नार्सिससचा स्वप्नदोष

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जे न देखे रवी...
20 Jul 2013 - 2:19 pm

काचेच्या भांड्यातल्या गोल्डफिशसारखा
विहरतो तो स्वच्छंद लिमिटेड अवकाशात
अन् तापलेल्या सूर्याच्या तोंडावर मिटून कवाडं
प्रतिबिंब पाहतो काचेत अ‍ॅनिमिक प्रकाशात

बांधलेल्या आखीव मॅग्नेटिक रस्त्यांवर
गुळगुळीत मॅगलेव्हने जाताना भर वेगात
ऑटोपायलटवर टाकलेल्या आयुष्याला
रस्ता सोडून जायचं येतच नाही मनात

क्षणात रंग बदलणार्‍या बत्तीस बिटी भिंती अन्
आकार बदलत्या नॅनो फर्निचरच्या गराड्यात
कंटाळा भरून राहिलेला असतो मख्खपणे
त्याच्या वेल इंजिनिअर्ड पिळदार शरीरात

चौघांचं चौकोनी चतुरस्र कायदेशीर कुटुंब
पसरलेलं जगभर ताणून एकेका कोपर्‍यात
स्वतंत्र, स्वतःचा असतो तो संपूर्णपणे
यंत्रांच्या आधाराने या एकविसाव्या शतकात

दचकून उठतो तो रोज गुडघ्यातलं डोकं काढून
स्वप्नातल्या जंगलाच्या मादक वासाने
अन् डिझायनर लाईफच्या शुभ्र चादरीवरचे
निरर्थकतेचे डाग पाहात बसतो सुन्नपणाने

करुणकविताजीवनमान

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

20 Jul 2013 - 3:01 pm | कवितानागेश

हम्म्म...

आतिवास's picture

20 Jul 2013 - 5:32 pm | आतिवास

हं!
कविता आवडली.
(शीर्षक मात्र पुरेसं उलगडलं नाही - शोधते त्याचा अर्थ ...)

अभ्या..'s picture

20 Jul 2013 - 6:17 pm | अभ्या..

वोव. इट्स डिफरंट.
आवडली

बॅटमॅन's picture

20 Jul 2013 - 7:49 pm | बॅटमॅन

आवडली! प्रतिमासृष्टी विशेषकरून आवडली. आशयाबद्दल क्वचित कुठे सरसकटीकरण वाटले पण अगदीही चूक नाहीच म्हणा त्यात.

रमताराम's picture

22 Jul 2013 - 2:05 pm | रमताराम

वाल्गुदेयाशी सहमत.
स्वगतः हा बॅट्या लेकाचा कोण्या समीक्षकाच्या नादी लागलेला दिसतोय.

पैसा's picture

20 Jul 2013 - 8:46 pm | पैसा

एकविसाव्या शतकाची कविता आवडली.

भडकमकर मास्तर's picture

21 Jul 2013 - 9:40 pm | भडकमकर मास्तर

शी र्ष क वाचून शरदिनीताई आठवल्या

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

22 Jul 2013 - 12:56 am | मिसळलेला काव्यप्रेमी

क्या बात है ननि, व्वाह...