घाई...

शैलेश हिंदळेकर's picture
शैलेश हिंदळेकर in जे न देखे रवी...
14 Feb 2013 - 7:52 am

बोलायला मनातले
एस.एम.एस. ची सोय नव्हती
रुपया टाकून फोन करु तर
गर्दी होती अवती भवती

नाक्यावरला वाणी होता
दोघांमधला दूत
त्याच्या करवी जमवत होतो
तुझ्याशी मी सूत

वारंवार पावलं तेव्हा
दुकानाकडे वळायची
मी तेथे आल्याची वार्ता
तुला कशी कळायची

काहीतरी निमित्त काढून
तू ही तिथे यायचीस
समोरून येता जाता
वळून गोड हसायचीस

पुढे एकदा चोरुन चोरुन
तयार एक पत्र केले
खात्री होती, ओळखशील तू
म्हणून नांव नाही लिहिले

पत्र द्यायचे धाडस मात्र
नाही करता आले मला
हळून तो लखोटा मग
मी वाण्याच्या हाती दिला

वाण्याने ते पत्र दिले
गुपचुप तुझ्या हाती नंतर
तेव्हापासून वाढत गेले
आपल्या दोघांमधले अंतर

आता आहेस तू वाण्याच्या
दोन मुलांची आई
पत्र देण्या उगीच केली
त्या वेळी मी घाई

हास्यप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

14 Feb 2013 - 8:03 am | स्पंदना

लबाड वाणी! तुमच्या पत्रावर नफा कमवलान! तुम्ही काय केलत? निदान दुकान तरी बदललत की नाही?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 Feb 2013 - 8:24 am | मिसळलेला काव्यप्रेमी

अवघड आहे. :(

श्री गावसेना प्रमुख's picture

14 Feb 2013 - 8:30 am | श्री गावसेना प्रमुख

वाण्याला दिली चिठ्ठी.......वाण्या आपुल्याच गर्लफ्रेंड ला मारतो मिठी1

शेवटच्या कडव्यात जरा गल्लत झाली, असो इथं प्रश्न विचारले तर फार गोंधळ होईल, त्यात तुम्ही नविन उगा शिव्या खाव्या लागतील.

यसवायजी's picture

14 Feb 2013 - 12:56 pm | यसवायजी

वाण्याच्या पोरांची आई एवढं समजलं.. पण शेवटी लग्न कुणाशी झालं?
असं विचारायचंय का तुम्हाला? :D

संजय क्षीरसागर's picture

14 Feb 2013 - 9:55 am | संजय क्षीरसागर

दोघांनी मिळून तुमचा मामा केला असेल

श्रिया's picture

14 Feb 2013 - 11:19 am | श्रिया

छान रचली आहे हि पण कविता.
एक प्रश्न आहे, त्या झुरळाला घाबरणार्‍या वेगळ्या का?

संजय क्षीरसागर's picture

14 Feb 2013 - 12:03 pm | संजय क्षीरसागर

झुरळाला घाबरणारी घरात फवारा घेऊन बसली आहे

श्रिया's picture

14 Feb 2013 - 12:10 pm | श्रिया

ओह आय सी! म्हणजे स्वत:च्या मुलाला यांची मामा म्हणून ओळख करुन देणारी ती हिच होय, मला वाटलं ती तिसरी.

संजय क्षीरसागर's picture

14 Feb 2013 - 12:17 pm | संजय क्षीरसागर

एका परीचे स्वप्न आयुष्याच्या सुखद वळणावर पाहीले मी
त्याच स्वप्नाचा विरत जाणारा दु:खद अनुभव घेतला मी

...अजून बाकीच्या यायच्या आहेत

म्हणजे इथल्याच एका कविच्या शब्दांत सांगायचे झाले तर हे कवी "इश्कबाज" होते असे वाटते. (क्रु.ह.घे.)

संजय क्षीरसागर's picture

14 Feb 2013 - 12:45 pm | संजय क्षीरसागर

सोलो साँग आहे