काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत कट्टा करायचा असं मुक्त विहारींनी ठरवलं, आणि कट्टा होणार की नाही इथपासून तुम्ही डोंबिवलीकरांनी राजकारण केलंत पर्यंतच्या ब-याच चर्चा मिपावर घडून आल्या. पण काहीही झालं तरी कट्टा करायचाच असा ठाम निर्धारच मु.वि. नी केलेला असल्यामुळे अखेरीस ठरलेल्या दिवशी, रविवार २६ मे, रोजी, नंदी पॅलेस मध्ये कट्टयाचा बेत ठरला.
कट्ट्याची उपस्थिती किती हा मुद्दा गौण असल्याने जितके आले ते कट्टेकरी. आलो तर येईन पासून रात्री उशीर होईल पण नक्की येईन असं सांगून टांग देणारे वगळले, तरी ४ जण नक्की येणार हे कळलं. मुलूंडच्या डॉ. सुबोध खरेंना खास निमंत्रण होतं, आणि त्यांनीही येण्याचं मान्य केल्यामुळे चौघांमध्ये सुद्धा कट्टा रंगणार याची खात्री झाली.
ठरलेल्या वेळी मु.वि. हाटेलात जाऊन मोक्याची जागा पकडून बसले. (हो, त्याच दिवशी आयपीएल चा अंतिम सामना असल्यामुळे हाटेल वाल्यांनी मोठ्या पडद्यावर सामना दाखवण्याची सोय केली होती) पाठोपाठ डॉ. खरे सुद्धा आले. मी आणि निम मात्र डोंबिवलीच्या संडे स्पेशल ट्रॅफ़िकमध्ये अडकलो, आणि जवळपास दीड तास उशिरा, ९.१५ ला पोहोचलो.
नंदी पॅलेस डोंबिवलीतल्या रहदारी आणि कोलाहलाच्या बाहेर, एमआयडीसी मध्ये हायवे वर असणारं एक जब्राट हॉटेल आहे. त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या गार्डन रेस्टॉरंटमध्ये आमचा कंपू जमला होता. संध्याकाळचा सुखद गारवा, हॉटेलमध्ये चालू असलेल्या लाईव्ह गझला, आयपीएल सामना आणि आमची गप्पाष्टकं, सुंदर मिलाफ़ जमला होता. ओळखपाळख झाल्यानंतर, आधी मु.वि. चे आखाती देशांबद्दलचे अनुभव, तिथल्या नोकरीच्या संधी, यांवर चर्चा झाली. त्यानंतर डॉ. खरेंचं मेडिकल आणि नौदलाचं अनुभवकथन सुरू झालं, आणि बाकी सगळे विषय मागे पडले. हे विश्व आम्हां तिघांना अगदीच अपरिचित, त्यामुळे विक्रांतवरचे दिवस, आलेले बरे वाईट अनुभव, हे खुद्द त्यांच्याच तोंडून ऐकण्यातली मजा निराळीच होती. सोबत उदरभरणासाठी वशाट कोंबडं आणि इतर पदार्थ होतेच.
गप्पांमध्ये दोन अडीच तास कसे गेले कळलंच नाही. त्यातच मुंबई पहिल्यांदाच आयपीएल जिंकण्याचा वाटेवर होती, त्यामुळे स्टेडियम सारखाच गदारोळ आणि उत्साह इकडेही दिसत होता. पेटपूजा, गप्पा, आणि चेन्नईचे फ़लंदाज धारातिर्थी पडल्यावर टाळ्या शिट्ट्य़ा अशा धमाल वातावरणात चौघांचाच, पण आठवणीत राहील असा कट्टा रात्री १२ च्या सुमारास आटोपला, आणि पुन्हा एकदा भेटण्याचं आश्वासन देऊन सगळे आपापल्या घराकडे मार्गस्थ झाले.
उपस्थित कट्टेकरी (डावीकडून) - प्रथम फ़डणीस, मुक्त विहारी, सुबोध खरे आणि निम.
प्रतिक्रिया
30 May 2013 - 10:20 am | प्रचेतस
छोटासाच पण मस्त वृत्तांत.
खादाडीचे फोटू न टाकल्यामुळे जळजळ झाली नाही.
बाकी त्याच दिवशी ठाणे आमरस पुरी कट्टा झाला का नाही ते कळले नाही. नसेल झाला तर ठाणेकरांना डोंबिवली बहुत लांब होते की काय?
बाकी डोंबिवलीकर स्पा का आले नाहीत म्हणे?
30 May 2013 - 10:28 am | नानबा
अहो,
हे कुणाचं वर्णन आहे वाटतंय तुम्हांला??
30 May 2013 - 10:42 am | प्रचेतस
=)) =)) =))
30 May 2013 - 12:52 pm | अत्रुप्त आत्मा
@हे कुणाचं वर्णन आहे वाटतंय तुम्हांला??>>> =)) =)) =))
अग्दि अग्दि बरोब्बर बसलाय दगड =))
30 May 2013 - 1:30 pm | मोदक
कोण हो बुवा..? कोण कोण..??
(निरागस) मोदक.
30 May 2013 - 10:30 am | सुहास झेले
किसन देव मोड ऑन "पुणेकरांना भारीच चौकश्या असतात...." किसन देव मोड ऑफ ;-) :-)
ह.घे.
30 May 2013 - 10:41 am | किसन शिंदे
तुला सांगतो सुझे, याला सांगितलं होतं आधीच. पण ऐकेल तो वल्ली कसला! :D
30 May 2013 - 10:44 am | सुहास झेले
=)) =)) =))
30 May 2013 - 10:46 am | प्रचेतस
काय सांगितलं होतं ब्वॉ??
30 May 2013 - 10:45 am | नानबा
ठाणे आमरस पुरी कट्टा आदल्या दिवशी होता. रामदास काका येणार म्हणून मीही तिकडे जायचे ठरवले होते.
आता ठाणेकरही अधूनमधून पुण्याच्या वाटेवर चालतात त्याला काय करणार?
:))
30 May 2013 - 10:54 am | गवि
झाला की नाही हे गुलदस्त्यातच.. !!??
30 May 2013 - 10:56 am | नानबा
नाही झाला. कुठं माशी शिंकली, की मांजर आडवं गेलं कुणास ठाऊक?
30 May 2013 - 12:48 pm | अत्रुप्त आत्मा
@की मांजर आडवं गेलं कुणास ठाऊक?>> :O मांजर आडवं जाणार? आणी ते ही तो ******चा हिरव्या डोळ्यांचा बोका असतांना? ;-) अशक्य ,केवळ अशक्य! =))
@******>> शब्द सौजन्या मा.अगोबा ;-)
30 May 2013 - 11:00 am | प्रचेतस
पण झाला का नाही?
ठाणेकर किसनदेव मात्र त्या रात्री ८.३० च्या सुमारास मामलेदार मिसळीच्या लायनीत उभे होते असे आमच्या खात्रीलायक व्हॉट्स अॅप सूत्रांकडून समजते.
लैच. =))
30 May 2013 - 12:12 pm | सूड
आता ठाणेकरही अधूनमधून पुण्याच्या वाटेवर चालतात त्याला काय करणार?
शेवटी एकारान्तच ना !! ;)
31 May 2013 - 8:54 am | धन्या
फक्त "ते" एकारान्त की "हे" सुद्धा?
31 May 2013 - 9:59 am | नानबा
:)) :))
31 May 2013 - 8:19 pm | सूड
आणि हे सदानकदा !! ;)
30 May 2013 - 1:40 pm | स्पा
वल्ली च्या काड्यांना शीळ फाट्यावर मारलेले आहे
चाट वर सगळी चौकशी करून पण, काहीच माहित नसल्याच्या आव आणण्याच्या वल्ली च्या स्वभावाचे आम्हास नेहमीच कौतुक वाटत आलेले आहे. असो उगाच नाही त्यांना कासम म्हणत :D
मुळात मी कट्ट्याला नसणार हे डोंबिवलीतील सर्वांना माहित होतं , म्हणून मी मुवि काका, प्रथम आणि निम आदल्याच दिवशी भेटलेले होतो. सो फक्त डॉक्टर सुबोध खरे फक्त मला भेटले नाहीत . पण पुढील वेळेस त्यांना नक्की भेटेन .
कट्टा छानच झाला . छोटेखानी वृतांत आवडला .
बदलापूर हून येताना मध्येच रात्री बाईक ने छोटासा घोळ केल्याने जरासं मनस्ताप झाला . असो
30 May 2013 - 1:50 pm | नानबा
बाईकचा घोळ?? काय आब्दा झाली बाईकची??
30 May 2013 - 1:54 pm | स्पा
रविवारी मुक्काम पोस्ट नाना !!!
लफरे झालेत बाला
30 May 2013 - 1:55 pm | नानबा
कं झालाव?? चाबिना त्या नानाच्या.. पोकल बांबूचे फटके मारू त्याला.
30 May 2013 - 2:02 pm | सूड
>>असो उगाच नाही त्यांना कासम म्हणत
वल्लीला कासम म्हणून तू त्याच्याबद्दल गैरसमज पसरवतोयेस बरं का!! ;)
30 May 2013 - 2:06 pm | मोदक
कोण आपला वल्ली..?? कासम..???
असेल बुवा.. :D
30 May 2013 - 2:13 pm | सूड
>>असेल बुवा..
असं नाही म्हणायचं. म्हटलं ना गैरसमज पसरतो. ;)
30 May 2013 - 2:15 pm | मोदक
अरे ते अत्रुप्त बुवांना उद्देशून नाहिये...
30 May 2013 - 3:51 pm | अत्रुप्त आत्मा
@अरे ते अत्रुप्त बुवांना उद्देशून नाहिये...>>> असू दे रे...! अस्ते एकेकाला सूड घ्यायची सवय ;)
30 May 2013 - 3:55 pm | अत्रुप्त आत्मा
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र......... सॉरी सॉरी हां... तो वरती छूपा हा शबुद र्हायला =))
30 May 2013 - 3:30 pm | भाते
नॉन व्हेज प्लैटर
नशीब आमच त्याचे फोटो टाकले नाहीत त्यापद्दल.
अगोदरच सविस्तर (संक्षिप्त!) वृत्तांत वाचून बरीच जळजळ झाली आहे.
30 May 2013 - 10:23 am | शिल्पा ब
छान.
बाकी आम्हाला वाटलं की सुबोध खरे आजोबा असतील म्हणुन...आता त्यांना सुबोध किंवा सुबोधभौ म्हणायला हरकत नै !! हरकतीवाल्यांनी आताच सांगा हो !
30 May 2013 - 10:28 am | किसन शिंदे
शिल्पा काकूशी सहमत! सुबोध सर त्यांच्या एकूण लिखानावरून,अनुभवावरून वयाने प्रौढ असतील असं वाटलं होतं पण या फोटोने ती सगळी शक्यता निकाली लागली. :)
30 May 2013 - 10:32 am | नानबा
वयाने प्रौढ नाहीत, पण त्यांचे अनुभव खूप सुंदर आहेत. आम्ही ऐकलेले अनुभव इकडे लिहीता न येण्यासारखे होते. पण मस्त.
30 May 2013 - 12:14 pm | वेताळ
आम्हा पुरुषाचा विभाग कधी चालु होणार? आम्हाला आमचे खाजगी विचार,अनुभव व कथा इथे मांडता येत नाहीत.
30 May 2013 - 12:51 pm | मी-सौरभ
वाट बघतोय
30 May 2013 - 7:57 pm | सूड
पण डॉ. खर्यांच्या चेहेर्यावर भूत पाह्यल्यासारखे एक्स्प्रेशन्स का आहेत फोटोत?
30 May 2013 - 10:47 am | पिलीयन रायडर
मलाही हेच्च वाटलं..!!
30 May 2013 - 10:26 am | सुहास झेले
मस्त... छोटेखानी कट्टा वृत्तांत आवडला. वल्ली म्हणतात तशी जळजळ झाली नाही ;-)
30 May 2013 - 10:53 am | महेश नामजोशि
माझा यायचा विचार होता पण २५ तारखेपासून माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी येऊ शकलो नाहि. आजच मी कामावर हजर झालो व मिपा बघत होतो. बघून आनंद झाला. बघू पुढच्या वेळी जमवु.
30 May 2013 - 10:55 am | नानबा
नक्की. पुढला कट्टा पावसाळी वातावरणात एखाद्या ढाब्यावर करायचा विचार आहे.
30 May 2013 - 11:14 am | मोदक
म्हण्जे..? तुम्ही मुंबईकर नियमीत भेटत नाही का..?
मी असे ऐकले आहे की काही पुणेकर आठवड्यातून / दोन आठवड्यातून एखादा कट्टा करतातच! नक्की माहिती / विदा नाही.
30 May 2013 - 8:39 pm | इनिगोय
म्हण्जे..? त्या कट्ट्यांना तुम्ही जात नाही का..? ;-)
31 May 2013 - 8:12 am | कवितानागेश
त्यांना कुणी कट्ट्याबद्दल सांगितलं तरच ते जातात! =))
31 May 2013 - 8:44 am | नानबा
अगं, ते पुणेकर आहेत. विशेष निमंत्रण दिल्याशिवाय स्वतःच्या लग्नालासुद्धा जात नाहीत म्हणे. :P
31 May 2013 - 10:59 am | गवि
मोदका, काडी उत्तम टाकलेलीस.. पण मुंबईकरांनी ती छस्स करुन विझवलेली आहे.
बाकी त्याचं असं आहे ना.. की मुंबई शहर आहे अफाट आकाराचं. मुंबईची मुलुंड भांडुप अशी दोन उपनगरे घेतली तरी पुणे (मूळ) शहराचा आकार होतो. त्यात कांजूर, विक्रोळी पवई, चांदिवली मिसळले तर पुण्याचा वाढीव आकारही कव्हर होतो.
मग होतं काय ना.. की वरचेवर भेटण्यासाठी आम्हाला दीर्घ प्रवास करावा लागतो.. त्याला वेळ नाही मिळत..
पुण्यात काय? फार फार तर शनिवारातून नारायणात नायतर लक्ष्मी ते टिळक यांमधे या टोकापासून त्या टोकापर्यंत गेलं की झाला प्रवास अन जमला कट्टा..
31 May 2013 - 11:34 am | प्रचेतस
ऑ.............
आम्ही चिंचवडला राहत असूनही कट्ट्यासाठी आठवड्यातून एकदा -दोनदा तब्बल साताठ कोसांवर असलेल्या पुण्यास जाणे होतेच की.
31 May 2013 - 11:41 am | गवि
मेल्या, पिंचिंकरांची मते फोडण्यासाठी मुद्दाम तुमचे गाव यातून वगळले होते तरी तू तिकडचाच ना..?!!
31 May 2013 - 11:46 am | प्रचेतस
अगदी.
अहो मावळतीकडे कर्जतपासून पुढे हुंबै तर उगवतीकडे लोणावळ्यापासून पुढे पुणंच.
31 May 2013 - 12:25 pm | अत्रुप्त आत्मा
@तर उगवतीकडे लोणावळ्यापासून पुढे पुणंच.>>> दे मारा!!! ढिश्क्यॅंव... ढिश्क्यॅंव... =))
31 May 2013 - 11:58 am | मोदक
+११११
आणि आम्ही पुणेकर... चिंचवड, थेरगांव, बर्डव्हॅली, ट्रान्स्पोर्टनगर, तळेगांव व खेडशिवापूर (हे योजनेमध्ये आहे)येथे आठवड्यातून / दोन आठवड्यातून होणार्या कट्ट्याला जातोच जातो.
विमेकाकांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. ;-)
31 May 2013 - 1:23 pm | भाते
आठवड्यातून / दोन आठवड्यातून होणार्या पुण्याच्या कट्ट्याचा वृत्तांत कधी वाचल्याचे आठवत नाही. किमान डोंबिवलीकर मिपाकरांनी माहिती देण्याचे सौजन्य तरी दाखवले हे ही नसे थोडके.
31 May 2013 - 2:07 pm | सूड
काय समजलांत !! आम्ही नेहमीच भेटतो, त्याचा वृत्तांत असा काय लिहायचां? इकडल्या कट्ट्यांचे वृत्तांत लिहायला सुरुवात केली तर अन्न हे पूर्णब्रह्म सारखं एक वेगळं सदर सुरु करावं लागेल.
31 May 2013 - 2:08 pm | सूड
अर्थात विमेकाकांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत !! ;)
31 May 2013 - 2:13 pm | गवि
आली का या सातवाहनाची सगळी गँग लगेच ??? आता ठामपावाले, बृमुंमनपावाले,मिभामनपावाले, कडोंमपावाले, विवमनपावाले इत्यादिना जमवणे आले..
31 May 2013 - 2:23 pm | बॅटमॅन
ते अनुस्वाराचं नीट जमलंय ना पहावं म्हटलं एकदा, उगीच नंतर डॉक्शाला ताप नको ;)
बाकी सातवाहन शब्दाची व्युत्पत्ती "(जिसके) साथ वाहन (लेके बाहेर पडते हैं ऐसा वो)" अशी आहे हेवेसांनल ;)
1 Jun 2013 - 2:19 am | विश्वनाथ मेहेंदळे
सध्या आयुष्यात करण्यासारखे बरेच काही असल्याने या वादात पडण्याची इच्छा नाही.
अवांतर :- उगाच कुणाला फुकट*टपणा करून काड्या सारायची सुरसुरी आली असेल तर येऊ देत. लक्ष द्यायला तूर्तास टैम नाही आहे.
अतिअवांतर :- हल्ली स्पष्ट बोलायचे ठरवले आहे. पोलिटिकल करेक्टनेस लारजेवर पाठवले आहे.
31 May 2013 - 2:13 pm | बॅटमॅन
हा हा हा अगदी अगदी :D
30 May 2013 - 11:48 am | सुबोध खरे
खरं तर कट्टा अजूनही बराच वेळ चालला असता पण मला बाराची शेवटची गाडी गाठायची होती त्यामुळे आवरते घ्यायला लागले.
समोर मोठ्या पडद्यावर चाललेला सामना मुंबई इंडियन जिंकत होते. टेबलावर उत्तम नॉन व्हेज प्लैटर आणि उजवीकडे गझलचा लाईव्ह कार्यक्रम. वेळ कसा गेला ते कळलेच नाही. त्यातून मुक्त विहारींचा आग्रह म्हणजे सोने पे सुहागा. ( बिल सुद्धा त्यांनीच दिले मी म्हणे डोंबिवलीचा पाहुणा होतो).
एखाद्या चविष्ट सुग्रास जेवणानंतर तोंड गोड करायला केशरी पेढा खाल्ल्यावर केशराची चव कशी जिभेवर रेंगाळावी तसे वाटले.
30 May 2013 - 9:02 pm | चौकटराजा
मी डोंबिवलीचा जावई असल्याने मुवि मला १०० टक्के वर्गणीत सूट देणार होते. ( जावयाचं काही घेउ नये असं आमचे श्वशुरही म्हणायचे) पण मुविनी सिक्सरच मारलेला दिसतोय ! वा वा धन्य ते डोंबोलीकर !!
30 May 2013 - 11:53 am | ऋषिकेश
आता पुढच्या डोंबिवली कट्ट्याला बरेच 'पाहुणे' जमणार तर! ;)
30 May 2013 - 11:58 am | अमोल खरे
>>आता पुढच्या डोंबिवली कट्ट्याला बरेच 'पाहुणे' जमणार तर!
जे कोणी मिपाकर येणार असतील त्यांच्या जाण्या येण्याचा खर्च (बोरिवलीपासुन डोंबिवलीपर्यंत मेरु एसी टॅक्सी) स्पा करणार आहे असं स्पाच मला म्हणाला आणि हे ऐकल्यावर माझ्या मनात लगेच स्पा आणि मुविंबद्दल अभिमान दाटुन आला. पुढील डोंबिवली कट्ट्याला आमची नक्की हजेरी.
30 May 2013 - 12:40 pm | सुबोध खरे
आमची कोणत्याही कट्ट्याला स्वखर्चाने यायची तयारी आहे (बिल परस्पर भरले जाणार असेल तर).
आर्मीत म्हणतात ना
eat and sleep whenever you can
and work if you have to.
30 May 2013 - 1:52 pm | नानबा
चला, म्हणजे पुढच्या कट्ट्यालासुद्धा स्पावड्याच्या बाईकचा घोळ होणार तर.. :)) :))
30 May 2013 - 2:07 pm | मोदक
माझ्या दाताची ट्रीटमेंट होती रे.. नाहीतर आलो असतो. ;-)
(जाणकारांना लगेचच कळेल.)
30 May 2013 - 2:35 pm | इरसाल
पोहे खावुन खावुन दात कणले काय तुझे ?;)
30 May 2013 - 9:06 pm | चौकटराजा
या वेळी कुणावर दात खाउन होतात मो भा ???
की दाती तृण धरले होते ??
31 May 2013 - 10:09 pm | मोदक
इरसालबुवा आणि चौरा - अभ्यास वाढवा! ;-)
"माझी दाताची ट्रीटमेंट आहे" हा मी आणि सूडने मिपामराठीला बहाल केलेला वाक्प्रचार आहे!
तुम्हाला दर्द-ऐ-दात माहिती नाही..? (अरे ये PSPO नहीं जानता!!!!!) :-D
30 May 2013 - 12:38 pm | प्रभाकर पेठकर
अरे व्वा..! मिपा सदस्यांची भेट आणि मुंबई इंडियन्सचा विजय.... खास उत्सवी वातावरण. नशिबवान आहात. अभिनंदन.
30 May 2013 - 1:00 pm | अत्रुप्त आत्मा
हाटिलातल्या माहौलच्या वर्णनानी परचंड जळजळ झाली आहे.
30 May 2013 - 1:23 pm | ब़जरबट्टू
आव... तुमचा आत्मा कसा त्रुप्त हुनार ?
आम्हाला डावी - उजवी बाजू समजतच नाय... केशोवर्तनावरून ओळख करुन देता काय ? म्हंजी ते लय सोप्प्प दिसतया… टोकदार मिशीवाले हे, बिनामिशीचे ते असं :)
30 May 2013 - 2:26 pm | अत्रुप्त आत्मा
@आम्हाला डावी - उजवी बाजू समजतच नाय... केशोवर्तनावरून ओळख करुन देता काय ? म्हंजी ते लय सोप्प्प दिसतया… टोकदार मिशीवाले हे, बिनामिशीचे ते असं >>> आपनास आम्चा फोटू बघायचा हाय काय? ;)
30 May 2013 - 2:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कट्टा वृत्तांत आवडला. डॉ.सुबोध खरे यांनाही कट्ट्यावर पाहतांना आनंद वाटला.
मनातल्या मनात : हल्ली कोणत्याही धाग्यावर मूळ विषयावरील प्रतिसादांपेक्षा अवांतर उपप्रतिसाद फारच पडायला लागलेत वाटतं. असो, चालायचंच.
-दिलीप बिरुटे
30 May 2013 - 2:29 pm | गवि
कट्टावृत्तांताने आनंद झाला.
फक्त ... एकीकडे मॅच आणि तिथेच दुसरीकडे गझलचा लाईव्ह कार्यक्रम ही अरेंजमेंट फार विचित्र वाटली.
कोणीतरी हॉटेलात पैसा कमावण्यासाठी का होईना, गातोय आणि तिथेच लोक मॅचकडे प्रसंगोपात्त लक्ष लावून बसले आहेत याने एक ओळ गावी आणि तिकडे सिक्सर बसावा, की लोक याला दाद द्यायची सोडून मधेच तिकडे चियर करणार असं??
एकवेळ खाता पिता लाईव्ह गझल (कला) ऐकणं आता अॅक्सेप्ट केलं आहे पण त्यातही एकावेळी दोन ऑप्शन्स?
30 May 2013 - 7:35 pm | सुबोध खरे
अहो दोन काय तीन ऑप्शन होते. एकीकडे मैच होती ती म्युट मध्ये होती आणी त्यासमोर फक्त क्रिकेट प्रेमी होते. मुक्त विहारिनी जागा पण अशी मोक्याची पकडली होती कि आम्हाला समोर मैच दिसत होती. उजवीकडे गझल पाहता आणी ऐकता येत होते. समोर नॉन व्हेज प्लैटर होता. (आणी पिणेकरांची पिण्याची सोय होती.)
30 May 2013 - 3:11 pm | मदनबाण
छोटेखानी कट्टा संपन्न झाला हे पाहुन आनंद झाला. :)
30 May 2013 - 3:24 pm | प्यारे१
छोटेखानी कट्टा छानच झालेला दिसतोय.
अवांतरः कुठल्याही अधिवेशनाला एखाद्या पक्षाच्या वळचणीला लागण्याच्या नुसत्या शक्यतेच्या भीतीनेदेखील अधिवेशनाला जाणारांची गर्दी कमी होतेच. ;)
30 May 2013 - 5:01 pm | तर्री
गर्दी नसली तरी दर्दी होते.....वा !
30 May 2013 - 7:20 pm | तिमा
छान झालेला दिसतोय कट्टा. वर्णन वाचून डॉ.खर्यांना भेटण्याची इच्छा तीव्र झाली. पुढच्या वेळेस.
30 May 2013 - 8:18 pm | श्रीरंग_जोशी
बर्याच दिवसांनी मिपाकरांच्या कट्ट्याचा वृत्तांत वाचायला मिळाला.
उपस्थितांची संख्या नेहमीपेक्षा कमी असली तरी कट्टा जोरदार झालेला दिसतोय.
यशस्वी आयोजनाबद्दल संबंधीतांचे अभिनंदन.
डॉक्टर साहेबांना फोटोत प्रथमच बघून कल्पनेपेक्षा प्रत्यक्षातले व्यक्तिमत्व खूपच वेगळे निघाल्याचा धक्का बसला. ते डॉक्टर आहेत हे ठाऊक नसतं तर त्यांचा फोटो पाहून ते (डॉक्टर नसलेले) लष्करी अधिकारीच वाटले असते :-).
बाकी मुविं यांचे मुलांच्या शेतीचे प्रयोग चांगलेच यशस्वी झाले असले तरी कर्मधर्मसंयोगाने डोक्यावरील केसांची शेती थांबून अनेक वर्षे झाले असल्याचे दिसत आहे ;-).
30 May 2013 - 8:28 pm | सुबोध खरे
मित्रहो
मला स्वतः ला असे वाटते आहे कि माझे कौतुक जर जास्तच होत आहे. कदाचित नवा सदस्य असल्याने असेल पण एक तर तेवढी माझी लायकी नाही आणि मला असे वाटत नाही कि कोणाचे ही व्यक्तीगत रित्या एवढे कौतुक करावे.कोणीही सदस्य मूळ संस्था किंवा समूहापेक्षा मोठा नसतो आणि नसावा.
मी आपला आभारी आहे.
30 May 2013 - 9:24 pm | कोमल
सुबोधजी मिपा वर कित्येक नव्या सदस्यांच रॅगिंग कसं कसं घेतलं जातं माहीत आहे ना.. तुम्ही खरचं तुमच्या क्षेत्रातील जाणकार आहात, तुमचे लिखाण, तुमचे अनुभव सगळ्यांनाच आवडतात.. आणि अशांच मिपाकर दिल खोलून कवतिक करतात.. :)
31 May 2013 - 1:28 pm | भाते
सुबोधजी, लष्करी अधिकाऱ्यापद्धल नेहमीच भितीयुक्त आदर वाटत आला आहे. आपण कदाचित या प्रतिक्रियांना आपले कौतुक म्हणत असाल. पुढल्या कट्टयावर आपणास भेटण्यास नक्किच उत्सुक आहे.
30 May 2013 - 9:29 pm | किलमाऊस्की
छान छान!! कट्टा वृत्तांत आवडला. सुबोध खरे यांना पाहतांना आनंद वाटला. मुवी तुम्ही चेपुवरच्या फोटोपेक्षा इथे वेगळे दिसताय. पुढच्या वेळेस डोंबिवलीत कट्टा झाल्यास नक्कीच येईन. :-)
30 May 2013 - 9:31 pm | नानबा
वा... पुढल्या कट्ट्याला येण्यास पसंती दाखवणार्यांची संख्या वाढतेय पाहून आनंद झाला.. :)
31 May 2013 - 10:09 am | ५० फक्त
नंदी पॅलेसच्या फार जुन्या आठवणी आहेत, आणि त्या पुन्हा उजळाव्या अशा नाहीत हे खरं कारण न येण्याचं, आणि हो कट्टा जरा कौटुंबिक झाला असे प्रतिसाद आले असते ते वेगळेच.
असो, पुढच्या कट्ट्याला हजर राहण्यात येईल.
31 May 2013 - 10:41 am | नानबा
ब्वॉरं... तसाही पुढला कट्टा पावसाळ्यात असल्याने शक्यतो कुठेतरी भटकंतीच्या ठिकाणीच ठरवू म्हंजे कसं??
1 Jun 2013 - 2:05 am | विश्वनाथ मेहेंदळे
कट्टा झकास झालेला दिसतो. हा कट्टा मला जमणे कठीण होते. असो, पुढील कट्ट्याला भेट होईलच.
अवांतर :- जुन्या कट्टे आयोजकांना मरगळ आली असताना नवीन कट्टे आयोजक तयार होत आहेत हे बघून आनंद झाला :-)