दिवाळी अंक २०२० - आवाहन

यंदाचा मिपा दिवाळी अंक असणार आहे 'प्रेम - शृंगार - रोमान्स विशेषांक'!. प्रेमाची, शृंगाराची, रोमान्सची इतकी रूपं, इतक्या छटा, इतके रंग... तर या प्रेमावर तुमच्या लेखांची, अनुभवांंची, कथांची, कवितांची आम्ही वाट पाहतोय.

लेखन देण्याची मुदत : २५ ऑक्टोबर, २०२०.

दिवाळी अंक २०२० - आवाहन

चीन विश्वासपात्र नाही

Primary tabs

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
20 Jul 2013 - 8:53 pm
चीन विश्वासपात्र नाही

सारे जुनेच आहे, काही नवीन नाही
विश्वासपात्र उरला तो मात्र चीन नाही

उत्तुंग झेप घे पण दमने नको कधीही
सांभाळण्यास बाळा वरती जमीन नाही

समजू नका कुणीही त्याला गरीब निर्धन
झाले अजून त्याचे पावित्र्य दीन नाही

आहे जरी घमंडी, उद्धट ज़रा जरासा
पण तो तुझ्याप्रमाणे, मित्रा कमीन नाही

"खावू लुटून मेवा" हे ब्रीद शासकांचे
क्लुप्ती जमेच ना ते सत्ताधुरीन नाही

तोडीस तोड उत्तर जमले बघा मलाही
आता पुढील चर्चा मुद्देविहीन नाही

स्वातंत्र्ययुद्ध अथवा संग्राम कोणताही
लढतात तेच जे-जे हुजरेकुलीन नाही

अख्त्यार भावनेच्या जगतो 'अभय' असा 'मी'
हसणे अधीन नाही, रडणे अधीन नाही

                              - गंगाधर मुटे
----------------------------------------------

अभय-गझलमराठी गझलगझल

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

21 Jul 2013 - 10:03 am | अर्धवटराव

कवितेची धार दिवसेंदिवस अधिक अभय होत चालली आहे.
जे काहि स्थित्यंतर तुमच्यातल्या कविला दिसतय आणि पुढील संघर्षाची दिशा काय असेल याबद्दल एखादा लेख टाका साहेब. कवितेला समर्थ समीक्षेची जोड हवी. पण तुमच्या शिवाय इतर कोणि वास्तववादी समीक्षा देखील करु शकणार नाहि.

अर्धवटराव

गंगाधर मुटे's picture

21 Jul 2013 - 10:56 pm | गंगाधर मुटे

अर्धवटराव, सध्या संघर्ष देखील दिशाहीन आणि पोरका झाला, असे काहीसे चित्र आहे.
बघुयात भविश्यात काय वाढून ठेवले आहे ते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jul 2013 - 10:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहित राहा.

पुलेशु.

-दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे's picture

21 Jul 2013 - 10:58 pm | गंगाधर मुटे

धन्यवाद डॉ. साहेब,
आपल्या शुभेच्छा आहेतच माझ्यासोबत. :)

श्रीरंग's picture

21 Jul 2013 - 1:34 pm | श्रीरंग

मस्त

गंगाधर मुटे's picture

21 Jul 2013 - 10:59 pm | गंगाधर मुटे

धन्यवाद सर.

प्रभाकर पेठकर's picture

21 Jul 2013 - 1:41 pm | प्रभाकर पेठकर

कविता कळली मजला, अगम्य त्यांत काही नाही,
'त्यांच्या' सारखा शब्दांचा, उगीचच खेळ नाही.

चांगली आहे, आवडली.

गंगाधर मुटे's picture

21 Jul 2013 - 11:00 pm | गंगाधर मुटे

धन्यवाद सर.

अविनाशकुलकर्णी's picture

21 Jul 2013 - 4:06 pm | अविनाशकुलकर्णी

चिन्याना बोल लावुन काय फायदा?आपले नाणेबघा..बद्द बद्द बद्द

गंगाधर मुटे's picture

21 Jul 2013 - 11:03 pm | गंगाधर मुटे

आपले नाणे..बद्द बद्द बद्द आहे म्हणून तर कोणीतरी विश्वासार्ह असावे, अशी आशा आपण बाळगतो.

नाही तर जशास तसे नसतो का वागलो? :)

निवांत पोपट's picture

21 Jul 2013 - 7:28 pm | निवांत पोपट

तुमच्या कविता नेहमी आवडतात.पण ही कविता.....:( पहिल्या दोन ओळी तर अगदीच अर्थहीन वाटल्या.

गंगाधर मुटे's picture

21 Jul 2013 - 11:05 pm | गंगाधर मुटे

निवांतराव, असे होते कधीकधी.
आणि सर्वांनाच सर्वच कविता आवडतील असेही नाही. :)

निपोंशी सहमत.. मुटेकाका, तुम्हीदेखील मिकाप्रमाणे एक स्टँडर्ड सेट करुन ठेवलं आहे. त्यामुळे ही कविता कुच जम्या नही अशी भासली. मुख्य म्हणजे गझलेसारखा फॉर्मॅट घेऊन ओळी पूर्ण करताना चवैतुहि फार आले आहेत.

पण त्याचवेळी मुटेकाकांशीही सहमत. कारण प्रत्येक रचना ही प्रत्येक वाचकाच्या मनाला एकसारखीच अपील होणारी असेलच असं नाही.

पुढील कवितेच्या प्रतीक्षेत.

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2013 - 1:53 pm | गंगाधर मुटे

आज सकाळ मधली बातमी

"चीनची पुन्हा कुरापत - ५० चीनी सैन्य लडाकमध्ये घुसले!"

(स्वगत : या चायन्यांनो या! आपले स्वागत आहे. तिथेच का बरे थांबलात? आणखी पुढे या. आम्हाला कश्याच्चा म्हणून प्रॉब्ल्रेम नाही. आम्ही आमच्या दिनचर्येत मस्त मशगूल आहोत. ;) )

गंगाधर मुटे's picture

24 Jul 2013 - 8:44 am | गंगाधर मुटे

आजच्या 'सकाळ' मध्ये ही गझल प्रकाशित झाली आहे.

धन्यवाद 'सकाळ'.
----------------------------------

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jul 2013 - 3:08 pm | अत्रुप्त आत्मा

जबरदस्त...!

@आजच्या 'सकाळ' मध्ये ही गझल प्रकाशित झाली आहे.>>> अभिनंदन...!

मदनबाण's picture

25 Jul 2013 - 5:06 pm | मदनबाण

चीन विश्वासपात्र नाही
हॅहॅहॅ... च्यामारी मला आत्ता पर्यंत आपले राजकारणीच विश्वासपात्र नाही असे वाटत होते,त्यात आता चीनी भाई पण सामिल झाले का ?

{प्रेमश्युई यक्स्परर्ट };)

उराडे अ. ह॑.'s picture

13 Aug 2013 - 6:54 pm | उराडे अ. ह॑.

वास्तवाच॓ यथायोग्य चिञण