९५०० पर्यटक आल्याची नोंद आहे , तेथील व्यवस्थापनाने सांगितल्या नुसार ते ४००० हजार लोकांना सुरक्षित पणे सामाऊ शकतात , हि आकडे वारी २००५ सालातील आहे. )
या यात्रांच्या काळात तेथे घेऊन जाणारे रस्ते हि मृत्यूचे सापळे बनत आहेत. देवदर्शनासाठी हजारो रुपये मोजणारे भक्त आपल्या वाहन चालका च्या विश्रांती बाबत , वाहनाच्या सुरक्षे बाबत राम भरोसे असतात.
त्यात "आम्ही दमड्या मोज्ल्यात चिंचोके नाही" या बाण्यामुळे सगळीच व्यवस्था कोलमडते.
" टूरटूर" ओप्रेटोर, लॉज वाले, भिक्षुक आणि इतरांचे हितसंबंध यात गुंतलेले असल्याने हे सर्व लोक याला सतत प्रोत्हाहन देत असतात.
या भक्तांना देऊळ, केशवा माधवा , OMG , १०० वेळा पाहण्याची
आणि भाऊसाहेब पाटणकरांचा पुढील शेर १००० वेळा लिहिण्याची
शिक्षा ठोठावली पाहिजे
मानतो ना देव आम्ही नाही कुठे ऐसे नव्हे
मानतो इतुकेच की तो आमचा कोणी नव्हे