एक होता ससा एक होतं कासव . त्यांची लागली शर्यत आंब्याच्या झाडापर्यंत पळण्याची पण चिऊचं घर होतं मेणाचं अन काऊचं घर होतं शेणाचं म्हणुन म्हातारी म्हणाली " लेकीकडे जाऊ तुपरोटी खाऊ मस्त जाडजुड होवु ". उंदीरानं काय केलं छोटे कापडाचे तुकडे जोडुन मस्त सुंदर टोपी बनवली अन सगळ्यांना चिडवत सुटला आणि मग ससा मग टुणुक्टुणुक उड्या मारत जोरात पुढं निघुन गेला अन कासव मात्र हळु हळु चालायला लागलं तेवढ्यात जोरात पाऊस आला अन काऊचं घर गेलं वाहुन मग काऊ चिऊच्या घरी आला आणि म्हणाला " चल रे भोपळ्या टुणुक टुणुक " म्हातारी घाबरली आणि म्हणाली " प्रधानजी जा ताबडतोब त्या उंदराला कैद करुन आणा अन त्याची टोपी जप्त करुन मला द्या. प्रधानजी निघाले तेव्हा सशाला दिसलं गाजरांचं शेत .कासवांनं गाजरं खावुन झोपलेल्या सशाला पाहिलं अन विचार केला " चिऊ ताई चिऊ ताई दार उघड . " चिऊताई म्हणाली " लेकीकडे जाते तुप रोटी खाते मग तु मला खा" काऊ म्हणाला " राजा भिकारी , माझी टोपी घेतली राजा भिकारी माझी टोपी घेतली " राजा चिडला अन हळु हळु चालत चालत आंब्याच्या झाडापाशी पोचला अन म्हणाला " थांब माझ्या बाळाला नाहु घालु दे , टीट लाऊ दे मग लेकीकडे जाते तुप रोटी खाते मग तु मला खा " मग कासवानं ती भिकारडी टोपी म्हातारी कडे फेकुन दिली .मग ससा हसत हसत म्हणाला " भोपळा मला घाबरला माझी टोपी परत दिली हा हा हा." अशा तर्हेने म्हातारीने शर्यत जिंकली पण तेवढ्यात.....
.
.
कबुतराच्या मागे लागला बहिरी ससाणा ...घाबरलेलं कबुतर उडत उडत सिंव्हासमोर आलं आणि म्हणालं ह्या जंगलात तुमच्यापेक्षा मोठ्ठा सिंव्ह आहे ." मग म्हातारी सिंव्हाला एका खोल विहीपाशी घेवुन गेली (कारण ससा कसा घेवुन जाणार तो तर गाजर खावुन झोपला होता ना !) मग शिबीराजा उंदराला म्हणाला "ह्या भोपळ्याच्या वजना इतकं मांस मी तुला देतो" पण चिंऊताईने दार काही उघडलंच नाही बिच्चारे प्रधानजी म्हणाले "कोल्होबा कोल्होबा बोरं पिकली " रडत रडत शिबीराजा म्हणाला " नको गं म्हातारे ढुंगी पोळली " मग लबाड माकडाने केक चे दोन भाग केले एक भाग सशाण्याला दिला एक भाग भोपळ्याला दिला एक भाग स्वतःल ठेवुन घेतला .श्रावणबाळाने हळुच विहीरीत डोकावुन पाहिले बघतो तर काय सेम टु सेम कासव तशीच भली मोठ्ठी आयाळ असलेलें ...पण तेवढ्यात.....
.
.
.
एक म्हातीरी आली एक टोपी घेवुन गेली "....
(क्रमशः )
डिस्केलमर : सदर कथा स्वतःच्या जबाबदारीवरच लहान मुलांना (दुसर्यांच्या) ऐकवावी . सदर कथा ऐकुन पेंगुळलेली कार्टीही जागी होवुन रडायला लागतात अन त्यांच्या आयांची बोलणी खावी लागतात असा शिबीराजाचा अनुभव आहे .
प्रतिक्रिया
10 Aug 2013 - 9:30 pm | सामान्य वाचक
गाई वरच्या निबंधाची आठवण झाली.
10 Aug 2013 - 9:51 pm | पैसा
पु भा प्र. पण तेव्हा म्हातारीला कोण भेटले ते सांगायला विसरू नका बरं!
10 Aug 2013 - 10:13 pm | आदूबाळ
आवडलं!
माझ्या स्वतःच्या गोष्टीत ऑन डिमांड खारूताई पासून व्हॅक्युम क्लीनर पर्यंत वाट्टेल त्या वस्तू घुसतात त्याची आठवण झाली :)
10 Aug 2013 - 10:17 pm | टवाळ कार्टा
आयला....कितवा पेग ;)
10 Aug 2013 - 10:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
बरं झालं आताच विचारलंत... क्रमशः मध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणं कठीण आहे ;)
12 Aug 2013 - 1:09 am | प्रसाद गोडबोले
अब रुलायेगा क्या पगले ?
दारुच्या पेग सोडा , थेंबा थेंबा साठी तरसलोय मी इथे :(
13 Aug 2013 - 9:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
अस्सं होय... म्हणजे हा विथड्रॉवल सिंड्रोम आहे तर ;)
10 Aug 2013 - 11:13 pm | कवितानागेश
अवांतरः २२९ आणि १२९ :)
11 Aug 2013 - 8:08 am | प्रीत-मोहर
माझी अडिच वर्षांची भाची अशीच गोष्ट सांगते :)
11 Aug 2013 - 12:34 pm | प्रभाकर पेठकर
लहान मुलांना 'शत' शब्दाचा अर्थ कळत नाही त्याचा इतका गैरफायदा घेऊ नये.
11 Aug 2013 - 1:30 pm | स्पंदना
मग शिंप्याने शिवले कपडे, ते सिंहाने घातले, अन उंदिर म्हणाला भोपळा नंगु आहे.
11 Aug 2013 - 6:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
वाचायला सुरुवात केली तेव्हाच मी ओळखलं की ही सायबेरियातील कायबेरिया जमातिच्या काहिबाहिया या भाषेतली कहाणी आहे...
कारण त्या भाषेत: शत = ३५९ ;)
11 Aug 2013 - 9:38 pm | भडकमकर मास्तर
आज मुलीला हीच गोष्ट सांगणार आहे..
12 Aug 2013 - 12:04 am | प्रभाकर पेठकर
मिपा वरील अध्यात्माच्या अत्याचारी लेखापासून प्रेरणा घेतलेली दिसते आहे. सर्व डोक्यावरून गेले.
13 Aug 2013 - 7:07 pm | अनिरुद्ध प
लै म्हन्जे लैच भारी,पु भा प्र (असेल तर)
14 Aug 2013 - 12:20 pm | दिप्स
एक नम्बर
14 Aug 2013 - 1:11 pm | ब़जरबट्टू
ही कथा वाचून मला रडू येतेत हो, बिचारी लहान मुले कशी नाही रडणार. बालकथामध्ये सहसा काही बोध द्यायचा प्रयत्न असतो, तुम्ही भराभर चिन्द्या केल्या की ताई... आईनस्ताईनच्या घराण्याच्या का काय तुम्ही :)