कंहाभारत आणि सरकार राज

अनामिक's picture
अनामिक in जनातलं, मनातलं
9 Jul 2008 - 7:46 pm

मी मिसळपाववर नवा आहे आणि थोडाफार लिहायचा प्रयत्न करणार आहे. काही चुका झाल्या तर निदर्शनास आणून देऊन योग्य मार्गदर्शन करावे.

काल देवदत्त यांनी लिहिलेला पौराणिक कथांवरील लेख वाचला आणि youtube वर नव्याने सुरू झालेलं महाभारत (की कंहाभारत म्हणावं? ) पाहिलं. या मालिकेच्या दिग्दर्शकानं सरकार राजच्या रामूकडून ट्रेनिंग घेतलेलं दिसतंय. तसेच शिवाजी नागरे हे दररोज नवी लुंगी वापरत असल्याने त्यांच्या वापरलेल्या काळ्या लुंग्यांपासून कंहाभारतातल्या सगळ्याच पात्रांचे कपडे बनवलेत असा माझा ठाम विश्वास आहे. सगळ्यांना काळे कपडे घालायला लावण्यामागे दुसरे काही कारण असू शकते असं मला वाटत नाही. सरकारराज चा दुसरा प्रभाव म्हणजे मालिकाभर पसरलेला अंधार अन वेगवेगळ्या angles मधून दाखवलेले न दिसणारे पात्रांचे चेहरे. मालिका बघताना घरातले दिवे लावण्याची प्रेक्षकांनी दक्षता घ्यावी. तसेच "गोविंदा गोविंदा" नाही पण तसेच काहीसे कोरस मधले कर्कश पार्श्वसंगीत म्हणून वापरले आहे. द्रौपदीच्या भूमिकेतील नटी अभिनयाच्या नावाखाली नुसती चिरकत/किंचाळत होती. आणि बाकी सगळ्यांचा अभिनयसुद्धा अगदीच सुमार. तुम्ही पहिली का हि मालिका, तुम्हाला बघून असेच काही वाटले का?

चित्रपटविचार

प्रतिक्रिया

राधा's picture

10 Jul 2008 - 7:51 pm | राधा

youtube वरच महाभारत मी पण बघीतल......... आजकालच्या सास्-बहु सिरीअल सारख direct केल गेल आहे........ पुर्वीच्या महाभारताची १% पण गोडी त्यात नाही...... सहमत आहे मी तुमच्या मताशी..........

प्राजु's picture

10 Jul 2008 - 8:14 pm | प्राजु

अनामिक ,
अरे तुझं हे परिक्षण वाचून.. ती मालिका नक्की काय असेल याची कल्पना येते.
सरकारराज चा दुसरा प्रभाव म्हणजे मालिकाभर पसरलेला अंधार अन वेगवेगळ्या angles मधून दाखवलेले न दिसणारे पात्रांचे चेहरे.
हे आवडलं. ;)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/