.....वाहवा.....

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
16 May 2013 - 11:55 am

मी तुझ्या डोळ्यात काही पाहिले होते
बहुधा भास ते माझ्या मनातले होते

कितीदा मी स्वतःलाच समजावतो
फायदे मिळाले ते तहातले होते

फुलवायचे तुला जे चार भिंतीत होते
स्वच्छंद ते फुल रानातले होते

विचारे का हसलो तिला एकटे पाहून मी
सुख ती दुस-या कुणाची नसण्यातले होते

मिळविली वाहवा माझिया गज़लांनी
खरे ते दुःख काही उरातले होते

मराठी गझलगझल

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 May 2013 - 12:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिळविली वाहवा माझिया गज़लांनी
खरे ते दुःख काही उरातले होते

छान. अजून येऊ द्या.

-दिलीप अबिरुटे

सुधीर's picture

16 May 2013 - 1:49 pm | सुधीर

बहोत खूब!

विसोबा खेचर's picture

16 May 2013 - 2:45 pm | विसोबा खेचर

वा..!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 May 2013 - 5:28 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

फुलवायचे तुला जे चार भिंतीत होते
स्वच्छंद ते फुल रानातले होते

सुरेख रचना. आवडली.

Bhagwanta Wayal's picture

17 May 2013 - 11:44 am | Bhagwanta Wayal

उत्तम रचना....

अत्रुप्त आत्मा's picture

17 May 2013 - 11:49 am | अत्रुप्त आत्मा

नवनविन रचना कराव्या..."अश्या!"
वा हवा ते चित्र मनातले होते. ;-)

पैसा's picture

18 May 2013 - 12:59 pm | पैसा

छान रचना!

सस्नेह's picture

18 May 2013 - 4:57 pm | सस्नेह

सुख ती दुस-या कुणाची नसण्यातले होते

...पटलं...!

मदनबाण's picture

19 May 2013 - 6:58 pm | मदनबाण

सुरेख...