रामदास कोण? ह्या प्रश्न हा माणूस मिपावर लिहिता झाल्या पासून आम्हाला सतावत होता.. हा माणूस विविध विषयांवर इतके सुरेख कसे काय लिहितो त्यालाच माहित..अहो.. सुंदर, अप्रतिम, वा क्या बात है वगेरे किती म्हणायचे ते!! शब्दच नाहीत हेच खरं.. तर अशा ह्या रामदास शेठचा ज्याचा त्याचा चंद्र. या लेखाला तात्या आर्मस्ट्राँमनी देलेला प्रतिसाद वाचला आणि आम्हाला खोडी काढायची दुर्बुध्दी झाली..म्हणून आम्ही सहज विचारले हा रामदास कोण आहे ? हा कविता करतो का? हा प्रतिसाद वाचून आमचे परमस्नेही जालसर्वज्ञ सर्किटशेठ ने तत्परतेने रामदासशेठच्या अप्रतिम कवितांची लिंक दिली..(कोण म्हणाले रे 'माकडाच्या हाती कोलीत') त्यानंतर आम्ही जे तारे तोडले तेच हे "केश्या" मेल्याचे तारे वाचून बघा. आणखी वाढवा.थोडसं हलकं फुलकं लिहीण्याचा प्रयत्न केला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------केश्या स्वगत
मेल्या "केश्या"च्या
मनात
पाप विडंबाचं
कपटी.
कोवळी कविता
बेचिराख.
पहिल्या प्रकाशनात.
------------------------------------------------------------------------------------------------सर्किट केश्याला
तुम नही सुधरोगे :-)
वाटलंच होतं.
पण पूर्ण १८ मिनिटे घेतलीत शेठ !
- (कालमापक) सर्किट
------------------------------------------------------------------------------------------------पहाटे १वाजता केश्या आणि सर्किट
'सर्किट' पहाटे
अचानक तडमडला
घड्याळ लाऊनगेला.
"केश्या"मेल्या वर
भार .
प्रतिसादाचा.
कोवळ्या सोवळ्या
'रामदासा'च्या कवितेला,
उभंलावणं
भरभर उगाचच.
=============================================================
शिवण तोंडावर
उसवली जरा
बघून बाय म्हणते.
छोटी झाली हाय माझी.
आता जाता बाजारात
ऐतवारच्या
घालू कशी नि काय.
------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
11 Jul 2008 - 7:00 am | रामदास
घरात हसरे तारे असताना मी पाहू कशाला नभाकडे.
11 Jul 2008 - 10:11 am | बेसनलाडू
विडंबनापेक्षा हा जास्त आवडला. म्हणजे विडंबन आवडले नाही असे नाही :)
(आस्वादक)बेसनलाडू
11 Jul 2008 - 1:19 pm | केशवसुमार
वा रामदासशेठ,
जबरा प्रतिसाद.. मान गये.. :))
(आभारी)केशवसुमार
(स्वगतः हा माणूस नक्की पेठेतला आहे :W काय हणलाय शाल जोडीत @) )
11 Jul 2008 - 5:32 pm | चतुरंग
विडंबन आणि प्रतिसाद असे हे जबराट कॉम्बिनेशन माझ्या डोळ्यांसमोर तारे चमकवून गेलं! ;)
(स्वगत -केशा आणि रामदास ओळख झालीय, काही खरं नाही आता रामदास लेख लिहायचं सोडून विडंबनं करायला लागतील की काय? :? :S )
चतुरंग
11 Jul 2008 - 7:05 am | सहज
ये हुई ना बात!!
केसु अव्वल नंबर!!
७ दिस २४ तास
केसुच्या मनात
विडंबाचाच ध्यास
11 Jul 2008 - 9:58 am | ऋषिकेश
वा केशवसुमार :)
खुप आवडले :)))))
बाकी सहजरावांचं
हे अगदी पटलं
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
11 Jul 2008 - 8:34 pm | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व लोकांचे मनापासून आभार..
(आभारी)केशवसुमार
स्वगत१ प्रतिसाद न देणार्यांचे आभार मानायला लागल्यापसून ह्या लोकांची संख्या हल्ली वाढलीय :W
स्वगत२ चल काहितरीच काय.. लेका तुला लोक कंटाळले आहेत आता तरी बंद कर तुझा फाजील पणा X(
12 Jul 2008 - 12:05 am | विसोबा खेचर
केश्याच्या अलौकिक प्रतिभेमुळे आज हा एक वेगळाच विडंबनात्मक, थट्टात्मक साहित्यप्रकार वाचायला मिळाला! :)
केश्या, फोकलिच्या तू काही सुधारायचा नाहीस! :)
असो, अभ्यंकर खानदानाचा विजय असो...
आपला,
(केश्याचा आडनावबंधु) तात्या अभ्यंकर.