कळवण्यास अत्यंत दु:ख होते आहे की मराठी संकेतस्थळांवरील जुने आणि लोकप्रिय लेखक व सामाजिक कार्यकर्ते श्री. श्रावण मोडक यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. येथील अनेक सदस्यांसाठी ते एखाद्या कुटुंबियाप्रमाणे होते. त्यांना श्रद्धांजली.
अत्यंत दु:खद घटना कळली तेव्हा विश्वासच बसला नाही. एक क्षण मेंदूने विचार केला की खर आहे का हे? आपण असे करु श्रामोंनाच विचारु. आणि लगेचच भानावर आलो. दु:ख व्यक्त करायला शब्द पुरेसे नाहीत.
अर्धा धागा वाचेपर्यंत वाटत होतं की परत काही तरी मजा करत असणार हे लोक..
माझी त्यांची व्यक्तिशः ओळख नव्हती, पण प्रतिसाद नेहमी वाचायचे त्यांचे..
ईश्वर म्रुतात्म्यास सद्गती देवो.
दुपारी श्रावणबाबतची बातमी कळली अन सुन्न झालो.
अगदीच धक्कादायक बातमी... अगदी श्रावण स्टाईल...
श्रावण आज आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही.
सखा, पत्रकार सहकारी, चळवळींशी सतत बांधीलकी ठेऊन जगणारा कार्यकर्ता... अनेक रुपे पाहिली त्याची गेल्या २५ वर्षात.
त्याला असलेली प्रश्नांची जाण, खोलात जाऊन विषय समजुन घेण्याची सवय, भाषेवरची पकड सगळ्याचंच सतत कौतुक वाटत राहिलं.
पण आज आता तोच राहिलेला नाही. काय बोलावं, काय लिहावं हेच सुचत नाहीये.
रेस्ट इन पीस असं सुद्धा म्हणवत नाही कारण रेस्ट त्याच्या स्वभावातच नाही.
बापरे! फारच धक्कादायक बातमी. माणसाचे आयुष्य किती क्षणभंगुर झाले आहे ह्या क्रूर सत्याला स्विकारणे कठीण होते आहे. एक दोन वेळा कट्ट्यावर भेट झाली होती.
देवा, असं नको करूस रे..! अरे! नेण्यासाठी भारतात माणसांची कमी नाही. ज्यांच्या जाण्याने भूईचा भार हलका होईल अशी माणसं उचलत जारे बाबा!
फार दु:ख होतं अशा बातम्यांनी.
मिपाचे सर्व सदस्य इतर सर्वांना पाहून ओळखत नाहीत. तेंव्हा अशा घटनेत आपल्या मिपा कुटुंबाला सोडून जाणार्या सदस्याचे छायाचित्र मुख्य फलकावर सर्वात वरती टाकले तर नविन सदस्यांना आणि इतर जुन्या पण त्या सदस्यास न भेटलेल्या सदस्यांना एकवार दर्शन तरी होईल.
धक्कादायक आहे ही बातमी
देव त्यांच्या आत्म्याला शांती देओ.
ह्या प्रसंगी श्रामो ह्यांचे मिपा वरील लेखन उपलब्ध करून द्यावे अशी मी विनंती करतो म्हणजे नवीन मिपाकरांना श्रामो कोण ,काय होते हे त्यांच्या लिखाणातून कळेल. आणी जुन्या मंडळी त्यांचे लेखनरुपी विचार पिंपळपान म्हणून जपू शकतील.
श्रामोंशी प्रत्यक्ष ओळख नव्हती. त्यांच्याशी खरडवहीतून किंवा व्यनितून खुप गप्पा मारल्या आहेत, असंही नाही.. पण नेहमीच एक जाणवत राहीलं, की हे रसायन वेगळं आहे. अत्यंत अभ्यासू, जाणकार आणि तरीही शिकण्यास उत्सूक असा माणूस त्यांच्या लिखाणातून, मग तो लेख असो वा प्रतिसाद, समोर येत राहीला.. अत्यंत क्लिष्ट अशी विनोदबुद्धी असलेलं हे व्यक्तिमत्व माझ्या औत्सुक्याचा विषय होता व राहील. मिपाने एक जाणकार, हुशार व्यक्तिमत्व गमावलंय, हे नक्की..
त्यांच्या मृताम्यास देव शांती देवो आणि कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती लाभो, हीच प्रार्थना..
श्रामो?
अगदी हक्काने "अग अग आवर स्वतःला" अस म्हणणारेच श्रामो मला आठवताहेत.
एकदा टिम म्हणुन त्यांच्या बरोबर काम केल मिपा कृपेने.
हल्ली दोन दिवस सारख ध्म्याच्या खवत त्यांना पाहुन जाउन बोलावस वाटत होतं.
श्रामो वी वील मिस यु!
श्रावण मोडकांची प्रत्यक्ष कधी भेट झाली नाही, थोडाफार व्यनितून व ई- मेलीतून संवाद झाला तेव्हढाच.
त्यांच्या व माझ्या 'ओळ्खीची' सुरूवात येथील एका चर्चेच्या दरम्यान झाली. त्यात त्यांच्या डाव्या भूमिकेवर आडून मी काही तीर मारले. ते त्यांनी समजूतदारपणे परतवले. तेव्हा अगदी प्रकर्षाने मला जाणवले ते त्यांचे प्रगल्भ व्यकित्मत्व. वाद होऊनही, त्यात मी त्यांच्यावर थोडे शरसंधान केल्यानंतरही त्यांनी ते फारसे मनात ठेवले नाही. सामजिक प्रश्नांवरील त्यांच्या भूमिका मल नेहमीच पटत असत असे नव्हे, पण तरीही आमचा वैयक्तिक संवाद सुरू झाला. येथील अन्य काही अनुभव पहाता, हे मला अगदी लक्षणीय वाटले.
त्यांच्याशी झालेल्या संवादातून त्यांच्या हृदयविकाराविषयी माहिती झाली होती, त्याची तीव्रताही माझ्या लक्षात आली होती. पण चळवळीतील अगदी सक्रिय कार्यकर्ता असल्याने, ते बहुधा सदैव फिरतीवर असावेत व त्या दरम्यान पथ्यपाणी ते फारसे संभाळू शकत नसावेत असा माझा कयास होता. आमचे संबंध अगदी घनिष्ट नव्हते, तेव्हा ह्याविषयी त्यांना मी कधी काही लिहीले नाही. पण त्यांच्या प्रकृतीची चिंता मला वाटत राहिलीच. तरीही हे अगदी असे टोकासे अघटित इतक्या लवकर घडेल असे वाटले नाही.
ह्यानिमीत्ताने आयुष्याची क्षणभंगूरता माझ्यापुरती पुन्हा: एकदा अधोरेखित झाली.
आता ते पुढच्या प्रवासास निघून गेले आहेत. तिथे जे कष्टकरी, शेतकरी असणार, त्यांचे निशाण ते स्वतःच्या खांद्यावर घेणार. तेथील जमिनदार, सरकारी बाबू इत्यादींनी आता जपून रहावे.
विश्वासच बसत नाही.
न बघता न भेटता ज्यांच्याबद्दल अत्यंत जिव्हाळा वाटतो त्यापैकी एक.
पटलावर श्रामोंचं अधोलेखित नाव वाचताच एक शंका मनात चुकचुकली.
शंका चूक ठरू दे आणि श्रामोंच्या कुठल्यातरी किंवा सगळ्याच गुणांबद्दल कौतुक करणारा धागा असूदे हा विचार करत धागा उघडलाझ
छे! नको तेच खरे ठरले.
श्रा मो आम्हा मिपावासियांच्या मनात चिरंतन जीवंत राहतील.
दुपारी फोन वरून ही बातमी कळली. विश्वास बसत नाही अजून या बातमीवर. ओळख धागे आणि खरडवही ह्याच्या पलीकडे केंव्हाच पोहोचली होती. अनेकदा भेटीगाठी व्हायच्या. परवाच थोडी चर्चा झाली होती छ्त्तीसगढमधील घटनेवरुन. आणि त्यांनी खरड पाठवली होती.
सुन्न झालेलो आहे. शब्दच सापडत नाहीत त्यांना श्रध्दांजली व्हायला. कारण श्रामो गेले यावर अजुन विश्वासच बसत नाही.
मुख्य पानावर श्रावण मोडकांचे नाव अधोरेखित पाहून काहीतरी मजा असेल, कुठला तरी पुरस्कार वगैरे मिळाला असेल, म्हणून अभिनंदनाचा धागा असेल असे वाटले, पण उघडताक्षणी तीव्र धक्का बसला. प्रत्यक्ष परिचय कुठल्याच मिपाकराशी नाही पण आंतरजालावर जे कोणी लेखक उत्सुकतेने वाचावेसे वाटत, त्यात श्रावण मोडक प्रमुख होते. चळवळीतले कार्यकर्ते आहेत आणि पत्रकारही हे बाहेरून माहीत होते. लिखाणातली बांधिलकी, तळमळ आणि व्यासंग नेहमीच जाणवायचे. आंतरजाल एका प्रगल्भ विचारवंताला मुकले आहे. श्रद्धांजली.
श्रद्धांजली 30 May 2013 - 7:00 pm | llपुण्याचे पेशवेll
मागेच श्रामोंचा नंबर घेतला त्यांना व्यनि करून. त्यांच्या येशाबद्दल बोलायचे होते. तसे आम्ही अनेकवेळा अनेक कट्ट्यांवर भेटत बोलत होतो पण मध्यंतरी अत्यंत काम लागल्याने थोडा जालापासून दूर होतो. पण येशा चटका लावून गेला आणि मला ते म्हटले होते येशाबद्दल सविस्तर बोलू.
येशा गेलाच आणि आता श्रामोही गेले. :(
प्रतिक्रिया
30 May 2013 - 4:11 pm | बॅटमॅन
!!!!!!!!!!!!!!!!
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.
30 May 2013 - 7:12 pm | बाबा पाटील
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.....
30 May 2013 - 4:12 pm | प्रकाश घाटपांडे
अत्यंत दु:खद घटना कळली तेव्हा विश्वासच बसला नाही. एक क्षण मेंदूने विचार केला की खर आहे का हे? आपण असे करु श्रामोंनाच विचारु. आणि लगेचच भानावर आलो. दु:ख व्यक्त करायला शब्द पुरेसे नाहीत.
30 May 2013 - 4:13 pm | विजुभाऊ
खरे वाटत नाहिय्ये. मृदुभाशी हसतमुख आणि चौफेर वाचन असलेला मित्र हरवला.
30 May 2013 - 4:13 pm | प्रचेतस
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली
30 May 2013 - 4:14 pm | गणपा
बातमी खरच धक्कादायक आहे. आधीतर यावर विश्वासच बसेना.
:(
एक चांगला अभ्यासू मित्रं हरवल्याचं दु:ख आहे.
30 May 2013 - 4:17 pm | पिलीयन रायडर
अर्धा धागा वाचेपर्यंत वाटत होतं की परत काही तरी मजा करत असणार हे लोक..
माझी त्यांची व्यक्तिशः ओळख नव्हती, पण प्रतिसाद नेहमी वाचायचे त्यांचे..
फार वाईट वाटलं वाचुन..... :(
30 May 2013 - 4:25 pm | सस्नेह
अगदीच धक्कादायक.
त्यांचे लेख वाचले आहेत. अत्यंत उच्च दर्जाचे व परिपक्व लेखन.
30 May 2013 - 4:38 pm | अनिरुद्ध प
अर्धा धागा वाचेपर्यंत वाटत होतं की परत काही तरी मजा करत असणार हे लोक..
माझी त्यांची व्यक्तिशः ओळख नव्हती, पण प्रतिसाद नेहमी वाचायचे त्यांचे..
ईश्वर म्रुतात्म्यास सद्गती देवो.
30 May 2013 - 4:15 pm | मूकवाचक
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली
30 May 2013 - 4:16 pm | तुषार काळभोर
श्रामोंना श्रद्धांजली!
30 May 2013 - 4:16 pm | सुनील
खव आणि व्यनि सोडता संपर्क नव्हता तरीही जवळची व्यक्ती गेल्यासारखे दु:ख होते आहे.
श्रद्धांजली.
30 May 2013 - 4:17 pm | चेतन माने
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !
30 May 2013 - 4:19 pm | अमोल केळकर
फारच वाईट बातमी . श्रध्दांजली
अमोल केळकर
30 May 2013 - 4:20 pm | इनिगोय
अत्यंत धक्कादायक! आंजावरील व्यासंगी व्यक्ती म्हणून त्यांचा परिचय होता. त्यांच्या अकाली निधनाचं दुःख वाटत आहे.
30 May 2013 - 4:21 pm | प्यारे१
भेटणं राहूनच गेलं. :(
सद्गती लाभो हीच प्रार्थना.
30 May 2013 - 4:22 pm | मदनबाण
धक्का बसला !
अजुनही विश्वास वाटत नाही !
मोडक काकांना भावपूर्ण श्रद्धांजली...
30 May 2013 - 4:24 pm | सानिकास्वप्निल
श्रामोंना भावपूर्ण श्रद्धांजली....
30 May 2013 - 4:25 pm | मैत्र
अत्यंत धक्कादायक आणि दु:खद...
श्रावण मोडक यांच्या शोध पत्रकारितेवर काही धागा असेल असे वाटून उघडला..
अतिशय वाईट वाटले..
श्रद्धांजली....
30 May 2013 - 4:30 pm | प्रसन्न केसकर
दुपारी श्रावणबाबतची बातमी कळली अन सुन्न झालो.
अगदीच धक्कादायक बातमी... अगदी श्रावण स्टाईल...
श्रावण आज आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही.
सखा, पत्रकार सहकारी, चळवळींशी सतत बांधीलकी ठेऊन जगणारा कार्यकर्ता... अनेक रुपे पाहिली त्याची गेल्या २५ वर्षात.
त्याला असलेली प्रश्नांची जाण, खोलात जाऊन विषय समजुन घेण्याची सवय, भाषेवरची पकड सगळ्याचंच सतत कौतुक वाटत राहिलं.
पण आज आता तोच राहिलेला नाही. काय बोलावं, काय लिहावं हेच सुचत नाहीये.
रेस्ट इन पीस असं सुद्धा म्हणवत नाही कारण रेस्ट त्याच्या स्वभावातच नाही.
30 May 2013 - 4:30 pm | अत्रुप्त आत्मा
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
भावपूर्ण श्रद्धांजली!!!
30 May 2013 - 4:32 pm | दशानन
परवाच बोलणे झाले होते, विश्वासच बसत नाही आहे,अगदीच शुन्यवत अवस्था झाली आहे :(
30 May 2013 - 4:33 pm | क्लिंटन
श्रामोंना भावपूर्ण श्रध्दांजली. :(
30 May 2013 - 4:33 pm | नि३सोलपुरकर
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.
30 May 2013 - 4:36 pm | कवितानागेश
सुन्न..
30 May 2013 - 4:37 pm | लॉरी टांगटूंगकर
भावपूर्ण श्रध्दांजली
30 May 2013 - 4:38 pm | दिपक.कुवेत
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
30 May 2013 - 4:42 pm | सन्जोप राव
अविश्वसनीय.... धक्कादायक....
30 May 2013 - 4:43 pm | निवांत पोपट
!! श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!
!! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !
30 May 2013 - 4:43 pm | इरसाल
विश्वास बसत नाहीये.
वाटलं चिंजंनी त्यांची खेचण्यासाठी काढलेला धागा असेल.
भावपूर्ण श्रद्धांजली.ईश्वर मृतात्म्यास शांती प्रदान करो.
30 May 2013 - 4:44 pm | Dhananjay Borgaonkar
धक्कादायक बातमी. अजुनही विश्वास बसत नाहीये.
श्रामोंना भावपुर्ण श्रदधांजली.
ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना धीर देवो.
30 May 2013 - 4:45 pm | विनायक प्रभू
एक चांगला माणुस हरपला.
30 May 2013 - 4:45 pm | इरसाल
मृतात्म्यास शांती प्रदान करो.
30 May 2013 - 4:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बातमी ऐकून धक्काच बसला. विश्वास बसत नाही.
-दिलीप बिरुटे
30 May 2013 - 4:51 pm | वेताळ
श्रामो ना भावपुर्ण श्रध्दाजंली.....
30 May 2013 - 4:54 pm | सामान्य वाचक
आज सकाळीच कळले की ICU मध्ये आहेत. वाटत होते कि medicine खूप पुढे गेले आहे. त्यामुळे सगळे ठीक होइल. पण….
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो!
30 May 2013 - 4:54 pm | हासिनी
भावपुर्ण श्रध्दांजली!!
30 May 2013 - 5:01 pm | अजातशत्रु
भावपुर्ण श्रध्दाजंली
30 May 2013 - 5:02 pm | भावना कल्लोळ
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
30 May 2013 - 5:03 pm | गवि
प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही आणि आता राहूनच गेली म्हणायची.
विचारपूर्ण आणि मॅच्युअर प्रतिसाद असायचे त्यांचे. अगदी नुकताच त्यांच्याशी प्रतिसादरुप संवाद झाला होता.. आणि असंच इतरही अनेकांना जाणवलं असेल.
त्यांना सद्गती लाभो..
31 May 2013 - 2:38 am | निशदे
भेटीचा योग येणे अवघडच असले तरी त्यांचे लेखन आणि प्रतिसाद अतिशय उत्कृष्ट असत.
श्रामोंना श्रद्धांजली....... :(
30 May 2013 - 5:05 pm | प्रभाकर पेठकर
बापरे! फारच धक्कादायक बातमी. माणसाचे आयुष्य किती क्षणभंगुर झाले आहे ह्या क्रूर सत्याला स्विकारणे कठीण होते आहे. एक दोन वेळा कट्ट्यावर भेट झाली होती.
देवा, असं नको करूस रे..! अरे! नेण्यासाठी भारतात माणसांची कमी नाही. ज्यांच्या जाण्याने भूईचा भार हलका होईल अशी माणसं उचलत जारे बाबा!
फार दु:ख होतं अशा बातम्यांनी.
मिपाचे सर्व सदस्य इतर सर्वांना पाहून ओळखत नाहीत. तेंव्हा अशा घटनेत आपल्या मिपा कुटुंबाला सोडून जाणार्या सदस्याचे छायाचित्र मुख्य फलकावर सर्वात वरती टाकले तर नविन सदस्यांना आणि इतर जुन्या पण त्या सदस्यास न भेटलेल्या सदस्यांना एकवार दर्शन तरी होईल.
मिपाच्या कुटुंब प्रमुखाला ही एक विनम्र विनंती.
30 May 2013 - 5:10 pm | गवि
कट्टावृत्तांतात सापडलेल्या काही प्रसन्न मुद्रा.
30 May 2013 - 5:20 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद गवि.
30 May 2013 - 5:05 pm | सोत्रि
अविश्वसनिय आणि धक्कादायक!
भावपूर्ण श्रद्धांजली...
- (सुन्न झालेला) सोकाजी
30 May 2013 - 5:07 pm | सुमीत
मोडक साहेबांना श्रद्धांजली, आजही त्यांची धरण ग्रस्तां वरची कथा आठवते.
30 May 2013 - 5:07 pm | जयंत कुलकर्णी
.
30 May 2013 - 5:09 pm | सूड
श्रद्धांजली !!
30 May 2013 - 5:11 pm | नरेश_
वाईट वाटले.भावपूर्ण आदरांजली!
30 May 2013 - 5:11 pm | श्रीरंग_जोशी
फारच धक्कादायक बातमी.
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
30 May 2013 - 5:11 pm | निनाद मुक्काम प...
धक्कादायक आहे ही बातमी
देव त्यांच्या आत्म्याला शांती देओ.
ह्या प्रसंगी श्रामो ह्यांचे मिपा वरील लेखन उपलब्ध करून द्यावे अशी मी विनंती करतो म्हणजे नवीन मिपाकरांना श्रामो कोण ,काय होते हे त्यांच्या लिखाणातून कळेल. आणी जुन्या मंडळी त्यांचे लेखनरुपी विचार पिंपळपान म्हणून जपू शकतील.
30 May 2013 - 5:12 pm | झकासराव
:(
त्यांचे लेखन व प्रतिसाद अभ्यासपुर्ण असायचे.
खुपच धक्कादायक बातमी.
30 May 2013 - 5:13 pm | चाणक्य
.
30 May 2013 - 5:16 pm | चिगो
श्रामोंशी प्रत्यक्ष ओळख नव्हती. त्यांच्याशी खरडवहीतून किंवा व्यनितून खुप गप्पा मारल्या आहेत, असंही नाही.. पण नेहमीच एक जाणवत राहीलं, की हे रसायन वेगळं आहे. अत्यंत अभ्यासू, जाणकार आणि तरीही शिकण्यास उत्सूक असा माणूस त्यांच्या लिखाणातून, मग तो लेख असो वा प्रतिसाद, समोर येत राहीला.. अत्यंत क्लिष्ट अशी विनोदबुद्धी असलेलं हे व्यक्तिमत्व माझ्या औत्सुक्याचा विषय होता व राहील. मिपाने एक जाणकार, हुशार व्यक्तिमत्व गमावलंय, हे नक्की..
त्यांच्या मृताम्यास देव शांती देवो आणि कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती लाभो, हीच प्रार्थना..
30 May 2013 - 5:17 pm | Mrunalini
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
30 May 2013 - 5:18 pm | तर्री
धक्कादायक व दुःखद बातमी.
इश्वर श्र.मो.च्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना.
30 May 2013 - 5:22 pm | अजो
श्रामोंना भावपूर्ण श्रध्दांजली. :(
30 May 2013 - 5:23 pm | प्रसाद प्रसाद
भावपूर्ण श्रद्धांजली
30 May 2013 - 5:24 pm | समाधान
भावपूर्ण श्रद्धांजली
30 May 2013 - 5:27 pm | लाल टोपी
कधीच संपर्क नव्हता परंतु जालावरील अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व भवपूर्ण श्र्ध्दांजली
30 May 2013 - 5:35 pm | सुधीर
वाचून धक्का बसला. :(
श्रामोंना श्रद्धांजली!
30 May 2013 - 5:37 pm | मृत्युन्जय
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. एवढेच म्हणु शकतो. अजुन लिहिणार तरी काय?
30 May 2013 - 5:45 pm | स्पंदना
श्रामो?
अगदी हक्काने "अग अग आवर स्वतःला" अस म्हणणारेच श्रामो मला आठवताहेत.
एकदा टिम म्हणुन त्यांच्या बरोबर काम केल मिपा कृपेने.
हल्ली दोन दिवस सारख ध्म्याच्या खवत त्यांना पाहुन जाउन बोलावस वाटत होतं.
श्रामो वी वील मिस यु!
30 May 2013 - 5:45 pm | स्पा
धक्का बसला
मन:पूर्वक श्रद्धांजली
30 May 2013 - 5:46 pm | सुहास झेले
धक्कादायक बातमी... :( :(
मोडक काकांना भावपूर्ण श्रद्धांजली.....
30 May 2013 - 5:47 pm | टिवटिव
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
30 May 2013 - 5:47 pm | प्रदीप
श्रावण मोडकांची प्रत्यक्ष कधी भेट झाली नाही, थोडाफार व्यनितून व ई- मेलीतून संवाद झाला तेव्हढाच.
त्यांच्या व माझ्या 'ओळ्खीची' सुरूवात येथील एका चर्चेच्या दरम्यान झाली. त्यात त्यांच्या डाव्या भूमिकेवर आडून मी काही तीर मारले. ते त्यांनी समजूतदारपणे परतवले. तेव्हा अगदी प्रकर्षाने मला जाणवले ते त्यांचे प्रगल्भ व्यकित्मत्व. वाद होऊनही, त्यात मी त्यांच्यावर थोडे शरसंधान केल्यानंतरही त्यांनी ते फारसे मनात ठेवले नाही. सामजिक प्रश्नांवरील त्यांच्या भूमिका मल नेहमीच पटत असत असे नव्हे, पण तरीही आमचा वैयक्तिक संवाद सुरू झाला. येथील अन्य काही अनुभव पहाता, हे मला अगदी लक्षणीय वाटले.
त्यांच्याशी झालेल्या संवादातून त्यांच्या हृदयविकाराविषयी माहिती झाली होती, त्याची तीव्रताही माझ्या लक्षात आली होती. पण चळवळीतील अगदी सक्रिय कार्यकर्ता असल्याने, ते बहुधा सदैव फिरतीवर असावेत व त्या दरम्यान पथ्यपाणी ते फारसे संभाळू शकत नसावेत असा माझा कयास होता. आमचे संबंध अगदी घनिष्ट नव्हते, तेव्हा ह्याविषयी त्यांना मी कधी काही लिहीले नाही. पण त्यांच्या प्रकृतीची चिंता मला वाटत राहिलीच. तरीही हे अगदी असे टोकासे अघटित इतक्या लवकर घडेल असे वाटले नाही.
ह्यानिमीत्ताने आयुष्याची क्षणभंगूरता माझ्यापुरती पुन्हा: एकदा अधोरेखित झाली.
आता ते पुढच्या प्रवासास निघून गेले आहेत. तिथे जे कष्टकरी, शेतकरी असणार, त्यांचे निशाण ते स्वतःच्या खांद्यावर घेणार. तेथील जमिनदार, सरकारी बाबू इत्यादींनी आता जपून रहावे.
30 May 2013 - 5:49 pm | विसुनाना
हॅ! हे कायतरीच झालं!
30 May 2013 - 5:58 pm | साती
विश्वासच बसत नाही.
न बघता न भेटता ज्यांच्याबद्दल अत्यंत जिव्हाळा वाटतो त्यापैकी एक.
पटलावर श्रामोंचं अधोलेखित नाव वाचताच एक शंका मनात चुकचुकली.
शंका चूक ठरू दे आणि श्रामोंच्या कुठल्यातरी किंवा सगळ्याच गुणांबद्दल कौतुक करणारा धागा असूदे हा विचार करत धागा उघडलाझ
छे! नको तेच खरे ठरले.
श्रा मो आम्हा मिपावासियांच्या मनात चिरंतन जीवंत राहतील.
30 May 2013 - 5:58 pm | अभिज्ञ
ऐकून अतिशय धक्का बसला.
मागे तीनेक वर्षामागे एकदाच श्रामोंबरोबर भेट झाली होती. अजूनही त्यावेळेला मारलेल्या गप्पा आठवतात.
भावपुर्ण श्रध्दांजलि.
अभिज्ञ.
30 May 2013 - 5:58 pm | मराठे
अनपेक्षित आणि धक्कादायक :(
श्रामोंना आदरांजली.
30 May 2013 - 6:03 pm | किसन शिंदे
अतिशय धक्कादायक बातमी!!
श्रामोंना भावपुर्ण श्रध्दांजली. :(
30 May 2013 - 6:10 pm | अक्षया
भावपुर्ण श्रध्दांजलि.
30 May 2013 - 6:13 pm | स्वाती२
विश्वासच बसत नाहीये! :( श्रामोंना श्रद्धांजली.
30 May 2013 - 6:14 pm | जुइ
भावपूर्ण श्रद्धांजली.
30 May 2013 - 6:19 pm | कपिलमुनी
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली
30 May 2013 - 6:23 pm | चिंतामणी
दुपारी फोन वरून ही बातमी कळली. विश्वास बसत नाही अजून या बातमीवर. ओळख धागे आणि खरडवही ह्याच्या पलीकडे केंव्हाच पोहोचली होती. अनेकदा भेटीगाठी व्हायच्या. परवाच थोडी चर्चा झाली होती छ्त्तीसगढमधील घटनेवरुन. आणि त्यांनी खरड पाठवली होती.
सुन्न झालेलो आहे. शब्दच सापडत नाहीत त्यांना श्रध्दांजली व्हायला. कारण श्रामो गेले यावर अजुन विश्वासच बसत नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली
30 May 2013 - 6:36 pm | मितान
धक्कादायक बातमी !
श्रामो, भेटायचं राहूनंच गेलं :(
30 May 2013 - 6:38 pm | खबो जाप
भावपूर्ण श्रद्धांजली....
ईश्वर त्यांच्या म्रुतात्म्यास सद्गती देवो.
30 May 2013 - 6:40 pm | शिद
श्रावण मोडक यांस मनःपूर्वक श्रद्धांजली...!!! ईश्वर त्यांच्या म्रुतात्म्यास सद्गती देवो.
30 May 2013 - 6:51 pm | अवतार
शब्दच नाहीत!
30 May 2013 - 6:56 pm | रेवती
अतिशय धक्कादायक बातमी आहे. विश्वास बसत नाहीये. ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो!
नाही, अजूनही विश्वास बसत नाही.
30 May 2013 - 6:56 pm | राही
मुख्य पानावर श्रावण मोडकांचे नाव अधोरेखित पाहून काहीतरी मजा असेल, कुठला तरी पुरस्कार वगैरे मिळाला असेल, म्हणून अभिनंदनाचा धागा असेल असे वाटले, पण उघडताक्षणी तीव्र धक्का बसला. प्रत्यक्ष परिचय कुठल्याच मिपाकराशी नाही पण आंतरजालावर जे कोणी लेखक उत्सुकतेने वाचावेसे वाटत, त्यात श्रावण मोडक प्रमुख होते. चळवळीतले कार्यकर्ते आहेत आणि पत्रकारही हे बाहेरून माहीत होते. लिखाणातली बांधिलकी, तळमळ आणि व्यासंग नेहमीच जाणवायचे. आंतरजाल एका प्रगल्भ विचारवंताला मुकले आहे. श्रद्धांजली.
30 May 2013 - 7:00 pm | llपुण्याचे पेशवेll
मागेच श्रामोंचा नंबर घेतला त्यांना व्यनि करून. त्यांच्या येशाबद्दल बोलायचे होते. तसे आम्ही अनेकवेळा अनेक कट्ट्यांवर भेटत बोलत होतो पण मध्यंतरी अत्यंत काम लागल्याने थोडा जालापासून दूर होतो. पण येशा चटका लावून गेला आणि मला ते म्हटले होते येशाबद्दल सविस्तर बोलू.
येशा गेलाच आणि आता श्रामोही गेले. :(
30 May 2013 - 7:01 pm | jaypal
मनःपूर्वक श्रद्धांजली..!
मोडक परीवाराच्या दु:खात आम्ही सगळे मिपाकर सहभागी आहोत.
30 May 2013 - 7:02 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
श्रद्धांजली! __/\__
30 May 2013 - 7:03 pm | आजानुकर्ण
श्री. मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
30 May 2013 - 7:05 pm | चैदजा
:( श्रावण मोडक यांना श्रद्धांजली !!!
30 May 2013 - 7:06 pm | सूर्य
अरेरे... खुप वाईट बातमी.. धक्का बसला.
: ' (
- सूर्य.
30 May 2013 - 7:14 pm | उदय के'सागर
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो...