चिमणं गोष्टी

स्वाती फडणीस's picture
स्वाती फडणीस in जे न देखे रवी...
11 Jul 2008 - 11:53 am

चिमणं गोष्टी
.

चिमणे चिमणे रडू नको!
आईचा पदर ओढू नको!
सोपवते तुज बाईंच्या हाती,
शाळेला कधी टाळू नको!!!

चिमणे चिमणे झालीस मोठी,
पंख पसरून उडण्या साठी..
भरारी घेताना भिऊ नको!
उंच उंच जाण सोडू नको!!!

चिमणे चिमणे रडू नको!
सुटले घरटे समजू नको!
संसारी केली तुझी पाठवणी,
कमी स्वत:स लेखू नको!!!

चिमणे चिमणे झालीस मोठी!
टिपशील दाणे बाळा साठी!
शेवटची गं ही बाळे पाठवणी,
आता चिमणू राहू नको!!!

चिमणे चिमणे झालीस मोठी,
चिमणं गोष्टी विसरू नको!
चिमणे चिमणे रडू नको,
चिव-चिव करण सोडू नको!!!

=============================
स्वाती फडणीस........ २००-०६-२००८

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

11 Jul 2008 - 12:38 pm | आनंदयात्री

बडबडगीत छान लिहलय स्वातीताई !

मनस्वी's picture

11 Jul 2008 - 12:56 pm | मनस्वी

मस्त लिहिलंय स्वातीताई.

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

धनंजय's picture

11 Jul 2008 - 7:49 pm | धनंजय

मस्तच

चतुरंग's picture

11 Jul 2008 - 7:52 pm | चतुरंग

चतुरंग

चित्रा's picture

15 Jul 2008 - 11:33 pm | चित्रा

म्हणायला सोपी कविता. आवडली.

यशोधरा's picture

11 Jul 2008 - 1:02 pm | यशोधरा

खूप सुंदर लिहिलय...

स्वाती फडणीस's picture

11 Jul 2008 - 3:34 pm | स्वाती फडणीस

:) आभार

विसोबा खेचर's picture

11 Jul 2008 - 4:13 pm | विसोबा खेचर

चिमणे चिमणे झालीस मोठी,
पंख पसरून उडण्या साठी..
भरारी घेताना भिऊ नको!
उंच उंच जाण सोडू नको!!!

वा! या ओळी अतिशय सुरेख....!

तात्या.

स्वाती फडणीस's picture

11 Jul 2008 - 6:58 pm | स्वाती फडणीस

:)

मदनबाण's picture

11 Jul 2008 - 7:31 pm | मदनबाण

व्वा,,छान !!!

मनदबाण.....

अभिज्ञ's picture

11 Jul 2008 - 7:51 pm | अभिज्ञ

+१
खुपच छान.

अभिज्ञ.

स्वाती फडणीस's picture

11 Jul 2008 - 10:53 pm | स्वाती फडणीस

:)

प्राजु's picture

12 Jul 2008 - 2:43 am | प्राजु

मला माझ्या आईची आठवण झाली. याच अर्थाची कविता तीने माझ्या लग्नाच्या वेळी लिहिली होती.. आवडली कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती फडणीस's picture

12 Jul 2008 - 11:28 am | स्वाती फडणीस

:)