"मी जात मानतो ,मानत नाही" हे माझे मत मी इथे मांडत नाही आहे. एक विचार सहज मनात आला म्हणून.............
जर 'जात' ह्या शब्दाला आपण "एक प्रकारची विशिष्ट जीवनशैली" असे समबोधले तर प्रत्येकजण आज ज्या जीवनशैली जगतो आहे,त्यात तो जितका जास्ती रुळला आहे किवा Comfortable आहे त्याला तितके इतर जीवनशैलीत रूळने कठीण जाते किवा जाऊ शकते.
कोणत्याही जातीचा उल्लेख न करता एक ( काल्पनिक ) उदाहरण. जर दगड, पाणी,कागद आणि अग्नी ह्य्ना आपण "जात" अस समजल आणि कोत्याही एका जातिला जर जर दुसऱ्यासोबत रहायला सांगितल (लग्न करायला सांगितल,एकरूप होण्यास सांगितल) तर तो त्या सोबत तितका एकरूप होणार नाही जितका तो स्वजाती बरोबर होईल.
वरील उदाहरना सारखेच जर माणसाने लग्न समजातीच्या ( स्वजातीच्या ) व्यक्तीबरोबर केले तर ते दोन जण एकमेकात जास्त एकरूप होऊ शकतात.
म्हणून जर 'जात' ह्या शब्दाला आपण "एक प्रकारची विशिष्ट जीवनशैली" असे संमबोधले तर ते चूक कि बरोबर ????
प्रतिक्रिया
8 Feb 2013 - 3:58 pm | अनुराधा१९८०
:-)
8 Feb 2013 - 3:58 pm | पिलीयन रायडर
एक जात असणार्या दोन व्यक्तींची जीवनशैली खुप वेगळी असु शकते. मग एक जात आहे म्हणुन ते एक्रुन होणार का? जात / धर्म / देश समान नसणारे पण एकमेकांवर खुप प्रेम करुन एकत्र रहाणारे लोक आहेतच ना.. आणि समान जातीत लग्न करुन एक्मेकांच्या जीवावर उठ्लेलेही आहेतच..
8 Feb 2013 - 4:00 pm | पिलीयन रायडर
एकरुप..
आणि एकंदरीत जात फार complicated प्रकार आहे. लग्नाच्या बाबतीत तर फारच.. (म्हणजे लोक तो करुन टाकतात..)
8 Feb 2013 - 4:02 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
बास राव आता अजिर्ण झालेय आता या विषयाचे.
8 Feb 2013 - 4:10 pm | दादा कोंडके
बाकीचं माहीत नाही पण हल्ली 'आयटी' अशीच एक नवजात अस्तित्वात आलिये. :)
8 Feb 2013 - 4:16 pm | मनीषा
खरं म्हणजे पूर्वी व्यवसायांवरून जाती व्यवस्था निर्माण झाली . ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य, आणि शूद्रं. प्रत्येक जातीतील लोकांसाठी त्यांची कर्तव्ये निश्चित करण्यात आली. त्यात धर्म आणि उच्च-निचतेच्या कल्पना कधी आणि कशा आल्या माहित नाही.
हे चूक जरी नसले तरी हल्लीच्या ग्लोबलायझेशन आणि फ्युजनच्या जमान्यात काही वेगळेपण राहीलेच नाहीये. आणि तरीही जाती आहेतच.
8 Feb 2013 - 5:18 pm | सूड
ही वर्णवेवस्था होती.
8 Feb 2013 - 4:16 pm | यसवायजी
बरोबरच म्हणुयात..
पण..
ज्या गोष्टीच्या फायद्यापेक्षा तोटेच जास्त आहेत ती गोष्ट समुळ नष्ट झाली पाहीजे असं नाही का वाटत?
जीवनशैलीला फक्त 'जात' असे संबोधुन थांबतात का माणसं? नाही.. तर माझी श्रेष्ठ आणी दुसर्याची जीवनशैली कनीष्ठ आहे हे चालू.. आणी बाकी सगळ्यासाठी तर 'इतीहास गवाह' आहेच.
8 Feb 2013 - 4:20 pm | मनराव
जात जातच नाही ... काय करणार.....???
त्यामुळे अता
![2](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/0/09/Popcorn02.jpg)
घेउन बसायचे.....
8 Feb 2013 - 4:23 pm | अनुराधा१९८०
जाती व्यवस्था सर्व जगात होती आणि आहे. मध्यपुर्वेच्या इस्लाम मधे पण आहे. आत्ताच तुम्ही वासेपुर बघितला च ना. पण दुर्देवानी हिंदू मधलेच काही लोक सतत शिव्या घालत असतात हिंदू लोकांना. बरे त्यांना कोणी जबरदस्तीने ठेवले आहे का हिंदू म्हणून.
ग्रीक, रोमन लोंकांच्या मधे पण जाती होत्या. सर्व रोमन जनतेला पण सर्व अधिकार नव्हते. तिथे राज्यकर्ते काही घराण्यातुन च यायचे. आणि जे रोमन नव्हते त्यांना गुलाम म्हणुन वागवले जाई.
जुन्या बुद्धांनी का नाही नवबुद्धांना आपले मानले? मग बुद्ध धर्मावर कोणी का नाही जातियतेचा शिक्का मारत?
शीख धर्म काढण्याचे एक कारण हिंदू मधली जाती व्यवस्था होती, पण शीख धर्मीयात पण जातीव्यवस्था तशीच पाळली जाते. धर्मग्रंथा मधे जातीव्यवस्था नाही म्हणजे जमिनीवर समाजात नाही असे नाही
8 Feb 2013 - 4:37 pm | बॅटमॅन
एक नवीन काडी टाकतो. नवीन संशोधनातून निष्पन्न झालेले आहे की जातीची कन्सेप्ट ही हिंदू धर्माअगोदरची असून मूळची दक्षिण भारतात उगम पावली असावी. हिंदू धर्मातील वर्ण वगैरे भानगडींच्या आधीच असे झालेले असणे म्हंजे किती मजेशीर आहे किनै =)) =))
http://www.thehindu.com/sci-tech/science/caste-system-an-indigenous-inve...
8 Feb 2013 - 4:39 pm | गवि
विचार चांगला आहे पण उदाहरणातला ढोबळपणा कमी करुन एक पाऊल रास्त उदाहरणाच्या दिशेने टाकू.
व्यवस्था अशी आहे की दगड, पाणी, हवा, अग्नी असे घटक नसून,सगळे वेगवेगळ्या प्रकारचे, पोताचे, घनतेचे, रंगाचे दगडच आहेत असं समजू.
उदाहरण आता असा ट्विस्ट घेईल की,
-देवळाचा दगड, किल्ल्याच्या दगड, दुकानाचा दगड, संडासाचा दगड असे प्रकार मानले जायला लागणं..
-संगमरवर, शुभ्र.. ते देवळालाच.. तेही विष्णूच्या.. खंडोबा, भैरोबाला जSSSरा खडबडीत लोकल दगड चालेल..
-कडप्पा काळा.. तो संडासालाच.. बाथरुमला त्यातल्यात्यात उजळ कोटा स्टोन..
-कोटा निदान आंघोळीच्या पाण्याने साफ राहतो म्हणून त्याला कडाप्पाच्या एक स्टेप वरचा दर्जा..
-संगमरवराला कोट्याचा विटाळ, तसा कोट्याला कडप्प्याचा..
साधारणपणे सर्व दगडांचे स्वभाव वेगळे पण त्याउपरही एखाद्या विशिष्ट कडप्प्याला एका संगमरवरासोबत लग्न करायचं असेलच तर दोघांच्या बिरादरी ते होऊच देणार नाहीत..
असं उदाहरण आहे ते.... :)
9 Feb 2013 - 4:13 am | खटपट्या
प्रचन्ड कन्टाळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळा ! चोथा झालाय ! काहीतरी नवीन घ्या हो !!!!