माझी कंपुबाजी

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
18 Mar 2013 - 4:25 pm

रिकाम टेकडा ** , भिंतीला तुंबड्या लावी | अशी एक आपल्या मराठीत म्हण आहे , आणि आता तर फेसबुकने सगळ्यांनाच फुकट भिंत उपलब्ध्द करुन दिल्याने सगळेच तिला तुंबड्या लावत बसलेले असतात . ( तुंबड्या लावणे म्हणजे नक्की काय हो ? कारण लहानपणी ही म्हण घरात बोललो होतो तेव्हा धपाटे पडले होते { ते ** ह्या शब्दाच्या वापराने पडले असा आमच्या बालमनाने विचार केला होता } )
ते असो .

तर आम्ही ही सध्या रिकामटेकडे असल्याने फेसबुकच्या भिंतीला तुंबड्या लावत असतो. तेव्हा आपल्या सारकेच किती जण हे करत आहे हे पाहण्या साठी आम्ही केलेला हा प्रयोग ... आमची कंपुबाजी ...

१) आमचा कंपु :

हे आमच्या फेसबुक वरील कंपुचे चित्र . प्रत्येक "नोड" हा एक व्यक्ती आहे अन ज्या ज्या व्यक्ती एकमेकांना ओळखतात त्या त्या "एज" ने जोडलेल्या आहेत . काही क्षण म्यॅट्रीक्ष पिक्चर मधे आलाचा भास होतोय का कुणाला ... ;)

२) एक वादग्रस्त चित्र

ह्या चित्रात गुलाबी नोड्स आहेत त्या फीमेल्स अन हिरवे नोड्स आहेत ते मेल्स . ( खरे काय कोण जाणे )

३) समाज शोधन

कम्युनिटी डिटेक्शन ला मराठीत काय म्हणता येईल बुवा ? ते असों . तर ह्या चित्रां मधे आमच्या कंपुतील उपकंपुंचे संशोधन केले आहे .उदा. हिरवा कंपु शाळेतला , निळा कंपु ब्लॉगवरचा जांभळा( लव्हेंडर का काय ते ) कंपु आयेसाय मधला वगैरे वगैरे . ( आता ह्यातली गिरीजा कोण ओळखा पाहु )

आता येतुन पुढील चित्रांचे स्पष्टीकरण नॉन टेक्निकल व्यक्तीला देण्यास मी असमर्थ आहे. तेव्हा ती केवळ चित्रकला म्हणुन गोड मानुन घ्यावी .

४)

५)

६)

७)

अशा रीतीने फेसबुकवरील तुंबड्या मिपाला लावणे सफळ संपुर्ण ||

अवांतर : विशेष आभार
१) https://gephi.org/
२) https://apps.facebook.com/netvizz/
३) https://www.coursera.org/course/sna

वावरलेख

प्रतिक्रिया

सुज्ञ माणुस's picture

18 Mar 2013 - 4:52 pm | सुज्ञ माणुस

अशा रीतीने फेसबुकवरील तुंबड्या मिपाला लावणे सफळ संपुर्ण :) :)

पैसा's picture

18 Mar 2013 - 4:57 pm | पैसा

रंगीबेरंगी चित्रं बरी दिसतायत! तुमचे फेसबुकी "फ्रेण्ड्स" बरेच आहेत वाटते!

वाव... काय मस्त दिसतायत ते सगळे रंग...

क्लस्टरिंगची चित्रे मस्त आलीयेत हो! अल्गोरिदम्स कुठले वापरलेत म्हणे? आम्ही बेयेशियन नेटवर्कपुढे अजून गेलोच नै :(

आणि सॉफ्टवेअर कुठले म्हणे? जमल्यास आम्हीपण दोनपाचचार तुंबड्या लावू म्हणतो :)

प्रसाद गोडबोले's picture

18 Mar 2013 - 6:20 pm | प्रसाद गोडबोले

धन्यवाद ब्यॅटमॅन .

मी यी फ्यॅन हु , फोर्सड अ‍ॅटलास (हा कन्वर्ज होत नाहीये :( ) फ्रुचेर्मॅन रिंगगोल्ड हे अ‍ॅल्गो वापरुन पाहिलेत ....

सॉफ्टवेयर साठी पुढील लिन्क्स पहा .
१) https://gephi.org/
२) https://apps.facebook.com/netvizz/
३) https://www.coursera.org/course/sna ( हा कोर्स नुकताच चालु झाला आहे !! )

पण मला हे सगळं "R" मधे करायची इच्छा आहे ...बघुया कसं काय जमतय ते ...
पुढं मागं फेसबुक मधे नोकरी मिळाली तर मज्जा येईल पालो आल्टो मधे ;)

ओक्के धन्यवाद :) सोशल नेटवर्क अ‍ॅनॅलिसिस चा कोर्स रोचक वाटतोय. साइन अप होऊन लेक्चर्स अटेंड करतोच!!!

बाकी आर मध्ये ढिगाने प्याकेजेस आहेत. याचीही असतीलच.

एकूणच ग्राफ हे प्रकरण मला अजून तितकंसं पचनी पडलेलं नाही हेच खरं!

ओक्के धन्यवाद :) सोशल नेटवर्क अ‍ॅनॅलिसिस चा कोर्स रोचक वाटतोय. साइन अप होऊन लेक्चर्स अटेंड करतोच!!!

बाकी आर मध्ये ढिगाने प्याकेजेस आहेत. याचीही असतीलच.

एकूणच ग्राफ हे प्रकरण मला अजून तितकंसं पचनी पडलेलं नाही हेच खरं!

आदूबाळ's picture

18 Mar 2013 - 6:23 pm | आदूबाळ

नेटवर्क थिअरी!

मला शिकवता काय भौ?

मनराव's picture

25 Mar 2013 - 6:21 pm | मनराव

सोत्री काकांना विचार......

calling सोत्री...!!! calling सोत्री...!!!

अभ्या..'s picture

19 Mar 2013 - 1:29 am | अभ्या..

च्यामारी गिराकाकानी खरडफळ्यावर माझी चित्रे कुठे न कशी टाकू म्हणून फुल्ल वातावरणनिर्मीती केली. मला वाटले चला आता जरा स्केचेस नायतर पेन्टींग तरी पाहायला मिळतील :(
पण तुम्ही गिराकाका पार मिपाचे श्वेतांबरीवाले हुसेन निघाले. मला तर काय पण सौंदर्य जाणवले नाही. फंडामेंटल्स ऑफ डीझाइन तर लै लांब.
नंतर आमच्या बॅट्याचे प्रतिसाद वाचून ह्यात कायतरी स्टॅट, मॅप्स असले काही असले तर शुभेच्चा. लगे रहो. :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Mar 2013 - 4:50 am | निनाद मुक्काम प...

फार आशेने हा धागा उघडला होता हो
पण हृदयभंग झाला.
Breaking heart
असो
पण
हि कंपू बाजी मात्र आवडली.

इन्दुसुता's picture

19 Mar 2013 - 5:46 am | इन्दुसुता

चान चान हो.
आम्ही ओळखली गिरिजा ( किंवा गिराकाका ) कोण ?
तो एक मधला निळा बिंदू दिसतोय ना, तोच/ तीच. :)
एकंदर प्रयोग / कंपूबाजी आवडली.

कवितानागेश's picture

19 Mar 2013 - 3:30 pm | कवितानागेश

निष्कर्ष काय निघाला? :(

प्रसाद गोडबोले's picture

19 Mar 2013 - 4:15 pm | प्रसाद गोडबोले

निष्कर्ष अनेक आहेत . त्यांचे मार्केटिंगसाठी , ऑनलाईन बीझीनेस साठी , ऑनलाईन सेल्ससाठी , टॅलेन्ट अ‍ॅक्विसिशनसाठी अशा कित्येक कारणासाठी उपयोग करता येईल !!

हळु हळु शिकत आहे , जसे जसे समजेल तसे तसे टाकत जाईन .

सोशल नेटवर्क अ‍ॅनालिसीस तसा स्टॅटीस्टिक्स , ग्राफ थेयरी च्या आसपासचा विषय ....इथे केवळ चित्रकला म्हणुन त्यातले काही ग्राफ टाकले होते .
.
ह्यातलं खरं सौंदर्य हे वापरुन जो पैसा बनवता येईल त्यात आहे :)

मनराव's picture

25 Mar 2013 - 6:23 pm | मनराव

>>ह्यातलं खरं सौंदर्य हे वापरुन जो पैसा बनवता येईल त्यात आहे <<<

याचा पण ग्राफ द्या कि ओ....तो बि रंगीबेरंगी नक्किच असेल...... :)

नगरीनिरंजन's picture

19 Mar 2013 - 4:43 pm | नगरीनिरंजन

छान! हे स्वतः प्रोग्रॅम लिहून केलंय?

लॉरी टांगटूंगकर's picture

19 Mar 2013 - 4:49 pm | लॉरी टांगटूंगकर

नॉन आयटी क्षुद्र मनुष्यांना समजेल असे काही स्पष्टीकरण कोणी लिहू शकतं काय?

श्री गावसेना प्रमुख's picture

19 Mar 2013 - 4:57 pm | श्री गावसेना प्रमुख

आता येतुन पुढील चित्रांचे स्पष्टीकरण नॉन टेक्निकल व्यक्तीला देण्यास मी असमर्थ आहे. तेव्हा ती केवळ चित्रकला म्हणुन गोड मानुन घ्यावी .

.इथे सकळजण हे ह्या प्रकारापासुन अनभिज्ञ असावेत असा कयास आहे,तसे नसेल तर ते ह्यांची इच्छा पुर्ण करतील.

साती's picture

25 Mar 2013 - 9:23 am | साती

मस्त! पूर्वी सर्किट म्हणून एक काका होते ते असे नको नकोते संकेतस्थलीय विदे गोळा करून त्याचे चिवडे करून आलेख रंगवित असत त्यांची आठवण झाली.
कुठे गेलेत कुणास ठाऊक!

परिकथेतील राजकुमार's picture

25 Mar 2013 - 6:15 pm | परिकथेतील राजकुमार

फारच अनोखा प्रयोग. असाच काहीसा एक प्रयोग आमचे स्नेही असलेल्या एका मिपासदस्याने केल्याचे आठवले.

ह्या चित्रात गुलाबी नोड्स आहेत त्या फीमेल्स अन हिरवे नोड्स आहेत ते मेल्स . ( खरे काय कोण जाणे )

हे तुमच्या लेखणीतून झरलेले वाक्य तर काळीज गलबलवून गेले.

तुंबडी म्हणजे जळू.
पूर्वी न्हावी या जमातीचे लोक जळवा लावून लोकांचे दुषित रक्त काढून त्यांच्यावर इलाज करीत असत. त्यासाठी त्यांच्याकडे जळवा ठेवलेल्या असत. रिकामपणात त्या तुंबड्या कुडाला किंवा भिंतीला लावून आपला वेळ घालवण्या वरून हि म्हण आली आहे.
तसेच स्वतःच्या तुंबड्या भरणे हा वाक्प्रचार रक्तपिपासू राजकारण्यांसाठी असाच आला आहे