.
सखे,.. "राधिके"!.. दिसतो शोभून, तुलाच..
निळा साज,
निळी ओढणी..
निलम हार
सखे,.. "राधिके"!.. दिसशी शोभून, तूच
खेळता रंग रास,
निळे निळे तन..
निळे निळे मन
सखे,.. "राधिके"!.. दिसते शोभून, तुलाच
अधीर चाल,
धावत जासी..
हरवू भान
सखे,.. "राधिके"!.. दिसते शोभून, तुझेच
तल्लीन ध्यान
निळी मोहिनी
निळा ध्यास
सखे,.. "राधिके"!.. दिसतो मजला, तुझ्यातच
घनश्याम
निळी बाहुली
दंग निळ्यात
=======================
स्वाती फडणीस............... १०-०७-२००८
प्रतिक्रिया
14 Jul 2008 - 12:45 pm | स्वाती फडणीस
कविता वाचणार्यांचे मनापासून आभार
:)
14 Jul 2008 - 8:23 pm | आशिष सुर्वे
अप्रतिम कविता...
शब्दांमधून कविता 'सचित्र' उभी करण्याची कला आहे तुमच्या लिखाणात.
छान.