माझ्या मिठीत विरघळू दे, कोमल तुझी ही शुभ्र काया
रात्रही मग होऊ दे स्तब्ध, चंद्रही नको अन् पुढे सराया
चढती लय श्वासांची, सांगते सर्व बिनदिक्कत
ओठ थरारती अलवार तुझे, तुझ्याशीच बंड करत
रातराणी आज फुलुन, आली तिच्या ऐन भरात
की तुझाच हा मत्त गंध, जीवघेणा उतरे ऊरात
हा हवेत कुंदपणा, कुठुनसा आज आला
त्यात कहर ही बट, चुकार खुणावते मला
आज नको मला, भान कुठल्याच जगाचे
तु ही नको सांगूस अन्, आज कुठे थांबायचे
पापण्यांची चलबिचल, का होतसे सये तुझ्या
मी न परका तुला, स्पर्श जरी हा पहिला
चल...चल सखे, या सर्वांच्या पलिकडे
काय कोठे नको पुसूस, शब्द पडतील तोकडे
मी तुझा अन् तु माझी, ईतकेच काय जाण तू
हलकेच ये कवेत माझ्या, अन् होऊनी जा बेभान तू
प्रतिक्रिया
6 Mar 2013 - 9:09 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
हम्म, रोमँटिक रोमँटिक म्हणतात ते यालाचं. :)
मस्तच.
6 Mar 2013 - 9:20 pm | मदनबाण
माझ्या मिठीत विरघळू दे, कोमल तुझी ही शुभ्र काया
रात्रही मग होऊ दे स्तब्ध, चंद्रही नको अन् पुढे सराया
आहाहा... मार डाला ! ;)
परत एकदा मला माझ्या शुभ्राची आठवण झाली.;)