अद्भुत (भाग 2)

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in जनातलं, मनातलं
10 Feb 2013 - 12:41 pm

थकल्या भागल्या अवस्थेत रोहन संध्याकाळी सहा वाजता पर्वत-शिखरावर असणार्याल त्या मठात पोचला. गावकर्यााला निरोप देवून घरी पाठवलं आणि रोहन मठाच्या प्रवेशद्वारातून आत गेला . आत जाताच एका छोट्या दहा-बारा वर्षाच्या भिकखूने त्याचे स्वागत केले ... आइये रोहन बाबू ,गुरुजी आपकीही राह देख रहे है .रोहन अवाक झाला. आपला उभ्या आयुष्यात या मठाशी कधी संबंध आलेला नाही,आणि याला माझे नावदेखील कसे काय माहीत?आणि मी इथे येणार हे यांना कासेकाय माहीत? ....तुमको मेरा नाम कैसे पता चला ?....... गुरुजी ने बताया बाबूजी.......... आश्चर्यचकित झालेला रोहन त्या छोट्याबरोबर निमूटपणे चालू लागला.

थोडेसे आत गेल्यावर एका हॉलमध्ये अनेक लहानमोठे बौद्ध भिक्षू प्रार्थना करत बसले होते .रोहनने सगळ्यांना वाकून नमस्कार केला. प्रार्थना संपल्यावर मध्यभागी बसलेल्या मुख्य गुरुजींनी त्याला जवळ बोलावले. ..... आओ बेटा रोहन ,मै हू भिक्खू धम्मपाल , हमारे इस छोटेसे आश्रम मे तुम्हारा स्वागत है ,बैठो , थक चुके होगे,मुंबई से यहा का सफर अच्छा हुवा ना?................ नमस्कार , मगर गुरुजी मै समझ नाही पा रहा हू, हमारी कोई पहचान तक नही ,और आप मुझे कैसे जानते है?............ अरे बेटा तुम्हे कल रातका वो सपना याद नही? हमारा भी वायरलेस नेटवर्क है बाबा ...................... हसून गुरुजी म्हणाले . आज रात आराम करो ,हमारे आश्रम का खाना खावो ....हम सब सूर्यास्त के बाद खाना नही खाते. तुम्हारे लिये खाना बचाके रखा है. कल सुबह तुम्हारे सवालोंका जवाब तुम्हे मिल जाएगा बेटा .....

आधीच दिवसभरच्या श्रमाने थकलेला रोहन आश्चर्यमुग्ध होवून अधिक काही न बोलता निमूटपणे छोट्याने दाखवलेल्या खोलीत गेला. सामान ठेवून फ्रेश होवून मग आश्रमातील जेवणाचा आस्वाद घेतला. त्याला जेवताना जाणवले की जेवणाची चव साधीच असली तरी काहीतरी निराळे आहे ,जसे की आपण देवाचा प्रसाद घेत असावा,तसा! जेवण झाल्यावर त्याला लगेच झोप आली. आणि तो निद्राधीन झाला.

रात्री कोणतेही स्वप्न पडले नाही. शांत झोप लागली. अशी झोप गेल्या कित्येक वर्षात त्याला आली नव्हती. त्याला आश्चर्य वाटले की काल आश्रमात प्रवेश केल्यापासून एकदाही सिगरेटची आठवण कशी झाली नाही?दिवसाला दोन-तीन पाकिटे ओढणारा मी असा कसा सिगरेट विसरलो? पण का कोण जाणे,त्याला आत्ताही सिगरेट ओढावीशी वाटली नाही. त्याने भराभर आवरले व आश्रमाच्या मुख्य हॉलमध्ये आला तेव्हा सकाळचे साडेआठ वाजले होते.

गुरुजींनी त्याला जवळ बोलावले तेव्हा रोहन नमस्कार करून गुरुजींच्या आसनाजवळ खाली बसला. गुरुजी म्हणाले... रोहन बेटा ,तू इथे आलास त्याचा उद्देश फार निराळा आहे. सुटलेली नोकरी आणि रुसलेली प्रेयसी हे फक्त तत्कालिक छोटेसे कारण आहे. बालपणी तुझ्या मनाला छळणारा तो पैशाचा विचित्र विचार आठवतोय? त्या विचारात खूप काही दडलेले आहे बेटा. आता एक काम कर. सिगरेट आणि दारूसारख्या व्यसनांचा जो दुष्परिणाम जो तुझ्या शरीर आणि मनावर झालेला आहे, तो प्रथम आपल्याला धुवावा लागेल. त्यासाठी तुला धरमशालेला जायचे आहे. तिथे तू दहा दिवसांचा एक विपश्यना कोर्स कर. आणि मग माझ्याकडे ये. तुला तुझ्या खर्याफ जीवन-ध्येयाचा मार्ग त्यानंतर कळेल............................!
4
रोहन थोडा उदास होवून म्हणाला ……. गुरुजी ,मी इतका प्रवास करून आपल्या मठात आलो ,आणि इथे आल्यावर मला माझ्या सगळ्या श्रमांचे सार्थक झाल्यासारखे वाटले. आश्रमात आल्यापासून मला कसलीच भीती,चिंता जाणवत नाहीये. मला तर स्वर्ग गवसल्याचा आनंद झालाय ,आणि तुम्ही मला लगेच इथून जायला सांगताय? गुरुजी म्हणाले...........बेटा ,तुला आत्ता जे जाणवते आहे,तो मठातील आध्यात्मिक वातावरणाचा पुण्यप्रभाव आहे. इथून बाहेरच्या जगात गेल्यावर तुला पुन्हा पहिल्यासारख्याच भीती आणि चिंता सतवायला लागतील. यासाठी तू विपश्यनेला जा. माझी तिथल्या आचार्यांशी ओळख आहे. आणि तुला लगेच निघायचे नाहीये काही . तिथल्या आश्रमात प्रवेश मिळण्यासाठी काही वेळ लागेल, आपण त्यांना तार करू गावातून. मग ते लवकरात लवकर तुला प्रवेश देतील. तोपर्यंत तू इथे मठातच थांब, आणि हो... मी सांगतो ती पुस्तके मन लावून वाच.
रोहनचे समाधान झाले . त्याला गुरुजींनी T Lobsang Rampa या लेखकाने लिहिलेली काही पुस्तके दिली. ती पुस्तके वाचताना वेळ कसा निघून गेला ते कळलंही नाही. दहा-बारा दिवसात त्याने सगळी पुस्तके वाचून काढली . गुरुजींनी धरमशालेला विपश्यना विद्यापीठात तार केली होतीच. तिचे उत्तर आले आणि रोहनला आणखी दोन दिवसानंतरची प्रवेशाची तारीख मिळाली. आता त्याला मठ सोडून प्रवासाला निघायचे होते. सकाळी निघताना गुरुजींची अनुमति घ्यायला रोहन गेला तेव्हा गुरुजी म्हणाले…….. तू इथे जे अनुभवलेस, वाचलेस ... त्यात आणि विपश्यनेच्या शिकवणुकीत फरक आहे,हे लक्षात ठेव. पण विपश्यना मन शुद्ध करणारी एक उच्च आध्यात्मिक साधना आहे. विपश्यना करताना इतर कोणत्याही गोष्टींचा ,अगदी हा मठ ,मी आणि तू इथे वाचलेली पुस्तके यांचा अजिबात विचार करू नकोस. नाहीतर तिथे तुझा आणखी गोंधळ होईल,हे लक्षात असू दे....
गुरुजींचा निरोप घेवून रोहन पर्वतावरून खाली उतरू लागला. जसजसा तो गावाकडे येवू लागला तशीतशी त्याला बाह्य जगाची, मुंबईची ,प्रियाची आणि आपल्या कोकणातल्या गावात राहणार्याग आईची आठवण येवू लागली. गेल्या पंधरा दिवसात त्याने कुणाला साधा फोनही केला नव्हता. मठात विजेची सोय नसल्याने त्याच्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झाली होती. सुदैवाने पर्वताच्या पायथ्याशी असणार्यार गावात वीज होती आणि मोबाईलला रेंजदेखील होती. गावात पोहोचायला दुपारचे बारा वाजले. गावात पोचल्यावर प्रथम एका दुकानात त्याने मोबाइल रीचार्जला लावला. अर्ध्या तासात बॅटरी थोडी चार्ज झाली. त्याने पहिला फोन आईला लावला.
मुंबईत असताना तो आठवड्यातून एकदोन वेळा कोकणात आईला फोन करत असे. त्याचे वडील लहानपणीच वारलेले.आईने जिद्दीने कष्ट उपसून एकुलत्या एक रोहनला बी.कॉम पर्यन्त शिकवले. मग काही दिवस मुंबईच्या काकांकडे राहून रोहनला चांगली नोकरी मिळाली. त्यानंतर काकांशी पटेना म्हणून भाड्याने रूम घेवून रोहन नोकरी सांभाळत होता. आईला दर महिन्याला न चुकता पैसे पाठवत असे. मग त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणार्यास प्रियाकडे रोहन नकळतच ओढला गेला. मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हायला वेळ लागला नव्हता....
दोन आठवडे फोन न आल्याने आई काळजीत होती.... मी खुशाल आहे,माझी काळजी करू नकोस, फक्त आणखी काही दिवस पैसे पाठवता येणार नाहीत, नंतर फोन करतो … असे समजावून त्याने फोन ठेवला. नोकरी गेल्याचे किंवा आपण कुठे आहोत त्याबद्दल एक अवाक्षरही त्याने आईला संगितले नाही .... उगाच त्या म्हातार्याो जीवाला काळजीचा घोर कशाला?
नंतर प्रियाला फोन लावला. तिने उचललाच नाही. तीन वेळा रिडायल केल्यावर चौथ्या वेळेला फोन उचलला गेला... ती अजूनही नाराज आहे ,हे त्याने ओळखले. त्याने फोन न केल्याबद्दल माफी मागून मी आणखी काही दिवस मुंबईत येणार नाही,असे मोघम संगितले. मग तिने ऑफिसमधल्या नवीन घडामोडीबद्दल माहिती दिली, आणि तुझ्या नवीन जॉबचे काय ? असे विचारताच एकदोन ठिकाणी ट्राय करतोय ,असे सांगून फोन ठेवला.
एक वाजत आला होता. धरमशालेला जाणारी बस लेह वरुन दुपारी तीन वाजता होती. गावातून लेहला जायला एक तास आणि पुढे आणखी सहा तास असा एकूण सात-आठ तासांचा प्रवास होता. गावातून दीड वाजता बस मिळाली,आणि बरोबर अडीचला तो लेहला पोचला. तिथे थोडेसे खाऊन त्याने तीन वाजता धरमशालेची बस पकडली. सभोवतालचे निसर्ग-सौन्दर्य अप्रतिम होते. उंचच उंचच बर्फाच्छादित पर्वतरांगा , उंच सुळक्यासारखी वाढलेली हिरवीगार झाडांची जंगले, मध्येच फुलांचे ताटवे ,आणि पाण्याचे प्रवाह.... आपण नंदनवनात आलो आहोत का? असे क्षणभर वाटले.
रात्री साडेनऊला बस धरमशालेला पोचली. तिथून रस्ता विचारत रिक्षाने तो विपश्यना आश्रमात पोहोचला तेव्हा रात्रीचे साडेदहा वाजले होते. नशिबाने आश्रमातील काही मंडळी जागी होती, त्यांना गुरुजींचे पत्र दाखवताच त्याचे स्वागत करून एका छोट्याशा खोलीमध्ये त्याची व्यवस्था करण्यात आली. ती खोली दोन साधकांसाठी होती , खोलीत अगोदरच एक जर्मन युवक होता.त्याचे नाव अॅलेक्स . त्याच्याशी ओळख करून घेण्यात आणि गप्पा मारण्यात रात्रीचे बारा कधी वाजले ते कळलेच नाही. शेवटी आश्रमातील स्वयंसेवकानी त्यांना झोपायला संगितले,तेव्हा कुठे ते झोपले......
विपश्यना शिबीर सुरू व्हायला अजून एक दिवस होता. तोपर्यंत रोहन आणि अॅलेक्स यांनी अनेक विषयांवर मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांची एकदम जिगरी दोस्तीच झाली म्हणाना ...! अॅलेक्स एक इंजिनियर होता. जर्मनीतील बर्लिन शहरात वाढलेला. इंजिनियरिंग पूर्ण केल्यावर त्याला ट्रेनी म्हणून जॉब मिळाला. गेली दोन वर्षे तो ट्रेनी म्हणून काम करत होता. पण कुठल्यातरी मैत्रिणीने भारतात येवून योग आणि ध्यानधारणेचे धडे घेतले. आणि मग त्या मैत्रिणीने अॅलेक्सलाही भारतीय अध्यात्माची गोडी लावली. तिचे अनुभव ऐकून अॅलेक्सच्या मनातही भारताबद्दल आकर्षण निर्माण झाले .... आणि त्या ओढीपायी तो भारतात आला होता. ...

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

10 Feb 2013 - 1:20 pm | आदूबाळ

येऊद्या पुढचा भाग...

मन१'s picture

10 Feb 2013 - 1:44 pm | मन१

+१

नन्दादीप's picture

10 Feb 2013 - 1:56 pm | नन्दादीप

+२..

पैसा's picture

10 Feb 2013 - 3:11 pm | पैसा

पु भा प्र