सस्नेह निमंत्रण

ऋचा's picture
ऋचा in जनातलं, मनातलं
7 Jul 2008 - 10:39 am

प्रति,
समस्त मिसळपाव.कॉम कुटुंबीय,

सप्रेम नमस्कार,

येत्या जुलै महिन्याच्या १२ तारखेस तुमचा मैत्रिण "ऋचा" विवाहबध्द होत आहे.
वैयक्तिकरित्या सर्वांनाच व्यक्तिशः भेटून निमंत्रण पत्रिका देणे केवळ अशक्य असल्याकारणे,इथेच आमंत्रण देत आहे.
कृपया हेच आग्रहाचे निमंत्रण समजुन ह्या विवाहसोहळ्यास उपस्थित राहून आम्हांस आपले शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती.

आपलाच,
ऋचा उपाख्य क्षितिजा

विवाहस्थळ : कोहीनूर मंगल कार्यालय, एरंडवणा
प्रभात रस्ता,गल्ली क्र. ८,
गरवारे कॉलेज समोर
पुणे-४

मुहुर्तः १२ जुलै-२००८
वेळः स. १० वा. १८ मि.

(आवांतर : मला पत्रिका डकवता येत नाहीये.)

हे ठिकाणप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

शेखर's picture

7 Jul 2008 - 11:04 am | शेखर

हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!!

शेखर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Jul 2008 - 11:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रत्यक्षात येऊन अभिनंदन करणे शक्य नाही म्हणून इथेच शुभेच्छा देते.

Marriage is not a word, it's a sentence.

दुसय्राच्या अनुभवावरुन शहाणी न झालेली
संहिता

विसोबा खेचर's picture

7 Jul 2008 - 11:25 am | विसोबा खेचर

ऋचा,

तुला लग्नाकरता अनेकानेक शुभेच्छा!

उद्याच धम्याच्या लग्नाला पुण्यात येतो आहे त्यामुळे पुन्हा १२ तारखेला तुझ्या लग्नाला पुण्यात येणं कितपत जमेल हा प्रश्नच आहे. तरीही प्रयत्न करेन..

असो, तुला आणि तुझ्या भावी नवर्‍याला लग्नाकरता मनापासून शुभेच्छा! दोघं सुखानं नांदा आणि संसार करा...

मिपा हे तुझं माहेर आहे आणि आम्ही सर्व माहेरची माणसं तुझ्या आनंदात सहभागी आहोत....

(वडीलबंधू) तात्या. :)

मनस्वी's picture

7 Jul 2008 - 11:26 am | मनस्वी

ऋचा

तुला आणि तुझ्या भावी नवर्‍याला लग्नाकरता आणि संसाराकरता मनापासून शुभेच्छा!

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

यशोधरा's picture

7 Jul 2008 - 11:26 am | यशोधरा

अभिनंदन ऋचा :) मनाने आणि मनापासून तुझ्या आनंदात सहभागी आहे गं! :)

प्रमोद देव's picture

7 Jul 2008 - 11:29 am | प्रमोद देव

तुमचा मैत्रिण ?
आपलाच?
ऋचा उपाख्य क्षितिजा

ऋचा लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा.
पण ऋचा हा आहे की ही आहे?
वरती असे का लिहिलेय...तुमचा,आपलाच?

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

रिमझिम's picture

7 Jul 2008 - 11:31 am | रिमझिम

चला तुमचाही बँड्(लग्नाचा)वाजला एकदाचा ;)
तुम्हा दोघानाही पुढील आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा!!!

सखाराम_गटणे™'s picture

7 Jul 2008 - 11:37 am | सखाराम_गटणे™

>>तुमचा मैत्रिण "ऋचा" विवाहबध्द होत आहे.
तुमचा ????

आम्च्या पण शुभेच्छा !!!!!!!!

सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

अनिल हटेला's picture

7 Jul 2008 - 11:42 am | अनिल हटेला

क्या बात है!!!

भावी आयुष्यासाठी वधु -वरास अनेक शुभेच्छा..........

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

आनंदयात्री's picture

7 Jul 2008 - 11:55 am | आनंदयात्री

अभिनंदन ऋचा ! नांदा सौख्यभरे !!

दाटुन कंठ येतो,
जा लाडके सुखाने :)

धमाल मुलगा's picture

7 Jul 2008 - 12:36 pm | धमाल मुलगा

असेच म्हणतो ;)

ॠचा, अभिनंदन आणि शुभेच्छा......
पण मी नाही येऊ शकणार लग्नाला :(
क्षमस्व!!!!

ब्रिटिश टिंग्या's picture

7 Jul 2008 - 2:28 pm | ब्रिटिश टिंग्या

असेच म्हणतो ;)
ॠचा, अभिनंदन आणि शुभेच्छा......

पुण्यात असतो तर नक्की आलो असतो लग्नाला......
एनीवे, परत आल्यावर तुझ्याकडुन अन् धम्याकडून पार्टी उकळणार आहे मी :)

(शुभेच्छुक) टिंग्या :)

II राजे II's picture

7 Jul 2008 - 3:45 pm | II राजे II (not verified)

हेच म्हणतो आहे !!!!

राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

संजय अभ्यंकर's picture

7 Jul 2008 - 8:29 pm | संजय अभ्यंकर

स्वगतः (मी चाललो हनिमुनला, कसा येणार?)

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

डॉ.प्रसाद दाढे's picture

7 Jul 2008 - 12:58 pm | डॉ.प्रसाद दाढे

पण मी नाही येऊ शकणार लग्नाला
अरे चोरा.. हनीमोर इन मसूरी काय?? :):)
ऋचास हार्दिक शुभेच्छा!!

केशवसुमार's picture

7 Jul 2008 - 1:55 pm | केशवसुमार

ऋचा,
हर्दिक आभिनंदन आणि शुभेच्छा!!
(शुभेच्छुक)केशवसुमार
स्वगतः तुमचा मैत्रिण ?आपलाच? :O कॉपी पेस्ट ची सवय काय जात नाही :W :B

कुंदन's picture

7 Jul 2008 - 2:38 pm | कुंदन

हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!!

तुमचा मैत्रिण ?आपलाच? हा कॉपी पेस्ट चा परिणाम दिसतोय ,
लवकरच तु प्रकल्प व्यवस्थापक होणार असे दिसतेय .... ;-)

अन्जलि's picture

7 Jul 2008 - 3:18 pm | अन्जलि

वैवाहिक जिवनासाथि हार्दिक शुभेछ्आ. गमतिचि गोश्ट अशि आहे कि टाटा मोतोर्स मधिल दुसर्या एकाचे पण त्याच दिवशि पुन्यामधे लग्न आहे माझ्या भचिशि कदाचित तुझा नवरा अनि माझा जावइ एक्मेकन्चे मित्र असु शकतिल. त्यामुळे मि पुन्यात आहे म्हनुन जमल्यास नक्कि येन्याचा प्रयत्न करिन. मग काय बुवा आता मजा आहे एका मुलिचि आम्हि आता पुनेकर होनार.

अमोल केळकर's picture

7 Jul 2008 - 3:20 pm | अमोल केळकर

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

प्रभाकर पेठकर's picture

7 Jul 2008 - 3:30 pm | प्रभाकर पेठकर

हार्दिक अभिनंदन.
तुमचा आणि आपलाच चे स्पष्टीकरण व्हावे ही विनंती.

अन्या दातार's picture

7 Jul 2008 - 3:54 pm | अन्या दातार

लग्नास येउ शकेन का नाही माहित नाही, पण आपल्याला भावी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा! :)

विकास्_मी मराठी's picture

7 Jul 2008 - 4:58 pm | विकास्_मी मराठी

विकास्_मी मराठी

हर्दिक आभिनंदन ! ! ! ! !
आपल्याला भावी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा.....
नांदा सौख्यभरे ! ! !
:)

शितल's picture

7 Jul 2008 - 5:09 pm | शितल

ॠचा तुला लग्नाच्या अनेक शुभेच्छा !
ना॑दा सौख्य भरे. :)

चावटमेला's picture

7 Jul 2008 - 7:54 pm | चावटमेला

हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा
http://chilmibaba.blogspot.com