महाराष्ट्रातल्या एका पुढाऱ्याने असे फर्मान काढले कि .महाराष्टात राहीचे असेल तर फक्त मराठीतच बोला ,लिहा ,इंग्रजी,हिंदी,
किंवा इतर भाषांचा प्रयोग चालणार नाही ,जो असे करणार नाही त्यास कडक शिक्षा दिली जाईल .
फक्त मराठी चे फर्मान निघताच अनेकांचे धाबे दणाणले ,पुष्कर टेलर्स असे नाव लिहिलेली पाटी पुश हा इंग्रजी शब्द असल्याने
ढकलकर शिंपी अशी पाटी दिसू लागली ,दिनकर ,दिवसकर झाला ,गोकुळ चे जाकूळ झाले,ऐअरटेल चा फलक वायू गोष्ट असा
दिसू लागला ,कोलगेट टूथ पावडर ,कोळसा दरवाजा दंत पूड झाले,एका दुकानदारां कडे एक मुलगा काकाचक्त्या मागू लागला .
दुकानदारास काहीच समजले नाही,मुलाने बोट दाखवले तेथे अंकल चिप्स ठेवलेल्या होत्या.एका मुलाने गम्मतच केली मदर टेरेसा
ला मदर टरेस आ म्हणून चक्क आई गच्ची वर ये असे भाषांतर केले .शाळा ,कॉलेज सर्व ठिकाणी इंग्रजी,हिंदी चे मराठी शब्द
करण्या चे खेळ खेळले जाऊ लागले,कोणी क्रोसीन ह्या तापाच्या औषधाचे कावळा पहिला असे भाषांतर केले,शार्पनर म्हणजे हुशार
पुरुष ,सेमिनार म्हणजे हिजडा अशी गंमत होऊ लागली,कोण काय म्हणतोय कोणते दुकान कशाचे आहे कळेनासे झाले ,लोकांची
नावे बदलली राज ठाकरेंना राज हा हिंदी शब्द असल्याने लोक त्यांना रहस्य ठाकरे म्हणू लागले.
सर्वत्र हाहाकार माजला पुढाऱ्याला आपली चूक लक्षात आली ,तो म्हणू लागला ज्याला जसे बोलायचे.लिहायचे असेल तसे करा
फक्त महाराष्टाचा मान राखा .
प्रतिक्रिया
27 Mar 2013 - 11:51 am | पैसा
पण अजून जरा जास्त नमुने लिहायचे होते!
27 Mar 2013 - 2:36 pm | तुमचा अभिषेक
असेच म्हणतो..
27 Mar 2013 - 2:16 pm | नगरीनिरंजन
ही गोष्ट ऐकलेली आहे.
पुढार्याचा निर्णय ऐकून 'हवापुच्छ' आस्थापनेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्याची हवा तट्ट झाली होती असे कळते.
अ व ट कल्पना आस्थापनेच्या मु.का.अ. ने हा निर्णय ऐकताच "काय ही कल्पना, गुरुजी" असा चक्रनाद त्याच्या डोक्यात होऊ लागला म्हणे.
महाराष्ट्राचे नाव लावणार्या एका कोषागाराच्या मुख्य व्यवस्थापकांनी आपल्या कोषागाराला महाराष्ट्र किनारा म्हणावे असा फतवा काढला पण त्यांच्या मदतनीसाचे इंग्रजी व मराठी दोन्ही चांगले असल्याने ते नाव बदलून महाराष्ट्र कोषागार असे करण्यात आले.
आपल्या इंग्रजी मालकाचे आडनाव लावणार्या एका शीघ्रान्न आस्थापनीचे तर धाबेच दणाणले. त्यांनी झटपट निर्णय घेऊन "मगदुम-लाड शीघ्रान्न केंद्र" अशा पाट्या लावून टाकल्या. शिवाय "आमचे येथे शाकाहारी मांसाहारी गरमागरम भरले पाव, बटाट्याचा कीस व कर्बसरबत असलेला नियतबेत मिळेल" अशीही पाटी लावून टाकली.
तिकडे एका पुस्तकाच्या दुकानात दुकानाचे नाव 'शब्दकोडी' ठेवावे की 'फुलीशब्द' ठेवावे यावर बराच खल झाला. शेवटी जरा भारदस्त वाटते म्हणून एका कारकुनाने सुचवलेले 'शब्दोल्लंघन' हे नाव नक्की करण्यात आले.
एका महादुकानाच्या व्यवस्थापकाने घाईघाईत दुकानाचे नाव बदलून 'ग्राहकथांबा' असे केल्याबद्दल आपल्या वरचढ्याची बोलणी खाल्ली आणि मग पुन्हा एकवार बदलून 'ग्राहकांचा मुक्काम' असे केले. दरम्यान दुसर्या एका महादुकानाच्या व्यवस्थापनाने 'केंद्रीय' असे नाव घेऊन टाकले.
एका चिनी खाद्यपदार्थ विकणार्या उपाहारगृहाने 'मुख्यभूमी चीन खानावळ' असे नाव घेतले तर इटलीचे पदार्थ विकणार्या उपाहारगृहाने 'गोग्गोड जीवन खानावळ' असे नाव घेतले.
हे सगळे चालू असताना, आपल्या पायाशी येऊन लोळण घेण्याऐवजी,आपल्याला पैसे देण्याऐवजी हे सगळे लोक परस्पर एवढाला खर्च करून बदल करू लागले आहेत हे पाहून, त्या पुढार्याचा तिळपापड झाला म्हणे.
रागाच्या भरात पुढारी या लोकांना डम्बहेड्स आणि इडियट म्हणाले असे कानावर आले आहे.
27 Mar 2013 - 3:57 pm | बॅटमॅन
मुख्यभूमी चीन खानावळ आणि हवापुच्छ लैच भारी =))
28 Mar 2013 - 10:42 pm | नावातकायआहे
शब्दोल्लंघन शब्द आवडला....
27 Mar 2013 - 4:28 pm | आदूबाळ
:))
27 Mar 2013 - 6:25 pm | घन्चकर
जय महाराष्ट्र
27 Mar 2013 - 9:21 pm | कलंत्री
मलातर हा विनोदाचा विषय वाटत नाही. जर असे कधी घडलेच तर बरेच होईल. इंग्रजीबद्दल पराकोटीची गुलामीची भावना आणि मराठीबद्दलचा न्युनगंड यातून असा एखादा नेताच मार्ग काढेल.
27 Mar 2013 - 11:15 pm | नाना चेंगट
सहमत आहे. स्वतःचे स्वत्व विसरलेला समाज असला की कुणी त्यांच्या बाजुने जरी बोलत असला, भल्याचे बोलत असला तरी फेकलेल्या तुकड्यांना चघळायची सवय लागलेला गुलाम स्वतःच्या पायावर स्वतंत्रपणे उभे राहून जगायला काचकूच करतो आणि मालकाच्या वक्राकार चढलेल्या भुवईला घाबरुन बंडखोरीची कल्पना मनातल्या मनात दाबून टाकत बेगडी सुरक्षिततेचे आवरण चढवत तेच तुकडे चघळत रहातो त्याप्रमाणे महाराष्ट्रातील जनता आंग्ल भाषा, आंग्ल देश आणि आंग्ल लोक यांचे मिंधे होऊन मेषपात्र बनुन राहिली आहे.
28 Mar 2013 - 1:43 pm | नगरीनिरंजन
सहमत आहे; पण दुकानांच्या पाट्या बदलून किंवा सक्ती करून स्वाभिमान जागृत होत नसतो हे ही सत्य आहे.
28 Mar 2013 - 2:03 pm | नाना चेंगट
सहमत आहे. हिमालय चढून जायचा आहे. पहिले पाऊल असे तर असे. अडखळू पडू हसे होईल हरकत नाही. किमान तो अनुभव हिमालयाच्या दिशेने निघतांना आपली तयारी कशी आहे याची जाणीव देईल. मग कधीतरी नक्की साध्य होईल अपेक्षित असलेल्या ठिकाणी जाणे.
28 Mar 2013 - 2:17 pm | दादा कोंडके
नाना आणि ननी यांच्याशी सहमत. :)
29 Mar 2013 - 3:53 pm | प्यारे१
मराठी भाषेचा अत्यंत धूर्त वापर करणार्या खर्या दादांशी अर्थातच स ह म त
29 Mar 2013 - 1:06 pm | क्लिंटन
आज शुभ शुक्रवार असल्यामुळे परळमधील भारतबैल अर्थकेंद्रातील हो पतपेढीच्या आमच्या कार्यालयाला सुटी आहे.त्यामुळे हा प्रतिसाद भर दुपारी लिहिता येत आहे.
मराठी भाषा आपली मातृभाषा असल्यामुळे त्या भाषेविषयी आपुलकी वाटणे अगदी साहजिक आहे.पण मराठीची सक्ती करताना कसलेही शॉव्हिनिझम (मराठी शब्द?) येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.ज्या क्षेत्रांमध्ये आघाडी मिळाल्यामुळे आपोआपच समाजात वजन वाढते अशा क्षेत्रांमध्ये (उद्योगधंदे/अर्थकारण) इतर भाषिकांच्या मानाने मराठी भाषिकांची संख्या कमीच आहे.त्यामुळे मराठी भाषेला आपल्याला अपेक्षित असलेले वजन प्राप्त होणार नाही हे ओघाने आलेच.तेव्हा ते आघाडीचे स्थान मराठी माणसाने मिळविल्यास अशी इतरांवर मराठी भाषेची सक्ती करावी लागणार नाही आणि इतरांना "झक मारत" मराठी बोलावी लागेल.नाहीतर असे मराठीकरण म्हणजे टिंगळटवाळी आणि कुचेष्टेचाच विषय ठरणार. जसे मुंबईत शीव वर्तुळाजवळ असलेल्या एका "मुल्लर वस्त्र स्वच्छतालय आणि रंगालय" या नावाचे झाले आहे. तेव्हा आपली प्राथमिकता कशाला असायला हवी?ते आघाडीचे स्थान मिळवायला की त्या आधीच मराठीची सक्ती करायला?
29 Mar 2013 - 3:17 pm | चिरोटा
+१. 'कृपया माझी मातृभाषा बोला' ईतरांना सांगणे वेडेपणाचे वाटते.
29 Mar 2013 - 4:23 pm | बॅटमॅन
भारतबैल आणि हो पतपेढी वाचून भारतबैलाला हो म्हणावेसे वाटले =))
बाकी अर्थातच सहमत.
28 Mar 2013 - 12:38 pm | खबो जाप
मला तरी मराठी सक्तीची करण्यास काही चुकीच वाटत नाही , फक्त महत्वाचे आहे कि आपण ती किती आचरणात आणतो.
आपणच कुठेही बोलताना पहिल्यांदा हिंदी किव्हा इंग्लिश मधून चालू करतो.
माझ्या लग्नाच्या दाखल्या साठी अर्ज केला तर अर्ज मराठीतून होता पण जेव्हा दाखला मिळाला तेव्हा त्यावर मराठी रकाने रिकामेच होते आणि इंग्रजी रकाने भरलेले होते, त्याला विचारले मराठी का छापले नाही तर म्हणे मराठीला कोण विचारतो.हि आपली शासनाची पद्धत.
मी गेले ३ वर्ष झाली चेन्नई मध्ये आहे, इथे कुठल्याही ठिकाणी लोक आपणहून तमिळ सोडून दुसऱ्या भाषेत सुरुवात करत नाहीत.
कुठल्याही हॉटेल मध्ये किव्हा रिक्षा मध्ये हिंदी गाणी ऐकायला मिळत नाहीत.
आता मला इथे सुखासुखी राहायचे असेल तर तमिळ शिकलेच पाहिजे असे माझे मत आहे.
जर तुम्ही स्वतःची मातृभाषा विसरलात किव्हा सोडलीत तर तुम्ही तुमच्या संपूर्ण इतिहासाला / साहित्याला मुकता आणि त्यांनी तुमच्या भविष्यावर नक्कीच परिणाम होतो हे लक्षात घेतले पाहिजे.
तेव्हा मराठी सक्ती असावी(च) पण ती आपण पण पाळली(च) पाहिजे.
आणि सगळ्यात मला राग येतो त्या मराठी कलाकाराचा मोठे मी मराठी मी मराठी म्हणून एक गाणे वाजवतात पण सगळ्यांना अवार्ड च्या कार्यक्रमात हिंदी गाण्याच्यावर नाचायची भारी हौस (च्यायला जशी आपल्याकडची सगळी मराठी गाणी संपलीतच), त्यात ते महागुरु एक नंबर वर स्वताची एवढी एकापेक्षा एक जबरदस्त हिट गाणी असून ह्यांना "पप्पू कान्त डान्स सालाच मिळते" आणि आणि सगळे तरुण कलाकार लाज कोळून पिल्यासारखे हिंदी गाण्याच्यावर अगदी हिडीस हसू येयील असे नाचतात इकडे दाक्षिण मध्ये कुठल्याही कार्यक्रमात असे दिसणार नाही.
28 Mar 2013 - 2:11 pm | नानबा
अहो ते कलाकार वगैरे गेले उडत, मुंबईत सामान्य मुंबईकर काय करतो? बस, रेल्वे, किंवा अजून कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी दुसरा अनोळखी माणूस दिसला, आणि त्याच्याशी बोलायची वेळ आली, की आधी हिंदीचा आधार घेतो. आपल्याच राज्यात आपलीच भाषा बोलायची लाज कसली? खबो जाप यांनी म्हटल्याप्रमाणे परप्रांतीयांना महाराष्ट्रात येऊन मराठी येणे क्रमप्राप्त आहे, असा दिवस जो पर्यंत येत नाही तो पर्यंत परिस्थिती बिकट आहे. मी स्वतः जमेल तितका प्रयत्न करतो की अनोळखी माणसाशी मराठीतून बोलेन. समजणं न समजणं समोरच्याचा प्रश्न आहे..
28 Mar 2013 - 2:13 pm | चावटमेला
अगदी अगदी !!
28 Mar 2013 - 2:21 pm | सर्वसाक्षी
मराठीचा अभिमान बाळगणारे आणि मराठीचा रास्त आग्रह धरणारे यांची टिंगल करण्यासाठी केलेले हे लेखन म्हणजे ओढुन ताणुन केलेले विनोद आहेत. निदान चांगल्या प्रकारे उत्तम उदाहरणांसहित लिहिले असतेत तर हरकत नव्हती. उदाहरणार्थ एखाद्याने शुद्ध मराठीतच बोलायचे असे ठरविल्यवर अनेक वस्तुंना/ उपकरणांना मराठी प्रतिशब्द हे रुढ वा लोकांना सुपरिचित नसल्याने गोंधळ उडणे वगैरे खपुन गेले असते. मराठीत बोला म्हणजे नावाचे सुद्धा भाषांतर करा हे उगाच चिकटविल्यासारखे वाटते. कुण्या परप्रांतियाने असे लिहिले असते तर समजण्यासारखे होते पण मराठीचा आग्रह धरणार्यांची टिंगल मराठी संकेतस्थळावर मराठी माणसाने उडवायची हे खटकते. अनेक परप्रांतिय अलिकडे जमेल तसे मराठी बोलताना दिसतात, किमान मराठी माणसाशी बोलताना सुरुवात तरी एखाद्या मोडक्या तोडक्या वा चुकीच्या का होईना पण मराठी वाक्याने करतात. जे त्यांना स्वाभाविक वाटते ते काही मराठी माणसांना टवाळकीचा विषय भासते. एकदा कर्नाटकातल्या वा उत्तर प्रदेशातल्या एखाद्या पोलिस ठाण्यात जा आणि तक्रार कुठल्या भाषेत नोंदवितात ते पाहा.
28 Mar 2013 - 10:25 pm | मराठी_माणूस
सहमत.
मराठी ला घरभेद्या पासुनच जास्त धोका आहे.
28 Mar 2013 - 10:51 pm | आजानुकर्ण
ननि यांचा प्रतिसाद आवडला.
हाही टोला झकास. मराठी लोकांनीच मराठी वापरायचे ठरवले तरी मराठी टिकवण्यासाठी पुरेसे आहे.
29 Mar 2013 - 4:08 pm | परिकथेतील राजकुमार
लेखन वाचले.
लेखात विनोद अथवा विरंगुळा कुठे आहे ह्याचे तज्ञांनी मार्गदर्शन केल्यास आभारी राहीन.
3 Apr 2013 - 6:47 pm | आदिजोशी
शिळ्या कढीला ऊत आणून अति टुकार विनोदांनी फोडणी देण्याचा भयानक फसलेला भंगार प्रयत्न.
4 Apr 2013 - 7:01 pm | सूड
असेच म्हणतो !!