नशिब!!!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
13 Jun 2013 - 6:30 pm

वाटते मजालाच तो ही,वरती आहे बैसला
पाहिले वरती कसा तो,कुठे आहे बैसला?
खेळ माझ्या मृदू मनाचा,मीच मोजून पाहिला
मि कुठे ना राहिलो,ना..देव कोठे राहिला...

आळसाची मीच माझ्या, ढाल अन केली जरी
प्रयन्तांचे वार तेथे,पडले कमी केंव्हा तरी
दु:ख आणी दुर्दैव सारे,त्यावरी मी झाकले
नशिबाने माझ्यावरी मग,पाश त्याचे टाकले...

नशिबावरी रडण्यास माझ्या,गाव सारा जमविला
लबाडिचा खेळ माझ्या,त्यांनी सुखे तो पाहिला
मी म्हणे माझ्या मनाला,आज यांना फसविले
मन ही माझे म्हणे...मग,'मीच तुजला फसविले!'...

उमगला हो 'अर्थ' मजला,नशिबाचा सारा इथे
कळले,नाही ढाल ती,'मुखवटा' आहे तिथे!
रोज रोजी मी स्वतःला,फसवू किती?हरवू किती?
आज मजला वाटते या,मुखवट्याची-ती भिती...

फेकुनी देऊन नशिबा,सत्य मी स्विकारिले
तरी माझ्या अंतरीने,सत्य ना स्विकारिले!
'आहे' 'जसा' तैसाच मि ही,मजला स्विकारितो.
कळले आज इतुके मलाही,म्हणून येथे थांबतो...

शांतरसकविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

13 Jun 2013 - 7:37 pm | पैसा

तुमची काव्य प्रतिभा अशीच बहरत राहू दे!

वेल्लाभट's picture

14 Jun 2013 - 10:39 am | वेल्लाभट

छान आहे....

प्रचेतस's picture

15 Jun 2013 - 9:30 am | प्रचेतस

सुरेख पण गंभीर कविता.
पण आता जरा एखादे हलकेफुलके काव्य येउ द्यात.

किसन शिंदे's picture

15 Jun 2013 - 10:59 am | किसन शिंदे

व्वा बुवा!!

पण आता जरा एखादे हलकेफुलके काव्य येउ द्यात.

काय नको. असंच धीरगंभीर लिहित रहा.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jun 2013 - 11:23 am | अत्रुप्त आत्मा

@काय नको.>>> :D

@असंच धीरगंभीर लिहित रहा.>>> :)

पैसा's picture

15 Jun 2013 - 11:25 am | पैसा

बुवा तुमच्या प्रतिभेला असे बंदिवासात अजिबात टाकू नका!

प्रचेतस's picture

15 Jun 2013 - 11:42 am | प्रचेतस

अगदी अगदी.

बुवांची इनोदी काव्ये, विडंबने वाचायला लैच आवडतात. आम्हास त्यापासून असे वंचित करू नका.

मोदक's picture

9 Jul 2013 - 8:52 pm | मोदक

ह्म्म..

पक पक पक's picture

15 Jun 2013 - 1:13 pm | पक पक पक

हेच म्हण्तो.. :)

अनन्न्या's picture

15 Jun 2013 - 4:07 pm | अनन्न्या

म्हणून नशिबाला दोष देताय की काय!

यशोधरा's picture

15 Jun 2013 - 8:16 pm | यशोधरा

आवडली.

सस्नेह's picture

15 Jun 2013 - 9:31 pm | सस्नेह

सुरेख.
अलिकडे आत्मा शांत होऊ लागला आहे ...जाने क्या बात है ?

बॅटमॅन's picture

16 Jun 2013 - 3:37 am | बॅटमॅन

कविता मस्तच. गंभीर आहे पण आवडली. वरती स्नेहांकिता म्हणताहेत तशी आम्हालापण शंका येऊ लागलीये-त्रुप्तीचे नक्की काय कारण आहे म्हणे भो आत्मूस भवान् ;)

आत्मुस गुर्जी. नका हो नका असे गंभीर होऊ, आमच्याकडं तशा प्रकारची वेगळी माणसं आहेत की !
तुम्चं डिपार्ट्मेंट वेगळं आहे का नाही? मग? ;)

कविता भारी आवडली हे सांगायचं र्‍हायलंच. ;)

गंगाधर मुटे's picture

9 Jul 2013 - 1:23 pm | गंगाधर मुटे

सुरेख कविता. :)

Bhagwanta Wayal's picture

9 Jul 2013 - 5:03 pm | Bhagwanta Wayal

सुरोख कविता, आवड्ली.

जेपी's picture

9 Jul 2013 - 8:58 pm | जेपी

नशिब आमच कविता वाचायला मिळाली

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jul 2013 - 9:52 pm | अत्रुप्त आत्मा

तथाssssssssssस्तू!!! :)

रानी १३'s picture

10 Jul 2013 - 1:49 pm | रानी १३

ही कविता भाऊसाहेब पाटणकराच्या एका कवितेसारखी वाटते आहे....

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jul 2013 - 2:47 pm | अत्रुप्त आत्मा

श्टाइल तीच आहे..!

आंम्ही भाऊसाहेबांच्या शायरीचे परचंड फ्यान... त्यामुळे त्याचा वारा येणे स्वा भाविक आहे.