सुन री पवन

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
8 Feb 2013 - 8:03 pm

http://www.youtube.com/watch?v=FSbTl3kEyMI

'सुन री पवन' या अनुराग चित्रपटातल्या अप्रतिम गाण्याचं हे रसग्रहण नव्हे, त्यातल्या व्हिडिओची ही रनिंग कॉमेंटरी. गाण्याची टिंगल करण्याचा हेतू नाही. केवळ मौजमजा.

गाण्याची सुरवात होते तेंव्हा, प्रथम एक पामेरियन कुत्रे बीचवर धावताना दिसते. एक गुब्बु मुलगा बीचवर बॉल खेळताना दिसतो न दिसतो तोच, मौशुमी वाळूचे घर बांधताना दिसते. निळ्या साडीत गाताना ती आपले सुळे चमकवत असते. पाठीमागे आणखी बर्‍याच निळ्या साडीतल्या मुली दिसतात, फक्त त्यांच्या धुवट साड्या असतात आणि चेहेरे हे, 'आपण यांना का पाहिलत' या कार्यक्रमासारखे असतात. त्या सगळ्या अंध असाव्यात अशी शंका येते. तेवढ्यात मौशुमी केसांना वाळूचे हात लावत उभी रहाते आणि दुसर्‍याच क्षणी ते प्रचंड काटेरी फिरणारे व्हील दिसते. अशा तर्‍हेने या सगळ्या मुली का आंधळ्या झाल्या, त्याचे कारण दिग्दर्शकाने खुबीने दाखवले आहे. पुन्हा आपण एक समुद्राचा लाँग शॉट बघतो, यावेळेस त्या मुलाबरोबर पुन्हा एकदा पामेरियनचे दर्शन होते. मौशुमी नव्यानेच अंध झालेली असावी कारण ती सारखी, वाटेत येणार्‍या प्रत्येक वस्तुला धडकत चालत असते. मात्र त्या टोकीदार चाकाच्या अगदी जवळून जाऊन सुद्धा तिचे डोळे फुटत नाहीत त्यामुळे आपला जीव भांड्यात पडतो. मौशुमीचा 'आय विल लिव्ह नो स्टोन अन्टर्नड' स्टाईलने पैदल प्रवास चालूच असतो. तेवढ्यात पहिले कडवे संपते आणि मधल्या म्युझिक पीसेसच्या वेळात डायरेक्टर परत त्या मुलाला दाखवतो. श्रीमंत घरातला तो मुलगा बॉलला कीक मारतो आणि बॉल मौशुमीच्या बांधलेल्या घराजवळ येतो. पाठोपाठ मुलगाही घरंगळत येतो आणि पर्वा नसल्यासारखा, एका घरावर पाय देऊन, बॉलला कीक मारताना दुसरे घरही उडवतो.(त्याची शिक्षा त्याला पुढे, सिनेमात मिळणार असते)

आता मौशुमी झोपाळ्यावर पोचलेली असते आणि तिथे बसून ती तिचं दुसरं कडवं सुरु करते. तिची केअरटेकर(ही मात्र सुंदर असते) तिला धरुन पुन्हा परतीचा गायडेड प्रवास सुरु करते. पण मौशुमीची इतरांना धडका देण्याची हौस फिटलेली नसते. परतीच्या प्रवासातही परत ती त्याच अंध मुलीला धडक देते.(अरेरे, त्याठिकाणी आपण हवे होतो, असा विचार प्रत्येक पुरुष प्रेक्षकाच्या मनांत आल्यावाचून राहिला नसेल) दुसरं कडवं संपायच्या बेताला मौशुमी परत ओरिजिनल जागी येते. तिला त्या केअरटेकरला ते घर दाखवायचं असतं. पण चाचपडल्यावर ते उध्वस्त झाले आहे हे तिला समजते. एवढे सगळे बघितल्यावरही त्या मठ्ठ मुलाच्या डोक्यांत प्रकाश न पडल्यामुळे तो, 'तुम्हे दिखता नही?" असा मूर्ख प्रश्न विचारतो. बहुतेक, प्रत्येक प्रेक्षकाला ती आंधळी आहे हे कळावे, म्हणून हा डायलॉग घातला असावा.

गाणे ऐकताना मौशुमी अकेली, अलबेली असून तिला कोणीतरी साथी हवा आहे हे कळते. 'पूरवैया पवन' ला उद्देशून जरी ती हे म्हणत असली तरी तिच्या भावना उचंबळून आलेल्या असतात हे सूज्ञ प्रेक्षकाला सहज कळते.( इतके अप्रतिम, सुंदर बर्मनी गाणे म्हटल्यावर तिला पुन्हा एकदा याच बीचवर येऊन 'वो क्या है' हे एलपी स्टाईल भिकार गाणेही म्हणावे लागते हे तिचे दुर्दैव!)

मौशुमीसाठी लताबाईंनी मात्र, खास ठेवणीतला आवाज लावला आहे.

विनोदआस्वाद

प्रतिक्रिया

शुचि's picture

8 Feb 2013 - 8:40 pm | शुचि

खुसखुशीत लेख आहे :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

8 Feb 2013 - 9:26 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्तचं तिमा..

सस्नेह's picture

8 Feb 2013 - 10:03 pm | सस्नेह

मस्त ष्टोरी...!
इतरही हिंदी-मराठी गीतांचा पंचनामा वाचायला आवडेल..

क्रान्ति's picture

8 Feb 2013 - 10:41 pm | क्रान्ति

आता जेव्हाही हे गाणं लागेल, तेव्हा या कॉमेंटरीची उजळणी होईल मनात आणि हसून हसून पोट दुखेल! :D

किसन शिंदे's picture

8 Feb 2013 - 11:16 pm | किसन शिंदे

मौशुमी कि मौसमी?

बाकी असलं तरी गाणं ऎकायला मात्र खुप गोड आहे.

मौशुमी बंगाली उच्चार असावा. रसगुल्ला तोंडात ठेऊन नाव घेतले की येतो तसा. :)

पैसा's picture

8 Feb 2013 - 11:18 pm | पैसा

मौशुमीचे ६४ दात ही अपूर्वाईची गोष्ट 'सुळे चमकवणे' या ड्राक्युला स्वरूपात समोर आली तेव्हाच हसून पुरेवाट झाली. गाण्याचा पंचनामा भारीतला. पण अशी काही गाणी आम्ही फक्त ऐकतो. ती बघणे कम्पल्सरी बिलकूल नाही! या गाण्यात लताचा आवाज मात्र खासच लागलाय!

स्पंदना's picture

9 Feb 2013 - 8:47 am | स्पंदना

मौशुमीचा 'आय विल लिव्ह नो स्टोन अन्टर्नड' स्टाईलने पैदल प्रवास चालूच असतो.

ऐश्या कब्बीच सोचा नय बघते टाइम.

झकास! साष्टांग स्विकारा तिमा.

चौकटराजा's picture

9 Feb 2013 - 10:58 am | चौकटराजा

मौशुमी वाळूचे घर बांधताना दिसते. निळ्या साडीत गाताना ती आपले सुळे चमकवत असते.
"सगळं चांगलं पण हसली की गेली कामातून" असे त्यावेळी आम्ही म्ह्णणत असू . तिमा आपण आमच्या कालीजात ( कलेजात नव्हे ) होता काय राव ?
बाकी असाच प्रयत्न करण्यासाठी ओ ओ ओ सजना बरखा बहार आयी ( परख ) हे लता सलीलदा चे गीत सुचवीत आहे !

खटासि खट's picture

9 Feb 2013 - 10:59 am | खटासि खट

वाहव्वा ! दिलखुष लेख.
( शीर्षकावरून पवनमुक्तासनाचे फायदे तोटे असा कायसा लेख असावा असं वाटलं )

अभ्या..'s picture

10 Feb 2013 - 4:32 pm | अभ्या..

सुरेख कॉमेंटरी तिमाजीपंत.
एकदम झकास. अगदी मौशुमीसारखीच. असू द्यात सुळे पण किती छान दिसतेय.

सुळे चमकवत ? बापरे खल्लास ___/\___

तर्री's picture

11 Feb 2013 - 4:24 pm | तर्री

किती जणींनी लता च्या सुंदर गाण्यांची पडद्यावर "काशी " केली आहे त्याला काही सुमार नाही.
आपण त्या नायिकांना पाहताच नाही , काही नसतेच पाहण्यासारखे ! फक्त ऐकायचे असते.
आपली चिकित्सा आवडली.....

दादा कोंडके's picture

11 Feb 2013 - 9:37 pm | दादा कोंडके

मजा आली. अगदी सताठ वर्षापुर्वीची गाणी बघितली तरी सुद्धा ते चित्रीकरण बघून हसू येतं. त्यात परत हिंदी, मराठी दाक्षिणात्य वगैरे स्टाइली वेगळ्या.
बाकी, खूप पुर्वीपासून साउथ इंडीयन गृप ड्यांन्स गाण्यात हिरो-हिरवीन नाचताना क्यामेरा समोरून आडव्या चार पाच भाजीवाल्या किंवा तत्सम बायका जे मागं काय चाल्लय त्याच्याशी शष्प संबंध नसल्यासारख्या घाई-घाईत जाताना दाखवतात. ते तसं का? ते मला अजुनही न सुटलेलं कोडं आहे. :)