मी लहानपणी दूरदर्शनवर रंगोली नेमाने बघायचो. तेव्हा केबल TV हा प्रकार अस्तित्वात नव्हता. नंतर तो कार्यक्रम रटाळ व्हायला लागला (छायागीत आणि चित्रगीत प्रमाणेच). आणि दरम्यान केबल TV चे आगमन झाले. केबलचे आगमन झाल्यावर रविवारचे रंगोली पूर्णपणे सुटले..
(एक अरसे बाद ) ऐन (गद्धे) पंचविशीत माझ्या आयुष्यात एक मुलगी आली. गर्लफ्रेंड का काय म्हणतात तशी. त्यांच्या घरी केबल नव्हते. ती रंगोली नेमाने बघायची आणि तिचा तो favorite कार्यक्रम होता. (तोवर गुणवत्ता परत सुधारली होती कार्यक्रमाची - चांगली गाणी, आपकी फर्माईष,वैगेरे). तिच्या नादाने मी रंगोली परत बघायला लागलो. एकदा योगायोगाने रविवारी सकाळी तिच्या घरी गेलो (तिच्या घरचे पण आमच्या चांगल्या परिचयाचे होते) तर ती एकटीच घरी, मग काय.. कार्यक्रमाची मजा द्विगुणीत झाली..
(और एक आरसे बाद).. आता ती मुलगी माझ्या आयुष्यात नाही पण रंगोली (हो हो - दूरदर्शनवरचे रंगोली ) नित्त्य नेमाने बघतो. झोपेत असलो तरी LCD समोर येउन पसरतो पण कार्यक्रम miss करत नाही. असे करून जुन्या गोड आठवणीना उजाळा देण्याचा माझ्या बापड्या मनाचा प्रयत्न असतो कि काय कुणास ठाऊक..
प्रतिक्रिया
12 May 2013 - 11:02 am | विसोबा खेचर
छान रे सचिनमामा...:-)
12 May 2013 - 11:07 am | इनिगोय
हे विडंबन आहे असं का वाटतंय..?
12 May 2013 - 1:07 pm | प्यारे१
+१.
मूळ 'पुडी' आकर्षक वेष्टनात होती. ही वर्तमानपत्राच्या कागदात आहे.
रव्वारी सक्काळी सक्काळी रंगोलीच्या वेळेत रंगीला रे....!
खिक्क्क!
12 May 2013 - 11:26 am | ज्ञानोबाचे पैजार
त्या रविवारी काय घडले असावे याची स्पष्ट कल्पना या वाक्यांमधुन येते आहे.
12 May 2013 - 12:43 pm | संजय क्षीरसागर
मला वाटतं `तर ती एकटीच घरी, मग काय.. कार्यक्रमाची मजा द्विगुणीत झाली..' यात काही तरी मर्म आहे.
कार्यक्रमाची मजा नक्की कशी द्विगुणित झाली ? दोघांनी एकत्र बघीतल्यामुळे की एकावर दुसरा फ्री मिळाल्यामुळे?
12 May 2013 - 1:11 pm | सचिन कुलकर्णी
तात्या - धन्यवाद. आपल्या सारख्यांच्या प्रोत्साहनामुळे आमच्यासारख्या नवलेखकुंचा उत्साह वाढतो.
इनिगोयजी - हे असलेच तर आमच्या जीवनाचे विडंबन आहे. ;)
पैजारबुवा,संजयजी - प्रेम होते हो ते..
12 May 2013 - 1:26 pm | सचिन कुलकर्णी
हे मुक्तक पूर्णपणे माझे आहे/कशाचेही विडंबन नाही. तुमची ती मूळ पुडी दाखवा. (विडंबना च्या प्रतिक्रियेसाठी तुम्ही +१ केलेय, म्हणून विचारतोय).
12 May 2013 - 1:31 pm | प्यारे१
खरड केली आहे.
12 May 2013 - 1:37 pm | सचिन कुलकर्णी
धन्यवाद. पण माझ्या लेखातील अनुभव हा स्वानुभवच आहे. आणि त्या लेखाची आमच्या लेखाला अजिबात सर नाही हो. आमच्या प्रतिभेची मर्यादा,दुसरे काय ?
12 May 2013 - 1:40 pm | प्यारे१
असो.
आम्हाला प्रतिभा मर्यादितच आवडते. :)
12 May 2013 - 1:45 pm | सचिन कुलकर्णी
मला वाटले म्याटर वाढते का काय. ;) पण आपण सुज्ञ आहात, सो परत एकदा मनापासून आभार. __/\__
12 May 2013 - 1:49 pm | प्यारे१
>>>पण आपण सुज्ञ आहात
१. बस कर. बस कर. अब रुलाएगा क्या?
२. ह्या ह्या ह्या. आता दुसरा जोक.
३. ऑ? आता मॅटर वाढवायलाच हवं.