नमस्कार सज्जनहो, सध्या श्रावण महिना चालू आहे सर्व साधकांसाठी पर्वकालच जणू या महिन्यात कुठल्याही देवतेची केलेली साधना अधिक फलदायी असते. परंतु त्यातल्या त्यात हा श्रावण महिना भगवान शिवशंकरासाठी खूपच महत्वाचा मानला जातो .
नेहमी म्हणजे रोजच्या जीवनात प्रत्येकजण 'जो आस्तिक आहे तो' सकाळी स्नानानंतर पूजा जमली नाही तर देवाला नुसता नमस्कार का होईना करूनच घराच्या बाहेर पडतो.
परंतु श्रावण महिन्यात प्रत्येकाच्या या कृतीत जास्त सुधारणा होत असते. म्हणजे उपवास किंवा ठराविक दिवशी देवाला जाऊन येणे आदी. जमले तर एखाद्या सद्ग्रंथाचे वाचन आणि दिवसातून जमेल तसे देवाचे नामस्मरण अश्या गोष्टी आपोआपच होतात.
भगवान शंकराचा आवडता असा हा श्रावण म्हणजे तृप्तता परिपूर्णता आणि समाधान याचा सुरेख मेळ असलेला आहे. धरणीमाता वरुणराजाच्या आगमनाने तृप्त झालेली असते. शिवाय झाडे, वेली, शेतातील पिके परिपूर्णतेच्या अवस्थेत असतात. आणि सर्व जीव त्यामुळे समाधानी असतात. आणि साधना हि मन जेव्हा समाधानी असते तेव्हा खूप चांगली होते. म्हणूनच श्रावण महिना भक्तीसाठी विशेष ठरला जातो.
भगवान शिव, एकांतप्रिय, सतत ध्यानमग्न, भक्तांवर कृपेचा वर्षाव करणारे आणि संपूर्ण विश्वाकरिता स्वत हलाहल प्राशन करून विश्वाला परोपकाराचा मार्ग दाखविणारे आहेत. देवादिदेव महादेव असूनही पर्वतावर एकांतात रमणारे स्मशानात जाऊन अंगाला राख फासणारे आणि मूर्तिमंत वैराग्य काय असते त्याचे उदाहरण म्हणजे भगवान शिव.
आजच्या धकाधकीच्या जीवनात शांती, स्वास्थ्य, समाधान हरविले आहे. भगवान शंकराच्या आचरणाकडे पहिले तर आपल्याला नक्कीच शांती समाधानाचा मार्ग सापडू शकतो .
आज या स्पर्धेच्या युगात जो तो नुसता धावत सुटला आहे. स्वताच्या नावलौकिकासाठी आणि पैसा कमाविण्यासाठी काहीही करत आहे. जो तो सुसाट सुटला आहे. आपली हि सुसाट धाव केव्हा थांबणार आहे कुणास ठाऊक?आणि याच्यातून नक्की काय साध्य करायचे हेही माहित नाही.
*इथे भगवान शिवांचा विचार केला तर अष्टमहासिद्धी, सर्व देव, यक्ष,किन्नर ,गंधर्व आणि गण हे सर्व दारात सेवेसाठी उभे असूनही भगवान शिव जे वैराग्यपूर्ण जीवन व्यतीत करतात ते विचार करण्यासारखे आहे. आणि आपणसुद्धा विचार करून त्यातून काही घेण्यासारखे आहे का हे बघायला हवे .
*भगवान शंकरांची एकांतप्रियता यावर सुद्धा आपण विचार करायला हवा. आजच्या स्पर्धेच्या युगातील मानव किती मिनिटे एकांतात घालवतो.? जर एखाद्याला विचारले कि तुम्ही किती वेळ एकांतासाठी घालविता, तर तो म्हणेन -अरे बाबा ह्या काय एकांताच्या गोष्टी करतोस इथे जेवलो तर हात धुवायला वेळ नसतो.
*भगवान शिवाची ध्यानमग्न अवस्था आपल्याला हे तर सुचवत नसेल ना? कि बाबा दिवसभर खूप धावपळ केलीस आता जर पाच मिनिटे का होईना पण एका जागी डोळे मिटून शांत बस आणि काही दिवसांनी तुझ्यातील बदल बघ.
* भगवान शिव सतत भक्तांवर कृपेचा वर्षाव करतात त्यातून त्यांना हे सुचवायचे असेल कि आपल्यापेक्ष्या (आपण जो कोणी आता आहे तो ) कमी गरीब दुर्बल आहेत त्यांच्यावर मदतीचा वर्षाव करा. मग बघा तुमच्या जीवनात किती फरक पडतो ते. दिनदुबळ्यांच्या अडी अडचणीमध्ये मदत करा त्यांच्या दुखात सहभागी होऊन त्यांचे दुख:कमी करण्याचा प्रयत्न करा. हे त्यांनी हलाहल प्राशन करून दाखवून दिले आहे.
एकंदरीत काय तर श्रावणात धरणीमातेने , निसर्गाने, ईश्वराने जे काही भरभरून दिले आहे त्याची प्रत्येकाने जान ठेवली पाहिजे कितीही धावपळीचे जीवन जगात असलो तरी दिवसातून पाच दहा मिनिटे का होईना शांत डोळे मिटून विचार न करता बसले पाहिजे. प्रसिद्धी ,पैसा यांच्यामागे न लागता अंती काय साध्य करणार आहोत याचा विचार करायला हवा. आणि विचार करूनही उत्तर सापडले नाही तर ज्ञानेश्वरी गीता वाचा समजून घ्या कारण तिच्यामध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. आणि एकदा का तुमचे सर्व प्रश्न संपले कि मग जीवन किती सुंदर आहे हे समजेल . आणि त्याबरोबर सर्वच महिने श्रावणासारखे सुंदर, परिपूर्ण शांतता समाधान देणारे असतील.
भगवंताच्या साधनेसाठी वेळ काळाचे, दिस मासाचे , व अन्य कसलेही बंधन नाही.
"जीवाचे शिवात एकरूप होणे हाच तर खरा जीवनाचा हेतू असतो.
प्रतिक्रिया
13 Aug 2013 - 7:15 pm | अनिरुद्ध प
कोलाहलात शान्त व एकान्त जागा कुठे शोधायची ?
14 Aug 2013 - 6:46 pm | प्रसाद गोडबोले
वीक डे ला काहीतरी फालतु कारण दाखवुन ऑफीसला दांडी मारुन अक्सा बीचवर गेलात तर "पुरेशी शांतता व एकांत" लाभतो ;)
16 Aug 2013 - 2:24 pm | अनिरुद्ध प
पण आपण सान्गीतलेल्या ठिकाणी बय्राच दिवसात गेलेले नसावेत्,कारण त्या ठिकाणी मी बय्राचवेळा सायकलने रोज जात असे,म्हणुन सद्ध्यातरि आपण सान्गितलेले ठिकाण आणि वेळ हि बाद ठरत आहेत.(वरिल कारणासाठी)
13 Aug 2013 - 8:55 pm | प्रभाकर पेठकर
बुक्का लावा आणि आरतीचे ताट फिरवा.
13 Aug 2013 - 9:48 pm | पैसा
हे सगळ्या लेखाचं सार!
14 Aug 2013 - 1:06 pm | अनिरुद्ध प
श्रावण मासाचे वेगळे महत्व मानण्याची गरज काय?
14 Aug 2013 - 2:33 pm | प्रभाकर पेठकर
श्रावणात मांसाला अजिबात महत्त्व द्यायचे नसते.
14 Aug 2013 - 3:52 pm | अनिरुद्ध प
तसेही आम्ही बारा महिने तेरा काळ गवत खाणार्यात मोडत असल्याने आम्ही वर्षभर 'मांसाला' अजिबात महत्व देत नाही,तसेच वरिल माझ्या उत्तरात 'मास' म्हणजेच महिना असे अभिप्रेत होते,'मांस' असे काही नव्ह्ते.
13 Aug 2013 - 11:36 pm | कवितानागेश
छान.
भगवान शिव सतत भक्तांवर कृपेचा वर्षाव करतात त्यातून त्यांना हे सुचवायचे असेल कि आपल्यापेक्ष्या (आपण जो कोणी आता आहे तो ) कमी गरीब दुर्बल आहेत त्यांच्यावर मदतीचा वर्षाव करा. मग बघा तुमच्या जीवनात किती फरक पडतो ते. दिनदुबळ्यांच्या अडी अडचणीमध्ये मदत करा त्यांच्या दुखात सहभागी होऊन त्यांचे दुख:कमी करण्याचा प्रयत्न करा. हे त्यांनी हलाहल प्राशन करून दाखवून दिले आहे.
हे फार आवडले.
14 Aug 2013 - 10:49 pm | यसवायजी
श्रावणात कोंबड्यांना सर्दी पडसं वगैरे काहीतरी होतं म्हणे.. त्यामुळे १ महिना त्यांचं आयुक्श्य वाढवल्याचं पुण्य लाभतं आपल्याला..
पण काही जण श्रावणात केस/दाढी वाढवतात. ह्याचं लॉजीक काय समजलं न्हाई बा आपल्याला..
कुणाला काही !dea?? काही धार्मीक किंवा वैज्ञानीक कारण असेल काय?
14 Aug 2013 - 10:59 pm | प्रसाद गोडबोले
अहो श्रावणात पाऊस पडत असतो . रिमझिम तर आहे , येवढसं भिजल्याने काय होतय असं म्हणुन आपण दुर्लक्ष करतो पण केसात पाणी राहिल्याने डोक्याला थंडी लागते ...मग सर्दी पडसं होतें
सिम्पल :)
14 Aug 2013 - 11:10 pm | यसवायजी
अहो पण केस भिजू नयेत म्हणुन कापले पाहीजेत ना.. ते लोक वाढवतात.. सेम लॉजिक कसं काय??
15 Aug 2013 - 12:24 am | प्रसाद गोडबोले
माझ्या माहीती प्रमाणे श्रावणाच्या आधी तुळतुळीट चमन गोटा करायचा असतो .
16 Aug 2013 - 10:58 am | मदनबाण
माझ्या माहीती प्रमाणे श्रावणाच्या आधी तुळतुळीट चमन गोटा करायचा असतो .

हा.हा.हा... सध्या पावसाळ्यामुळे मी झीरो कट / मिलेटरी कट मारुन ठेवला आहे. कधी काळी कॉलेज मधे असताना कडक श्रावण पाळला होता तेव्हा अगदी हे राम मधला कमल हसन झाला होता माझा ! ;)
16 Aug 2013 - 1:43 pm | सुहास..
मदन हसन ;)
16 Aug 2013 - 12:27 pm | अनिरुद्ध प
कारण अभक्षभक्षण व अपेयपान यावर नियन्त्रण ठेवणे सोपे जात असावे असे वाटते.
16 Aug 2013 - 3:55 pm | बॅटमॅन
कसे काय बॉ? पंजाबात या दोन्ही गोष्टींचे सेवन दाबून चालते असे ऐकून आहे आणि तिथे तर केस व दाढी वाढवल्या जातेच. वैयक्तिकपणेही पाहिले असता दोन्ही गोष्टींचा काही संबंध नाही असेच दिसते.
16 Aug 2013 - 4:43 pm | अनिरुद्ध प
श्रावण पाळण्याचा म्हणजेच,मनावर सय्यम ठेवण्याचा आहे,आणि ज्या कोणाला या गोष्टीमुळे होणारा फायदा हा वैयक्तिकच असतो,कारण मी अनेकदा सार्वजनीक ठिकाणी श्रावण या महीन्यात एखाद्या व्यक्तिला त्याच्या वाढलेल्या दाढीवरुन काय श्रावण पाळलाय काय असे विचारलेले ऐकले आहे.(महाराष्ट्रात)
16 Aug 2013 - 7:32 pm | यसवायजी
आणी काही भक्त श्रावणात केस-दाढी वाढवतात पण 'घरात पोळी आनी भायेर नळी' चालुच असतं..
बाकी वर्षभर कोण ढुंकुन बघत नाही, निदान असला अवतार बघुन ४ लोक विचारतात.. काय श्रावण पाळलाय काय??
:D
16 Aug 2013 - 9:26 am | दादा कोंडके
तिकडे नागडे शिवभक्त अंगाला राख फासून स्मशानातली प्रेतं उकरून वचा-वचा खातात आणि इकडे शिवभक्तांचं श्रावणातल्या सात्विक उपासनेने मला अंमळ गदगदून आलं.
16 Aug 2013 - 12:54 pm | स्पा
????
16 Aug 2013 - 1:01 pm | प्रसाद गोडबोले
मागे मी सदर प्रकाराची युट्युब लिन्क दिली होती तेव्हा ती डीलीट करुन "अशा लिन्क शेयर करण्यापुर्वी थोडा विचार करावा " असा डोस मला सं.मं ने दिला होता :(
(घाबरलेली स्मायली)
16 Aug 2013 - 1:41 pm | दादा कोंडके
सहमत. नकोच ते. त्यापेक्षा आपली भाजी-भाकरी बरी. :)
16 Aug 2013 - 5:26 pm | म्हैस
डुर्दैवाने प्रतिक्रिया देनार्यान्नि लेखाचि खिल्लि उड्व्लेलि आहे. इतका सुन्देर लेख कोनालहि समजु नये?स्वतला शिव्भक्त म्हन्वुन घेनारे कहिहि करतात. त्याचा देवाशि काय सम्बन्ध?
16 Aug 2013 - 5:36 pm | अनिरुद्ध प
आता बाणाचे काहि खरे नाही,शिवाचा तिसरा नेत्र उघडण्यातच आहे.