शतशब्द कथा
हा प्रकार सध्या वेगात प्रचलीत होत आहे.मी ही प्रयत्न करायला गेलो.पण छ्छे! मग माझं मन म्हणालं मला--आत्मू..तुझा प्रांत नाही रे हा.आपला वकूब ओळख मेल्या! पण तरिही ते ऐकेल तर माझं मन कसलं? सलग दोन रात्री मेंदूबरोबर हुतुतू खेळून सुद्धा,हाती काही लागलं नाही.मग मन म्हणालं,तू सावरकरनिष्ठ ना? मग त्यांचे काव्य वाच,स्फूर्ती येइल.अरे अगीचे भस्म आणी राखेचाही अंगार करणारा माणूस तो! त्याच्या शब्द स्पर्शाने तुझा मेंदू चेतणार नाही काय? आणी खरच मेंदू चेतला,पण कुठे? तर काव्याच्याच प्रांतात."कथा" या प्रांतातली "गती" दाखवून,एक खराखुरा "मोक्ष" दिला त्या स्पर्शानी मला!
========================================================
शत'शब्द शोधिताना
शत रात्री व्यर्थ गेल्या
कथिता तुला व्यथा ही
त्या रात्री धन्य झाल्या!
खर्ची पडे वह्यांची
एक थप्पी एका पाठी
कशी साधना तुझी ही
हातात अंती "वाटी"
हाय हाय..जमे न काही
ठेव पाने तू मिटोनी
प्रतिभा नभातं गेली
घरट्यातूनी उडोनी!
प्रतिक्रिया
7 Aug 2013 - 4:37 pm | मदनबाण
शत जन्म शोधिताना | शत आर्ति व्यर्थ झाल्या |
शत सूर्य मालिकांच्या | दीपावली विझाल्या ||
तेव्हा पडे प्रियासी | क्षण एक आज गाठी |
सुख साधना युगांची | सिद्धीस अंती गाठी ||
हा हाय जो न जाई | मिठी घालु मी उठोनी |
क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी ||
कवी: स्वातंत्र्यवीर सावरकर
7 Aug 2013 - 4:43 pm | अत्रुप्त आत्मा
हायला... मूळ काव्य "सांगायचं" र्हायलं :( माफी असावी हो! :)
12 Aug 2013 - 11:06 pm | धमाल मुलगा
वाचता वाचताच वसंतखाँच्या आवाजात ह्या ओळी ऐकू यायला लागल्या राव. :)
ठ्यांक्यु मदनवा :)
7 Aug 2013 - 4:56 pm | अत्रुप्त आत्मा
ह्या धाग्यातली मेख ओळखणार्याला माझ्याकडून येक बक्षिस.. ;)
वळखा..वळखा..बरं!!! :)
7 Aug 2013 - 8:04 pm | पैसा
तुमचा "शत शब्द अनुभव" आवडला बर्का! काव्य झक्कास! या निमित्ताने एका सुंदर गीताची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! एवढे बोलून मी माझे २४ शब्द संपवते.
7 Aug 2013 - 8:49 pm | सुधीर
या निमित्ताने एका सुंदर गीताची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!
14 Aug 2013 - 5:57 pm | चिगो
" शतशब्द अनुभव".. ;-)
15 Aug 2013 - 10:50 pm | अत्रुप्त आत्मा
दोन..! ;)
7 Aug 2013 - 5:04 pm | चौकटराजा
मला तर बुवा एक ओळ पटकन सुचली.
शत लुब्ध शीधताना
फिल्डिंग व्यर्थ गेल्या
शत लेख काव्य माला
किती त्वदर्थ लिहिल्या
हाय हाय करू मी काय
ही सांज गे उदास
चिती चितारलेल्या
स्माईली उडून गेल्या
7 Aug 2013 - 5:04 pm | प्रचेतस
_/\_
7 Aug 2013 - 8:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
छान प्रयत्न आहे ! जागलेल्या रात्रींचे चीज झाले !
चिती चितारलेल्या
हे मात्र आत्माबुवांना चपखल लागू आहे ! +Dस्माईली उडून गेल्या
7 Aug 2013 - 9:31 pm | मोदक
हे मात्र आत्माबुवांना चपखल लागू आहे!
+११११११
9 Aug 2013 - 12:14 pm | बॅटमॅन
हेच म्हण्णार होतो, एकदम चपखल =))
9 Aug 2013 - 3:47 pm | अभ्या..
हम्म
लै जणांच्या रात्र रात्र जागलेल्या अन चितार्लेल्या स्मायल्या उडून जातेत. फ़क्त गुरजी बिनधास्त कबूल करतेत.;-)
गुरजी तुस्सी ग्रेट हो.
9 Aug 2013 - 5:18 pm | बॅटमॅन
हा हा हा =))
अगदी अगदी.
9 Aug 2013 - 1:12 pm | आतिवास
शतशब्दकाव्य आहे की काय असं वाटलं आधी :-)
9 Aug 2013 - 5:03 pm | स्पंदना
यस्स! आत्मुस तुस्सी ग्रेट हो।
9 Aug 2013 - 5:41 pm | अत्रुप्त आत्मा
वाचकांना एक विनंती- हे सावरकरांच्या काव्याचे विडंबन नाही. फक्त रचनेचे आधारभूत प्रतीरूप आहे. :)
9 Aug 2013 - 7:44 pm | चौकटराजा
विडंबनात मूळ काव्याची चेष्टा नसतेच. खरे तर त्याचा फॉर्म विडबन कर्त्याने स्वीकारला यात मूळ काव्याचा सन्मानच होतो.
12 Aug 2013 - 9:13 am | वेणू
प्रयोग आवडला रे...
12 Aug 2013 - 10:46 pm | अत्रुप्त आत्मा
सर्वांचे आभार..! :)
12 Aug 2013 - 11:07 pm | एस
अपितु सहजीचि म्हणोनी धागा उघडुनि पाहो तो आपुली काव्यशलाका आमुचिये मनास स्पर्शून गेली असे ऐसे लिहावयासि मात्र मिपामाजी आज प्रवेशकर्ता झालो आहो.