5
अॅलेक्सच्या संगतीत रोहनचा दिवस छान गेला. दुसर्या दिवशी विपश्यना शिबीर सुरू होणार होते. त्यादिवशी सकाळी अॅलेक्स आणि रोहनने फॉर्म भरून रीतसर प्रवेश घेतला व इतर सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला दुपार झाली.शिबिराला सुमारे 150 पुरुष व तितक्याच महिला होत्या. इथले जेवणही रोहनला आवडले. साधेसेच ,पण सात्त्विक आणि पौष्टिक ... त्या रात्री मौनाला सुरुवात झाली .आजपासून दहा दिवस मौन पाळायचे. रात्री खोलीत गप्प बसणे दोघांनाही अवघड जात होते . तरीही मनाचा निश्चय करून ते निद्राधीन झाले.
दुसर्यान दिवशी आनापान सती ,तिसर्यात दिवशी ध्यान-त्रिकोण एकत्रीकरण शिकवले गेले. रोज संध्याकाळी गोयंका गुरुजींचे रसाळ प्रवचन व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले जाई. चौथ्या दिवशी विपश्यना दीक्षा दिली गेली.त्या दिवशी रोहनला खूप निराळा अनुभव आला. त्यानंतर रोज सर्वांग प्रदक्षिणा, अधिष्ठान, धारा-प्रवाह वगैरे कौशल्ये शिकवली गेली. दहाव्या दिवशी मंगल-मैत्री साधना झाली.आणि मौन सुटले.रोहनल मनावरील बरीच ओझी उतरल्याचा,मन शुद्ध झाल्याचा खोलवर अनुभव आला होता.
मग सर्वांनी ओळखी करून घेतल्या,आणि मेजवानीचा आस्वाद घेतला. इतकी सगळी व्यवस्था आणि तीही एका पैशाचीही अपेक्षा न ठेवता? खूप आश्चर्यकारक होते. दान काऊंटर वर जावून त्याने दानाची रक्कम जमा केली.आणि मग तो आणि अॅलेक्स विपश्यनेच्या अनुभवांवर गप्पा मारू लागले. रोहनने आपल्या प्रवासाबद्दल आणि लडाखच्या मठाबद्दलही अॅलेक्सला सांगितले .
शिबीर संपायला अजून एक दिवस होता. दुसर्याआ दिवशी सकाळी प्रवचन होवून शिबीर समाप्त झाले. निघताना तिथल्या आचार्यांनी भिक्खु धम्मपाल यांना देण्यासाठी एक पत्र रोहनजवळ दिले. आणि मग तो आणि अॅलेक्स विपश्यना आश्रमाबाहेर पडले. रोहनने सांगितलेले दिव्य स्वप्न आणि चमत्कार ऐकून अॅलेक्सच्या मनातही लडाखच्या मठाबद्दल आकर्षण आणि उत्सुकता निर्माण झालेलीच होती.त्यामुळे तोही रोहनसोबत लेहला निघाला. त्यांनी धरमशालामध्ये इतर ठिकाणे आणि लामांचा मठही पहिला. एका अनामिक ओढीने तिथून पाय निघत नव्हता तरीही लेहची बस पकडून रात्री दहा वाजता लेहला पोचले. आणि मग त्याच मागच्या वेळच्या लॉजवर दोघेही थांबले.
सकाळ झाल्यावर पुन्हा पर्वत चढायचा होता म्हणून दोघांनीही भरपूर नाश्ता आणि दूध घेतले, आणि पर्वत चढू लागले.यावेळी रस्ता ओळखीचा असल्याने रोहनने गावकर्यांदच्या मदतीशिवाय स्वत:च वर जाण्याचा निर्णय घेतला . ते मठात पोचले तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. पूर्वीप्रमाणेच छोट्याने पुन्हा स्वागत करून त्यांना खोलीत नेले. फ्रेश होवून गुरुजींच्या भेटीला गेले.
गुरुजींनी त्यांचे स्वागत केले. रोहन नमस्कार करून गुरुजींना म्हणाला………….. गुरुजी विपश्यना ही साधना खूप चांगली आहे. मला खूप मोकळे वाटते आहे आता, आणि यापुढे आयुष्यात कोणतेही व्यसन न करण्याचा मी निश्चय केला आहे........ फार छान! गुरुजी म्हणाले....... अरे पण या मित्राची ओळख तर करून दे आधी..... मी काय ओळख करून द्यायची गुरुजी?आपण सर्व जाणत असालच ! तुमच्याविषयी मी याला जे सांगितले,त्याने प्रभावित होवून हा इथे आला आहे. हा मूळचा जर्मनीचा, अॅलेक्स. भारतात आध्यात्मिक अनुभूतीच्या शोधासाठी आला आहे गुरुजी.............
ठीक आहे बेटा. एक लक्षात ठेव ,पूर्वजन्मीचे काहीतरी लागेबांधे,संस्कार असल्याशिवाय कोणत्याही मनुष्याचे पाय या माठाकडे वळायचे नाहीत. ज्याअर्थी हा तुझ्याबरोबर इकडे आला,त्याअर्थ त्याचाही तुझ्या आध्यात्मिक आयुष्याशी काहीतरी संबंध असणारच! कळेल ते लवकरच.............. आता लवकर जेवून घ्या पाहू!...........गुरुजी म्हणाले.
त्यादिवशी जेवणानंतर एक विशिष्ट पद्धतीने बनवलेले एक तिबेटी पेय त्या दोघांना देण्यात आले. ते प्यायल्यावर त्यांना एक निराळीच हुशारी वाटू लागली.दोघेही झोपले. रात्री बरोबर तीन वाजता गुरुजींनी रोहनला उठवले . अॅलेक्सला आत्ता उठवू नको असे खुणेनेच सांगून रोहनला घेवून गुरुजी एका उसर्याउ बाजूच्या गुप्त खोलीत गेले. तेथे जाताच त्याला झोपवले,आणि सम्मोहन सूचना देवून त्याला सम्मोहित केले. ...............आता मी 1 ते 10 अंक म्हणतो, त्याबरोबर तू तुझ्या पूर्वजन्मात जाणार आहेस. तिथे कायकाय घडते, ते तू माला सांगायचेस .............................
6
तुझे नाव काय?
थॉमस रुडी
हे कोणते साल सुरू आहे ?
1862 , 12 डिसेंबर
तू कुठे आहेस?
मी अमेरिकेत आहे.
आजूबाजूला काय परिस्थिति आहे?
युद्ध सुरू आहे . आत्ताच आम्ही युनियन्स वाल्यांच्या पाच सैनिकांना यमसदनी धाडले.
तुझ्याबरोबर कितीजण आहेत ?
आम्ही तीस कन्फेडरेट आहोत , मी मूळचा व्हर्जिनियाचा !
किती दिवस झाले युद्ध सुरू आहे?
आम्ही फ्रेड्रिक्सबर्गला आहोत. युनियन्सचा सेनापति सैतान अँब्रोज बर्न्साईडने कालपासून हल्ल्यांना सुरुवात केली. तो कालपासून नदी पार करून आम्हाला संपवायचा प्लॅन बनवतोय. पण आमचा प्रमुख रॉबर्ट ली ने अशी काही नाकाबंदी केली आहे ,की अँब्रोजच्या नाकी नवू आले आहेत. आमचेही खूप सैनिक मारले गेले, पण आम्ही शत्रूचेही खूप नुकसान केलेले आहे.
तुमच्याजवळ काय शस्त्रे आहेत?
आमच्याकडे घोडे,बंदुका आणि भले आहेत. पण शत्रूकडे तोफाही आहेत.
आता काय झाले?
पलीकडून सतत गोळ्यांचा वर्षाव सुरू आहे. आत्ताच एक गोळी माझ्या खांद्यात घुसली ....... आई गं!
दुसरी गोळी येते आहे. ती मात्र नेमकी छातीवर ! बापरे! मी मेलो ..........
मी आता माझ्याच निष्प्राण शरीरकडे बघतो आहे. मी वर तरंगतो आहे. गोळी लागूनसुद्धा छातीत अजिबात दुखत नाही, कसे काय?
…………..
परत ये रोहन .... मी 10 ते 1 अंक मोजतो,तोपर्यंत तू परत आपल्या शरीरात ,सन 2010 मध्ये परत आलेला असशील...............
रोहनने हळूहळू डोळे उघडले. गुरुजी समोर बसले होते. सकाळचे सहा वाजले होते.
काय रोहन? कळलं ना तुझ्या पूर्वजन्माबद्दल? तुला लहानपणी छळणारा पैशाचा विचित्र विचार कुठून आला माहीत आहे का? युनियन्स म्हणजे श्रीमंत जुलमी मालक, पूर्वजन्मी तू अमेरिकेत होतास . अमेरिकन सिव्हिल वॉरमध्ये मालकांच्या अत्याचारविरुद्ध लढणार्या कन्फेडरेट सैन्यातील एक सैनिक होतास ,त्यामुळेच तुला पैसा हा शत्रू वाटत असे...
होय गुरुजी ..माझी पैशाबद्दलची भीती कमी झाल्यासारखी वाटते आहे.
ठीक आहे. आता आजचे आपले काम संपले, आता उद्या पहाटे तीन वाजता पुन्हा आपल्याला नवीन प्रयोग करायचा आहे.
(अपूर्ण- क्रमश: )
प्रतिक्रिया
10 Feb 2013 - 3:13 pm | नानबा
आवडलं. मस्त धरून ठेवतंय लेखन..
पु. भा. प्र.
10 Feb 2013 - 4:19 pm | दिपक.कुवेत
तिनहि भाग आत्ताच वाचले. पुढे काय होणार आहे ह्याची उस्तुकता लागलीये....पटापट पुढले भाग टाका.
10 Feb 2013 - 5:33 pm | स्पंदना
छान चाललीय लेखमाला आवडली.
10 Feb 2013 - 7:13 pm | येता जाता....
वा..... मस्त,मजा येतेय वाचायला......
10 Feb 2013 - 7:23 pm | अग्निकोल्हा
अतिशय त्रोटक भाग लिहीत आहात. मोठे भाग येउदेत.
10 Feb 2013 - 7:48 pm | मंदार कात्रे
भाग २ पहा
10 Feb 2013 - 9:42 pm | अग्निकोल्हा
सर्व भाग क्रमाने वाचुन काढल्यावरच प्रतिसाद दिला होता.
10 Feb 2013 - 7:45 pm | मंदार कात्रे
<< तू इथे जे अनुभवलेस, वाचलेस ... त्यात आणि विपश्यनेच्या शिकवणुकीत फरक आहे,हे लक्षात ठेव. पण विपश्यना मन शुद्ध करणारी एक उच्च आध्यात्मिक साधना आहे. विपश्यना करताना इतर कोणत्याही गोष्टींचा ,अगदी हा मठ ,मी आणि तू इथे वाचलेली पुस्तके यांचा अजिबात विचार करू नकोस. नाहीतर तिथे तुझा आणखी गोंधळ होईल,हे लक्षात असू दे....>> भाग २ पहा @ ग्लिफ
10 Feb 2013 - 9:56 pm | सस्नेह
विंट्रेष्ट्रिंग ...
11 Feb 2013 - 1:04 pm | मनराव
वाचतो आहे.......
11 Feb 2013 - 1:12 pm | ५० फक्त
मस्त चाललं आहे, चालु द्या.
12 Feb 2013 - 11:39 pm | खटपट्या
पहिल्या दोन भागान्ची लिन्क द्या
25 May 2016 - 8:10 pm | विजुभाऊ
पुढे काय झाले?
27 May 2016 - 4:07 pm | मंदार कात्रे
३ वर्षान्च्या गॅप नन्तर पुढचे भाग लवकरच येतील . कथा तयर आहे पण लिहून होत नाहिये
बस्स थोडासा इन्तजार और.............