भीक न घालता कुत्रे कसे आवरावे ?

सस्नेह's picture
सस्नेह in काथ्याकूट
4 Aug 2013 - 8:53 pm
गाभा: 

म्हणजे त्याचं असं झालं की हे सगळं त्या कुत्रीनं सुरु केलं.
ओ, कुत्री ही शिवी नैये कै ! खरीखुरी कुत्री आहे. ती बघा अजून आमच्या गेटबाहेर उभी आहे. आणि तिनंच दोन महिन्यापूर्वी आमच्या नारळीखाली एक नव्हे दोन नव्हे सात पिल्ली घातली होती. पंधरा दिवस तिनं आम्हाला नारळीच्या पंधरा फुटात पाय तर टाकू दिला नाहीच, वर आणि आमच्याच अंगणात आम्हाला जायची चोरी झाली ! काठी हातात घेतल्याशिवाय घराबाहेर पाय टाकणे जिवावरचे धाडस होऊन बसले. भगीरथ प्रयत्नाने तिची अन तिच्या पिल्लावळीची बोळवण शेजारच्या पडक्या ग्यारेजमध्ये केल्यानंतर सुद्धा तिने आपला दरारा, येत जाता वॉव वॉव करून टिकवून धरला आहे. शिवाय माहेरघरचे आमंत्रण असल्यागत वेळीअवेळी हक्काने आमच्या मागच्या दारी खरकटी शिते खाण्यासाठी ती अन तिची पिल्लावळ वरचेवर पायधूळ झाडत असतात , ते निराळेच ! म्हणजे, ती गेटवरून उडी मारून अन पिल्ले गेटखालच्या सापटीतून सरपटत !
तर या सगळ्या कुत्रीय दहशतीवर चिरंजीवाने रामबाण उपाय शोधला आहे. तो असा, की आपणच एक कुत्रा पाळायचा ! तोपण साधासुधा नव्हे, तर जर्मन शेफर्ड !
आता माझी लहानपणीची सगळी हयात अपार्टमेंटमध्ये राहून गेल्यामुळे हे बंगलेवाल्यांचे कुत्रे प्रकर्ण म्हणजे मला काला अक्षर भैस बराबर ! मग हे अज्ञान, मिपावरच्या सर्वज्ञ, तज्ञ, सूज्ञ व सदैव सल्ल्यास सज्ज असणाऱ्या निष्णात सल्लागारांकडे नेण्याचे ठरवले.
तेव्हा मिपावरील सर्व सज्जन, साक्षात माहितीचे अर्णव, यांना णम्र इनंती की कृपया खालील मुद्द्यांवर मला सल्ला देऊन गार.. आपलं, उपकार करावे !
१. ज्याचा मेंटेनन्स आणि केसांची लांबी कमीत कमी आहे (म्हणजे उवा इ. श्वापदे त्या जंगलात फिरावयास धजणार नाहीत ) अशी श्वानप्रजात कोणती ? या प्रजातीच्या श्वानशिशूच्या किमती काय असतात ?
२. किती वय असताना कुत्र्याचे पिल्लू घरी आणावे ?
३. त्याची राहण्याची झोपण्याची व्यवस्था कुठे अन कशी असावी ?
४. त्याच्या शी शू ची व्यवस्था कशी करावी ?
५. कोणत्या वयात काय खाणे द्यावे ?
६. अंघोळ घालण्याची फ्रीक्वेन्सी किती असावी ?
७. त्याला पशुवैद्याकडे केव्हा न्यावे ?
८. (त्याच्या अन आपल्या ) आरोग्याची कोणती काळजी घ्यावी म्हणजे त्याच्यामुळे घराचे आरोग्य दूषित होणार नाही ?
९. घरामध्ये येऊ द्यावे की नाही ?
१०. कुत्रा पाळण्याचा मंथली खर्च अंदाजे किती असतो ?

तर वरील सर्व माहिती मिळाल्याशिवाय कुत्रा पाळण्याचे धाडस करण्याचा इरादा पक्का होईना.
मग द्या बरे तुमचा चान चान सल्ला !! a

प्रतिक्रिया

कुत्रे पाळण्याचा अनुभव नाही,
पण असे करता येईल का, एखाद्या वाघाचा किवा अजून कुत्रे ज्या प्राण्यांना घाबरता त्यांचा आवाज टेप करून ठेवायचा
व त्या कुत्रीला घाबरावायचे.

लॉरी टांगटूंगकर's picture

4 Aug 2013 - 9:05 pm | लॉरी टांगटूंगकर

http://www.misalpav.com/node/22166
याच्याशी बरेच दोस्त बाडीस आहेत,
थेट अनुभव नसल्याने उत्तर नाही.

मी लहानपणी सेम रामबाण उपाय दिलेला पण घरच्यांनी तो न ऐकता काही तरी भलतंच केलं...
त्या बेसवर कुत्रीला हटवण्याचे असल्यास फुकट सल्ला देऊ शकतो...

सस्नेह's picture

5 Aug 2013 - 9:50 pm | सस्नेह

धन्स. हे आधीही वाचले आहे.

यशोधरा's picture

4 Aug 2013 - 9:14 pm | यशोधरा

जर्मन शेपर्ड अतिशय नाजूक तब्येतीचा असतो, भला मोठा दिसत असला तरीही. जरा इकडे तिकडे झाले की त्यांची तब्येत बिघडते. डॉबरमन एकदम ब्येष्ट. केस वगैरेही खूप नाही गळणार, किंवा रॉटवायलर. त्यांची जरा काळजी घ्यावी लागते.

लॅबू तर एकदम ब्येष्ट!

इथे पहा आणि ठरवा की कोणती ब्रीड घरी आणावयाची आहे, मग डिटेलमध्ये लिहिता येईल.

प्रभाकर पेठकर's picture

4 Aug 2013 - 9:19 pm | प्रभाकर पेठकर

कुत्रे पाळण्यावर पुस्तके मिळतात. अगदी सर्व जातीच्या कुत्र्यांची समग्र माहिती त्यात असते.
माझा आवडता डॉबरमन आहे. आखुड केसांचा असतो. कुत्र्यांना गोड आणि तेलकट खायला घालून नका. त्याने केस गळतात (कुत्र्याचे). कुत्रे आपले घरचे जेवण (आपण जेवतो तेच) जेवतात. जास्त मसालेदार आणि तेलकट जेवण असू नये. आणि पेडिग्रीची सवय लावली तर इतर कशाला तोंड लावत नाहीत. ते महाग पडतं.
आता ती कोण अनोळखी कुत्री, तुमच्या घरी चांगल्यातला (देखणा) कुत्रा आला की लवकरच सुन म्हणून बंगल्यात राहायलाच येईल. तेवढं सांभाळायचं.
कुत्र्यांना एकटं मोकळं सोडायचं नाही. रोज फिरायला न्यावं लागतं. तेंव्हा साखळी बांधूनच न्यावे. नाहीतर ते रस्त्यात इथे-तिथे घाणीत तोंड घालतात. दुसर्‍या कुत्र्यांपासून तुमच्या कुत्र्यास स्पर्श होऊ नये म्हणून सांभाळायचं. संसर्गजन्य रोग असतात. त्याची बाधा होऊ शकते.
कुत्रा न पाळता केवळ श्वानप्रेमापोटी एवढी माहिती मला आहे.

त्रिवेणी's picture

4 Aug 2013 - 9:24 pm | त्रिवेणी

आता ती कोण अनोळखी कुत्री, तुमच्या घरी चांगल्यातला (देखणा) कुत्रा आला की लवकरच सुन म्हणून बंगल्यात राहायलाच येईल. तेवढं सांभाळायचं.>>>>>>>>>>>>ही ही ही

हो, बाळंत्पण तर आधीच केले आहे, आता सूनमुखसुद्धा पुन्हा पाहीन ! a

कुत्र्याची वासाची शक्ती अतिशय तीव्र असते त्यामुळे कुत्र्याला जागेतून हलवण्यासाठी सोपा उपाय म्हणजे त्यांच्या बसण्याच्या जागेशी डांबराच्या गोळीचा थोडासा चुरा टाका. गोव्याला माझ्या घराच्या खिडकीखाली कुत्रीने पिल्ले दिली होती दिवसभर आणि रात्रभर कुई कुई आवाजाने उच्छाद झाल्याने वरील उपाय केला दुसर्या दिवशी कुत्रीने एक एक करून सारी पिल्ले दुसरीकडे पडक्या घरा मध्ये हलविली.

बॅटमॅन's picture

5 Aug 2013 - 12:20 am | बॅटमॅन

हा हा हा, खरा डॉक्टरी उपाय केलात एकदम :D

अत्रुप्त आत्मा's picture

5 Aug 2013 - 1:00 am | अत्रुप्त आत्मा

@ खरा डॉक्टरी उपाय केलात एकदम smiley>>> +++१११ =))

केव्हाही उपयोगी पडेल असा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय. सुबोधजी, धन्यवाद!

दादा कोंडके's picture

5 Aug 2013 - 11:56 am | दादा कोंडके

केव्हाही उपयोगी पडेल असा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय. सुबोधजी, धन्यवाद!

सहमत. आता त्यासाठी लांडगे किंवा कुत्र्यांना घाबरवणार्‍या तत्सम प्राण्यांच्या मुतायची वाट बघायला नको! ;)

अनेक विचार एकाच वाक्यात विरामचिन्हा शिवाय बांधल्यामुळे, `कुणाच्या' असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

धमाल मुलगा's picture

5 Aug 2013 - 8:49 pm | धमाल मुलगा

काय डोक्यालिटी है राव. सॉल्लीड लॉजिक. :)

सस्नेह's picture

5 Aug 2013 - 9:54 pm | सस्नेह

खरा उपयुक्त सल्ला दिल्याबद्दल.
डांबरगोळ्यांचा स्टॉक भरून ठेवण्यात येत आहे....

त्या कुत्रीचच एखाद पिल्लु दत्तक घ्या की ...

अवांतर सल्ला - मला वाटते भिक घालणे परवडेल पण (शक्यतो) कुत्रा पाळू नका. आणि अगदीच पाळायचेच असेल तर बाकी काही करण्याआधी शेजार्‍यांची परवानगी घ्या.. "की आमचे कुत्र भुँकलेले चालेल का?" म्हणून.

सुनील's picture

5 Aug 2013 - 8:48 am | सुनील

लेखाचा एकंदरीत टोन हा कुत्र्यांबद्दलच्या हेटाळणीचा वाटला म्हणून लिहावेसे वाटत नव्हते. तरीही, यशोधरा आणि पेठकर काकांचे प्रतिसाद वाचून लिहावेसे वाटले.

१. ज्याचा मेंटेनन्स आणि केसांची लांबी कमीत कमी आहे (म्हणजे उवा इ. श्वापदे त्या जंगलात फिरावयास धजणार नाहीत ) अशी श्वानप्रजात कोणती ? या प्रजातीच्या श्वानशिशूच्या किमती काय असतात ?

वर म्हटल्याप्रमाणे डॉबरमन.

आमच्याकडे आहे गोल्डन रिट्रीवर. अत्यंत केसाळ! परंतु, केस हीच त्याची शान आणि ऐट!

२. किती वय असताना कुत्र्याचे पिल्लू घरी आणावे ?

जेवढे लवकर आणाल तेवढे उत्तम. ५-६ आठवड्याचे आणा.

३. त्याची राहण्याची झोपण्याची व्यवस्था कुठे अन कशी असावी ?

स्वतंत्र गादी मिळते. अर्थात आमचा "टफी" लहानपणी आमच्याच बरोबर झोपत असे!

४. त्याच्या शी शू ची व्यवस्था कशी करावी ?

लहान मुलांप्रमाणेच. सवय लागेपर्यंत घरभर. एकदा सवय लागली की नेमलेल्या जागी.

५. कोणत्या वयात काय खाणे द्यावे ?

घरी आणल्यापासून लगेच.

६. अंघोळ घालण्याची फ्रीक्वेन्सी किती असावी ?

ब्रीडवर अवलंबून आहे. आम्ही दोन आठवड्यातून एकदा देतो. एरवी सतत केस विंचरत ठेवतो.

७. त्याला पशुवैद्याकडे केव्हा न्यावे ?

लहानपणी वरचेवर - लसीकरणासाठी वगैरे. नंतर २-३ महिन्यातून एकदा पुरे.

८. (त्याच्या अन आपल्या ) आरोग्याची कोणती काळजी घ्यावी म्हणजे त्याच्यामुळे घराचे आरोग्य दूषित होणार नाही ?

वेळच्यावेळी औषधपाणी केले तर काही प्रॉब्लेम येत नाही.

९. घरामध्ये येऊ द्यावे की नाही ?

!

त्याला जर घरचाच एक सदस्य म्हणून वागणूक मिळणार नसेल तर न आणणेच अधिक श्रेयस्कर!

१०. कुत्रा पाळण्याचा मंथली खर्च अंदाजे किती असतो ?

हौसेला मोल नाही ;)

या खेरीज हे लक्षात ठेवावे की, आपल्या हिंडण्या-फिरण्यावर बरीच बंधने येतात. स्वतःची चारचाकी असेल तर, प्रवासाचा प्रश्न मिटतो. तरीही, पेट्-फ्रेंडली हॉटेल्-रेस्टॉरण्ट्स शोधताना फार यातायात होते.

ते सोडले तर, पाळीव कुत्रा ही एक अत्यंत आनंददायक गोष्ट आहे.

न आणणेच अधिक श्रेयस्कर!

हा प्रतिसाद अत्यंत आवडला.

सस्नेह's picture

5 Aug 2013 - 9:56 pm | सस्नेह

लेखाचा एकंदरीत टोन हा कुत्र्यांबद्दलच्या हेटाळणीचा वाटला

आश्चर्य आहे !
माझ्या लेखात बरीचशी भीती अन थोडीशी चिंता आहे फक्त ...!

१ आपला सर्वात जास्त राग ज्या आय डी वर असेल त्याचे नाव कुत्र्याला देणे.
२ आमचा टिंब टिंब शिवमहिम्न स्तोत्र देखील म्हणतो हां ! होय की नाही रे टिंब टिंब ? असे लाडीक वाक्य पाठ करून ठेवणे !
३.दत्तभक्त होणे.
४.वर्षातून एकदा रायगडाला सश्वान भेट देणे.
५.आपले कुत्रे ( छे.. हा काय शब्द ? आपला पेट ...हं हा शब्द चालेल ) आमच्याकडे सोपवा व निर्धास्तपणे पंधरा दिवस चीन, युरोप अमेरिका यांच्या दौर्‍यावर निघा. अशा प्रकारची छोटी जाहिरात शोधायला शिका !
६. तुमचे कुत्रे रात्रभर भुंकून डोके उठवते त्यापेक्षा बेंकेत आणखी एखादा सेफ लॉकर का घेत नाही ? अशा विचारणेस
लॉकरचे भाडे कोण तुम्ही भरणार का ? असा प्रश्न ठासून विचारायची प्रॉक्टीस करा.

कोणतेही कुत्रे आणा, लळा लागला की त्याच्या जाण्यानंतर आठवण येताच डोळे ओले होतील. आपले लेकरू असावे तसे असते.

म्हणूनच प्राणी पाळावेसे वाटत नाहीत. :(

प्रकाश घाटपांडे's picture

5 Aug 2013 - 9:44 am | प्रकाश घाटपांडे

वल्ली व रेवतीशी अक्षरशः सहमत. टंकताना सुद्धा बिट्टू भुभुची जाम आठवण येते. स्नेहांकिताला सल्ला. भुभुला स्नेहांकित करुन घ्या मग काही प्रॉब्लेम येत नाही.

गणपा's picture

5 Aug 2013 - 1:40 pm | गणपा

लळा लागला की त्याच्या जाण्यानंतर आठवण येताच डोळे ओले होतील. आपले लेकरू असावे तसे असते.

शंभर वेळा सहमत.
कुत्रं कधी घरच्यांनी पाळू दिलं नाही. मुंबईच्या तोकड्या जागेत अधीक भर कुठली?
बाबांना एकदा अगदी २ दिवसांचं कोंबडीच पिल्लू मिळालं. ते ते घरी घेऊन आले. मुंबईत राहून कोंबडी कधी पाळीन अस स्वप्नातही वाटलं नव्हतं. चांगली ५-६ महिने होती. रोज सकाळी पहिल्या मजल्यावरच्या बाल्क्नीतून उडी मारून उंडरायला जायची. दुपारी परत जीने चढून घरात हजर. फार लळा लावला होता. एकदा वरच्या शेजार्‍याशी कडाक्याचं भांडण झालं माझं. त्या दिवशी आमची कोंबडी जी फिरायला गेली ती परत आलीच नाही. :(
तिच्या जाण्याचं दु:ख ईतकं होतं की बहिणीने ६-७ महीने (शिजवलेल्या) कोंबडीला तोंडही लावलं नाही.
मलाही फार वाईट वाटलं होतं, पण बहिणी ईतका त्याग माझ्याने काही झाला नाही.

मदनबाण's picture

5 Aug 2013 - 9:43 am | मदनबाण

ह्म्म्म... रोचक चर्चा ! ;)
बाकी मी खाली देतो तसा कुत्रा मिळाला तर नक्की पहा ! घराच्या आवारतलं काय अख्ख्या १ किलोमीटर परिघात कोणी येण्याची हिम्मत करणार नाहीत ! नातेवाईक सुद्धा लांबच राहतील ! ;)

D

जाता जाता :--- माझ्या आवडत्या भू भू वर काही तरी लिहावे असे बर्‍याच वेळा वाटले आहे, पण ते मी टाळले आहे.इतका मस्त कुत्रा नंतर माझ्या पाहण्यात कधीच आला नाही. :(

प्रकाश घाटपांडे's picture

5 Aug 2013 - 9:47 am | प्रकाश घाटपांडे

लई भारी. दत्तभक्तांना कुत्रा काही करत नाही असे म्हणतात.

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Aug 2013 - 9:56 am | ज्ञानोबाचे पैजार

कुत्रा हा अतिशय निरुपयोगी,लोचट आणि बिनडोक प्राणी आहे. कुत्रा पाळल्याने फायदा तर काही होतच नाही उलट शेजारी, मित्रमंडळी दुरावतात. रात्री बेरात्री भुंकुन तो डोके उठवतो. उगाच लोचटासारखा पायात तडमडत रहातो. त्याचे खाणे पिणे आणि मेंटेनंन्स हे वेगळेच. त्या शिवाय आपल्या हिंडण्या फिरण्यावरही बंधने येतात.इतरही अनेक कारणे आहेत.

त्या पेक्षा मांजर जरा बरी असते. पण ती देखील निरुपयोगी.

कुठले जनावर पाळायचे असेल तर एखादी गाय किंवा शेळी पाळा. कुत्र्या एवढ्या कष्टात आणि खर्चात तुम्हाला ती दुध तरी मिळेल. किंवा कोंबड्या पाळा.

मासे पाळण्याचा देखील विचार करुन बघा. तो पण पर्याय बरा आहे. ते बिचारे तर तुम्ही ठेवाल त्या कोपर्‍यात गुमान रहातात. जरा मोठा टँक घेतलात किंवा घराच्या मागे छोटेसे तळे किंवा हौद बांधलात तर खायचे मासे सुध्दा घरच्या घरी मिळु शकतात. एकदम ताजे ताजे.

वरचे काहीच पटले नाही तर एखादा घोडा किंवा हत्ती पाळा. ऑफिसला जाण्यासाठीचा पेट्रोलचा खर्च तर नक्कीच वाचेल.

पण कुत्रा अजिबात पा़ळु नका.

निवेदिता-ताई's picture

5 Aug 2013 - 1:49 pm | निवेदिता-ताई

कुत्रा अज्जिबात पाळू नका.....हे म्हणजे विकतचे दुखणे घेण्यासारखे आहे

सुबोध खरे's picture

5 Aug 2013 - 12:19 pm | सुबोध खरे

एक वेळ श्रावण पाळा फार तर महिनाभर त्रास होतो
पण कुत्रा अजिबात पा़ळु नका.

अप्पा जोगळेकर's picture

10 Aug 2013 - 4:06 pm | अप्पा जोगळेकर

आवडले. मुळात व्यावसायिक उपयोग वगळता जनावरे पाळावीतच कशाला ?

अविनाशकुलकर्णी's picture

5 Aug 2013 - 10:02 am | अविनाशकुलकर्णी

मांजळ पाळा

किसन शिंदे's picture

5 Aug 2013 - 10:21 am | किसन शिंदे

गावी असलेल्या घरात कुत्रं पाळणं एकवेळ ठिक पण शहरातल्या घरात पाळायचं म्हणजे खरंचच भिक नको पण कुत्रं आवर अशी अवस्था होते.

कोमल's picture

5 Aug 2013 - 10:42 am | कोमल

अवांतर-
मागे एकदा अस्साच बोक्यासाठीचा धागा आला होता.. त्याची आठवण झाली :)) :)) :))

नि३सोलपुरकर's picture

5 Aug 2013 - 11:17 am | नि३सोलपुरकर

वल्ली व रेवतीताईशी अक्षरशः १०० % सहमत.

दिपक.कुवेत's picture

5 Aug 2013 - 11:57 am | दिपक.कुवेत

मुळात पाळिव प्राणी/पक्षी हे दुरुनच पहायला आवडतात....ते घरात पाळायची तर दुरची गोष्ट! एक तर ते (कुत्रा/मांजर) घरभर फिरतात, त्यांचे केस गळतात, जेवताना नको ईतके जवळ येतात, पायात घुटमळतात.....म्हणुन ते आपले पहायला दुरुनच बरे वाटतात. एवढे करुन वर त्यांनी नखं दाखवलीच तर काय घ्या? वर त्रिवेनिचा सला ब्येस्ट. कमी खर्चिक, दुसर्‍यांना कमी त्रासदायक! कुत्रेच काय कुण्या माणसांचीहि तुमच्या घराकडे पाहण्याची हिम्मत होणार नाहि :D

प्रभाकर पेठकर's picture

5 Aug 2013 - 12:04 pm | प्रभाकर पेठकर

अहो दिपकजी,

घरभर फिरतात, त्यांचे केस गळतात, नको ईतके जवळ येतात,

हे गुण विशेष 'नवरा' ह्या प्राण्यातही आढळतात पण म्हणून काय....... असो.

बॅटमॅन's picture

5 Aug 2013 - 12:10 pm | बॅटमॅन

केस गळणे हा गुणविशेष नवरी नामक प्राण्यात विशेषेकरून आढळतो, वरील सर्व गुणधर्म त्यांनाही लागू होतात बरं का पेठकरकाका.

प्रभाकर पेठकर's picture

5 Aug 2013 - 12:16 pm | प्रभाकर पेठकर

मी आपला 'सेफ गेम' खेळलो.

तेही खरंच म्हणा. मिपावर तरी किमान नवरे किंवा एकुणातच पुरुष हे अतिशय सेफ पात्र आहे. कोणीही काहीही बोला, टेन्शन इल्ले. पण बाकी काही बोलोगे तो बोलेंगे के बोलता है.

माझीही शॅम्पेन's picture

5 Aug 2013 - 12:09 pm | माझीही शॅम्पेन

पु.ल च्या , माझ्या आणि तमाम लोकांच्या शत्रू-पक्षा बद्दल चांगल लिहिण जमणार नाही , एकच सांगतो मित्र-मैत्रिणी खात्रीशीर पाने दूरवतात हे नक्की !!! (एका जवळच्या मैत्रिणी कडे जाण सोडून दिल , तिच्या कडे एकदा खिरित कुत्र्याचा केस आला होता :( )

बॅटमॅन's picture

5 Aug 2013 - 12:11 pm | बॅटमॅन

खिरीत कुत्र्याचा केस????????

(ओकारीवाली स्मायली आहे का हो कुणाकडे?)

माझीही शॅम्पेन's picture

5 Aug 2013 - 12:21 pm | माझीही शॅम्पेन

नंतर जेवताना माझे काय हाल झाले...सांगता सोय नाही ,

त्यासाठी फक्त तो 3-इडीयट्स लाटण्याचा प्रसंग आठवा :)

अर्थातच..पण क्वचित का होईना, मानवी केस जेवणात आल्याचा केवळ पूर्वानुभव असल्याने इतके काही वाटत नाही...कुत्र्याचा केस म्हंजे अतीच आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Aug 2013 - 2:33 pm | अत्रुप्त आत्मा

ही घ्या
http://www.sherv.net/cm/emoticons/sick/barfing-smiley-emoticon.gif
===================================
आत्मू'ज स्मायली भांडा रं! =))

आमचे येथे सर्व प्रकारच्या "ताज्या" स्माईली मिळतील! =))

नक्शत्त्रा's picture

5 Aug 2013 - 12:22 pm | नक्शत्त्रा

"कोणतेही कुत्रे आणा, लळा लागला की त्याच्या जाण्यानंतर आठवण येताच डोळे ओले होतील. आपले लेकरू असावे तसे असते.म्हणूनच प्राणी पाळावेसे वाटत नाहीत. "

वल्ली व रेवतीशी पूर्णपणे सहमत!!!

लहानपणी हे सर्व करून जाहले आहे. Lifelong आठवणी पुरतत. फक्त तुमचे मन खंबीर पाहिजे. माझे मन एवढे खंबीर नाहीये आणि त्यामुळे आता हे धाडस नाही करवत. आता हे सगळे पाळिव प्राणी/पक्षी हे दुरुनच पहायला आवडतात.

प्रभाकर पेठकर's picture

5 Aug 2013 - 12:24 pm | प्रभाकर पेठकर

म्हणूनच मी वयाच्या पासष्टी नंतर कुत्रा पाळणार आहे. जे काय दु:ख व्हायचे ते त्याला होईल.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Aug 2013 - 2:29 pm | अत्रुप्त आत्मा

@जे काय दु:ख व्हायचे ते त्याला होईल.>>>=)) पेठकर काका,आज एकावर एक षटकार लावताय!=))

अनिरुद्ध प's picture

5 Aug 2013 - 6:54 pm | अनिरुद्ध प

कशावरुन? हे ग्रुहितक मान्ड्ले?

प्रभाकर पेठकर's picture

6 Aug 2013 - 2:22 am | प्रभाकर पेठकर

सर्वसाधारणपणे कुत्र्यांचे आयुष्य १५ वर्षांपर्यंत असते असे ऐकले आहे. आमच्या घराण्यात अजून ८० च्यापुढे कोणी गेले नाही (सर्व आधीच गेले). तसेच घराण्यात कोणालाही नसणारी व्यसनं मी केली आहेत आणि कांही अजून चालू आहेत. त्यामुळे ८० ही माझी 'डेड लाईन' नाही. त्या आधीच मिपावर श्रद्धांजलीचा धागा कोणीतरी टाकेलच. (टाका बरका. नाहीतर 'प्रभाकर भूतकर' नांवाची नविन आयडी येईल.)

तुम्ही कसेही असा कुत्रा तुमच्यावर प्रेम करतोच करतो. त्यामुळे त्याला बिचार्‍याला नक्कीच दु:ख होईल. तो इमानदार असतो, त्याच्या जवळ छक्के-पंजे नसतात. माझ्या कुत्र्याने अगदीच जेवण वगैरे नाही सोडलं तरी कांही काळ 'ब्लॅक डॉग' आणि चखण्याला तोंड लावणार नाही ह्याची मला खात्री आहे. दु:खभराने माझ्या लॅपटॉप समोर कुंई-कुंई करेल. कोणी लॅपटॉप उघडून माझ्या पाककृती त्याला दाखवल्या तर कृतार्थ नजरेने तो त्या पाहील.

धमाल मुलगा's picture

6 Aug 2013 - 2:36 am | धमाल मुलगा

=)) =)) =))
आहे आहे...तुमच्यासुध्दा विनोदाला कारुण्याचं झालंऽऽरं!

चौकटराजा's picture

6 Aug 2013 - 10:25 am | चौकटराजा

आपली काही व्यसने असूनही चालू आहेत म्हणता. डोळ्यासंबंधी काही " व्यसन" आपल्याला असल्यास आपण उलटे जास्तच जगणार ! अर्थ कळला नसेल तर अत्रे साहेबांचे " लग्नाची बेडी" हे नाटक पहाणे.

पाअला वाचट त्रिम .

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Aug 2013 - 8:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

तिमा's picture

5 Aug 2013 - 12:44 pm | तिमा

कुत्रे पाळणं हा अतिशय आनंददायी अनुभव आहे. पण जर तुम्ही फ्लॅट मधे रहात असाल तर पाळू नये. कारण त्यामुळे कुत्र्यावरही अन्याय होतो. तुमच्यासभोवती मोकळे आवार असले तरच पाळावा. बाकीच्या डिटेल्स वर सर्वांनी लिहिल्याच आहेत.
मी श्वानप्रेमी आहे पण माझे ओळखीचे वा आप्त तसे असतीलच असे नाही.त्याचाही विचार व्हावा.
कुत्रा हा अत्यंत हुशार प्राणी आहे.बिनडोक तर मुळीच नाही. रस्त्यावरुन चालताना, कोण श्वानप्रेमी आहे ते त्यांना कळते. त्यांच्यावर ते सहसा भुंकत नाहीत असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

कुत्रा हा अत्यंत हुशार प्राणी आहे.बिनडोक तर मुळीच नाही.
१००% सहमत. लई हुषार असत्यात शिवाय त्यांची मेमरी बी स्ट्राँग असतीया...

जाता जाता :--- मला कुत्रे कितीही आवडत असले तरी रस्त्यातले मोकाट कुत्रे मात्रं टाळंक सरकण्यास कारणीभूत ठरतात... आईच्या गावात फु़कटची बोंबाबोंब ! साला रातच्यालाच ह्यांना लयं उत येतो काय ? साला आधी १०-१२ कुत्तरडी व्हाव्ह व्हाह ओरडतात. मग तेच व्हाव्ह व्हाव्ह वेगवेगळ्या कोनातुन ऐकायला येते... मग एक करुन व्हाव्ह ची संख्या आणि आवाज कमी होत जातो तरी सुद्धा एखादं हरामी कुत्तरडं असतंच, की जे स्वतःच्या नरड्याला ताण देउन देउन व्हाव व्हाव करतंच बसतं ! मी म्हणतो गप तिच्यायला आधीच डोक्याचे १२ वाजेलेले आहेत त्यात तु साला रात्री १ वाजे पर्यंत ओरडुन ओरडुन का अंत पाहतोस ? खाली येउन काठीने पेकाटच मोडुन टाकी न बघ !

अवांतर :--- आता कसं जरा बरं वाटतेय मला ! साला कशा कशाचं फस्ट्रेशन "पाळवे" लागेल हे सांगता येत नाही.;)

माझ्यामते जर तुमच्या घरी कोणाला अ‍ॅलर्जी वैगरे नसेल, तर नक्की कुत्रा पाळा. कुत्र्यासारखा इमानदार, हुशार आणि प्रेंमळ प्राणी नाही. तुम्ही त्याला जेवढे प्रेम द्याल, त्याच्या दुप्पट तो तुमच्यावर प्रेम करेल.
आणि आता कुठल्या जातीचा पाळायचा विचाराल, तर ह्या बाकी जातींपेक्षा त्या कुत्रीचेच एक पिल्लु घ्या. अगदी कुठल्या जातीचाच घ्यायचा असेल तर लॅब सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. डॉबरमॅन चांगला आहे, पण त्यांचा स्वभाव थोडा agressive असतो. तुम्ही जर पहिल्यांदाच कुत्रा पाळणार असाल तर लॅबच घ्या.

दादा कोंडके's picture

5 Aug 2013 - 2:54 pm | दादा कोंडके

तुम्ही त्याला जेवढे प्रेम द्याल, त्याच्या दुप्पट तो तुमच्यावर प्रेम करेल.

बरोबर.

आपलं प्रेम म्हणजे वेळचेवेळी गिळायला देणे, प्यायला पाणी, रहायला जागा, झोपायला गुबगुबीत अंथरुण, त्याच्या ह_ण्या-मु_ण्याच्या वेळा सांभाळणं, त्याचं वेळी-अवेळी भुंकणं सहन करणं, शेजार्‍यांना त्रास देणं, घरभर पसरलेले केस स्वछ करणं, त्याला वेळच्यावेळी डॉकटरला दाखवून लशी टोचवणं, त्याला सोडून कुठेही न जायची अबाळ सहन करणं वैग्रे वैग्रे.

आणि त्याचं प्रेम म्हणजे पायात घुटमळत कुई-कुई करणं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Aug 2013 - 6:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला कुत्रे पाळायचा आणि त्यांना बावळटासारखा जीव लावायचा नाद आहे. सध्या असलेलं कुत्र सॉरी कुत्री जर्मन शेफर्ड. सिंगल कोट. ( अंगावर फार केस असत नाही) वेळच्या वेळी लसिकरण. औषधोपचार. आवडतं खाद्य पेडेग्री देतो. शी सु साठी बाहेर सोडतो. सुरुवातीला हे सर्व लहाने लेकरांप्रमाणे करावं लागतं. मी लहान पिलु घेतलं तीन हजाराला.. मला विचाराल कुत्र कोणतं पाळावं तर माझी शिफारस डॉबरमन. तुर्तास इतकेच.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Aug 2013 - 6:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

http://mr.upakram.org/node/1077 हेही वाचा.

-दिलीप बिरुटे

चौकटराजा's picture

5 Aug 2013 - 7:39 pm | चौकटराजा

प्रा डा तुमच्या नादाचं ठीक आहे. ते शी शू तुमच्याच बंगल्यात करून घेऊन मग आमच्या बंगल्यात सोडत जा ना ! काय आहे झाडूवाला " माल" हलवायचा जादा चार्ज मागतो !

उपास's picture

5 Aug 2013 - 6:35 pm | उपास

पहा, पुन्हा विचार करा.. जर पुढे जाऊन तुमचा इंटरेस्ट संपला तर त्या कुत्र्यावर अन्याय..
वर बर्‍याच जणांनी म्हटलय तसं, कुत्रा तुम्हाला त्याच्यावर प्रेम करायला भाग पाडतो अगदी इतरांना तुमच्यापासून वेगळं करुन, तुम्हीही छान रमता आणि मग एक दिवस साला एक्झिट घेऊन गेला की आपलं उरलेलं आयुष्य बरबाद त्याच्या आठवणीत!
आणि कुत्रा पाळणार की कुत्री, त्यांचे सगळे तदनुषंगे येणारे नैसर्गिक सोपस्कार.. जबाबदारी असतेच!
-(गल्लोगल्लीचच्या भटक्या कुत्र्यांच्या पेकाटात लाथ घालायला सदैव तत्पर) उपास

प्यारे१'s picture

5 Aug 2013 - 6:50 pm | प्यारे१

मला वाटलं.... मिपावर नवीन एखादा आयडी तर आला न्हाई ना? ;)

मित्रमंडळीत ज्यांच्या ज्यांच्या घरी म्हणून कुत्रा आहे त्यांच्या घरी जायचं म्हणजे जीवावर येतं. गेलं की गेटपासनं घरात शिरेपर्यंत ही छळवादी कुत्री भुंकत असतात. बरं कितीही भुंकली तरी आपण घाबरु नये अशी श्वानप्रेमी मंडळींची अपेक्षा असते. असो, मला अनुभव नाही पण आजूबाजूचे नमुने बघून पुन्हा विचार करा येवढंच म्हणेन.

आदूबाळ's picture

5 Aug 2013 - 7:41 pm | आदूबाळ

बरं कितीही भुंकली तरी आपण घाबरु नये अशी श्वानप्रेमी मंडळींची अपेक्षा असते

अगदी अगदी. आणि वर "दुसरं कोणी घाबरत नाही त्याला" अशी टिप्पणी करून पाणऊतारा सुद्धा करतात.

पिशी अबोली's picture

5 Aug 2013 - 7:25 pm | पिशी अबोली

डॉबरमन मस्तच.
कुत्र्यांचा लळा लागण्याबद्दल वर लिहिलेल्या सगळ्यांशी सहमत.. कुत्र्यांना शिस्त लावली तर त्यांच्यासारखा प्राणी नाही. खूप जीव लावतात. उत्तम सोबत करतात.
पण कुत्र्यांची प्रचंड काळजी घ्यावी लागते. स्वच्छता,व्यायाम सगळीच. सगळं कुटुंब बाहेर राहणार असेल काही दिवस तर काळजी घेईल असं श्वानप्रेमी कुटुंब शोधून ठेवा. आमच्या एका शेजार्‍यांनी खेळणं आणावं तसं एक पिल्लू आणलं आणि त्याला ग्रिल्सच्या दारात लॉक करुन १५ दिवसांसाठी निघून गेले बाहेर, तेही न सांगता. किती आटापिटा करावा लागायचा त्या पिल्लूला खाऊ घालायला. आणि ते ओरडत रहायचं बिचारं दिवसभर.
पण मूळचा तुमचा प्रश्न पिल्लू आणून सुटणं कठीणच आहे. ती कुत्री छोट्या पिल्लाला भीक घालेल असं वाटत नाही..

यशोधरा's picture

5 Aug 2013 - 7:33 pm | यशोधरा

आई गं :( काय हे! किती निष्काळजीपणा आणि दुष्टपणा!

पिंपातला उंदीर's picture

5 Aug 2013 - 7:37 pm | पिंपातला उंदीर

जितका रद्दड धागा तितक्या भूमितीय श्रेणीत प्रतिसाद असे काही समीकरण आहे का

चौकटराजा's picture

5 Aug 2013 - 7:43 pm | चौकटराजा

अरे बुवा.. सारेच धागे येकदम सिरेस काय म्हणून करायचे ? ते चेपूच्या फालतू लाईक अनलाईक पेक्षा बरा आहे हा गाढवपणा !

स्नेहातई मज्जाच करायची असेल धाग्यावर, तर शहामृग किंवा इममू पाळ ,;-) लै भारी
शिरेसली पायजे असेल केनेल तर मला सांग. मी देतो सोलापुरात आलीस की. :)

धमाल मुलगा's picture

5 Aug 2013 - 9:41 pm | धमाल मुलगा

माझं एक फ्रेंच मॅस्टिफ पेंडिंग आहे बे तुझ्याकडं. पैलंच सांगून ठेवतोय कडू! नंतर नाय म्हणून सांगायचं नाही.

धम्या लेका फ्रेंच मॅस्टिफ पेंडिंग आह ची आठवण करुन द्यायला भारी वाटते पण तू जौन बसला अम्रीकेत. इथं हे धूड दोघांना आवरत नाहीय्ये. चक्क पिंजरा लावावा लागलाय. अजून बी हवं आसल तर सांग गड्या पण एक्स्ट्रा दोन माणसाचं शिजवस्तवर वैनीसायबाचा पिट्टा पडल. आन घेतलं तर कपल घे. उगा उपासमार करु नकोस त्याची. जास्त पिसाळतेय मंग. ;)
सांग मग कधी यीवू घीऊन आम्ही तिघेजण?
fm

धमाल मुलगा's picture

12 Aug 2013 - 9:52 pm | धमाल मुलगा

लेकरु क्यवढं मोठ्ठं झालं रे! :)

>>इथं हे धूड दोघांना आवरत नाहीय्ये. चक्क पिंजरा लावावा लागलाय.
आता मालकाच्याच सवयी लागल्या तर आणि काय होयाचं? ;)

>>अजून बी हवं आसल तर सांग गड्या पण एक्स्ट्रा दोन माणसाचं शिजवस्तवर वैनीसायबाचा पिट्टा पडल
हरकत नाय बे! आपुन त्यवड्या कारणानं बाई ठेऊ.

>आन घेतलं तर कपल घे. उगा उपासमार करु नकोस त्याची. जास्त पिसाळतेय मंग.
=)) =)) =))
हौ! अन घराबाहेर बोर्ड लावतो, -
'फ्रेंच मॅस्टिफ स्पेशॅलिष्ट! आमचे येथे फ्रेंच मॅस्टिफ वधू/वर मिळवून देणेपासून ते तुमच्या फ्रेंच मॅस्टिफिणीच्या बाळंतविड्यापर्यंत सारं काही खात्रीलायकरित्या करुन मिळेल.' :D

हरकत नाय बे! आपुन त्यवड्या कारणानं बाई ठेऊ.

;) ;) =))

धमाल मुलगा's picture

5 Aug 2013 - 9:40 pm | धमाल मुलगा

एकुणच जनावरं फार आवडतात, त्यात कुत्र्यांचा नंबर लै वरचा है. :) साले जीवापाड प्रेम करणं म्हणजे काय ते शिकवतात राव. :)

आपल्या प्रश्नांची यथामती उत्तरं देण्याचा प्रयत्न -

सर्वात प्रथम, कोणत्या प्रकारचं कुत्रं पाळायचं आहे ते ठरवा. ती छटाक-पावशेर मापातली बिन्डोक अन होपलेस ब्रिड्स असतात त्यांचा विचारही करु नका. निव्वळ किरकिरी, नाजुक अन (बिनडोकपणामुळं) ओव्हर कॉन्फिडन्सवाली असतेत. तसंही तुम्ही अपार्टमेंटमध्ये रहात नसल्यानं मिड/लार्ज साईझच्या कुत्र्यांना नीट ठेवता येणं शक्य आहे तुम्हाला.

घरात लहान मूल आहे का? असेल तर शांत स्वभाव असलेली ब्रीड निवडावी लागेल. मोठी मुलं असतील तर बिन्धास्त हाऊंड / टेरिअर अश्या मस्तीखोर ब्रीड्सचा विचार करु शकता.

रॉटविलर किंवा बुलडॉगसारखे तद्दन तिरसट टाळक्याचे कुत्रे आणायचे असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवणारं अन प्रेमासोबत आपलं ऐकायला लावेल असं कोणी खंबीर माणूस घरात असेल तर ठीक. (शक्यतो बायकांना आपण हायकमांड असल्याचा ओव्हर कॉन्फिडन्स असतो नवर्‍याचं भिजलं मांजर केल्यामुळं...अशा बायकांचं गर्वहरण करण्यासाठी रॉटविलर बेष्ट उपाय असतो ;) ). पण जर नीट सांभाळला तर रॉटसारखा दुसरा सवंगडी नाय राव. दणकट, रासवट, काही मोजक्या लोकांसोबत प्रेमळ आणि इतरांसाठी म्हणजे आग्यावेताळ! बुलडॉग त्याच्यापेक्षा दोन पायर्‍या खालचा. दोघांचंही फरकोट उत्तम! केस फारसे नसतात त्यामुळं गळण्याचा प्रश्न फार नाही. हूमदांडगे असल्यानं त्यांना घरात घेण्याचा प्रश्न शक्यतो येत नाही..जे असेल ते अंगणात!

त्यानंतर नंबर लागतो तो डॉबरमॅनचा. हुशार असतात बेटे! दिसायलाही मोठे ऐटबाज. केस गळण्याची भानगड नाही. पण तब्येतीनं बर्‍यापैकी नाजूक असतात असं आपलं एक निरिक्षण.

कमी खर्चात, भारी कडक असलेलं कुत्रं हवं असेल आणि दिसण्याबाबत आग्रही नसाल (कुत्रं=शोपीस असं गणित नसेल तर) कारवानी (कारवान हाऊंड) सारखं दुसरं कुत्रं नाही. दिसताना दिसतं पाप्याचं पितर, पण अंगात असा जोर असतो...ह्ये कुत्रं ज्या अंगणात बांधलेलं असतं, त्या घराकडं मुरलेला चोर स्वप्नातही फिरकत नाही!

सर्वात सेफ गेम म्हणजे - लॅब्रेडॉर. एकदम शाणं शाणं बाळ.

१. ज्याचा मेंटेनन्स आणि केसांची लांबी कमीत कमी आहे (म्हणजे उवा इ. श्वापदे त्या जंगलात फिरावयास धजणार नाहीत ) अशी श्वानप्रजात कोणती ? या प्रजातीच्या श्वानशिशूच्या किमती काय असतात ?

डॉबरमॅन, रॉटविलर, बुलडॉग, कारवानी....उवा कुत्र्यांना होत नाहीत, पिसवा मात्र असतात, अन गोचिडं. कुत्र्याची नीट स्वच्छता ठेवली नाही तर टकल्या कुत्र्यालाही हे किडे छळणारच. त्याला पर्याय नाही. नीट स्वच्छता केली तर अफगाण हाऊंडलाही पिसवा वगैरे श्वापदांचा बुज्बुजाट होत नाही.

श्वानशिशूंच्या किंमती ह्या त्यांच्या ब्लडलाईनवर अवलंबून असतात. केसीआय रजिस्टर्ड हवं असेल तर जास्त असतात, क्रॉसब्रीड असेल तर स्वस्त मिळतात. आपल्या भागातल्या एजंटांकडं चौकशी करुन साधारण अंदाज घेणे. म्हमईतली किंमत पुण्यात लागू होत नाही अन पुण्यातली कोल्लापूरात.

२. किती वय असताना कुत्र्याचे पिल्लू घरी आणावे ?
६ आठवडे.

३. त्याची राहण्याची झोपण्याची व्यवस्था कुठे अन कशी असावी ?
वेग़ळी. नाजुक ब्रीड असेल तर छपराखाली/घरात, अन्यथा अंगणात.

४. त्याच्या शी शू ची व्यवस्था कशी करावी ?
सुरुवातीला त्रास होतोच. हळूहळू शिकवलं की कळायला लागतं. फिरायला नेलं की ठरल्या ठिकाणी कार्यभाग उरकायची सवय आपसूक लागते.

५. कोणत्या वयात काय खाणे द्यावे ?
तसा ठराविक नियम नाही. दूध पहिल्यापासून, सुरुवातीला भाकरी दुधात बारीक कुस्करुन ...नंतर नुसतं दूध, नुसती भाकरी, मग अंडी, मग चिकन अन मग बीफ.

६. अंघोळ घालण्याची फ्रीक्वेन्सी किती असावी ?
दर आठवड्याला. एरवी दिवसाआड ब्रशिंग. बारीक केसांचं कुत्रं असेल तर आंघोळीआधी अर्धातास लोण्यानं मालीश करावं.

७. त्याला पशुवैद्याकडे केव्हा न्यावे ?
जनरली, पिल्लू घेतलं की त्यासोबत व्हॅक्सिनेशनचा एक तक्ताही देतात. तो फॉलो करायचा. पिल्लू आणल्यानंतर व्हेटकडे एक भेट देऊन यायचं. प्राथमिक तपासणी झाली की व्हेट सांगतातच पुढचा क्रम. :)

८. (त्याच्या अन आपल्या ) आरोग्याची कोणती काळजी घ्यावी म्हणजे त्याच्यामुळे घराचे आरोग्य दूषित होणार नाही ?
आंघोळीचं वेळापत्रक नीट पाळावं.
न चुकता पिसवारोधक पावडर लावावी.
भटक्या कुत्र्यांशी लगट करु देऊ नये.
खाण्यात तेलकट अन्न देऊ नये.
व्हेट टूथपेस्ट्स मिळतात त्यांनी आठवड्यातून साधारणतः दोनदा दात घासून द्यावेत.
बाकी, घरातल्या लहान बाळाबाबत पाळतो तशी इन जनरल पथ्यं...वेळच्यावेळी खाणं, वेळच्यावेळी शी-शू वगैरे....

९. घरामध्ये येऊ द्यावे की नाही ?
शक्यतो नकोच. त्यामध्ये हायजिनपेक्षा वस्तुंच्या नुकसानाचा मुद्दा जास्त येतो. तुम्ही कुत्र्याची स्वच्छता नीट ठेवली असेल तर काही प्रॉब्लेम नसतो घरात येऊ देण्याचा, पण त्यांच्या मस्तीनं फर्निचरची वाट लागू शकते. ते चालत असेल तर बिन्धास्त येऊंद्या. :)

१०. कुत्रा पाळण्याचा मंथली खर्च अंदाजे किती असतो ?
प्रेमाचं मोल करता नाही. :)
मान्य आहे, सध्या तुम्ही गरज म्हणून ह्या विषयाकडं पाहताय, पण एकदा ते घरी आलं की आठवड्याभरात असं जीव लावेल की मग मी काय म्हणतोय त्याच्याशी सहमत व्हाल. :)
एक औषधपाण्याचा खर्च सोडला तर तसा फार खर्च होत नाही. फारतर घरात एक-दीड व्यक्तीचा खर्च आणखी असं म्हणा.

आणखी काही प्रश्न असतील तर अभ्याला विचारा! त्यो फार्महाऊसवर ब्रिडींग करायचा. :)

जाताजाता : कुत्र्याचं पिलू आणायचं, ते मोठं होणार, मग त्या कुत्रीला हुसकून लावणार...प्रवास अंमळ मोठा आहे. ह्या उपायाचा उपयोग त्या कुत्रीच्या पुढच्या विणीनंतर होईल. तोपर्यंत गलोल, लवंगी फटाके, खेळण्यातल्या पेलट्सवाल्या पिस्टलचा उपेग करा. :)

शैलेन्द्र's picture

5 Aug 2013 - 11:05 pm | शैलेन्द्र

लेख लै आवडला..

"सर्वात सेफ गेम म्हणजे - लॅब्रेडॉर. एकदम शाणं शाणं बाळ. "
सालं, मला तो कधिच नाही आवडला.. पुढ्चा कुत्रा म्हणजे एक रॉट आणी एक बुल्डॉग.. दोन पाळणार, एक नाही..

धमाल मुलगा's picture

5 Aug 2013 - 11:56 pm | धमाल मुलगा

>>लेख लै आवडला..
=)) =)) घाल काड्या. ;)
च्यायला! कुत्रं हा विषय निघाला की हे असंच होतं बघ. किती बोलू न किती नको अशी गत.

>सालं, मला तो कधिच नाही आवडला..
गरीब असतो. शांत असतो...रॉटसारखी रांगडी कुत्री आवडणार्‍यांना लॅबचं कशाला कवतिक असतंय? पण एक सांगतो, ज्या घरात अगदी लहान पोरं असतील त्या घरात पोरांचा सवंगडी म्हणून आणायला लॅबसारखं दुसरं भूभू नाय. पोरांच्या जोडीनं वाढवलं तर कळतंय राव. अशक्य प्रेम करतात लेकरांवर. नीट खेळवतात, पोर रडत असेल तर कावरीबावरी काय होतात, त्या पोराला शांत करेपर्यंत आपल्याला किती छळतात...फार समजूतदार जमात बघ.

>>पुढ्चा कुत्रा म्हणजे एक रॉट आणी एक बुल्डॉग.. दोन पाळणार, एक नाही..
अग्ग्ग्ग्गं....गुरुऽऽ....दोन्ही एकदम? आणशील तेव्हा नक्की सांग. मी येईन खेळायला. बुलडॉगसोबत कुस्ती खेळलायस काय कधी? जबर्रा यक्सपिरियन्स असतोय. फक्त त्याला आपली मान धरु द्यायची नाय. ;)

माझ्याकडे दीड वर्षाचा लॅब आहे. होणार्‍या अर्धांगिनीचे मत फारसे अनुकूल नसूनही आणला आणि आता तीच जास्ती प्रेम करते.

भयंकर केस गळतात घरभर हा एकच काय तो त्रास. पण इतकं भयानक प्रेम करतात मालकावर की विचारू नका. ३ आठवड्यांपूर्वी hiking ला नेले होते. कोणी नसल्याने पट्टा लावला नव्हता सारखे पुढे पुढे पळत मग मागे आम्ही येतोय का नाही बघायल फिरून येत होता. ६ मैलाची हाईक असेल पण ह्याने बहुधा ९ एक माईल्स तरी केले असतील. घरी आल्यावर बघितले तर पायाची सालटी निघाली होती. एका ठिकाणी तर सर्वसाधारणपणे काळी पॅड्स असतात त्यांच्या पायावर ती पूर्ण सोलवटून खालची गुलाबी चामडी दिसत होती. हूं का चू केले नाही. आम्हालाच फार वाईट वाटले.

बारीक केसांचं कुत्रं असेल तर आंघोळीआधी अर्धातास लोण्यानं मालीश करावं.

आई शप्पत! त्या अर्ध्या तासात त्याला मोकळं सोडू नका. गल्लीतले सर्व कुत्रे आणि कुत्र्या त्याला चाटायला घरात घुसायच्या आणि एक नसती पीडा होऊन बसायची.

त्याचं स्वतःचं तोंडही बांधून ठेवावं नाहीतर एकदा 'टेस्ट' लागली तर तोच स्वतःला चाटून साफ करेल आणि मग लोणी पोटात गेल्याने केस गळायला लागतील.

घरात लोण्याचा छोटासाच तुकडा उरला असेल तर तो आपल्या नाश्त्याच्या पावाला लावायचा की कुत्र्याच्या अंगाला ह्या विचारात ऑफिसला उशीर होण्याची शक्यता जास्त.

बायकोने आपल्याला, नाश्त्याच्या पावाला लावायला, अमूल बटर दिले आणि कुत्र्याला घरचे शुद्ध लोणी फासले तरीही कुटुंबकलहाला तोंड फुटू शकते.

चारही बाजूंनी लोणी फासलेल्या ह्या बुळबुळीत प्राण्याला आंघोळीसाठी न्हाणीघरात कसे ओढत न्यायचे ही अजून एक समस्या. एका हातात पेटता लायटर घेऊन, 'आता येतोस आंघोळीला की पेटवू इथेच' असा आक्रमक पवित्रा घेतल्यास कुत्र्याच्या मनातून तुम्ही कायमचे उतरू शकता. पाहा बुवा!

धमाल मुलगा's picture

6 Aug 2013 - 2:48 am | धमाल मुलगा

>>चारही बाजूंनी लोणी फासलेल्या ह्या बुळबुळीत प्राण्याला आंघोळीसाठी न्हाणीघरात कसे ओढत न्यायचे ही अजून एक समस्या.
अहो, इतकं लोणी लाऊन त्या कुत्र्याला काय तव्यावर खरपूस भाजायचाय काय? =))

एका हातात पेटता लायटर घेऊन, 'आता येतोस आंघोळीला की पेटवू इथेच' असा आक्रमक पवित्रा घेतल्यास कुत्र्याच्या मनातून तुम्ही कायमचे उतरू शकता. पाहा बुवा!

=)) =)) व्हिज्युअलाईझ झालं राव! अन त्या व्हिज्युअलायझेशनमधल्या रॉटनं "व्हुफ्फ तिच्यायला!" अशी दिलेली शिवीही ऐकू आली.

आई शप्पत! त्या अर्ध्या तासात त्याला मोकळं सोडू नका. गल्लीतले सर्व कुत्रे आणि कुत्र्या त्याला चाटायला घरात घुसायच्या आणि एक नसती पीडा होऊन बसायची.

मोकळं नाहीच सोडायचं, अर्धा तास मालीश करुन लोणी जिरवायचं.

त्याचं स्वतःचं तोंडही बांधून ठेवावं नाहीतर एकदा 'टेस्ट' लागली तर तोच स्वतःला चाटून साफ करेल आणि मग लोणी पोटात गेल्याने केस गळायला लागतील.

हां! हे एक लफडं असू शकतं. पण ते टेन्शन सुरुवातीच्या दोन-तीन मालीशपर्यंतचंच. त्या तेव्हढ्या वेळात लोणी चाटायचा प्रयत्न केला की कानफडवायचं. मग गणित पक्कं बसतं, ह्या वासाचं चाटायला गेलं की कानाशी झिणझिण्या येतात..अन त्या भानगडीत पडायचं बंद होतं.

घरात लोण्याचा छोटासाच तुकडा उरला असेल तर तो आपल्या नाश्त्याच्या पावाला लावायचा की कुत्र्याच्या अंगाला ह्या विचारात ऑफिसला उशीर होण्याची शक्यता जास्त.

=)) =)) ते कुत्र्यावर आपला किती जीव जडलाय त्यावर अवलंबून असतंय. आपसुक निर्णय होतोय.

बायकोने आपल्याला, नाश्त्याच्या पावाला लावायला, अमूल बटर दिले आणि कुत्र्याला घरचे शुद्ध लोणी फासले तरीही कुटुंबकलहाला तोंड फुटू शकते.

हा कुत्र्याला लोणी फासण्याचा उद्योग हा आधी गृहलक्ष्मीशी खरखर होऊनच मग पार पडत असतो. "एव्हढी कसली जहागिरी ऊतू चाललीये म्हणते मी, त्या कुत्र्याला कशाला लोणी? इतकीच हौस असेल तर फास की खोबरेल तेल" हा ९९% घरांमधला ठरलेला डायलॉग आहे असं अनधिकृत सुत्रांकडून कळते. :)

पैसा's picture

5 Aug 2013 - 11:31 pm | पैसा

लेख आणि काही प्रतिक्रिया आवडल्या. कुत्रा घरात कोणाला खराच आवडत असेल तरच आण. मुलं आधी हो हो म्हणतात आणि मग कामाची वेळ आली की पळ काढतात. मग आता हा कुत्रा मला एकटीला सांभाळावा लागतोय असा आणखी एक लेख लिहावा लागेल!!

कुत्र्याचं आयुष्य साधारण १५ वर्षांपर्यंत असतं. त्याला जीव लावून तो गेला की घरातला माणूस गेल्यापेक्षा जास्त वाईट वाटतं. आता यापुढे एवढी गुंतवणूक आणि दु:ख सहन करायची ताकत आपल्यात आहे का याचा जरूर विचार कर.

अगदी अगदी. आमचा भूभू गेला तेंव्हा बरेच दिवस लागले सावरायला. आता पुन्हा ते दु:ख नको असं वाटतं. त्याचं सगळं करायलाही लागतं. त्याचं शेवटचं आजारपण आपल्यालाच बघवत नाही. मुलं नाही काही करत. उगीच दोनचार दिवस हौस असते त्यांना. हा लेख वाचल्यापासून आमच्या भूभूच्या आठवणीनं बेजार झालीये. तो कसा बघायचा, कान टवकारायचा, दंगा करायचा, लाड करवून घ्यायचा. काय काय आठवतय. नुसता वैताग आलाय तेच ते आठवून! जरा मोठे होईपर्यंत शी, शूच्या सवयी तसेच चपला चावणे असते. स्नेहाताईला पुन्हा लहान बाळ सांभाळल्याचा अनुभव मिळणार. ;)

लंबूटांग's picture

6 Aug 2013 - 1:29 am | लंबूटांग

अगदी एखादे लहान बाळ असल्याप्रमाणेच. फक्त फरक इतकाच की बाळे मोठी होतात आणि आपले आपण करायल लागतात. कुत्रे मात्र जन्मभर बाळच असतात.

पण खरंय गेल्यावर काय होईल याचा विचारही करवत नाही. त्यामुळे आहे तेव्हा शक्य तितकी मजा करून घेणे. सर्वसाधारण जितका मोठा कुत्रा तितके कमी आयुष्यमान.

गुंतवणूक म्ह्णाल तर प्रचंड कधी कधी प्रचंड खर्चही करण्याची तयारी ठेवा. नुकतेच वार्षिक लशीकरणासाठी जवळ्पास ५०० डॉलर्स खर्च करावे लागले होते. अधून मधून आजारपण आले की १५०-२०० डॉलर्स जातातच.

पैसा's picture

6 Aug 2013 - 10:00 am | पैसा

आपलं तुझ्या लॅबबद्दल बोलणं झालं होतं. पण मी गुंतवणूक पैशांची म्हणत नाहीये. भारतात कुत्रे पाळायला फार पैसे खर्च होत नाहीत. मी मानसिक आणि भावनिक गुंतवणूक म्हणत होते.

माझे २ पैसे. गेल्यावर्षीच एक लॅब पाळल्यामुळे बरीचशी ताजी ताजी माहिती/ सल्ले.

पण त्याआधी तुम्ही त्या कुत्रीला हुसकवण्यासाठी एक कुत्रा पाळायची युक्ती तुमच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. त्यातून तो कुत्रा आमच्या कुत्र्यासारखा जगमित्र असेल तर अजून १० कुत्री जमवून खेळत बसेल. असो आता कुत्रा पाळण्याविषयी. कोणत्या जातीचा घ्यायचा ते नीट विचार करून घ्या. प्रत्येक जातीच्या कुत्र्याचा स्वभाव वेगळा असतो तसेच त्यांना वेगवेगळ्या प्रमाणात व्यायाम वगैरेची आवश्यकता असते. धमुने लिहील्याप्रमाणे छोट्या कुत्र्यांचा अ‍ॅटिट्युड त्यांना स्वतःलाच घातक ठरतो. आमचा दुसरा कुत्रा तसल्या छोट्या जातीचा आहे पण तो २ दा मरता मरता वाचला आहे त्याच्या आ कुत्रा मुझे मार अशा अ‍ॅटिट्युड मुळे. इवलासा असला तरी उगाच इतर कुत्र्यांना उचकवतो आणि नसत्या आफती ओढवून घेतो. त्याला नेपोलिअन कॉम्प्लेक्स असे म्हणतात असे नुकतेच कळले.

आणल्या आणल्या लगेच त्याला ट्रेन करायला सुरूवात करा. Positive Reinforcement सगळ्यात बेश्ट. आंजालावर प्रचंड माहिती उपलब्ध आहे. कुत्र्यांना मालकाला खूष ठेवायचे असते त्यामुळे त्याला त्याने काय केले की तुम्हाला आनंद होतो हे तुम्ही जाणवून द्यायचे. याचबरोबर सर्वात महत्त्वाचे, कुत्र्याला सतत जाणीव हवी की तो बॉस नसून you are the boss. (पॅक लीडर). त्याने जर तुम्हाला नको असलेली गोष्ट केली की ठामपणे नो असे सांगायचे. ओरडायचे नाही. कुत्र्यांना सर्वसाधारण पणे ओरडणे म्हणजे तुम्ही excited आहत असे वाटते आणि मग ते कधी कधी चांगली गोष्ट करत आहेत असे समजतात.

जितक्या लवकर कुत्र्याला house broken (शी शू लागली आहे हे तुम्हाला सांगणे) करता येईल तितके बरे. त्यासाठी सुरूवातीला दर २ तासांनी बाहेर न्या. एक सरळ सोपे सुत्र म्हणजे कुत्रा जितक्या महिन्यांचा आहे तितक्या तासांनी त्याला शी शू करायला नेलेच पाहिजे. तो शू करताना जर त्याला Go pee अशी कमांड ऐकायची सवय लावली आणि शू झाल्यानंतर खूप कौतुक केले तर तो नंतर नंतर कमांडवर शू करायला लागतो. याचा उपयोग इथे हिवाळ्यात खूपच होतो. बाहेर बर्फ पडत असताना कुत्र्याने झटपट कार्यभाग उरकण्यासारखे सूख नाही.

भारतात थोडे वेगळे वातावरण आहे पण येथे बरेच लोक - मीही- कुत्र्याला क्रेट ट्रेन करतात. क्रेट म्हणजे एक पिंजरा. त्याला आम्ही रात्री झोपताना आणि ऑफिसला जाताना त्यात ठेवून जायचो. बर्‍याच लोकांना हा क्रूरपणा वाटतो पण कुत्र्याला ते त्याचे घर वाटते आणि कुत्र्यांच्या नैसर्गिक instinctनुसार ते जिथे राहतात तिथे घाण करत नाहीत.

कुत्र्यांनाही दुधाचे दात असतात आणि ते पडून नवीन येतात. हा कालावधी ३ महिन्यांपासून ९ महिने कधी कधी वर्षापर्यंत असतो. जातीप्रमाणे बदलतो. या काळात त्यांना चावायची जबरदस्त उर्मी येते. हाच काळ असतो जेव्हा त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावे लागते आणि नको त्या गोष्टी चावण्यापासून थांबवावे लागते. लिंबाचा रस सगळ्यात उत्तम. माझा कुत्रा बाथरूम मधे छोटी मॅट असते ती, आणि टेबल खुर्चीचे पाय चावायचा प्रयत्न करायचा. तेव्हा त्याच्या तोंडात एक थेंब लिंबाचा रस टाकला की त्याला ती चव नं आवडल्यामुळे तो थांबायचा पण तेवढया पुरतेच. तो थांबला की त्याला खेळणे द्यायचे आणि ते पकडले तोंडात की कौतुक करायचे. अशा रितीने त्यांना काय त्यांचे खेळणे आहे ते कळते.

आता काही गोष्टी आम्ही करतो त्या.

  1. कुत्र्याला फर्निचर वर अजिबात चढू देत नाही. एकदा का ती सवय लागली की मोडणे महाकठीण. तो/ ती कितीही आजारी असली तरीही.
  2. कुत्र्याला रोज भरपूर चालवणे/ पळायला नेणे. कुत्रा लहान असताना एखाद्या बाळाप्रमाणे एनर्जी असते. जर पुरेशी exerciseनसेल तर मग ती ऊर्जा काहीतरी इतर उपद्व्याप करण्यात निघते. पण कुत्रा दीड वर्षाचा होईपर्यंत २० मिनिटापेक्षा जास्त सलग चालवले नाही. या काळात त्यांची हाडे विकसीत होत असतात. खूप ताण दिला तर म्हातारपणाआधीच सांधेदुखी व इतर हाडांचे त्रास होऊ शकतात.
  3. कुत्र्याला नेहमी - अक्षरशः नेहमी पट्टा (leash) बांधूनच चालवणे. तुमचा कुत्रा कितीही गुणी असला तरी बाकीचे कुत्रे गुणी असतीलच याची खात्री नाही आणि त्यांची एखादी कृती तुमच्या कुत्र्याला घाबरवू शकते (पळत सुटून गाडीखाली जाण्याचा धोका) किंवा स्व संरक्षणाला परावृत्त करू शकते.
  4. कुत्र्याला तुमच्या बरोबर किंवा तुमच्या मागे मागे चालवणे. तो तुमचा लीडर नसून तुम्ही त्याचे लीडर आहात. अमेरिकेत त्यासाठी एक Sensible No Pull Harness मिळते. कुत्र्याने जास्ती ओढ दिल्यास तो वळून त्याचे तोंड तुमच्याकडे होते. पण इतरही उपाय आहेत.
  5. त्यांच्या खाण्या पिण्याच्या वेळा कसोशीने पाळणे. एक वेळापत्रक तयार झाले की तुम्हाला आणि कुत्र्यालाही बरे.
  6. त्याला grain free diet वर ठेवले आहे. फक्त आणि फक्त dog food च देतो. चुकूनही आपले उरलेले त्याला देत नाही. कुत्रे माणसाळण्याआधी ते शिजवलेले आणि तेलकट तुपकट खात नसत त्यामुळे मला तरी logically हे पटले. तसेही एकदा ती चटक लागली की मग आशाळभूतासारखे आपण जेवत असताना बघणे सुरू राहते.

सद्ध्या तरी इतकेच आठवते आहे.

लंबूटांग's picture

6 Aug 2013 - 1:34 am | लंबूटांग

जर त्याला पुढे पिल्लं वगैरे होऊ देऊन विकायची नसतील तर neuter ( कुत्री असेल तर spay) करून घ्या. क्रूर वाटेल पण ते नाही केले आणि त्यांना partnerमिळाला नाही तर मग Hormonal imbalance मुळे ते खूप म्हणजे खूपच आक्रमक बनतात. ना त्यांच्यासाठी चांगले ना आपल्यासाठी. बरेच लोक माणसाशी तुलना करतात आणि म्हणतात तुला असे केले तर कसे वाटेल पण आपल्या आणि कुत्र्यांच्यात काही फरक आहे तो म्हणजे कुत्री वर्षातील काही काळच प्रजननासाठी सक्षम असतात. तेव्हाच त्यांना साथीदार लागतो.

ही अतिशय सोपी शस्त्रक्रिया आहे आणि फारसा त्रास होत नाही.

छान माहिती. तुझ्या बाळाचा फोटू मात्र प्रचंड गोड आहे.

धमाल मुलगा's picture

6 Aug 2013 - 2:56 am | धमाल मुलगा

एक भर -
पिल्लांचे दात शिवशिवतात तेव्हा दिसेल ते चावत बसण्याची सवय लागते त्यासाठी - कॅल्शियमचं च्यूइंग-बोन आणून द्यायचं...बसतंय तेच चावत. अन त्याची चवही आवडते, अन कॅल्शियमही मिळतं. विन-विन सिनॅरिओ :)

कवितानागेश's picture

6 Aug 2013 - 7:36 am | कवितानागेश

कुत्रा पाळायचा की नाही हे सावकाश ठरव.
आधी, ती गेटवरून उडी मारून अन पिल्ले गेटखालच्या सापटीतून सरपटत ! अशी येणारी कुत्री आहे, तिला थांबवायला गेटची उन्ची खालून वरून वाढवून घे की. तिचे येणं तरी बंद होईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Aug 2013 - 11:44 am | डॉ सुहास म्हात्रे

तिला थांबवायला गेटची उन्ची खालून वरून वाढवून घे की. तिचे येणं तरी बंद होईल.
ही ही हा हा हा हा!!!
(संदर्भः तुमचीच सही... आवांतरः सही सही आहे :) )

इन्दुसुता's picture

6 Aug 2013 - 9:40 am | इन्दुसुता

वर धमाल मुलगा आणि लंबुटांग यांनी बरीच उपयुक्त माहिती दिली आहे... आवड असल्या खेरीज कुत्रा पाळू नका. कुत्रा पाळला तरीही तुम्हाला तुमच्या त्रासापासून लगेच मुक्ती नाही. त्यासाठी खरेंनी एक उपाय सांगितला आहे... शिवाय धमाल मुलगा म्हणतात ते ही खरे आहे ( तोपर्यंत गलोल, लवंगी फटाके, खेळण्यातल्या पेलट्सवाल्या पिस्टलचा उपेग करा. smiley )
किंवा पाण्याचा फवारा देखिल तितकाच उपयोगी ठरू शकतो. ( पाण्याचा पाइप सर्वसाधारण पणे सर्वांकडे असतोच, शिवाय स्वतः लांब राहून पाइपने फवारा उडविणे सोपे जाते). ऑफेन्स इज समटाईम्स द बेस्ट डिफेन्स. सध्या जिचा त्रास आहे ती कुत्री आणि पिल्ले यायची तयारीनिशी वाट बघा, आणि फवार्‍याच्या रेंजमध्ये आल्यावर फवारा टाका. असे काहीवेळा झाले की ती तुम्हाला बिचकून राहील / राहतील.. म्हणजे तुमचा हेतू सफल झाला ( तुम्ही तिला घाबरण्या ऐवजी ती तुम्हाला घाबरू लागेल / लागतील ).

सुबोध खरे's picture

6 Aug 2013 - 9:52 am | सुबोध खरे

पिल्ले फार लहान असतील तर पाणी टाकू नका. मी पहिले हेच केले होते पण ती अतिशय लहान पिल्ले थंडीने कुडकुडताना पाहवत नाही.(पाप क्षालनासाठी त्यांना मी त्यादिवशी दुध दिले) आणी दुसर्या दिवशी डांबर गोळ्यांचा चुरा ठेवला.
तसेच फटक्याच्या आगीने लहान पिल्ले भाजण्याची शक्यता आहे कारण त्यांना पळून जायचे असते हे माहित नसते. या गोष्टी पिल्ले मोठी झाली कि करता येतील

पिलीयन रायडर's picture

6 Aug 2013 - 9:44 am | पिलीयन रायडर

मागे कुठे तरी उंदीर कसा बाहेर काढावा ह्यावर कुणीतरी त्याचा किमान शब्दात कमाल अपमान करावा असं सांगितल्याच आठवत आहे...
तु पण ट्राय करुन पहा..!!

चौकटराजा's picture

6 Aug 2013 - 10:36 am | चौकटराजा

आपली पोळीशी अशी आहे की शेजार्‍यावर ( आणि शेजारणीवर सुद्धा ) प्रेम करू नका. त्याच्या कुत्र्यावर करा. खूप फायदे आहेत. आपल्याला त्याच्या( म्हणजे कुत्र्याच्या ) देखभालीचा ताप नाही. परिचयामुळे कुत्र अंगावर येत नाही. शेजारी मात्र
आपले श्व्वान प्रेम पाहून आपल्यावर प्रेम करायला लागतो. शेजारीण आपल्यावर प्रेमबिम काही करायला लागत नाही पण
येता जाता ओळख तर दाखविते ? तेवढंच !

मुक्त विहारि's picture

6 Aug 2013 - 11:54 am | मुक्त विहारि

बिंधास्त कुत्रा पाळा...

इकडे कुत्रा, तिकडे उंदीरपुराण सुरु आहे. http://www.maayboli.com/node/44433

माझ्याकडे दोन धनगरी कुत्रे आहेत्,ए आर व्ही आणी टी टी सोडुन दुसरे कुठलेही इन्जेक्शन द्यावे लागत नाही,दुध भाकरी आणी अधुन मधुन अंडी व मटन सोडुन खाण्यापिण्याचे फालतु लाड नाहेत्,आणी राखणदारीला एक नंबर जात... घरातली माणस सोडुन बाहेरच्या कुणाच्या बापची गेटच्या आत पाउल ठेवायची टाप नाही.आणी घरातल्या लोकांनी कितीही बदडले तरी चुकुनही दात लावणार नाही.घरातल्या चिल्या पिल्यांनी शेपुट ओढु दे नाही तर कान उपटु दे चुकुन गुरकणार सुद्धा नाही.आणी चोरापांसुन सापा पर्यंत सगळ्यांपासुन संरक्षण. फक्त आंघोळ घालायला मात्र वाइट त्रास देतात्,तेव्हड मात्र सांभाळुन घ्यायच..

अन्तु बर्वा's picture

6 Aug 2013 - 2:01 pm | अन्तु बर्वा

कुत्र्यासारखा दुसरा पाळीव प्राणी नाही!

मला सुद्धा कुत्रा पाळायची इच्छा आहे पण एक शंका आहे.

मी flat राहतो आणि सकाळी ८ पासून ते संध्याकाळी ७. पर्यंत घरी कोणीच नसते.

मग कुत्रा इतका वेळ एकटा राहू शकेल का?

त्रिवेणी's picture

6 Aug 2013 - 3:35 pm | त्रिवेणी

रागावु नका, सहज एक गंमत
तुम्ही जो कुत्रा पाळाल ना तो स्नेहांकीता ताईकडे सकाळी ८ पासून ते संध्याकाळी ७.पर्यंत ठेवत जा, यामुळे तुम्हा दोघांचे प्रॉब्लेम सूटतील.

अन्तु बर्वा's picture

6 Aug 2013 - 3:59 pm | अन्तु बर्वा

हा हा हा!

विजुभाऊ's picture

6 Aug 2013 - 3:32 pm | विजुभाऊ

धमाल मुलगा यांच्या श्वान पुराणा बद्दल वाचायला आवडेल.
त्याना इतर मिपा सदस्यानी त्याबद्दल लिहावे यासाठी अश्वावर आरुढवून द्यावे ही विनंती.
( अर्थात ते अश्वारुढ होतील याची शाश्वती नाही. कितीही अश्व आणावे लागले तरीही त्यानी शिकार पूर्ण केली नाही हा इत्यास आहे)

सस्नेह's picture

7 Aug 2013 - 3:55 am | सस्नेह

सुबोध सर , धमु, लंबुटांग यांच्या सूचना विशेष उपयुक्त वाटल्या.
आता जरा धीर आला आहे कुत्रा पाळण्यासाठी !
कारवान हाउंडचा किंवा बाबा पाटील यांच्या कुत्र्यासारखा धनगरी कुत्रा शोध घ्यावा म्हणते.

घेतला तर रेअर ब्रीडचा घेऊ नको स्नेहातै. पार्ट्नर मिळवायला लै तरास पडतो. पुण्याबिम्बईत मिळतेत. लहान गावात नाहीत मिळत. :(
कारवानी किंवा धनगरी लै भरोशाने घायचे ब्रीड आहेत. त्याच्या सवयी लवकर कळत नाहीत. आपल्या सवयी त्याच्यावर लादल्या की काहीतरी वेगळेच होऊन बसते.
त्यापेक्षा रॉट्विलर नायत्र लॅब बेस्ट. डॉबरमन कडे चांगले लक्ष देणार असताल तर ते पण चालेल.
पण लॅब लै आळशी होतेत घरी बसुन. :(
बाकी ते ट्रेनिंग वरुन जोक आठवला.
एकजण लै हौसेने कुत्रा ट्रेन करतो.
प्रात्यक्षिक दाखवायला आण शायनिंग मारायला मित्रांना बोलावतो.
एक बिस्कीट घेऊन "टेक टॉमी टेक" चा आदेश देतो.
टोमी गप्पच.
ह्याचे परत चिडून "टेक टॉमी टेक".
.
.
टॉमी बिचारा कंपाऊंडला जाऊन टेकतो.

पैसा's picture

10 Aug 2013 - 5:38 pm | पैसा

मी आणि माझा शत्रुपक्ष आठवला!

कुत्र्याचे मालक "टेकीला" आणतात बाबा!

धमाल मुलगा's picture

12 Aug 2013 - 9:54 pm | धमाल मुलगा

डाक्टरबाबा ह्या बाबतीत अनुभवी आहेत असं त्यांच्या प्रतिसादावरुन कळतं. त्येंच्याकडून टिप्स घेता येऊ शकतील. :)

ह्याचे परत चिडून "टेक टॉमी टेक".
.
.
टॉमी बिचारा कंपाऊंडला जाऊन टेकतो.

=)) =)) =))

स्पंदना's picture

7 Aug 2013 - 4:26 am | स्पंदना

झालं?
केव्हढी माहीती ती, अन किती प्रकारचे प्रतिसाद.
बा द वे मेरेकु एक नय समझ्या। बोले तो आप कुतीयासे छुटकारा चाहते हो। फिर दुसरा कुत्ता कायको चाहिये? और अगर चाहीये, तो जो है उसपेच क्यु नय चलानेल्का?
मतलब पालनेकाही है तो जो अभी खुद ब खुद द्वार्पे खडा है वोहीच क्यु नय पालनेका?

सस्नेह's picture

7 Aug 2013 - 4:35 am | सस्नेह

अरे बाबा, जो है वो वन प्लस सेवन है ! यानेके फंडा सेवन बार !
और हमारे घरमे आके हमकोच वॉव वॉव करती ना वो !
तो काटेसेच काटा निकालनेका, करके दुसरा कुत्ता लानेका ! समझी ?

काटे से काटा! कुत्तेसे कुत्ता!
:)) :)) :|

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2013 - 11:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

"काटे से काटा" यानेके "कुत्तेने काटा तो उसको काटनेकू दुसरा कुत्ता लानेका"... भौत अच्चा आयड्या हाय ;)

आयला शतक? माझा शतकी प्रतिसाद स्नेहांकिताला सादर भेट>
काय ब्वा ! भाव वाढला एका माणसाचा! वॉव्व वॉव्व वॉव्व।

श्रीरंग_जोशी's picture

7 Aug 2013 - 7:53 am | श्रीरंग_जोशी

धागाकर्तीस शुभेच्छा. भविष्यात या संकटापासून कशी सुटका झाली यावर लिहिण्यास विसरू नका.

बाकी प्रतिसादांमधील काही अनुभव वाचून १२वी युवकभारती पुस्तकातील Snapshot of a dog हा निबंध आठवला. या अन याप्रकारच्या उत्तमोत्तम वाङमयाकरीता पा.पु.म. चे आयुष्यभर ऋणी राहीन.

सखी's picture

8 Aug 2013 - 6:27 pm | सखी

आई शप्पथ..
पुढे मागे कधी कुत्रा पाळायचा ठरलाच तर मला काहीही प्रोब्लेम येणार नाही..
काय डिट्टेल सुचना आहेत!!!!
प्रतिसाद श्रेय पिराचा हा प्रतिसाद

कुत्रा जीव लावतो हे खरं आहे, स्नेहाकिंताताई वर काही जणांनी म्हंटल्याप्रमाणे हा जरा लांबचा उपाय वाटत नाही का? तुम्ही पिल्लु आणणार, त्याला ट्रेन करणार, ते मोठे होणार, त्यानंतर ते ह्या कुत्रीला घाबरवणार (?) तेही ते स्वत: भित्रे वा जग्नमित्र नसेल तर. त्यापेक्षा यातलीच १-२ पिल्लं घेतली तर? आणि बाकीची ओळखीत, मित्र-मैत्रिणीमध्ये वाटुन टाकली तर?

पुष्कळ लोकांनी सातातले एखादे पिल्लू घेण्याचा सल्ला दिला आहे. पण जी कुत्री पिल्लांच्या जवळ जायच्या आधीच वॉव वॉव सुरु करते, ती पिल्लाला दत्तक देईल कशी ? आणि मग एकाला दत्तक घेतले, की त्याचे भाऊबंद इथेच मुक्काम ठोकतील की कायमचा ! अ

चाफा's picture

10 Aug 2013 - 3:39 pm | चाफा

.

ह्ये आमचं दोस्त, याचं ब्रीड ओळखा पाहू

धमाल मुलगा's picture

12 Aug 2013 - 9:54 pm | धमाल मुलगा

नाय ओळखता येत. आता सांग लवकर कोणतं आहे ते.

स्पंदना's picture

13 Aug 2013 - 5:48 am | स्पंदना
धमाल मुलगा's picture

13 Aug 2013 - 6:42 am | धमाल मुलगा

जर्मन शेफर्डचा बच्चा आहे! :)

स्पंदना's picture

13 Aug 2013 - 6:50 am | स्पंदना

केव्हढा मस्त आहे ना?

नाय ओळखता येत. आता सांग लवकर कोणतं आहे ते. >>>>> मला माहित असता तर विचारलं असतं का धम्या, तु एक्सपर्ट म्हणून विचारलं, हे प्रकरण एका मित्रानं घरपोच केलेलं आहे, एकुणच लै भारी काम आहे, पार गावठी पासून ते पोलीस डॉग पर्यंत कंपेअर करून झालं सवयी आणि रूपडं काही ओळखता येई ना ! :(
खास सवयी म्हणजे, हा फक्त मी आणि माझी पुतणी दोघांपैकी कुणीतरी जेवायला घातलं तरच जेवतो.
पट्टा हा प्रकार म्हणजे गुलामगिरीची निशाणी असल्यानं त्याला सक्त विरोध म्हणून शक्य त्या प्रकारे पट्टे तोडतो. :)
घरातल्या कुणीही `धर' हा शब्द उच्चारताना त्याचा रोख जर एखाद्या माणसाकडे असेल तर त्या माणसाचा किमान डॉक्टरी खर्च करण्याची वेळ आमच्यावर येते.
फिरायला जाताना घरातल्या कुणासोबतही जातो फक्त परत येताना ते दोघे एकत्र असतील याची खात्री नाही `अपवाद म्हणून मी भाऊ आणि माझी पुतणी'
आवाज खणखणीत दुसर्‍या मजल्याच्या गच्चीतून गुरगुरला तरी तळमजल्यावर पळापळ.
बाहेर नेलं की लय रोमियोगीरी करतंय राव ह्ये..

समस्त सल्लाकारांना कळवणेस अत्यंत आनंद होतो आहे की १ जून २०१७ रोजी आम्ही एक सुरेख लॅबचा बच्चा दत्तक घेतला असून ब्लेक असे नामकरण झाले आहे.
फोटू उद्या टाकणेत येतील. :)

अनन्त अवधुत's picture

6 Jun 2017 - 1:23 am | अनन्त अवधुत

अभिनंदन !!

अनन्त अवधुत's picture

6 Jun 2017 - 1:31 am | अनन्त अवधुत

ह्या समस्त धाग्याला कारणीभूत झालेली कुत्री (आणि तिचे पिल्ले) अजूनही त्रास देतात का?

नाही हो ! ती गेली. आता राहिले श्वानप्रेम :)

नूतन सावंत's picture

6 Jun 2017 - 11:35 am | नूतन सावंत

स्नेहांकिता,छान! कुत्रे अतिशय मायाळू असतात त्याचा अनुभव तुला येऊदेत.आमच्याकडे एक मस्त कुत्रा होता,7/8 दिवसांचं पिलू रस्त्यावर बेवारशी सोडलं होतं कुणीतरी इतर कुत्रे त्याला त्रास देत होते म्हणून भाऊ त्याला घरी घेऊन आला होता.जातिवंत कुत्रा म्हणजे काय? हे त्याला पाहून कळायचं,19 वर्षं जगला तो आणि जाताना पुन्हा कुत्रा पाळायचा नाही ही शिकवण देऊन गेला.मला कुत्रा प्रचंड आवडतो.