हार्मोनिका- नवा छंद..

नानबा's picture
नानबा in जनातलं, मनातलं
8 Feb 2013 - 9:30 pm

गेल्या काही दिवसांपासून हार्मोनिका- अर्थात माऊथ ऑर्गन वाजवण्यात रस आलाय. त्यासाठी क्लास वगैरे न लावता आंतरजालावर युट्युब वरून काही व्हिडिओज बघून मोडकंतोडकं शिक्षण चाललंय. सध्या "तुझसे नाराज नही जिंदगी, है अपना दिल तो आवारा, ये दोस्ती हम नही तोडेंगे, छुकर मेरे मन को" इ सोपी गाणी जमायला लागलीयेत. आता थोडं पुढं सरकावं म्हणतोय. इकडे मिपा वर बरेच जुणे जाणते हार्मोनिकाकर असतीलच. त्यांच्याकडून थोडीफार मदत मिळेल काय?

कलाप्रतिसाद

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

8 Feb 2013 - 10:00 pm | श्रीरंग_जोशी

मी देखील काही महिन्यांपूर्वी हि हार्मोनिका खरेदी केली. २-३ दिवस प्रयोग करून पाहिले त्यानंतर परत हात लावला नाही.
जाणकारांनी या धाग्यावर मार्गदर्शन केल्यास मलाही लाभ मिळेल...

स्टेमीना चांगलाच वाढतो आणि आपोआप सुर जुळतात. ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

9 Feb 2013 - 9:30 am | अत्रुप्त आत्मा

अब्बा....ब्बा........ दे मारा.........!!! :-D

दादा कोंडके's picture

8 Feb 2013 - 11:10 pm | दादा कोंडके

लहान असताना घरात एक बाजा होता. फुंकून फुंकून हैराण व्हायचो. थोडसं मोठ्ठं झाल्यावर कुणितरी बाजा वाजवल्यानं ओठ काळे होतात आणि गाल फुगतात असं सांगितलं. तेंव्हापासून सोडून दिलं. नंतर निवडक स्वरच वाजवण्यामध्ये लिमिटेशन्स असतात त्यामुळे एक कला म्हणून ठिक असली तरी बाजा वाजवण्यात विशेष मजा वाटली नाही.

चिगो's picture

8 Feb 2013 - 11:15 pm | चिगो

हार्मोनिकावर मला थोडीफार जमणारी गाणी म्हणजे " ये जो देस है तेरा.." "आवाज दो हमको, हम खो गये.." "बाते कुछ अनकहीसी" (मेट्रो) मधली ट्यून.. "इक दिन बिक जायेगा माटी के मोल.." आणि इतर. पण आता बराच काळ झालाय हार्मोनिका वाजवून. आता ती तिच्या डब्बीत बंद पडलेली असते.. :-(

श्रीरंग_जोशी's picture

8 Feb 2013 - 11:19 pm | श्रीरंग_जोशी

है अपना दिल तो आवारा या गीतामध्ये वाजवलेली हार्मोनिकाची धून ऐकून मला हार्मोनिका विकत घ्यावीशी वाटली. पण तसे वाजवणे जमले नाही एकदाही म्हणून आता हातही लावावासा वाटत नाही... :-(.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Feb 2013 - 12:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ऑल दी बेस्ट..!!

"है अपना दिल तो आवारा" मधे खरच झक्कास वाजवलयं हर्मोनिका...!!

चौकटराजा's picture

9 Feb 2013 - 9:47 am | चौकटराजा

मी पुण्याच्या सिटीपोस्ट चौकातून १९७६ चे सुमारास हिरो कंपनीचे made in china हार्मोनिका रूपये वीस ला घेतली.( त्यावेळी मला चारशे रुपये पगार होता केंद्र सरकारी नोकरीत बरं का ! ) मी कुणाकडेही हे वाद्य शिकलो नाही. पण मला बरीचशी गीते यावर वाजविता येतात. उदा किसी ना किसीने, ओ तुमसे अच्छा कोन है, य ही वो जगा है, ई. या वाद्यात दोन प्रकार आहेत. एकात फक्त शुद्ध स्वरांचीच गीते वाजविता येतात .काही स्वर हवा खेचून तर काही हवा सोडून . जिभेने
तोंडाच्या पो़कळीत हवा दाबत ( पंपिंग) करीत यातून वेगळाच आकर्षक स्वर धर्म निर्माण करता येतो. त्यातील रीड चे कंपन होऊन पुढे ज्या बाजूने हवा बाहेर पडते ती हवा एका हाताने हलविली तर मस्त परिणाम मिळतो.परत हवेचा जोर कमी अधिक करून ही काही वेगळेपण साधता येते. दुसर्‍या एका प्रकारात बाजूला एक कळ असते ती दाबून कोमल half tone) स्वर काढता येतात म्हणे. ( असे म्हणे म्हणण्याचे कारण मी तशी हर्मोनिका वाजवून पाहिलेली नाही. )

विशेष असे की १९७६ साली खरेदी केलेली माझी हार्मोनिका २०१३ मधेही उत्तम वाजते. ( त्यावेळचे मेड इन चायना ची गुणवत्ता काय असावी ते आपण समजा )

मी नुकतीच ही हार्मोनिका घेतली आहे. फार सुंदर वाजते. पण वाजवणाराच फॉल्टी वाजवतो.. :D
harmonica

माझाही ती कळ दाबून कोमल स्वर वाजवता येणारी (स्केल चेंजर) हार्मोनिका घ्यायचा विचार होता. त्या वर जीना इसि का नाम है फार अप्रतिम वाजवता येतं. प.ण रू १८०० पासून पुढे त्यांची किंमत आहे कळल्यावर माझा हात आखडला. (छंदाला मोल नसतं हे जरी खरं असलं तरी पाकिट महत्त्वाचं हो.) बघू या हार्मोनिकावर जरा बरा हात बसला की घेईन म्हणतो..

चौकटराजा's picture

9 Feb 2013 - 10:50 am | चौकटराजा

प्रथमशेठ, १८०० वरच्या हरमोनिका साठी शुभेच्छा ! हातापेक्षा ओठ जीभ व श्वासावर काम करा ! यश येईलच व मग आनंद च आनंद !

मराठी_माणूस's picture

9 Feb 2013 - 10:53 am | मराठी_माणूस

अत्यंत सुंदर वाद्य आहे.
ह्या वाद्याला मर्यादा आहेत असे वाटणार्‍यांनी खालील लिंक पहाव्या. अशोक भंडारी आणि मदनकुमार यांची अफलातुन जादुगरी आहे.
http://www.youtube.com/watch?v=PYsU9Gco97o
http://www.youtube.com/watch?v=CAjfSqNXwt4&list=PL3F148AD4B372A8E3

"लाखो़ है निगाहो मे" ह्या गाण्यात "तौबा ये निगाहें, ये रोकती है राहे" ह्या ओळी मधले व्हँपिंग जबरदस्त आहे.
तसेच वेस्ट मधे वाजवले जाणारे ब्लुज ऐकावेत. टेन होल डायटॉनिक मधुन काय काय काढता येते ते बघुन थक्क व्हायला होते.

छंदास शुभेच्छा

संजय क्षीरसागर's picture

9 Feb 2013 - 12:08 pm | संजय क्षीरसागर

लाखो है निगाहमें

मराठी_माणूस's picture

9 Feb 2013 - 12:11 pm | मराठी_माणूस

धन्यवाद

शुचि's picture

9 Feb 2013 - 9:10 pm | शुचि

वा!! काय सुमधुर आहे.

तिमा's picture

9 Feb 2013 - 6:46 pm | तिमा

हार्मोनिका घेतल्याबद्दल अभिनंदन. प्रॅक्टिस केलीस तर तुला कुणाकडेही न शिकता वाजवता येईल.
जन गण मन हे ही त्यावर चांगले वाजते.