समुद्राच्या अंगी आवेग भिनायला
भरतीची जोड लागते
.
संध्येला कातर व्हायला
सूर्यास्ताची वेळ लागते
.
चातकाच्या आतुरतेला
वसंताची ओढ लागते
.
पाण्याला नितळ व्हायला
स्वच्छ सूर्यप्रकाश लागतो
.
मातीला गंधाळायला
पहिल्या पावसाची सर लागते
.
प्राजक्त ओघळायला
पहाटेची साथ लागते
.
मोगर्याला गजरा व्हायला
धाग्याची गाठ लागते
.
मऊ साय धरायला
दुधाला धग लागते
.
साध्या पाण्याचे थंडगार तुषार
व्हायला कड्यावरुन कोसळावे लागते
.
हवेला कुंद व्हायला
धुक्याची हाक लागते
.
इतकचं काय,
चंद्र उठून दिसायलासुद्धा
रात्रीचे आंगण अन्
चांदण्यांचे कोंदण लागते
.
पण तुझं तसं नाहीये गं
तुझं... तसं नाहीये
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२८/०५/२०१३)
प्रतिक्रिया
26 Jun 2013 - 12:49 am | अभ्या..
ओह्हो. सिंप्ली ग्रेट रे.
आम्हाला प्रतिसाद द्यायला पण शब्द हुडकावे लागतात.
तुझं तसं नाहीय्ये रे मिका.
26 Jun 2013 - 5:40 am | स्पंदना
पाण्याला नितळ व्हायला
किरणांची झालर लागते
कविता अन कल्पना दोन्ही आवडल.
26 Jun 2013 - 10:02 am | आतिवास
+१
किंवा -
पाण्याला नितळ व्हायला
प्रकाशाची उब लागते
कविता आवडली.
26 Jun 2013 - 8:42 am | चाणक्य
शेवटच्या दोन ओळी....... क्या बात हैं...
26 Jun 2013 - 9:30 am | रुमानी
तुमच बरं आहे पण हे ....!
26 Jun 2013 - 10:43 am | गवि
कविता बनवायला
उपमांची प्लेट लागते..
कडवी बांधायला
यमकांची जुडी लागते..
पण तुझं तसं नाहीये रे मिका..
तुझं तसं नाहीये.
..........
कविता ठीक. शेवटच्या दोन ओळीत सगळा जीव आहे, बाकीची जुळणी उत्स्फूर्त नाही. तू फार वरचं स्टँडर्ड सेट करुन ठेवलं आहेस, तेव्हा चूक तुझीच.
27 Jun 2013 - 6:12 pm | पैसा
शेवटच्या २ ओळींसाठी बाकी रचना केल्यासारखे वाटले. म्हणजे काय, ही रचना वाटली. उत्स्फूर्त आविष्कार नाही वाटला नेहमीसारखा. तरी ठीक. उन्नीस-बीस चालतंय कधी मधी! :)
26 Jun 2013 - 11:02 am | michmadhura
खूप आवडली.
26 Jun 2013 - 3:43 pm | भावना कल्लोळ
मला हि
26 Jun 2013 - 4:12 pm | कोमल
मस्तच मिका.. क्या बात है...
खुपच छान.. अतिशय आवड्या..
26 Jun 2013 - 4:45 pm | किसन शिंदे
गविंशी सहमत!!
शेवटच्या दोन ओळीच अख्खी कविता खाऊन टाकतात.
26 Jun 2013 - 7:53 pm | संजय क्षीरसागर
महौल इतका जबरी झालयं की आता यावर उतारा यायलाच हवा!
26 Jun 2013 - 9:12 pm | सस्नेह
सर्वात जास्त आवडलं ते
26 Jun 2013 - 10:33 pm | पाषाणभेद
मिका मिपाचा हिरा आहे हिरा.
27 Jun 2013 - 1:14 am | प्यारे१
ह्याचा ऑटोग्राफ घेऊन ठेवा रे कुणीतरी माझ्यासाठी.
ज्येष्ठ कवी पद्मविभूषण मिसळलेला काव्यप्रेमी ह्यांचा संदेश नि स्वाक्षरी. ;)
27 Jun 2013 - 6:45 am | इन्दुसुता
खूप आवडली.
मोगर्याला गजरा व्हायला
धाग्याची गाठ लागते
ह्या ओळी सर्वात आवडल्या.
27 Jun 2013 - 7:54 am | रेवती
पण तुझं तसं नाहीये गं
तुझं... तसं नाहीये
वाह! सगळी कविता वाचल्यावर हा शेवट समर्पक आहे.
2 Jul 2013 - 2:31 am | निनाव
Namaskaar Mi.Ka.
mastach.. khoop diwasanni yeNe zhaale ani tumchi kavita wachaayla miLali.
sundarach..
3 Jul 2013 - 2:47 am | पिशी अबोली
सुंदर... फार आवडली..
6 Jul 2013 - 7:57 am | कवितानागेश
आवडली कविता. :)
9 Jul 2013 - 1:20 pm | गंगाधर मुटे
सुरेख कविता.
19 Apr 2016 - 12:31 pm | फिझा
अप्रतिम !!
19 Apr 2016 - 6:32 pm | राघव
आवडली.
20 Apr 2016 - 1:57 pm | उल्का
खूप सुरेख आहे!
शब्दान्ना जुळुन यायला
भावनान्ची साथ लागते. :)