मला समजलेले गांधीजी (भाग - १ ) - गांधीहत्या आणि मी
मला समजलेले गांधीजी (भाग - १ )
१. गांधीहत्या आणि मी
विद्यार्थिदशेत मी मुंबई ला राहायचा . बांद्रे . मातोश्री पासुन पाच मिनिटावर . हिंदुत्वान भारलेलं वातावरण होत . रुद्राक्षाच्या माळा . गंध . शाल . खणखणाट. शिवसेनेच्या शाखेवर कोलनितलि पोरं पडिक असत. कैरम खेळताना तिथं चाललेल्या देशभक्तीच्या चर्चा कानावर पडत असत. त्यात गांधिजिंचा उल्लेख टकल्या असाच हमखास होत असे. त्यानं देशाची वाट लावली असं ठाम मत सोंगट्या उडवताना व्यक्त केल जाई . आणि त्यावर माझाही विश्वास बसलेला होता. त्यांची बकरी , पंचा, मुसलमानांच लांगुलचालन हे सारे आमच्यासाठी विनोदाचे विषय होते. गांधिंनि सगळ्या हिंदुना बकरी बनवायचा ध्यास घेतला होता . मुसलमानांच्या बकरी ईद ची सोय करायला ... किवा ... हो गांधीजी हे राष्ट्र पिता आहेतच कारण - त्यांनी देशाची आई **ली...... . किंवा याहून घाणेरड्या विनोदांना आम्ही धो धो हसून दाद देत असू. पुढे कुठल्यातरी पुस्तक प्रदर्शनात गोपाळ गोडसे यांच पुस्तक हाती लागलं . पुस्तकाच्या कव्हरवर आगीच्या ज्वाळा होत्या . विकत घेऊन वाचल. त्या पुस्तकांनी त्यावेळी मनात आग पेटली होती . देशाची फाळणी करणाऱ्या आणि दुश्मन पाकड्यांसाठि पंच्चावन्न कोटीचे दान देणार्या या अधमाला नथुराम गोडसे मारतो ते एक राष्ट्रीय काम होते असे मला वाटत असे. देशभक्ती हे पाप असेल तर मी पापी घोर भयंकर । मात्र पुण्य ते असेल जर मग नम्र माझा अधिकार तयावर !
अहिंसे चे बाळकडु पाजून गांधीने देश षंढ बनवला. हिंदुस्थान च्या नामर्द पणाचा हा बाप आणि पाकिस्तानचा राष्ट्रपिता - त्याविषयी आदर वाटणं मला शक्यच न्हवतं . वाचनाच्या गोडितुन पुढे मला विज्ञानाविषयी प्रचंड आकर्षण आणि कुतूहल निर्माण झालं . प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव असतो आणि मानवी बुद्धीला अधिक प्रयत्नाने आज ना उद्या तो उलगडू शकतोच असे मला वाटे. पूर्वी वरुणराजा पाउस पाडत असे. त्यानं तो पाडावा म्हणुन ऋषी यज्ञ करत असत . आता समुद्रातल्या वाफेचे ढग बनून नैऋत्य मोसमी वार्यांमुळे पाउस पडतो हे ठौक झालय. आपण कृत्रिम पाउसही पाडू लागलोय . जगातली सर्व रहस्ये विज्ञान उलगडू शकते ... आज नाही तर उद्या पण मानवी तर्कशास्त्राला सारे उलगडेल .. अशी आमची विज्ञान निष्ठ - बुद्धिवादी दृष्टी विकसित होत होती . त्यामुळे तर गांधी विषयीच्या तीरस्कारात भरच पडत गेली. अस्पृश्यता काढता म्हणुन भुकंप होतात असे म्हणणारे सनातनी आणि अस्पृश्यता पाळता म्हणुन भुकंप होतात असे म्हणणारे गांधी.... दोघेही सारखेच मूर्ख आहेत असे मला वाटे . गांधिजिंचे अध्यात्म - आत्मशुद्धीचे उपास, श्रद्धावानांचा सेनानी होण्याचा त्यांचा मनसुबा, त्यांची विज्ञान विरोधी भूमिका , हिंद स्वराज मध्ये त्यांनी रेल्वे पासून सर्व तंत्रद्न्यानाला केलेला विरोध त्यांचे ब्रह्मचर्य आणि सत्याचे प्रयोग सार - सार बालिश खेडवळ आणि बावळटपणाच आहे असा मजबूत ग्रह मी करून घेतला होता. समग्र सावरकर साहित्याचे वाचन केल्यावर (थोड्याकाळासाठि का होईना) पण सावरकर वाचले असते तर खुद्द मोहनदास करमचंद गांधीही -- गांधिवादाचे विरोधक बनले असते असे वाटे.
पुढे वाचन वाढलं तसतसं देशासमोरचे अधिक प्रश्न नजरेस पडु लागले. डॉ आंबेडकरांच कीर लिखित चरित्र वाचल्यावर- जातिव्यवस्था हा रोग संपविल्याशिवाय देशाच भल होणार नाही हे मनापासून पटल. तिथेही व्हिलन गांधीच होता. चातुर्वणाचा समर्थक गांधी हा सनातनी होता आणि म्हणुनच त्याचे विचार आपल्या देशाला जातिमुक्त होऊ देत नाहीत असेही वाटे. पुढे सावरकर लिखित गांधी गोंधळ , अरुण सारथिंचे गांधिंवरिल टिकास्त्र आणि डॉ आंबेडकरांचे - गांधी आणि कोंग्रेस ने अस्पृश्यांसाठी काय केले ? हि पुस्तके माझ्या मनातला गांधी विरोध अधिकाधिक प्रबळ करत गेली .
एक वेळ अशी आली कि वेगवेगळ्या पुस्तकातली उलट सुलट मते आणि तर्क वाचण्या बरोबरच ... माणसं वाचण अधिक आवश्यक आहे अस मला वाटु लागलं. कारण मत बनत ते माणसाच्या अनुभवातून . माणसं वाचू लागलो तसे नवे गांधी कळत गेले ...
आणि गांधिंच हे पुस्तकाबाह्य आकलन फार वेगळ होतं . आज गांधीचा स्मृतिदिन .त्यानिमित्ताने ३ भागात माझे गांधिंविषयि आकलन लिहिण्याचे ठरवले आहे.
हिंदुत्व वादी आणि आंबेडकरवादी या दोघांचाही गांधी हा प्रमुख आणि समान शत्रू आहे. तरीही या मुद्द्यापुराता का होईना पण या दोन प्रवाहांचा संगम झाल्याचे आढळत नाही. ते का ? हा चिंतनिय प्रश्न आहे. आणि लेखमालेच्या उद्याच्या दुसर्या भागात त्याचा उहापोह आपण करू . हिंदुराष्ट्र वादाच्या ध्येयाने पछाडलेल्या बहुसंख्य अतृत्प आत्म्यांना मात्र गांधी "वध " हा समर्थनीय आणि वधकर्ता पूजनीय वाटतो . ( कधी उघड पण निदान मनात तरी कायम ! )
साधारणत : पाच वर्षापूर्वी पुण्यातल्या एका हिंदुत्व वादी मंडळाने २ ऑक्टोबर ला समारंभाचे आयोजन केले होते. . कडव्या हिंदुत्व वादी मंडळिंनि गांधिजयंतिचा कार्यक्रम ठरवला या धक्क्यातून कसाबसा सावरत मी कार्यक्रमस्थळि पोचलो . तिथे ढोल ताशांचा गजर चालू होता . गुलाल उधळला जात होता. मंडळी नाचत होती . अध्यक्षांना भेटलो. अध्यक्षसाहेब म्हणाले " अभिनंदन ". "?". " आज गोडसेंनि गांधीला ठोकला !" . मी कपाळावर हात मारून घेतला. जयंती आणि पुण्यतिथि यातला फरक सांगण्यापासून सुरवात करावी लागणार होती !
विनोदाचा भाग सोडाहो . पण अज्ञान हा दोष नाही . गडबडीत चूक होऊ शकते . ३० जानेवारी हि गांधिंचि पुण्यतिथि साजरी केली जात नाही . कारण त्या दिवशी त्यांचा खून झाला होता. २ ऑक्टोबर हि एकच गांधी तारीख जनतेत बहुदा ड्राय डे मुळे फ़ेमस आहे. बिचार्यां अध्यक्षांनि गांधी विषयीच्या अज्ञानामुळे हा गोंधळ घातला होता.
नथूरामच्या नाटकाने आणि गोपाळ गोडसेंच्या पुस्तकाने असे भरपूर अज्ञान पसरले आहे. मुख्य गोंधळ आहे तो वध - हत्या - खून या शब्दावरून .संस्कृतात किवा मराठीत कोणत्या अर्थाने हे शब्द वापरले जातात ? इथपासून गोंधळ सुरु होतो.
संस्क्रुत डिक्शनरी -
१) http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?page=424&table=molesworth&d...
२) http://www.andhrabharati.com/dictionary/sanskrit/index.php#ws-1
वध आणि हत्या यात फारसा फरक नाही . वध म्हणजे वाइट व्यक्तीला ठार मारणे असा अर्थ तर बिलकुल नाही . 'पाञ्चजन्य'मध्येसुद्धा 'गोवधबंदी' असा शब्द वापरला गेलेला आढळला. गोवध हा शब्द कसा रुढ झाला मग ? गाय हि आपल्या पूर्वजांच्या मते दुष्ट होती काय ?
दोन व्यक्तींच्य समोरासमोरच्या द्वंद्वात होतो तो वध. आणि युद्धात सामुहिक होतात त्या हत्या . साधरणत: असे वापरण्याचा प्रघात आहे. मी नथुराम बोलतोय नाटकाचे मराठीला योगदान काय ? असा प्रश्न कोणि विचारला तर वध शब्दावरून घातलेला घोळ असे त्याचे उत्तर येईल.
नाटकातला नथुराम म्हणतो :
" आपण शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला असे म्हणतो - हत्या नाही - म्हणुन मी पण गांधीचा वध केला असे म्हणावे" असे नाटकातल्या नथूरामचे म्हणणे आहे. कंसवध हा शब्द वापरला जातो ते दोन व्याक्तीतले द्वंद्व युद्ध होते म्हणुन . चांगल्याचा वाइटावर विजय या अर्थाने नव्हे. हे नाटकातल्या नथुरामला कळलेले दिसत नाही . इथे त्या नथुरामचे संस्कृत भाषेविषयीचे अज्ञान दिसून येते. नाहीतर वध हा शब्द अनेकदा वाइट अर्थानेही वापरला जातो हे त्याच्या लक्षात आले असते. निदानपक्षि गोवध , अभिमन्यू वध, पितृवध, मातृवध, इत्यादी शब्द तरी "पंडित" नथुरामला ठाउक नकोत का?
मुळ मुद्दा असा आहे कि इथे नथुरामला स्वत: ला शिवरायांची आणि गाधिंना अफझलखानाची उपमा द्यायची आहे. नथूरामची उपमा चुकली आहे. कंसवध , जरासंधवध , अफझलखान वध इत्यादी वधांच्य प्रसंगी समोरासमोरचे द्वंद्व युद्ध झाले होते . दोन्ही बाजू सशस्त्र होत्या . युद्धसज्ज होत्या . तूल्यबळ होत्या. एका शक्तिहीन निशस्त्र म्हातार्या माणसावर गोळ्या झाडणे हे समोरासमोरचे द्वंद्व आहे काय ? पुरुषार्थ आहे काय ? निदान नथुराम ने गांधिंना प्रतिकाराची संधि तरी दिली होती काय ?
गांधिंनि प्रतिकार केला नसता हि गोष्ट वेगळी .. पण जिथे द्वंद्व् झालेच नाही तिथे वध होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही . तो एक भ्याड खून होता.
गांधिंना हरवण्याचा द्वंद्वात्मक मार्ग होता . - तो म्हणजे लोकशाही मार्गाने कोंग्रेसला पराभूत करणे. हि लोकशाही गांधीची कोंग्रेसच देऊ पाहात होती. नथुरामला प्रतिकार करण्याची संधि गांधीच देत होते. पण नथुरामला आणि त्याच्या हिंदुमहासभेला गांधिंना निवडणुकीत हरवणे शक्य वाटत न्हवते. म्हणुन त्यांनी निवडणुकांच्या लढाइतुन पळ काढला . आणि खुनाचा शोर्ट कट स्वीकारला.
राजकीय खून हे इतिहासात घडलेले आहेत. जेंव्हा इतर सर्व मार्ग बंद होतात तेंव्हा खुनाचा पर्याय शिल्लक राहतो. मदनलाल धिंग्रा किंवा भगतसिंग यांनीही राजकीय वध केले होते . पण इंग्रजांशि लढण्यासाठी तेंव्हा लोकशाहीचे कोणतेहि मार्ग शिल्लक न्हवते. त्यामुळे ते समर्थनीय वाटतात .
मग नथुरामचा शोर्ट कट त्याच्या अनुयायांना का समर्थनीय वाटतो ?
देशाची फाळणी हा हिंदुत्व वाद्यांच्या लेखी एका महान गुन्हा आहे. आणि मातृभूमीचे तुकडे करणार्याला त्यांच्या लेखी एकच शिक्षा आहे - वध !
ज्यांना वाढ्त्या मुस्लिम लोकसंखेची चिंता आहे. बांग्लादेशींच्या घुसखोरी मुळे जे अस्वस्थ आहेत असे हिंदुत्ववादी..... अखंड भारतवादीही असतात... हा एक विनोदच आहे. अखंड भारतात बांग्लादेश तर येतोच पण पाकिस्तान सकट ची सर्व मुस्लिम लोकसंख्या ही येते. अखंड भारतातली मुस्लिम लोकसंख्या ४०% च्या आसपास जाते. आज १२% मुस्लिमांसमोर हतबल झालेले राजकीय हिंदू नेत्रुत्व अखंड भारतात शिल्लक तरी राहिल का?
हिंदू लोक शेतकरी. जमिनीला माता मानणारे. भूगोलावर त्यांचे लैच प्रेम. त्यांचा मनात अखंड भारतमाता घर करून बसली आहे. पण अखंड भारत म्हण़जे केवळ भुगोलांची बेरीज न्हवे. त्यात लोकसंख्येची बेरीज आहे. इतिहासाची वजाबाकी आहे आणी धर्माचा भागाकार आहे.
खरे पाहता हिंदू समाजात आणी धर्मात तुलनेने राष्ट्रवादी गोष्टी कमी आहेत. हिंदूधर्माची मूलभूत शिकवण - परधर्म सहिष्णुता विरुद्ध इस्लामी जिहाद आणी उम्मत( कुराणसिद्ध मुस्लिम बंधुभाव) विरुद्ध हिंदू ची जातिव्यवस्था. ही लढाईच विषम आहे. हिंदुंकडची एकमेव जमेची बाजू म्हणजे त्यांची लोकसंख्या. अखंड भारतात त्या एकमेव जमेच्या बाजूचे महत्व झपाट्याने कमी होणार होते.
फाळणी केवळ भूभागांची झाली नाही. फाळणी मुस्लिम लोकसंख्येची झाली . अन भारतातल्या मुस्लिमांचे सांख्यीकी महत्व झटकन उतरले.
मुस्लिमांचे पायचाटे म्हणून गांधींना अहोरात्र शिव्या देणारे लोकमान्य टिळकांना मात्र पूजतात. . कुरुंदकर म्हणतात " एका मुसलमानाला तीन मतांचा अधिकार देउन; लखनौ कराराच्या वेळी कोंग्रेस मधील मुस्लीम लांगुलचालनाचा पाया; खुद्द लोकमान्य टिळकांनी घातलेला आहे. हे हिंदुत्ववादी का विसरतात ?"
फाळणीमुळे अखंड भारताच्या धोक्यापासून हिंदूंचे रक्षण झाले. हे वास्तव समजून घेतले पाहिजे.
१५ ऑगस्ट १९४७ ला झालेल्या फाळणीला जवाबदार कोण ? हा प्रश्न गेली गेली ६५ वर्षे हिंदुस्थानी विचारवंतांना छळतो आहे. हिंदुत्ववादी अखंड हिंदुस्थानचा जप करत यासाठी गांधींच्या अहिंसक स्वभावाला जवाबदार ठरवतात. तर सेक्यूलर विचारवंत फाळणीसाठी संघाचा आक्रमक हिंदुत्ववाद आणी सावरकरांनी द्वीराष्ट्रवादाला दिलेली मान्यता या गोष्टी दोषपूर्ण मानतात.
सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली द्विराष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती त्यावेळी गांधिजी शाळकरी वयाचे होते आणी चार वर्षाचे सावरकर नुकतेच बोलायला शिकले होते. द्विराष्ट्रवादाच्या मागणीसाठी या दोन्ही लहानग्यांना जवाबदार ठरवणे हे बालिशपणाचेच ठरेल.
द्विराष्ट्रवादाची मागणी फाळणीसाठी न्हवतीच ती अखंड भारतासाठी होती. सर सय्यदांची द्विराष्ट्रवादी भुमिका एकदा समजली की फाळणीची अपरिहार्यता चटकन लक्षात यील.
मुस्लिम अल्पसंख्य आहेत. पण ती एक राज्यकर्ती जमात आहे. भारत स्वतंत्र झाला की लोकशाही आलीच. संख्येच्या बळावर हिंदू ही राज्यकर्ती जमात बनेल. डोक्याचे वजन न मोजता डोक्यांची फक्त संख्या मोजणारी भुक्कड लोकशाही सय्यद अहमदांना मान्य न्हवती. हिंदू आणी मुसलमान हे भारत नावाच्या वधूचे दोन सुंदर डोळे आहेत म्हणून राजकीय सत्तेचे वाटप दोन्ही डोळ्यांना समान झाले पाहिजे. आणी म्हणूनच सर्व सत्ताकेंद्रात (लोकसभा ते ग्रामपंचायत) ५० % राखीव जागा मुस्लिमांसाठी असल्या पाहिजेत असे सय्यदांचे म्हणणे होते. ३०% मुस्लिमांसाठी ५०% जागा आणी हिंदूच्या भावनेसाठी अखंड भारत. असा द्विराष्ट्रवादाच्या मागणीचा आशय आहे.
मोहनदास गांधी नावाच्या बनेल म्हातार्याने. द्विराष्ट्रवाद कधीच मान्य केला नाही. फाळणी मात्र देउन टाकली !
सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:!
(अर्थः सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली तर शहाणा माणूस अर्ध्याचा त्याग करतो आणी उरलेल्या अर्ध्या चा स्वीकार करतो ! )
त्यामुळे गांधिंनि फाळणी करून हिंदुचा घात केला आणि म्हणुन त्यांचा वध समर्थनीय आहे असे म्हणणारे डबल ढोलकी ठरतात.
मग गांधी हत्येचे समर्थन करण्याचे काही कारण उरते काय ? गांधिंनि हिंदुचे व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून दूरदृष्टीने योजनापूर्वक फाळणी केली असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही .
पण गांधिहत्येच्या समर्थकांनाहि ते कारण पुढे करता येणार नाही कारण सकृत दर्शनी तरी फाळणी हिंदुना हितकारक ठरली आहे.
५५ कोटीचे कारण तसेच फुसके आहे. गांधीना मारायचे प्रयत्न ५५ कोटीच्या आधीपासूनचे आहेत. असे अनेक प्रयत्न नथुराम गटाने बरीच वर्षे केलेले आहेत.
डॉ आंबेडकरांचे पाकिस्तान ओर पार्टिशन ऑफ इंडिया हे पुस्तक अशाच डबल ढोलकी विचारवंता कडुन अनेकदा वापरले जाते. वस्तुत: आंबेडकरांनि हे पुस्तक फाळणीचे समर्थन करण्यासाठी लिहिलेले आहेत. दार उल हार्ब आणि दार उल इस्लाम अशी जगाची वाटणी इस्लामी धर्मशास्त्राने केलेली असल्याने मुस्लिमांचे हिंदुबरोबर सहजीवन अशक्य आहे - फाळणी अपरिहार्य आहे असे आंबेडकर म्हणतात. अखंड भारतात धार्मिक प्रश्न उग्र बनून राहतील आणि मग सामजिक सुधारणांकडे लक्ष द्यायला कुणाला वेळच उरणार नाही . या भावनेतून वेगळ्या चुली मांडणे बरे म्हणत आंबेडकरांनिहि फाळणीला पाठिंबा दिला आहे.
नथुरामला आणि त्या विचारसरणीच्या लोकांना हिंदु समाजाचे आकलन झालेलेले न्हवते . आजही झालेले नाही . हिंदु समाज अहिंसक वगैरे कधीच न्हवता. महाभारतातलि भाउबंदकि आधुनिक भारतापर्यंत सनातन चालू आहे. शेतिच्या बांधावरुन भाऊ भावाचे खून करतो. राज्यावरून चुलत्यांचे रक्त वाहवले जाते. जातिपातिंचा आजचा संघर्ष थेट एकलव्य किवा शंबुक किंवा परशुराम पर्यंत भिडवला जातो. हिंदु लोक एक राष्ट्र - एक जीव नाहीत. आधुनिक राष्ट्रवादाच्या, लोकशाहीच्या परिप्रेक्षातुन हिंदुना पहायला शिकवणे हि काळाची गरज होती. त्यासाठी गांधिंनि अहिंसा हे उपकरण वापरले. त्यानेच त्यांनी हिंदु लोकांची मने जिंकली. महाराष्ट्रातले उदाहरण द्यायचे झाले तर ब्राह्मणेतर चळवळीचे देता येईल . टिळकांची जहाल कोग्रेस ब्रहमणेतर चळवळीला कधीच आपली वाटली नाही. त्या जहाल्पणात काहिंना ब्राह्मण्याचा वास येत होता. पण अहीसक गांधिंच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणेतर पक्ष कोंग्रेस मध्ये आला हे विसरता येईल काय ? गांधिजिंच्या अहिंसेबद्दल आपण तिसर्या भागात अधिक सविस्तर चर्चा करू.
फाळणी झाल्यानंतरहि मुस्लिमांना दंगलीची झळ पोचू नये म्हणुन हा महात्मा वणवण फिरत होता. पाकिस्तानातल्या हिंदुवर होणार्या अत्याचाराने नथुराम पेटुन उठला होता. त्याला इथल्या मुस्लिमांवर सुड उगवायचा होता ...... आणि हिंदुसमाजाला सुडाच्या तत्वाद्न्यानापासून दूर नेणारा महात्मा त्याला नको होता असाही तर्क लढवता येईल . सूडाचे तत्व अस्तनिताल्या निखार्यासारखे असते ते स्वत:लाही जाळतेच . दशतावादाला खतपाणी घालणार्या पाकिस्तानात आज तोच जिहाद अंतर्गत भस्मासुर बनला आहे हे दिसत नाही काय ? तरी क्षणभर युक्तिवादासाठी मान्य करू ...कि नथुरामला सुड घ्यायचा आहे. गांधिहत्येचा परिणाम काय झाला ? गांधीला गोळी घालताच एका क्षणात भारतातल्या मुस्लिम विरोधी दंगली थांबल्या हे खरे नाही काय ? नथुरामच्या गोळीने असंख्य मुस्लिमांचे जीव वाचले . त्याचे सुडाचे तत्व फेल झाले . पाकिस्तान ची निर्मिती हा गांधिविचाराचा पराभव आहे असे कोणास म्हणायचे असेल तर गांधिहत्येचा परिणाम हा नाथुरामि बदला तत्वाचा पराभव आहे हे हि मान्य करावे लागेल .
पाकिस्तानची निर्मिती हा गांधीच्या सर्वधर्म समभावाचा पराभव होता असे म्हणणारे लोक कुराणाचा दाखला देण्यात पटाईत आहेत . कुराणातला जिहाद. काफ़िरांना मारण्याच्या आज्ञा . इस्लाम धर्माची ( कुराण प्रणित ) इतर धर्माप्रती असहिष्णुता याचे दाखले - कुराणातल्या आयतिंचे क्रमांक देत अवश्य देता येतील . गांधिजिंचि सर्वधर्म समभाव नावाची एक छोटीशी पुस्तिका आहे. त्यात गांधीजी विनम्रपणे म्हणतात कि दास आणि दस्युंविरोधातल्या ऋग्वेदातल्या ऋचांचे क्रमांक हि असेच दाखवता येतील . मानुस्मृतीतली शुद्रविरोधी टिपणे श्लोकांच्या क्रमांकासहित प्रसिद्ध झालेली आहेत . त्याचा नेमका अर्थ वेगळाच आहे असा वाद सर्व धर्म मार्तंड घालत बसतात. गांधीबाबा हि सुट - धर्माचा आधुनिक अन्वयार्थ काढण्याची सुट .... सर्वच धर्मांना देतात आणि त्याला - सर्वधर्म समभाव असे नाव देतात .
आर्य समाजाचे संस्थापक , दयानंद सरस्वतिंनि आपल्या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथात मानुस्मृतीतली समता (!) उलगडली आहे. आंबेडकरांनि दयानंद सरस्वतिं बद्दल अनेकदा आदर व्यक्त केलेला आहे. फुलेंनी त्यांची पुण्यात मिरवणुकाही काढली होती. शाहू महाराज तर आर्य समाजिस्टच! कारण ग्रंथात काय आहे यापेक्षा ... भाष्य काराचा हेतू काय आहे हे महत्वाचे असते. गांधिंच्या मौलाना आझाद नामक शिष्याने कुराणातला सर्वधर्म समभाव उलगडला आहे ! गांधिंचा सर्वधर्म समभाव हा असा आहे.
थोडक्यात गांधिहत्येचे हिंदु म्हणुन समर्थन करता येत नाही हे मला उमगले आहे. त्यांच्या सर्व धर्म समभावा वर टिका करताना भान सोडले जाते हेही समजले आहे .
तरी अधुनिक दृष्टिकोनाचे बुद्धिमान विचारवंत डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यात वाद का झाले त्याचे खरे स्वरुप काय होते ... हा प्रश्न मला अस्वथ करतो. ..
(क्रमश:)
आगामी
२) डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी
३) पुस्तकांपलिकडचे गांधी
प्रतिक्रिया
31 Jan 2013 - 1:15 pm | क्लिंटन
राजघराणे यांचा अजून एक उत्तम लेख.
+१. अखंड हिंदुस्तान रहावा असे म्हणणारे एक गोष्ट विसरतात (आणि मी पण सुमारे ३-४ वर्षांपूर्वीपर्यंत अशा विसरणार्यांपैकी एक होतो) की देश अखंड ठेवणे म्हणजे केवळ भूप्रदेशांची बेरीज नाही तर लोकसंख्येचीही बेरीज आहे. १९४७ मध्ये जर फाळणी झाली नसती तर त्यानंतर सततची अशांतता नांदली असती.आज पाकिस्तानात भारतापेक्षा जास्त बॉम्बस्फोट होत आहेत हे समोर दिसतच आहे.आपल्याच धर्माच्या लोकांचा जीव घ्यायला ते लोक स्वतः मानवी बॉम्ब बनून आपला जीव द्यायला मागेपुढे बघत नाहीत हे समोर दिसतच आहे.आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान एक सीमा आहे.त्यामुळे आजही पाकिस्तानातील अशा तत्वांना भारतात मुक्त प्रवेश नाही तर लपून-छपून यावे लागते. जर का ती सीमाच नसती तर अशा तत्वांचा अगदी मुक्त संचार सर्वत्र असता आणि अखंड भारतात किती अशांतता नांदली असती याचा विचार कोणी केला आहे का?
तेव्हा मला वाटते जे काही १९४७ मध्ये झाले ते एका अर्थी चांगलेच झाले.त्यातूनही १९४७ मध्ये फाळणी झाली नसती तर ती भविष्यात कधीतरी झालीच असती.त्यातूनही मुस्लीम लीगचे स्वप्न-- पूर्ण पंजाब (दिल्लीपर्यंत) आणि पूर्ण बंगाल (कलकत्त्यापर्यंत) पाकिस्तानात जायची शक्यता अधिक ठळक झाली असती. तेव्हा १९४७ मधल्या परिस्थितीत फाळणी मान्य करणे हाच योग्य विचार ठरला.मुस्लीम लीगला पाकिस्तान हवा होता त्यापेक्षा बराच लहान पाकिस्तान त्यांना मिळाला आणि त्याला "मॉथ इटन पाकिस्तान" असे म्हटले गेले.पण असा "मॉथ इटन पाकिस्तान" देऊन देशाचा आणखी लचका भविष्यात तोडला जायचा धोका तर त्यामुळे कमी झाला? १९४७ मध्ये अगदी जालंधर-लुधियाना शहरांमध्येही मुस्लीम बहुसंख्या होती-- जिल्ह्यात नव्हे.पण त्यावेळी झालेल्या दंगलींमध्ये तिथल्या मुस्लीमांना एक तर यमसदनी धाडले गेले किंवा पाकिस्तानात हाकलले गेले आणि यातूनच सध्या भारतात असलेल्या प्रदेशात मुस्लीमांचा टक्का कमी झाला.तीच गोष्ट जम्मू प्रांताची. तिथेही मुस्लीम बहुसंख्या होती पण दंगली आणि स्थलांतरे यामुळे आता तिथे हिंदू बहुसंख्या आहे. या गोष्टी हिंदूंच्या हिताच्या ठरल्या कारण अशा ठिकाणी नव्या पाकिस्तानची मागणी व्हायची शक्यता घसरलेल्या मुस्लीम टक्क्यामुळे कमी झाली.अर्थातच सगळ्या मुस्लीमांनी नव्या पाकिस्तानची मागणी नक्कीच केली नसती पण अशी मागणी करणारे मुस्लीमच असते आणि एकूणच मुस्लीम टक्का कमी झाला त्यात अशांचाही टक्का कमीच झाला नाही का? तेव्हा प्रश्न हा की गांधींना फाळणीचा दोष द्यायचा की फाळणीचे श्रेय द्यायचे.
अगदी अगदी.पण होते काय की स्वातंत्र्यलढ्यात मुस्लीमांचा सहभाग असावा या हेतूने गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला तर ते "दाढ्या कुरवाळणारे" ठरतात पण त्याच उद्देशाने टिळकांनी लखनौ करार केला तर ते मोठे मुत्सद्दी ठरतात.कलकत्त्याचे महापौर असताना सुभाषचंद्र बोसांनीही मुस्लीमांना राखीव जागा दिल्या होत्या असे वाचल्याचे आठवते.पण त्याबद्दल सुभाषचंद्रांना कोणी दोष देत नाही.या सगळ्या प्रकारात एकच दुवा समान दिसतो आणि तो म्हणजे आंधळा गांधीद्वेष.
सध्या इतकेच.वेळ मिळेल त्याप्रमाणे या चर्चेत भाग घेईनच.
1 Feb 2013 - 11:45 am | सुधीर
फाळणीवरचा प्रा. शेषराव मोरे यांनी लिहिलेला "अखंड भारत" गांधीजींचाच नकोसा हा लोकरंग मधला लेख (मूळ ग्रंथ "‘कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?") वाचल्यावर फाळणीबद्धलची भावनिक मतं बदलली होती.
16 Oct 2013 - 7:55 pm | भ ट क्या खे ड वा ला
सहमत
1 Feb 2013 - 11:22 pm | आजानुकर्ण
उत्तम लेख. पाकिस्तान आणि फाळणीबाबत आंबेडकरांनीही वेगळ्या देशाचे समर्थन केलेच होते.
26 Oct 2013 - 2:45 pm | आनन्दा
लोकमान्य टिळकांनी आणि सुभाष्चन्द्र बोसांनी ही असे करार केले असतील.. पण त्यांचे बाकीचे वागणे हिन्दुविरोधी नव्हते.
उदा. श्रद्धानंद खून खटला
परंतु हेच गांधी भगतसिंगांच्या फाशीच्या वेळेस उभे राहिले नाहीत.
अश्या प्रकारची उदाहरणे इतरांबद्दल उपलब्ध नाहीत.
31 Jan 2013 - 1:30 pm | मन१
ह्यातला बराच भाग तुमच्याच "फाळणी : काँग्रेसचे हिंदुंवर उपकार" अशा कुठल्याशा धाग्याखाली वाचले होते.
बरीच सविस्तर चर्चा केलेली दिसत आहे.
31 Jan 2013 - 2:11 pm | अमित
पुढील भाग लवकर येऊ दे :)
31 Jan 2013 - 2:39 pm | अत्रुप्त आत्मा
अगदी असेच म्हणतो... उत्तम लेख +१
31 Jan 2013 - 2:49 pm | परिकथेतील राजकुमार
बर्याच दिवसांनी काही निखळ विनोदी आणि मनोरंजनात्मक लेखन वाचनात आले.
धन्यवाद.
31 Jan 2013 - 4:22 pm | अधिराज
बघा आता. गांधीहत्येचा इशय तुमाला इनोदाचा आणि मनोरंजनाचा वाटतो व्हय?
31 Jan 2013 - 2:49 pm | ऋषिकेश
एकूणात लेख आवडला.. तपशीलात शिरत नाहि
31 Jan 2013 - 3:03 pm | चावटमेला
३० जानेवारी हि गांधिंचि पुण्यतिथि साजरी केली जात नाही . कारण त्या दिवशी त्यांचा खून झाला होता. २ ऑक्टोबर हि एकच गांधी तारीख जनतेत बहुदा ड्राय डे मुळे फ़ेमस आहे
३० जानेवारीला बी ड्राय डे असतोय वो, म्हैत नसतया बर्याच जणांना आनि घोळ हुतुया मग ऐन येळी :(
असो, लेख आवडला. पुलेशु
31 Jan 2013 - 3:03 pm | मृत्युन्जय
गांधीजींची तत्वे पुर्णतः चुकीची किंवा गोंधळलेली होती हे आपल्याला पटते की नाही? सगळा त्रास तिथेचतिसुरु झाला. बाकी गांधींजींबद्दल आदर नसणे हे मात्र मला समजत नाही. ही ४ वाक्ये बोलुन अध्यक्षमहारज मी माझे छोटेसे भाषण संपवतो.
31 Jan 2013 - 3:10 pm | संजय क्षीरसागर
वास्तविकात इतिहास आणि त्याचं विष्लेशण यात मला रूचि नाही कारण, `आता काय करता येईल' ही दिशाच नेहमी मार्गदर्शक ठरते.
फाळणी झालीये आणि तिच्यावर काथ्याकुटून आता उपयोग नाही. हत्या पाशवी आहे पण गांधीहत्त्या घडून गेली आहे आणि त्यावर उपाय नाही. नोबडी कॅन एव्हर गो बॅक इन टाईम.
मला वाटतं, कोणत्याही समाजाविषयी स्वतःची ठाम मनोधारणा करून घेणं (आणि ती पसरवणं) हे सगळ्यात विघातक आहे. त्यानं सर्वधर्म समभावात अडथळा निर्माण होतो.
एखादी व्यक्ती चूक करते, याचा अर्थ ती संपूर्ण जातीची विचारसरणी आहे असा नाही. किंबहुना तश्या अर्थामुळे दोन सामाजात तेढ निर्माण होते.
तुमचं हे विधान :
एकांगी आहे. वरचष्मा गाजवणं ही प्रत्येकाची प्रवृती आहे. ती घरापासून तख्तापर्यंत दिसते. जात आणि धर्माचा त्याच्याशी संबंध नाही. जिवेष्णेचा (स्वतःचं अस्तित्व टिकवण्याच्या) प्रेरणेचा तो भाग आहे.
वृती गैर आहे हे नक्की पण तुमच्या विचारसरणीत एकांगीपणा येऊ देवू नका. त्यामुळे विचार आणि प्रयत्न दोन्हींची दिशा भरकटते.
31 Jan 2013 - 3:57 pm | पुण्याचे वटवाघूळ
का हो सगळ्यांना उपदेश करायचा जन्मसिध्द हक्क तुमचा आहे असे तुम्हाला वाटते का?
31 Jan 2013 - 4:18 pm | संजय क्षीरसागर
त्याला वाटलं तर तो घेईल नाही तर सोडून देईल.
ही इज अ पब्लिक स्पिकर अँड रायटर त्यामुळे जे लिहीलय ते जनहितार्थ आहे.
31 Jan 2013 - 5:55 pm | अग्निकोल्हा
टाळी एका हाताने वाजत नसते हो, बरेचदा नाइलाजानेच का असेना पण... !
@ राजघराणं
लेख वाचनिय आहे. सर्व भाग चाळण्यास उत्सुक.
31 Jan 2013 - 6:25 pm | संजय क्षीरसागर
मुद्दा साधाये : एखाद्या व्यक्तीवरनं त्याच्या सर्व धर्मियांना वेठीला धरणं पुन्हा धार्मिक कलह निर्माण करणं आहे. आणि ही मानसिकता प्रत्येकजण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत धर्मनिरपेक्ष समाजाचं स्वप्न अशक्य आहे.
31 Jan 2013 - 6:10 pm | सुनील
मला वाटते, ते विधान राजघराणं यांचे स्वतःचे नसून, अशी सर सय्यद अहमद यांची भूमिका आहे/होती, असे राजघराणं याना सांगायचे असावे.
ते खुलासा करतीलच.
31 Jan 2013 - 6:20 pm | पैसा
हे डॉक्टर म्हणत नाहीयेत, तर ते सर सय्यद अहमद यांचं विधान आहे.
31 Jan 2013 - 6:35 pm | संजय क्षीरसागर
इथून पुढे लेखनाची दिशा ती असणार आहे:
तुम्ही लक्षपूर्वक वाचा:
31 Jan 2013 - 7:12 pm | राजघराणं
हे मत सर सय्यद अहमद यांचे आहे. म्या पामराचे नाहि.
31 Jan 2013 - 3:17 pm | सुनिल पाटकर
जबरदस्त लेख , उत्तम विश्लेषण
31 Jan 2013 - 6:21 pm | पैसा
उत्तम मुद्देसूद लेख. या लेखाचा काही भाग आधी वाचला होता असं आठवतं. पण विस्तारही उत्तम आहे. पुढचा भाग लवकर येऊ द्या!
31 Jan 2013 - 7:51 pm | बाबा पाटील
नशिब आमच गाधींना समजाउन घेवुन लेख लिहिणारा कुणी तरी लेखक भेटला.
-कुणी बोट दाखवल तर सरळ कानफाटात मारणारा--बाबा पाटील....
31 Jan 2013 - 7:54 pm | विकास
वर मन१ यांनी म्हणल्याप्रमाणे लेखातला प्रमुख भाग हा आधी देखील वेगळ्या लेखात आधी येथेच आल्याचे आठवते. त्यामुळे येथे माझा प्रतिसाद देणे चोप्य पस्ते इतके सोपे झाले आहे. :-)
सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली द्विराष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती ...द्विराष्ट्रवादाची मागणी फाळणीसाठी न्हवतीच ती अखंड भारतासाठी होती.
द्विराष्ट्र हा विषय कायम चघळला जातो. म्हणून वरील वाक्यांशी सहमत असलो तरी थोडे अधिक लिहीत आहे. (हा आपल्या विधानांशी प्रतिवाद नाही!).
सर सय्यद अहम्मद यांचे १८८७ सालातले लखनौचे प्रसिद्ध भाषण हे उर्दू मधे होते. ते १८८८ साली अलाहाबादच्या पायोनियर प्रेस ने इंग्रजीत भाषांतरीत करून प्रसिद्ध केले. त्यात, उर्दूमध्ये जेथे जेथे त्यांनी समाज (कम्युनिटी) या अर्थाने "कौम" हा शब्द वापरला होता, त्याचे भाषांतर प्रत्येक ठिकाणी, "नेशन" असे केले. त्यात अजून एक लफडे म्हणजे नेशन ह्या शब्दाचा मराठी/हिंदीत/संस्कृत मध्ये "राष्ट्र" असा केला जातो, ज्याचा अर्थ पण बर्याचदा "देश" या संकल्पनेपेक्षा वेगळा असतो, पण तुर्तास ते बाजूस ठेवूयात.
आता हे लिहीत असताना सर सय्यद यांच्या भाषणाच्या बाजूने लिहीत नाही कारण त्यात "ते" विरुद्ध "आपण" अशीच भाषा आहे. पण नेशन हा श्ब्द नाही आणि त्या अर्थाने व्दिराष्ट्रवाद नाही. याचे त्यांच्या भाषणातील सुरवातीचे उदाहरण म्हणजे: "Although my own thoughts and desires are towards my own community, yet I shall discuss whether or not this agitation is useful for the country and for the other nations who live in it. " अजून एका ठिकाणी त्यांनी म्हणले आहे: "England and Scotland are a case in point. In the past many wars were waged between those countries, and many acts of bravery were done on both sides; but those times have gone, and they are now like one nation. But this is not the case with our country, which is peopled with different nations. Consider the Hindus alone. The Hindus of our Province, the Bengalis of the East, and the Mahrattas of the Deccan, do not form one nation." थोडक्यात जात-धर्म-भाषा-संकृती यांनी वेगळे झालेल्यांचे त्यांच्या लेखी राष्ट्र होते पण अशा सर्व राष्ट्रांचे एकत्रिकरण हे एका देशात होत होते. ते होताना समान वंश, रहाणीमान आणि समान भौगोलीक कक्षेतील इतिहास हे कारण असावे. पण तात्पर्य एकचः राष्ट्र आणि देश या संकल्पना समान न धरता भिन्न धरल्या गेल्या आहेत.
ज्यांना वाढ्त्या मुस्लिम लोकसंखेची चिंता आहे. बांग्लादेशींच्या घुसखोरी मुळे जे अस्वस्थ आहेत असे हिंदुत्ववादी..... अखंड भारतवादीही असतात... हा एक विनोदच आहे.
ते आजच्या वर्तमानातील भारतीय उपखंडाचा अखंड भारत व्हावा असे म्हणतात असे आपल्याला नक्की वाटते का? कारण मला तसे वाटत नाही. त्यांचा अखंड भारतवाद हा १९४७ सालासाठी असतो आणि त्याच्या मागेपुढे घेतलेल्या राजकीय निर्णय आणि निर्णयक्षमतेविषयी असतो. तो बरोबर का चूक हा येथे मुद्दा नाही, पण तुम्हाला जो विनोद म्हणायचा आहे, तो अस्तित्वात आहे असे मला वाटत नाही.
मोहनदास गांधी नावाच्या बनेल म्हातार्याने. द्विराष्ट्रवाद कधीच मान्य केला नाही. फाळणी मात्र देउन टाकली !
असहमत. वरील विधान वाचताना असे वाटू शकते की गांधीजी हे फक्त हिंदूंच्या बाजूने होते आणि त्यांना मुसलमान जनता नको होती. जे काही केले ते दूरगामी/स्ट्रॅटेजिक होते. पण वास्तव तसे होते असे इतिहासातली पाने चाळताना वाटत नाही. १९२० सालापासून (खिलाफत चळवळीपासून) गांधीजींची धोरणे. तेच १९२१ च्या मोपला दंगलीनंतर... १९४० नंतर विचार बदलला असेलही पण तरी हे काही फार स्ट्रॅटेजिकली कोणीच केले असे वाटत नाही, हिंदूंच्या हिताचा विचार करत केले असा निष्कर्ष काढणे अधिकच अवघड जाते. याचा अर्थ त्यांनी मुद्दामून हिंदूंच्या अहीताचा विचार केला असे अजिबात म्हणायचे नाही.
प्रतिसाद देखील क्रमशः :-)
31 Jan 2013 - 8:37 pm | राजघराणं
हे वाक्य वरिल लेखात आलेले आहेच
31 Jan 2013 - 9:10 pm | विकास
आधीच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, मी आपल्या आधीच्या लेखातील माझा प्रतिसाद चोप्य पस्ते केला होता. त्यात ते (आपले वरील) वाक्य नसावे. तसेच हाच सूर मी कुरूंदकरांच्या लेखात पण वाचलेला आहे आणि त्याच्याशी मी असहमत आहे.
2 Feb 2013 - 1:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मोपल्यांचं बंड हे मुळात हिंदू-मुसलमान धर्माधारित दंगा अशा प्रकारे सुरू झालेलं नव्हतं. गरीब मजूर आणि श्रीमंत मालक अशा प्रकारचा तो वाद होता. लवकरच त्याला हिंदू-मुसलमान असा रंग आला. गांधीजींना असा रंग आल्याचं समजलं नाही.
संदर्भः लोकमान्य ते महात्मा. (याचा तपशीलवार खुलासा दुसर्या खंडात आहे.)
कुरूंदकरांनी या विषयातले तपशील दिलेले आहेत का हे निबंधवजा लिखाण आहे? (कुरूंदकरांचं मूळ लिखाण वाचलेलं नाही म्हणून जिज्ञासा.)
1 Feb 2013 - 12:58 pm | मन१
स्वतःलाच quote करण्याचा मोह आवरत नाहिये. ह्याशब्दांबद्द्ल जे जाणवलं ते मी इकडेच जालावर काही ठिकाणी लिहिलय.
country nation देश राष्ट्र भूमी कौम समाज वंश हे शब्द अगदि जवळून एकमेकांस कित्येकदा स्पर्शून जातात तर कधी समानार्थी म्हणून वापरले जातात. कुठल्या संदर्भात वापरतोय, त्यावरून ते ठरते.
संपूर्ण जग तेव्हा nation , country(राष्ट्र, देश) ह्या शब्दांतील फरक शोधत होतं.
जगभर मध्ययुगात nation हे एखाद्या जातीचं, जमातीचं, मोठं रूप(extension) मानलं जात होतं.
देश शब्दाची आजची "व्यवस्था"/system ह्याजवळ जाणारी व्याख्या अजून बनायची होती.
race आणि nation (वंश/कबिला/टोळी आणि राष्ट्र)ह्या कल्पना एकमेकांना स्पर्श करत होत्या. त्यांच्या सीमा धूसर होत्या.
जवळच्या नात्यातील लोक एकत्र आले की कुटुंब बनते. समानता असणारी काही कुटुंबे एकत्र आली की एक वंश, एक राष्ट्र , एक टोळी बलागते.त्यामुळेच कधीकधी भारतातली हरेक जात एक अशीच स्वतंत्र राष्ट्र वाटू लागते.
.
.
नकाशावरच्या भूभागाला "देश " म्हणतात. देश = जमीन = भूमी = country = वतन(मराठी,हिंदी, आणी उर्दुमधील) बस्स. इतकच.
कुटुंब हे चार भिंतीमध्ये/फ्लॅटमध्ये "वसते " तसेच राष्ट्र हे देशात "वसते". राष्ट्र हा चालक असून देश हे चाल्य(गाडी/वाहन) आहे.
दोन देश exclusively वेगळ्या भागातच असतात. पण एकाच देशात्/एकाच भूभाग काही वेगवेगळे समाज, वेगवेगळी राष्ट्रे नांदू शकतात. हंगेरी ह्या देशात बराच काळ रोमन आणि हूण ही दोन राष्ट्रे मध्ययुगाच्या प्रारंभी वसत होती; तसेच.
घरातून कुटुंब जागा सोडून जाते. तसेच एखाद्या राष्ट्राला एखाद्या देशातून घालवून देता येते.
एखादे राष्ट्र एखाद्या देशाचा ताबा घेउन त्याला आत्मसात करते. ग्रीको-रोमन राष्ट्राला तुर्क राष्ट्राने बायझेंटाइन्/तुर्कस्थान "देशातून" काढले तसेच. किंवा "स्पेन्/अल अंदालूस" देशातून अरब राष्ट्र बाहेर फेकले गेले तेराव्या शतकापर्यंत तसेच काहीसे.
.
.
भारत वेगळ्या मार्गावरून जातो आहे. आम्ही त्या अर्थाने(धार्मिक्,वांशिक) एकसंध नाहीत. पण आमच्यात एकच एक धागा(बृहत सांस्कृतिक??) अशी ही कल्पना आहे. आपण वेगळे असलो तरी तुला मारलं की मला दुखतं अशी काहीशी एक कल्पना आहे. मध्यमवर्गानं ही स्थापित होण्यास नकळातपणे फार मोठा हातभार लावलाय. भारत ही "संकल्पना" जाणवून घ्यायची असेल तर तुम्ही सलग पाच-सात वेळेस मूळ "मिले सूर मेरा तुम्हारा" हा सुंदर मैफिल पाहिली पाहिजे. साध्या साडीतली कुलीन गुजराती स्त्री "बणे सूर जो तारो मारो बणे आपणो सूर निराळो" असं काहीसं म्हणते ; पूर्वेकडच्या राज्यात कुणीतरी " सृष्टी होउ कोइ कोतान्/कोइ कोशू" अशी सुरेल कुणी हाक देतं, मराठीत फिल्मस्टार तनुजा "तुमच्या माझ्या जुळता तारा मधुर सुरांच्या बरसती धारा" म्हणत समेवर येते.
अहाहा. सुरेख. सुंदर. त्या गीतातल्या सगळ्याच भाषा समजतात असे नाही, पण खूपच प्रसन्न वाटते. "मला तुमची भाषा येत नाही पण मी तुमच्या भावना समजू शकतो" ह्या अर्थाचे काहीसे हे भारतीय संघराज्य एकत्रित आहे. ह्यात भाषाभिमानी अतिप्राचीन वाङ्मयासोबत तमिळ आहेत, बाबो मोशाय त्याच्या मिठायांसोबत आहे, नेकिचा नोकरदार नि कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी मराठीही आहे. परंपराप्रिय राजपूत्/राज्स्थान हे आहेत नि आमचेच निसर्गाच्या सहवासात राहणारे उडिया लोकंही आहेत.
दिल्लीकडच्यांना अकबराबद्दल प्रेम्/आदर आहे ना, असूं देत, त्याचं (मेवाडी)राजपूतांना आदरस्थानी असणार्या राणा प्रतापाशी युद्धही झालं होतं ना? असूंदेत. तरीही आम्ही दोन्हीचा सांस्कृतीक वारसा सांगू. कुणीकडून काय मिळालं हे मांडू.
"मिले सूर मेरा तुम्हारा " च्याच धर्तीवर, त्या दर्जाची नसली, काहीशी populist वाटली तरी "तारक मेहता का उल्टा चश्मा" मध्ये ही भारताच्या वैविध्याची नि एकतेचीही कहाणी मस्त मांडलिये. म्हणजे, तो कथेचा मूळ गाभा नसेलही, पण प्रत्येकाला त्यात आपलच, किंवा आपल्या जवळच्यांचं representation सापडतं. एका हिंदी सिरियलमध्ये " पापड कसले बनवतेस तू माधवी" म्हणणारा मराठी श्रीयुत भिडे नि कच्छवाले(गुजराती) जैन व्यावसायिक जेठालाल एकमेकांची सुमडी सुमडीत खेचू पाहतात. पण खरच अवघड वेळ आली तर भिडेला जेठालाल ला सोडून जेवणही जात नाही. अर्थात जेठालाल सुटला की ह्यांचे पुन्हा ट ऑम अॅन्ड जेरी सारखे उद्योग सुरुच. सोसायटीच्या बाहेर व्यवसाय करणारा अब्दुल त्यांच्या परिवाराचाच एक सदस्य आहे. सरदारजी त्यांच्या पारशी बायकोसाबत धमाल आणताहेत. ते मद्राशाला(हौ. सगळे साउथ इंडिअन हे मद्राशीच असतात.) छोले भटुरे आठवणीनं आणून देतात , मद्राशी सगळ्या उत्तर भारताच्या उत्सवात सहभागी होताना दिसतो. "आपण वेगळे आहोत पण आपण शत्रू नाहीत" अशी काहीशी ही भावना आहे.
सध्याची भारत ही संकल्पना यशस्वी झाली तर ती जणू एका मोठ्या प्रच्चंड मोठ्या कोलाज च्या रुपातील असेल. मोठा कॅनव्हास, अनेकानेक रंग तरी त्यांची एकमेकांना सोबत. एकजिनसीपणा नाही, पण एकत्रित बांधणी पक्की आहे.
एकाच पुस्तकात प्रत्येक पान वेगवेगळ्या रंगाचं असावं तरीही त्याची बायंडिंग घट्ट असावी, तसच काहीसं.
.
एक भारत" म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर रेल्वेने प्रवास करावा. आधी जम्मू ते मदुरै आणि नंतर सुरत ते गुवाहाटी असं जाउन पहा. रेल्वेतच बसले राहिलात तरी खूप काही बघणं होइल. अल्पशा मोबदल्यात आख्खे भारत दर्शन होउन जाइल्.रेल्वेत भेटणारी माणसे, त्यांची आयुष्ये त्यांनी "भारत " कल्पनेबद्द्ल काहीही भाष्य न करताच तुम्हाला खूप काही सांगून जातील. कॅनव्हास मोठा करायला एकदा स्लीपर कोच, नि एकदा तरी ए सी असे जा. खूप काही जाणवेल.
.
.
वतन्--कौम्---मुल्क
उर्दु भाषेतलं उदाहरण त्यातल्या त्यात परिचित असल्यामुळं घ्यायचं म्हटलं तर काय दिसतं?
"ऐ वतन ऐ वतन तेरी राहों में हम जां तक लुटा जाएंगे" असं कुणी म्हणतं. "गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे" हे त्याचं मराठी रूप. भूमी- जमीन- वतन ह्यांच्याशीही बांधिलकी मानलेलीच दिसते.
इथे जमीन- वतन हे शब्द निष्प्राण, निर्जीव नाहीत, आपले, आपल्या लोकांचे तिथे पूर्वापार वास्तव्य आहे ही भावन त्या जमिनीच्या तुकड्याला मोल प्राप्त करुन देते. एरव्ही "जमीनीचा तुकडा" ह्या अर्थाने हेच शब्द जमीन्-दार, वतन-दार असे दिसतात.
.
सध्या बोली उर्दु मध्ये मुल्क हा शब्द सर्रास आढळतो. मराठीत आपण "देश" म्हणतो; बोलीभाषेतही "देश" वापरतो अगदि त्याच अर्थाचा आणि वापराचा हा शब्द. ह्यात मला तितकासा जिवंतपणा जानवत नाही. कलरलेस, ओडरलेस, निरुपद्रवी असा हा शब्द.
.
"राष्ट्र " ह्या कल्पनेशी "बृहद कुटुंब" किंवा "टोळी" किंवा "वंश" ह्याच्या जवळ जाणारा उर्दु शब्द म्हणजे "कौम"
"कदम कदम बढाये जा खुशी के गीत गाये जा
यह जिंदगी है तू कौम पे लुटाये जा" असं आझाद हिंद सेनेचं विजय गीत होतं. भारत ही एक "कौम" मानण्यात आली होती. एक बृहत कुटुंबच. पण अर्थातच ह्या शब्दाचं मूळ तितकं उदात्त नाही. आज आफ्रिकन एकाच आफ्रिकन "देशा"त अनेक "कौम " पहायला मिलतात. एक "कौम" दुसर्या "कौम" ला हाकलायला पाहते ; उर्दु च्यानेल पाहिल्यावर "कौम" ह्या शब्दाचा हा अर्थही जाणवेल.
वतन, मुल्क, कौम हे मराठीत अनुक्रमे वतन/भूमी/जमीन,देश, राष्ट्र बनून येताना दिसतात.
.
देश- राष्ट्र ही तुलना सर्वात अचूक करता येइल ती संस्था/संघटना -- संस्थेचे कार्यालय ह्या जोडिशी.
एखाद्या संस्थेला एखाद्या कार्यालयातून, बिल्डिंगमधून घालवून देता येते. पण म्हणून त्यांची संघटना संपत नाही, तिचे फक्त कार्यालय जाते, तसेच काहीसे. संघटना असणे, संघटनेचे सभासद असणे हे एका नात्याने, धाग्याने बांधले जाणयसारखे आहे . "राष्ट्र " ह्या कल्पनेत असे बांधले जाणे अपेक्षित आहे. एकमेकांशी नाते अपेक्षित आहे.
त्यामुळेच "राष्ट्र" हा एक जिवंत शब्द आहे. "देश" हा एक निव्वळ कार्यालय असावे तसा शब्द आहे; मूळचा
बराचसा निर्जीव.
1 Feb 2013 - 7:02 pm | रणजित चितळे
मन अगदी मनातले लिहिलेत. फार आवडले.
http://bolghevda.blogspot.com/2010/10/blog-post.html
http://bolghevda.blogspot.com/2010/10/blog-post.html
2 Feb 2013 - 1:46 am | श्रीरंग_जोशी
मनोबा - वर जे काही विचार मांडले आहे त्यास तोडच नाही...
माझ्या सुदैवाने मला गोकूळधाम छाप सोसायटीमध्येच लहानाचं मोठं व्हायला मिळालं. हेवेदावे होतेच पण त्यांचे जात व धर्माशी काहीच घेणे देणे नव्हते...
31 Jan 2013 - 8:01 pm | रणजित चितळे
हिंदू लोक शेतकरी. जमिनीला माता मानणारे. भूगोलावर त्यांचे लैच प्रेम. त्यांचा मनात अखंड भारतमाता घर करून बसली आहे. पण अखंड भारत म्हण़जे केवळ भुगोलांची बेरीज न्हवे. त्यात लोकसंख्येची बेरीज आहे. इतिहासाची वजाबाकी आहे आणी धर्माचा भागाकार आहे.
वाक्य भयंकर आवडले.
लेख वाचला. मी स्वतः सावरकर भक्त. त्यांचे सगळे लेख एकदा नाही बरेचदा वाचले व वाचतो.
आपला लेख खूप चांगला झाला आहे. माझ्या काही टिपण्णी आहेत काही आपल्या लेखावर काही बाकीच्यांच्या प्रतिसादांवर -
१. आपले - अखंड भारत परत होणे म्हणजे मुस्लीम जनता ४० टक्के झाली असती व त्यामुळे बरेच प्रश्न उपस्थित झाले असते - पटले.
२. अखंड भारत नाही ह्याचे दुःख आहे पण त्याच बरोबर पुढे जायचे असेल तर WE SHOULD MAKE PEACE WITH HISTORY हे करायलाच पाहिजे.
३. ह्याच बरोबर इतिहासाचे अवलोकन, अध्ययन हे आपण केले पाहिजे, आपण कोठे चुकलो हे त्याने कळते. नाहीतर त्याच चुका परत परत होत राहतात.
४. लेख खूप छान आवडला - एक खटकले त्यात काही ठिकाणी भाषा पार्लमेटरी वापरली असतीत तर त्याला अजून उंची आली असती असे मला वाटते.
31 Jan 2013 - 9:50 pm | सुनील
PJ मोड ऑन
पार्लमेंटरी भाषा म्हणजे कोणती हो?
म्हणजे "भ"कारी की मा(पंचाक्षरी)?
नाय म्हणजे, पार्लमेंटात सगळे चोर-दरवडेखोर बसतात, असे म्हणतात म्हणून विचार्तोय हो ;)
PJ मोड ऑफ
कृपया, हे फार ताणून चांगल्या धाग्याचा विचका करू नये. आमची विनोदाची उबळ खोकल्यासारखी असते ;)
31 Jan 2013 - 8:38 pm | राजघराणं
मिच पार्ल्मेंटरि न्हाइ तर भाषा कशि व्हनार :-) .. असो... पुढ्च्या वेळपासुन लक्षात ठेविन ... ढन्यवाद
31 Jan 2013 - 9:25 pm | रणजित चितळे
:-)
31 Jan 2013 - 9:44 pm | धन्या
भाषा पार्लमेटरी
म्हणजे कशी?
- अडाणी धन्या
31 Jan 2013 - 9:36 pm | रामपुरी
"मदनलाल धिंग्रा किंवा भगतसिंग यांनीही राजकीय वध केले होते."
'ते' वध का आणि हा 'खून' का? तुमच्याच व्याख्येनुसार त्यावेळीही समोरची (इंग्रज) माणसे नि:शस्त्र/बेसावध होती. समर्थनिय असतील तर दोन्हीही आहेत किंवा दोन्हीही नाहीत.
"पण इंग्रजांशि लढण्यासाठी तेंव्हा लोकशाहीचे कोणतेहि मार्ग शिल्लक न्हवते."
अतिशय चुकीचे/विनोदी विधान.
अजून बराच प्रतिवाद करता येईल पण ते व्यर्थ आहे. तेव्हां असोच... पुलेशु
31 Jan 2013 - 9:58 pm | आनन्दिता
लेख खुप आवडला... दोन तीन दिवसांपासुन गांधींवर इथल्या काही काजव्यांनी आपल्या अल्पमती चा प्रकाश टाकायचं काम केल्याने , तुमच्या लेखाचं शिर्षक वाचताच आता गांधीवर अजुन राळ नको अशी प्रार्थना करतच लेख वाचायला घेतला.. त्यांच्यावरील आरोपांचा सकारत्मक आणि अभ्यासपुर्ण उहापोह करायला घेतल्या बद्दल तुमचे मनापासुन आभार..
पुढचे लेख पटापट येऊद्यात.
31 Jan 2013 - 10:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
उत्तम अभ्यासपुर्ण लेख. इथल्या काही "हुश्शार (?)" लोकांना गांधीविरोध का हे कालपासुन सांगायचा प्रयत्न करत होतो. तुमच्या लेखाची मदत नक्कीच झाली आणि होईल.
माझ्या गांधीविरोधाची कारणं:-
१. आपल्यावर अत्याचार होत असताना तो निमुट सहन करणं हा अत्याचार करण्याहुन गंभिर गुन्हा आहे. आज पाकिस्तान भारताच्या हद्दीत घुसुन आपल्या सैनिकांना मारायचं धाडस करतोय, त्यावेळी मात्र ह्यातले बहुसंख्य गांधीवादी हिप्पोक्रिट लोकं पाकिस्तान ला सडेतोड उत्तर द्या म्हणुन मागणी करतातच ना? मग कुठे जातो तुमचा गांधीवाद तेव्हा? तेव्हा असं का नाही म्हणत, अरे दोनचं का मारले अख्खी रेजिमेंट देतो पाठऊन हाल हाल करुन मारा त्यांना म्हणुन? हा एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करा ची शिकवण दिल्याबद्दल गांधींविषयी मला राग आहे.
२. मी हिंदु मुस्लिम असा रंग द्यायचा प्रयत्न करत नाहीये. कोण कुठला तो ओवेसी येऊन हिंदु संस्क्रुती, देव-देवता आणि आर.एस.एस. बद्दल बोलुन जातो. मग त्यावेळी गांधींच्या तालमीत तयार झालेल्या काँग्रेस नी काय कारवाई केली त्याच्यावर? नुसते खटले भरले म्हणजे झालं का? का धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली फक्त हिंदुनांचं लक्ष करायचं? ह्या भेकड व्रुत्तीची सुरुवात गांधींमुळे झाली त्यामुळे मला राग आहे. सर्वांना न्याय समान हवा.
३. भगतसिंग आणि राजगुरु ह्यांना श़क्य असुनही गांधींनी का वाचवलं नाही? पुढच्या राजकारणामधे आपल्या स्थानाला धक्का ह्या दोघांमुळे लागु शकतो हे त्यांना माहीत होतं का? दोन देशभक्त क्रांतिकारकांचा म्रुत्यु म्हणजे राजकीय हत्येचा भागच होता असं का म्हणु नये?
आपली इतिहासाची पुस्तकं आठवा शाळेतली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात गांधींबद्द्ल आणि त्यांच्या चळवळी बद्द्ल धडेच्या धडे आणि बाकीच्या महत्त्वाच्या स्वातंत्र्यसैनिकांची नुसती तोंडओळख का? त्यांचा सहभाग सारखाचं किंबहुना जास्त महत्वाचा होता. हा पद्धतशिर पणे कोणाचा प्रचार शाळकरी मुलांच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न आहे हा वादाचा मुद्दा आहे.
अवांतर-
विनायक दामोदर सावरकरांचा फोटो विशेष आवडला.
1 Feb 2013 - 12:57 am | आनन्दिता
इथे महात्मा गांधींवर चर्चा चाललीये आत्ताच्या "मॅडम गांधीं " वर नाही त्यामुळे तुमचे पहिले दोन मुद्दे बाद ठरतायत... त्यांच्या नाकर्तेपणाच्या पावत्या बापूंच्या नावे फाडू नका...
भेकडपणा ची सुरुवात गांधींपासुन झाली असं सांगताय तर त्याच गांधींच्या प्रभावाखालि लहानाची मोठी झालेल्या अन पाकीस्तानाला नानी याद करायला लावणार्या इंदिरा गांधी बद्दल तुम्ही काय प्रतिवाद कराल?.
गांधींची अहिंसा आणि सत्याग्रह ही मुल्ये स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित होती.. पण याचा अर्थ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने एक सार्वभौम राष्ट्र म्हणून जगासमोर उभे राहताना लष्कर न बाळगणार दुबळं राष्ट्र म्हणून उभं रहावं असं गांधीवाद खचितच सांगत नाही... १९४७ मधे काश्मिरात घुसखोरी करणार्या पाक ला रोखण्यासाठी तिकडे लष्कर पाठवायचा सल्ला गांधींनी स्वतः नेहरूंना दिला होता हे विसरुन चालणार नाही..
या वाक्याला मात्र मनापासुन दाद..खुद्द भगत सिंग,राजगुरु, अन सुखदेव (यांना तुम्ही विसरलाय बहुतेक) यांच्यासुद्धा हे लक्षात आलं नसेल...
गांधी -आयर्विन करारा नंतर गांधीजींच्या अटीनुसार सुमारे ९०,००० जणांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती अन विषेश म्हणजे हे ९०,००० लोक सत्याग्रहाच्या चळवळीचा हिस्सा कधीही नव्हते.. या तिघांच्या सुटकेसाठी ही गांधींनी करारात नेगोशियेट करायचा प्रयत्न केला होता हे स्वतः आयर्विन कबुल करतो..
According to a report in the Indian magazine Frontline, Gandhi did plead several times for the commutation of the death sentence of Singh, Rajguru and Sukhdev, including a personal visit on 19 March 1931. In a letter to the Viceroy on the day of their execution, he pleaded fervently for commutation, not knowing that the letter would be too late.
Lord Irwin, the Viceroy of India later said:
As I listened to Mr. Gandhi putting the case for commutation before me, I reflected first on what significance it surely was that the apostle of non-violence should so earnestly be pleading the cause of the devotees of a creed so fundamentally opposed to his own, but I should regard it as wholly wrong to allow my judgment to be influenced by purely political considerations. I could not imagine a case in which under the law, penalty had been more directly deserved.
1 Feb 2013 - 2:06 pm | अधिराज
खूप छान प्रतिसाद दिलाय ताईसाहेब तुम्ही. चांगली माहिती मिळाली.
1 Feb 2013 - 1:01 am | बाबा पाटील
छान माहिती मांडलीत आनन्दिता....
1 Feb 2013 - 8:34 am | आनंद घारे
खूप मेहनत घेऊन लिहिलेल्या या विस्तृत लेखामधून मला एवढे समजले की लेखकाच्या मनात त्याच्या अजाण वयात पेरल्या गेलेल्या द्वेषाच्या विषाने काही काळासाठी त्याचा ताबा घेतला होता. स्वतंत्रपणे विचार करण्याएवढी समज आल्यानंतर 'प्रचार' आणि 'विचार' यातला त्याला फरक समजू लागल्यामुळे या विषाचा अंमल कमी झाला आणि मुख्य म्हणजे त्याला जे काही पाजले गेले होते ते 'अमृत' नसून 'विष' होते याची जाणीव झाली. या लेखाचा मथळा "मला समजलेले गांधीद्वेषाचे स्वरूप" असा असता तर तो जास्त समर्पक वाटला असता. हा लेख चांगला लिहिला असला तरी व्यक्तिशः मला आतापर्यंत गांधीजी जितके समजले होते त्यात हा लेख वाचून काही भर पडली नाही.
मिसळ्पाववर आलेला हा लेख आणि त्यावर आलेले अनेक सकारात्मक प्रतिसाद वाचून असे वाटते की इथले वातावरण आता बदलायला लागले आहे.
1 Feb 2013 - 12:19 pm | बन्या बापु
लेख विस्तृत विचार मांडणारा आहे.. त्याबद्दल लेखकाचे अभिनंदन..
तरीही हे लेखकाचे मत असल्याने त्याला "गांधीहत्या आणि मी" असे शीर्षक समर्पक नाही. तसेच वाचनातून प्रत्येकाला समजलेले सारखेच असेल असेही नाही.
वैचारिक मतभेद असल्यामुळे आपला पास..
बन्या बापु
बाकी संजय क्षीरसागर साहेबांची सहमत.. १००० %
1 Feb 2013 - 12:27 pm | वेताळ
दुसरी बाजु विचारात घेतली जात नाही. लेख वाचल्यावर लक्षात येते कि दुसरी बाजु देखिल तितकीच महत्वाची किंबहुना सत्य आहे.
गांधीजीं बद्दल माझेही मत तितके चांगले नाही.पण त्याच्यावर टिका करण्या इतपत माझी योग्यता देखिल नाही. गांजीनी काही निर्णय चुकीचे(आपल्यामते)घेतले असले तरी त्यामागे काहीतरी ठोस कारणे असली पाहिजेत.ती कारणे उजेडात येणे महत्वाची आहेत.
एक चांगला व दर्जेदार लेख लिहल्याबद्दल राजघराणेंचे अभिनंदन.
1 Feb 2013 - 2:01 pm | श्रीगुरुजी
भारत स्वतंत्र झाल्यावर "स्वतंत्र भारताला सैन्याची गरज नाही" असे गांधीजींनी लिहिले होते असे वाचले आहे. हे खरे आहे का? हे खरे असल्यास हे अत्यंत भाबडे विधान मानावे लागेल.
1 Feb 2013 - 3:50 pm | पिंपातला उंदीर
गांधीवादी समाजवाद पेक्षा पण भाबडा का भारत-पाकिस्तान-बांगलादेश याना एकत्र करून अखंड हिंदुस्तान निर्माण करण्याच्या उद्दिष्तापेक्षा पण भाबडा?
1 Feb 2013 - 7:37 pm | विकास
भारत स्वतंत्र झाल्यावर "स्वतंत्र भारताला सैन्याची गरज नाही" असे गांधीजींनी लिहिले होते असे वाचले आहे. हे खरे आहे का? हे खरे असल्यास हे अत्यंत भाबडे विधान मानावे लागेल.
गांधीजींच्या "आदर्श राज्याच्या" (ideal state) संकल्पनेत पोलीस आणि सैन्यदलाची गरज नव्हती. पण त्यांनी तसे होणे शक्य नाही हे मान्य करत "कमीत कमी" पोलीस आणि सैन्यदल असावे असे म्हणले होते. "गरज नाही" असे म्हणले नव्हते.
मात्र जे नेहमी होते तेच झाले, राजापेक्षा राजनिष्ठ आणि गांधींजींच्या पेक्षा गांधीवादीच जास्त बोलू लागले. त्यातून एक अत्र्यांनी एका भाषणात केलेला विनोद आठवला. शंकरराव देव आणि अत्रे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत खांद्याला खांदा लावून लढले. पण एकमेकांशी राजकीय विरोधात कमी नसावेत. गांधीहत्येनंतर मला वाटते शंकरराव देवांसकट काही (promininent) गांधीवादी हे नेहरू-पटेलांकडे ह्ट्ट करू लागले होते की आपल्याला सैन्य नको (कारण गांधीजींचे स्वप्न/इच्छा वगैरे). त्यावर अत्र्यांनी अशी काहीशी टिपण्णी केली. "भारताला सैन्य नको हे त्या महात्म्याने म्हणणे वेगळे आणि (त्यांच्यासारखा पंचा नेसणार्या) शंकररावांनी म्हणणे वेगळे... उद्या पाकीस्तान अथवा चीन ने हल्ला केला तर त्यांचे सैन्य काय तुमच्या सैन्यात गुंडाळायचे का?" :-)
1 Feb 2013 - 8:24 pm | विकास
गांधीहत्ये नंतर विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात जातीय दंगलीचा डोंब उसळला होता. त्यात अनेकांची भिषण पद्धतीने हत्या झाली, लूटमार झाली आणि अनेक घरेदारे उध्वस्त झाली. सातारा आणि सभोवताली तर खूपच वित्त आणि मनुष्यहानी झाली. मुंबईत सावरकर सदनात, डॉ. बाळाराव सावरकरांना ज॑मावाने घरातून बाहेर ओढून इतके मारले की त्याची परीणती त्यांच्या मृत्यूत झाली.
सरकारने काही प्रमाणात नंतर मदत केली असे म्हणतात, पण ती सामान्यांपर्यंत पोचली जाण्याची शक्यता नव्हती. (आजही नाही, त्याकाळी तर जातीय तणावात आणि बाबूगिरीत विचारच करायला नको). सगळ्यात गंमत म्हणजे हे ज्यांच्या हत्येमुळे झाले ते अहींसावादी आणि नंतरचे सामान्य जीवनाची हत्या करणारे हत्येकरी हे गांधीटोपीधारी गांधीवादी झाले.
गांधीहत्येबद्दल कायम तेच ते विश्लेषण ऐकायला येते. त्याचे इतिहास संशोधन केले जाते. पण महाराष्ट्रातील आणि देशात इतरत्र झालेल्या दंगलीसंदर्भात ना त्या काळात काही चौकशी समिती नेमल्याचे ऐकले नाही, ना त्याचे कोणी इतिहास संशोधन केल्याचे ऐकले नाही अगदी गेला बाजार कोणी नाटक अथवा चित्रपट पण काढल्याचे ऐकलेले नाही.
दंगलग्रस्तांना, स्वतःची सातत्याने victim म्हणून प्रतिमा तेवत ठेवायला आणि पर्यायाने तो मुद्दा जळत ठेवणे उचीत वाटले नाही हे एकूण समाजासाठी आणि कालौघात त्या त्या कुटूंबासाठी चांगलेच झाले पण इतर कोणाच मानवतावाद्यांना, इतिहासाच्या विद्यार्थ्याला त्याचे महत्व कसे वाटले नाही? त्याबद्दल कधी कोणी का लिहीत नाही. स्वतंत्र भारतातील आणि ते देखील ज्याला घटनेने असो/नसो लोकप्रेमाने/हक्काने आणि त्याच्या खर्याखुर्या कर्तुत्वामुळे ज्याला राष्ट्रपिता संबोधले गेले, त्याच्या नावाने हा काळीमा फासला गेला असे वाटत नाही का?
1 Feb 2013 - 9:27 pm | रामपुरी
जसं 'ते' शीखांचं शिरकाण काँग्रेसनं 'योग्य आणि उचित' ठरवलं होतं तसंच याचं पण आहे. दोन्ही माणसे एवढी "महान" होती की किरकोळ लोकांच्या एवढ्या हत्या कमीच म्हणाव्या लागतील. उगाच काहीच्याकाही अपेक्षा ठेऊ नका हा एक आगंतुक सल्ला.
1 Feb 2013 - 9:36 pm | विकास
योग्य आणि उचीत नव्हते ठरवले हो.... तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी तर तात्काळ जनतेची समजूत घालायला म्हणले होते: "When a giant tree falls, the mother earth below shakes."
:-)
2 Feb 2013 - 2:32 am | रामपुरी
समजूत घालावी ती अशी.
1 Feb 2013 - 10:57 pm | मन१
एलकुंचवारांचं गाजलेलं "वाडा चिरेबंदी" हे नाटक. ह्यात त्याच घटनेची पार्श्वभूमी वापरलेली आहे म्हणतात.
.
1 Feb 2013 - 11:47 pm | विकास
मला नाही वाटत "वाडा चिरेबंदी" गांधी हत्या संबंधातील नाटक होते म्हणून. ते एक अतिशय आर्टीस्टीक गूढ नाटक होते. आठवते त्याप्रमाणे एलकुंचवार लिखित, विजया मेहता दिगदर्शित आणि तसेच दिग्गज कलाकार होते. त्यात जे दाखवले होते त्याचा थोडक्यात सारांश असा होता, की जुन्या प्रथा/रुढी आणि त्याच प्रमाणे एका कुटूंबाच्या चिरेबंदी वाड्यातील सर्व आठवणी / कल्चर हे त्या वाड्याशी मनाने संलग्न असलेल्या कोणालाच सोडवत नसते. त्या संदर्भात वर्षानुवर्षे तेथेच रहाणार्या व्यक्ती, बाहेरच्या जगाची साथ ऐकू येणारी (किंचीत अर्धवट) मुलगी,बाहेरच्या विश्वात रहायला गेलेला अधुनिक मुलगा, त्याचे कुटूंब,हे सर्वच कुठल्यानकुठल्या पद्धतीने त्या चिरेबंदी कल्चर मधे अडकलेले असतात.... त्याचा संबध होता तो रुढीत जखडलेल्या मनोवृत्तीशी. गांधी हत्येशी काही संबंध नव्हता. असलाच कदाचीत तर पासिंग उल्लेख असेल...
नाव आठवत नाही पण, सुहास जोशी - श्रीराम लागू या दोघांनी संस्थानिक पतीपत्नीची भुमिका केलेले एक नाटक होते त्यात दोघे जण (नाटकाच्या) शेवटी (गांधी हत्येनंतर) जेंव्हा दंगलखोर वाडा जाळायला येतात आणि त्यात ते आपखुषिने भस्मसात होण्याचा निर्णय घेतात असा किस्सा आहे. अर्थात तो नाटकाचा मुख्य विषय नव्हता.
तसेच माझ्या मुळच्या प्रतिसादात "नाटक्/चित्रपट" का काढला नाही अशी तक्रार नाही, तर एकंदरीत गांधीहत्येचा आजही वापर करताना नंतरचे तथाकथीत सुधारकी वर्तन त्यावेळच्या हिंसाचारासंदर्भात कसे कानाडोळा करत आले ह्याचे विश्लेषण म्हणून होते. असो.
2 Feb 2013 - 12:21 am | योगप्रभू
अग्निपंख हे त्या नाटकाचे नाव. डॉ. लागू आणि सुहास जोशींचा जबरदस्त अभिनय होता. नंतर त्याचे प्रयोग झाले नाहीत.
2 Feb 2013 - 12:41 am | विकास
बरोबर "अग्निपंख" असेच नाव होते. त्याचे विशेष प्रयोग झाले नाहीत. नाटक पण फार ग्रेट नव्हते, पण त्यातील दोघांच्या अभिनयामुळे लक्षात राहीले.
1 Feb 2013 - 11:21 pm | आजानुकर्ण
एकंदर प्रतिसादाबाबत ढोबळ सहमती असली तरी हे वाक्य खटकले
यात गंमत कशी ते कळले नाही. गांघी अहिंसावादी आणि दंगल करणारे गांधीवादी यात गंमत नक्की दोन्ही गोष्टींची आहे की फक्त वाक्याच्या उत्तरार्धाची? गांधींची हत्या होऊन नंतर दंगल होणे याचा गांधी अहिंसावादी होण्याशी काही संबंध नसावा. फारतर गांधींच्या नावावर हिंसा करणारे स्वतःला अहिंसावादी म्हणत होते ही गंमत ग्राह्य मानता येईल.
1 Feb 2013 - 11:35 pm | विकास
"गंमत" हा शब्द उपरोधाने वापरलेला आहे. तरी देखील आत्ता परत वाचताना वाक्य एकूणच गंडल्याचे लक्षात आले. (चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद).
सगळ्यात गंमत म्हणजे हे ज्यांच्या हत्येमुळे झाले ते अहींसावादी आणि नंतरचे सामान्य जीवनाची हत्या करणारे हत्येकरी हे गांधीटोपीधारी गांधीवादी झाले.
हे वाक्य त्या दंगलखोरांना लागू आहे (अर्थातच गांधीजींच्या बाबतीत "गंमत" म्हणलेले नव्हते) . थोडक्यात अर्थ असा: "हे ज्यांच्या (म्हणजे गांधीजींच्या) हत्येमुळे झाले ते नंतर सामान्य जीवनाची हत्या करणारे हत्येकरी हे अहींसावादी गांधीटोपीधारी गांधीवादी झाले." असे हवे होते
1 Feb 2013 - 11:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तेव्हाचे (ब्राह्मण) मुख्यमंत्री (हा आजघडीचा प्रचलित शब्द) बाळासाहेब खेरांनी दंगलग्रस्तांना मदत केली तशीच दंगलखोरांवर फार कारवाई होऊ न देण्याची भूमिका घेतली. डॉ. सदानंद मोरेंच्या 'लोकमान्य ते महात्मा'च्या दुसर्या खंडात यासंदर्भात विवेचन आहे, ते काहीसं असं की उत्तर पेशवाईपासून ब्राह्मण विरूद्ध कायस्थ, मराठा, अन्य जाती असा विद्वेष सुरू झालेला होता. तेव्हाचं कारण अर्थातच नाकर्ते आणि घाबरट (paranoid) पेशवे. त्याशिवाय ब्राह्मणांचं इंग्रजी राजवटीतही असणारं महत्त्वाचं स्थान, धार्मिक अधिष्ठान इत्यादींमुळे ब्राह्मण विरोधात तेल पडत गेलं. टिळकांच्या, शाहूंच्या वेदोक्त-शास्त्रोक्त प्रकरणात असणार्या पारंपरिक तरीही दुराग्रही भूमिकामुळेही त्यात आणखी भर पडली.
मराठी ब्राह्मणांमधे जसे कट्टर गांधीवादी होते, विनोबा, (आणखी बरीच नावं आहेत, आता विसरले) इ. तसे कट्टर गांधीविरोधकही होते. टिळकांचा राजकीय वारसा चालवणार्या नरसोपंत केळकरांनीही 'तळ्यात-मळ्यात' करत कधी एक ठाम भूमिका घेतली नाही, पण ते मनाने नेहेमीच गांधीविरोधक होते. कट्टर गांधीविरोधकांमधे अर्थातच नथुराम आणि असे अनेक ब्राह्मण होते. त्यांचा मुख्य राग जातीय आणि प्रांतीय प्रकारचा होता, मराठी ब्राह्मणाकडून गुजराथी बनियाकडे नेतृत्त्व जाणे (हे डॉ. सदानंद मोरेंचं मत.) त्याशिवाय मनाचा कौल, अहिंसा, या गोष्टी होत्याच.
गांधींच्या खूनामुळे काही शतकं चाललेल्या या ब्राह्मणद्वेषाला ठिणगी मिळाली. सूड किंवा न्यायबुद्धीने दोषींवर कारवाई केली असती तर ब्राह्मणांविरोधातला राग आणखी धुमसता राहिला असता. त्यामुळे तत्कालिन गृहमंत्री, सरदार पटेलांचा राग पत्करूनही बाळासाहेब खेरांनी कठोर कारवाई टाळली.
(पुस्तक वाचून आता बराच काळ झालाय. त्यामुळे तपशीलात गफलती असण्याची बरीच शक्यता आहे. पण मुख्य मुद्दा, जातीकलह टाळणे, तो मोरेंच्या मताशी प्रामाणिक आहे.)
1 Feb 2013 - 11:58 pm | विकास
ज्यांचे कुणाचे हे लेखन असेल आणि जे कोणी त्याच्याशी सहमत असेल (मोरे यांच्या पासून आपल्या बद्दल सर्वांचाच आदर ठेवत) त्यांच्याशी पूर्णपणे असहमत. कुठल्याही सामाजीक हिंसेचे कुठल्याही पद्धतीने जर समर्थन अथवा बचाव करायचा ठरवले तर ते अशा कुठल्याही घटनेचे समान पद्धतीने करायला हवे. कारण जाती-जमातीतील आणि भिन्न धर्मातील वैर हे अनेक बाबतीत अनेक शतके असलेला आपला देश आहे. (तेच इतरत्र देखील). मग ते दुधारी शस्त्र ठरून त्यातून समाजात हिंसा करणे हे जनमान्य होऊ शकते. मग त्यातून त्या भूगाची, मग देशाची घडी विसकटू शकते, त्याचाच पुढे परीणाम सगळ्या जगावर देखील होऊ शकतो... असे अनेक दाखले जगभर पहाता येतील...
म्हणूनच इतिहासातील selective घटनांचा, स्वतःच्या राजकीय/सामाजीक/वैचारीक स्वार्थासाठी कुणाचे तरी selective victimaization करत कुणालातरी सतत राक्षस ठरवत बोंब मारणे बंद झाले पाहीजे अशा मताचा मी आहे. ती परीपक्वता आणि प्रगल्भता जेंव्हा स्वतःला विचारवंत म्हणवणार्या तथाकथीत समाजधुरीणांमधे, माध्यमांमधे येईल तो सुदीन.. असो.
2 Feb 2013 - 12:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुस्तक वाचताना हे हिंसेचं समर्थन वाटलं नाही.
गांधींजींच्या खूनानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जी हिंसा उसळली तिच्यामागची कारणमीमांसा समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. डॉ. मोरेंच्या मताप्रमाणे हा फक्त गांधी-अंध-भक्तीचा आविष्कार नव्हता. ब्रिटीशपूर्व काळापासून महाराष्ट्र हे एक सत्ताकेंद्र/सत्तास्थान असल्यामुळे मराठी लोकांमधे एकंदरच राजकीय जागृती अधिक प्रमाणात होती. (तीच गोष्ट बंगाल आणि पंजाबमधे, कारणं काही प्रमाणात वेगळी असली तरीही). त्याशिवाय जातीभेदांची किनार या दंग्याला होती. गांधी-अंध-भक्तांनी त्यांच्या खूनाचं कारण दाखवत गांधीवादी ब्राह्मणांनाही सोडलं नव्हतं. बहुदा शंकरराव देवांना किंवा त्यांच्या वडलोपार्जित घरादाराला याची झळ बसलेली होती.
गांधी या 'महापुरुषाचा पराभव' त्याच्या अनुयायांनी केलेल्या या हिंसेमुळे झाला ही 'गंमत' आहेच; पण त्याचं कारण फक्त गांधीजींच्या भक्तांना अहिंसा, गांधीजींच्या विचारांचा गाभा न समजणं एवढंच नव्हतं. गांधीजींचा खून एका मराठी ब्राह्मणाने करण्याचं निमित्त झालं एवढंच.
---
त्यापुढच्या इतिहासात इंदिरा गांधींच्या खूनाचा बदला घेण्यासाठी शीखांविरोधात हिंसा उफाळली. त्याचंही कारण फक्त आंधळी इंदिराभक्ती एवढंच असेल हे पटत नाही.
पण अशा घटनांमुळे वाईट प्रथा सुरू होतात हे मान्य आहे. ठाण्यातही आनंद दिघे हॉस्पिटलात गेले म्हणून शिवसैनिकांनी हॉस्पिटलाचीच तोडफोड केली. शिवसेनेला हिंसा वेगळी शिकायची आवश्यकता नव्हतीच, पण महात्मा आणि इंदिरा गांधींच्या खूनानंतर उसळलेल्या हिंसेकडे, आणि त्यापुढच्या तुम्ही उल्लेख केलेल्या राजीव गांधींच्या मुक्ताफळांकडेही याचं पितृत्त्व काही प्रमाणात द्यायला हवं.
2 Feb 2013 - 12:52 am | विकास
डॉ. मोरे यांचे लेखन माहीत असल्यामुळे कल्पना आहे. त्यावेळेस सरकारने का निर्णय घेतले याची अनेक कारणे असू शकतात, त्यातील हे देखील एक आहेच. अशी कारणमिंमासा अशा सर्वच प्रसंगात देत प्रस्थापित सरकारे वागली तर तथाकथीत विचारवंत गप्प बसतील/बसतात का? नाही हे उत्तर आहे. तथाकथीतच नाही तर प्रामाणिक विचारवंताने देखील गप्प बसू नये असे मी म्हणेन. पण त्यात आधी म्हणल्याप्रमाणे सिलेक्टीव्ह राक्षसीकरण करणे आणि ते देखील एका व्यक्तीच्या गुन्ह्याबद्दल संपूर्ण जातीजमातीचे, विचारांचे, संघटनेचे, संस्कृतीचे, हे अक्षम्य आहे आणि ते आपल्याकडे सातत्याने झालेले आहे.
तुम्ही आनंद दिघ्यांच्या मृत्यूनंतरचे उदाहरण दिले, त्यात देखील काय दिसते? ती घटना (आणि दुर्घटना) २००१ साली झाली. तरी देखील २०१२ साली दिलीप डिसुझाला बाळासाहेबाच्या आजारपणात त्याच्या वाचकांना पहील्यांदा त्याच घटनेची आठवण करून द्यावीशी वाटली. थोडक्यात पब्लीक कारणमिंमासेपेक्षा त्यातील हिंसा लक्षात ठेवत इतरांना लक्षात ठेवण्यास भाग पडते - हे ठिकाण योग्यच आहे, पण आधी म्हणल्याप्रमाणे, सिलेक्टीव्ह...
2 Feb 2013 - 1:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
समजले नाही. राक्षसीकरण कशाचं? कोण करतं? आणि त्याचा विचारवंतांशी संबंध काय?
दिलीप डीसूजाच कशाला, माझ्या ओळखीतल्या अनेकांनी (ज्यांना सर्वसाधारण लोक म्हणून ओळखता यावं) "सिंघानिया फोडून पोट भरलं नसेलच, आता मातोश्री फोडलं पाहिजे" अशा प्रकारच्या गप्पा खासगीत मारल्या होत्या. यातले काही लोक हिंदुत्त्ववादी, गांधीविरोधकही आहेत. बहुसंख्य ठाणे आणि परिसरातले आहेत.
कुठेही बाँबस्फोट झाला, विशेषतः मुंबई आणि परिसरात, तर तेव्हा १९९२ च्या दंगलींची लगेच आठवण होते, (माझी अशी अजिबात इच्छा नाही) पण समजा काँग्रेसमधल्या कोणी बड्या राजकारणी व्यक्तीचा उद्या खून झाला, तर महात्मा आणि इंदिरा गांधींच्या खूनानंतर उसळलेल्या हिंसेची त्यात आठवण येणं अपरिहार्य आहे. विचारवंतांना ती आठवण कडू आठवण म्हणून होते, तेव्हा चुका झाल्या, त्या आता होऊ नयेत अशा प्रकारची ती आठवण असते.
अशा वेळेस होणारी हिंसा हे फक्त लक्षण आहे. रोग भलतीकडेच असतो आणि बहुतेकदा तो लक्षणांशिवाय शोधणंही कठीण असतं.
म्हटलं तर एखादा पाकीटमार किंवा मुलीची छेड काढणारा सापडला तरी आपल्याकडे पब्लिक त्याला मरेस्तोवर मारतं. तिथे तर जात, धर्म, राजकीय बांधिलकी काही-काही आड येत नाही. तिथे कोण विचारवंत असेल आणि त्याच्या/तिच्याकडे तेवढं शारीरिक आणि मौखिक बळ असेल तरच तो चोर/छेडखानी करणारा पब्लिकच्या हाणामारीतून सुटतो.
1 Feb 2013 - 11:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
लिखाण वाचून रिचर्ड डॉकिन्सची आठवण झाली. त्याची पुस्तकं उत्क्रांतीला विरोध करणार्या, देवभोळ्या लोकांना उद्देशून असतात; तसा हा लेख लेखकाची पूर्वीची जी गांधीद्वेषाची धारणा होती, ती अजूनही बाळगणार्या लोकांना उद्देशून आहे असं वाटतं.
लेख आणि मांडणी दोन्ही आवडले. आता थोडी बाल की खाल. लिखाण उत्तम आहे म्हणून शुद्धलेखनाच्या उलुश्या का होईना, चुका टोचतात. प्रूफरीडर म्हणून काम करायला मी तयार आहे.
2 Feb 2013 - 12:04 am | अनुराधा१९८०
मोहनदास गांधी नावाच्या बनेल म्हातार्याने. द्विराष्ट्रवाद कधीच मान्य केला नाही. फाळणी मात्र देउन टाकली >>> मुस्मिल लीग विचारत कुठे होते काँग्रेस ला आणि गांधीना? त्यांनी २ च option ठेवले होते. एकतर सत्तेत ५०:५० भागीदारी, पंतप्रधान मुस्लिम लीग चा. किंवा फाळणी.
नेहरुंना तर सत्ते ची स्वप्ने १९३७ पासुन च पडत होती त्यामुळे फाळणी मान्य करण्याशिवाय काही ईलाज च नव्हता.
ह्या वधा नी एका हुतात्म्याला जन्म मात्र दिला. ईंदिरा गांधी चे पण असेच. आता ह्यांचे वध झाले म्हणुन ह्यांची पापे धुवुन निघली सगळी.
2 Feb 2013 - 12:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
सगळी पापं धुवून निघाली कारण आणि/किंवा याचा अर्थ हे लोक हुतात्मे झाले.
अगदी सहमत आहे.
2 Feb 2013 - 12:09 am | बाबा पाटील
बाई माफ करा. आपण महान आहात ! आपले आर्दश आहेत्,आमची सपशेल माघार....
2 Feb 2013 - 12:18 am | सोत्रि
अतिशय सुंदर लेख!
फाळणीसाठी कोणीही जबाबदार असो, ती होणारच होती आणि ती झाली हेच बरे झाले. द्विराष्ट्रवाद मान्य असलेल्या अखंड हिंदुस्तानापेक्षा फाळणी झालेला हिंदुस्तान ह्यातच भले होते आणी आहे.
- (गांधीवादी नसलेला) सोकाजी
2 Feb 2013 - 12:33 am | शैलेंद्रसिंह
जवळपास सगळ्या मुद्द्यांशी सहमत आहे. गांधींनी एकात्मतेचे राजकारण केले. मुस्लिम विरोध टाळला हेही सत्यच आहे. कारण हिंदु-मुस्लिम एकता जास्त मह्त्वाची होती. लीगचे नेते गांधींना पर्यायाने कॉंग्रेसला हिंदुंची संघटना म्हणुन प्रोजेक्ट करायला तयारच होते. गांधींना तेच नेमके टाळायचे होते. कॉंग्रेस ही हिंदुंची नसुन सगळ्या भारतीयांची प्रतिनिधी आहे हे त्यांना सिद्ध करायचे होते.
फ़ाळणीचे श्रेय मात्र नेहरु-पटेल ह्यांना द्यायला हवे. ४०% मुस्लिम लोकसंख्येबरोबर लष्करातील मुस्लिमांची संख्याही जास्त होती. सैन्यातही मुस्लिम फ़ुटीरतावाद रुजला होता. ब्रिटीश गेल्यानंतर फ़ाळणी झाली असती तर ती मुस्लिम लीगच्या शर्तीवर झाली असती. पटेल-नेहरुंनी दुरदर्शीपणा दाखवला म्हणुनच आजचा नकाशा भारताला मिळाला.
शेषराव मोरेंनी त्याचे श्रेय गांधींना उगाच दिलंय. फ़ाळणीच्या काळातली परिस्थित पाहता गांधींच्या हिंदु-मुस्लिम एकात्मतेच्या राजकारणाला सुरुंग लागलेले उघड आहे. मुस्लिम लीग राजकारणात प्रबळ असतांना हिंदु-मुस्लिम एकता हे एक दिवास्वप्नं बनलं होतं.
2 Feb 2013 - 1:50 am | प्रसाद गोडबोले
शेवटी फाळणीचे खापर कोणाच्या माथ्यावर फोडायचे ते सांगा , सरांच्या , की महात्म्यांच्या की स्वातंत्र्यवीरांच्या ??
शेवटी सगळेच ग्रेट !!
बाकी आंबेडकर अन सावरकर ह्यांची कधीच चर्चा झाली नाही काय राव ?
फाळणी होतच होती तर क्लीन स्वीप व्हायला हवी होती ...ह्यावर सावरकरांचे आंबेडकरांशी एकमत झाले असते कदाचित असे वाटते , नाही का ?
(काडी टाकणे मोड ऑन :
आणि आमचा पेटंट पश्न : ह्यालेखावरुन महात्माजींचे पायही मातीचेच होते असे आम्हास वाटले , मग त्यांन्ना(च) राष्ट्रपिता का म्हणावे ? :O
आणि म्हणायचेच असेल तर ह्या हिशोबाने मग सावरकर , आंबेडकर , जीना(?) ह्यांना राष्ट्रकाका / राष्ट्रमामा म्हणावे काय ? =))
काडी टाकणे मोड ऑफ)
2 Feb 2013 - 2:00 am | श्रीरंग_जोशी
राज्यकर्ती जमात हा त्या काळात ठासून वापरला गेलेला मुद्दा असला तरी तो पटण्यासारखा नाही. भारतीय उपखंडात विविध जाती धर्मांचे राजे होते व त्यांच्या अधिपत्याखाली इतर धर्मांचे सरदार, सैन्य व जनता असायची. केवळ इंग्रजांचे राज्य येण्याअगोदर काहीशे वर्षे दिल्लीचे तख्त मुस्लिम व्यक्तिंकडे असले म्हणून लगेच सर्व मुस्लिम 'राज्यकर्ती जमात' बनू शकत नाही. मुळात उपखंडातील बहुतांश मुस्लिमांचा मुळ धर्म इस्लाम नव्हताच. परकीय आक्रमकांद्वारे तो लादला गेलेला होता.
लेखाच्या आशयाशी सहमत.
2 Feb 2013 - 2:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
१. किती वर्ष राज्य केलं हे पहायचं तर महाराष्ट्रात ब्राह्मण मुघलांच्या अर्धा काळही सत्तेवर नव्हते. पण तरीही पराभव ब्राह्मण राज्यकर्त्यांचा झाला, जणूकाही ब्राह्मणांकडुन राज्य गेलं. ही पारंपरिक लढाऊ वृत्तीचीही नाही. तरीही सुरूवातीच्या काळात स्वातंत्र्याचे प्रयत्न महाराष्ट्रात याच जातीकडून झाले. बंगालमधे ब्रिटीश सत्ता आल्यावर हिंदू, विशेषतः ब्राह्मण सुखावले कारण मुसलमान सुभेदारचं राज्य गेलं. महाराष्ट्रात उत्तर पेशवाईत ब्राह्मणांचा अत्याचार सहन करणारे दलित, आणि इतर जातीतले लोक सुखावले.
२. लादलेला धर्म असतो तो पहिल्या पिढीवर. पुढची पिढी त्याच, नव्या धर्मात जन्माला येते. मुघल आणि एकंदर मुसलमान राज्यकर्ते ब्रिटीश सत्तेआधी निदान काही शतकं उत्तर भारतात होते.
2 Feb 2013 - 2:17 am | श्रीरंग_जोशी
माझा मुद्दा एवढाच आहे, की कुठल्याही जातीच्या / धर्माच्या / गटाच्या लोकांना राज्यकर्ती जमात हे लेबल लावणे भारतीय उपखंडाच्या बाबतीत संयुक्तिक नाही...
2 Feb 2013 - 2:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आधी वर्तन लोकांनी केलं, मग लेबल लावलं गेलं.
2 Feb 2013 - 4:24 am | अग्निकोल्हा
मुघलांच्या आधि काही "शे" वर्षे भारतात राज्य कोणाचं होतं या बाबत तुम्हि अनभिज्ञ आहात हे कळाले.. पण पुढे काय सांगायचय ?
2 Feb 2013 - 4:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
"आपलं" राज्य आणि "आपले" राज्यकर्ते परत आणण्यासाठी जनसामान्यांकडूनही प्रयत्न केले जातात. राज्यकर्ती जमात असं म्हणताना विशेषतः उत्तरेकडच्या मुस्लिमांचा उल्लेख करताना लेखकाला हे सुचवायचं आहे.
बाकी मी इतिहासात कच्ची आहे हे खरंच.
2 Feb 2013 - 5:00 am | अग्निकोल्हा
रेफरन्स कळाला.
:) ओह! प्लिज डु नॉट माइंड.
अवांतर :- मुघलांविरुध्द इतकि शतके भारतिय राज्यकर्ते केवळ पराभुत होते पारतंत्र्यात न्हवते असा गोड गैरसमज भारतिय समाजमनावर होता काय ? असल्यास त्याचे कारण मुघलांमधे "लोकशाही" न्हवते हे असावं का ?
2 Feb 2013 - 6:20 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
माझा खरंच इतिहास या विषयाचा फार अभ्यास नाही. पण काही स्पेक्यूलेशन्स:
शक्य आहे.
सुरूवातीला मुघलांनाही विरोध झालाच. बाबर जिंकला पण हुमायूनचं बालपण अतिशय कष्टाचं, धावपळीचं होतंच.
लोकशाही हे मोठं तत्त्व आहे हे लक्षात येण्याचं कारण म्हणजे इंग्लिश शिक्षण. त्यांची भाषा शिकून त्यांचे विचार वाचल्यावर त्यांच्या लोकांना असलेलं स्वातंत्र्य आम्हाला का नाही असा एक प्रश्न सहज उपस्थित झाला. मुघल आणि अन्य आक्रमकांकडे, आधीच्या काळात हे तत्त्व नव्हतंच. त्यातही राजपूत राजघराण्यांमधे राजाशी लग्न करून, सोयरीक जमवून, मांडलिकत्त्व पत्करून अगदी समान पातळीवर नाही तरी भारतीय लोक उच्चपदस्थ होतेच. यामुळे एतद्देशीयांचा राज्यकारभारात वरचष्मा होताच. अकबराच्या उदारमतवादी राजवटीमधे परकीय आणि आपले असा फरकही बराच कमी झाला असण्याची शक्यता आहे.
दुसरं असं की मुघल राज्यकर्ते आले आणि इथले होऊन राहिले. इथला कापूस, मँचेस्टरमधे नोकर्या आणि पुन्हा खप भारतात असा प्रकार मुघल काळात झाला नाही. कुरुंदकरांनी या संदर्भात सुरेख विवेचन 'जागर'मधे केलेलं आहे; मुसलमान आक्रमक भारतात आले आणि मुस्लिम धर्माचं भारतीयीकरण झालं. (संगीत, दर्ग्याच्या माध्यमातून मूर्तीपूजा इ.) ते मुळातूनच वाचा. तर मुसलमान बाहेरून भारतात आले पण भारतीय झाले. ब्रिटीश हे कायम ब्रिटीशच राहिले. अँग्लो-इंडीयन संततीमधेही जी मुलं गोरी होती, ब्रिटनमधे वेगळी दिसणार नाहीत अशी होती त्यांना आपल्या देशात परत नेलं.
2 Feb 2013 - 4:04 am | काळा पहाड
मी तथाकथीत हिंदुत्ववादी नाही. ते फार मवाळ असतात. पण यात विनोद काय आहे? लोकसंख्या यायची काय गरज आहे? पाकिस्तानचे तुकडे आणि बांग्लादेशचे तुकडे हे वसाह्ती म्हणून ही असू शकतात. जसे गाझा आणि वेस्ट बँक इस्त्रायल साठी होते तसे.
2 Feb 2013 - 5:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तशीही बांग्लादेशाची लोकसंख्या बहुदा आपल्या आधीच कमी होईल. लोकसंख्या वाढण्याचा बांग्लादेशाचा दर आपल्यापेक्षा कमीच आहे. त्यांचा दर २००८ मधे प्रत्येक स्त्रीमागे २.४ मुलं असा होता; तो २०११ मधे प्रत्येक स्त्री मागे २.२ मुलं असा झाला. भारतात हेच आकडे २.७ आणि २.६ असे आहेत.
संदर्भ वर्ल्ड बँकेचे संस्थळ
वसाहती बाळगणार्या इस्रायलमधे भडक पक्षाचे नेतान्याहू यांची मतसंख्या रोडावल्याची अलिकडची बातमी वाचली असेलच. (बाय द वे, तो देश इस्रायल असा आहे, इस्त्रायल असा नाही. अस्त्रातला स्त्र नाही, सहस्रमधला स्र.)
2 Feb 2013 - 11:31 am | फारएन्ड
माझ्या मते फाळणीचे अपश्रेय किंवा श्रेय दोन्ही गांधीजींना देणे चुकीचे आहे. त्यांचा फाळणीला जाहीर विरोध होता हे सर्वमान्य आहे व त्यांचा ज्या बहुसंख्य लोकांवर प्रभाव होता त्यांनाही फाळणी नकोच होती. पण त्या वेळी फाळणीसंदर्भात ब्रिटिश, जीना व काँग्रेस यात ज्या राजकीय खेळी चालू होत्या त्यात गांधीजींनी काही डावपेच खेळल्याचे माहीत नाही. पडद्यामागे राहून नेहरूंतर्फे ते करत होते म्हणावे तर १९४७ च्या सुमारास काँग्रेसच्या नेतृत्वाने त्यांचे सल्ले स्वीकारणे कमी केले होते असेच दिसते.
गांधीजींचे हेतू निर्विवाद असले तरी तेव्हाच्या नेतृत्वाला त्यांचे राजकीय सल्ले प्रॅक्टिकल वाटले नसतील असेच वाटते.
त्यामुळे ते फाळणी रोखण्यास असमर्थ होते असेच माझे मत झाले आहे.
मात्र फाळणी होऊ देण्यात त्यांचा काहीतरी (बाकी भारताच्या हितासाठी) ग्रॅण्ड प्लॅन होता असे काही पोस्ट्समधे ध्वनित होते ते पटत नाही. तसे conjecture असेल काही लोकांचे.
2 Feb 2013 - 1:27 pm | अवतार
यांनी म्हटल्याप्रमाणे, "पुढारलेल्या देशांतील लोक ज्या बाबी खाजगी बैठकीत सुद्धा उच्चारत नाहीत त्या बाबी आमच्या देशांतील लोक जाहीरपणे बोलूनही समजून घेत नाहीत."
राजकारण हे भावनिक मुद्द्यांवर होत असले तरी राजकारणाचे आकलन हे राजकीय दृष्टीकोनातून न होता भावनिक आधारावर होऊ लागले की वास्तव आणि कल्पना यांतील सीमारेषा पुसट होऊ लागतात! "आम्ही विरुद्ध ते" असा झगडा जिथे चालू असेल तिथे महापुरुषांना सोयिस्कर चौकटींमध्ये डांबून ठेवणे यापलीकडे फारसे काही होऊ शकत नाही. इतर देशांमध्ये निदान "आम्ही" आणि "ते" यांच्या व्याख्या तरी सुस्पष्ट असतात. तिथल्या महापुरुषांच्या चौकटी देखील ठरलेल्या असतात. इथे तर कोणत्या महापुरुषाला कुठल्या चौकटीत टाकायचे हेच अजून ठरत नाही. त्यातही गांधीजींसारखा सर्वांनाच कोड्यात टाकणारा विषय असला की कल्पनांना धुमारे फुटणारच. या देशातील समाजाच्या मानसिकतेलाच मुळात अनेकविध पैलू आहेत. त्यातून निर्माण होणारे गांधींसारखे रसायन समजून घेणे हे गांधीजींवर विनोद करण्याइतके सोपे खचितच नाही. कोणत्याही विचारसरणीचे समर्थन किंवा विरोध हा राजकीय विश्लेषणाचा हेतू नसून निरपेक्ष सत्याची उकल करणे हे खरे ध्येय आहे. ह्या लेखातून ते निश्चितच साध्य झाले आहे.
ह्या दुव्यातून अजून काही ऐतिहासिक तथ्ये मिळू शकतील.
आज-काल : गांधीजी आणि जिना एक पुनर्विलोकन
16 Oct 2013 - 6:33 pm | arunjoshi123
अशा आठवणी आठवून उजव्या किंवा कशा मताचे लोक कसे असतात याची कल्पना इतरांना देणे याला कुमार्केतकरी विचारसरणी म्हणतात. कुमार्केतकर जेव्हा टीव्हीवर मोदी-आडवाणी द्वंद्वाच्या वेळी 'संघाचे आडवाणींबद्दल काय मत आहे?' वर बोलतात तेव्हा ते 'अहो काय सांगू मला ते शब्द बोलवत नाही, अगदी प्रायवेटमधे बोलवत नाहीत इतके घाण आहेत' असे उत्तर देतात. आमच्या दिल्लीतले प्रेक्षक जाम खूश! एकतर मोदींच्या समर्थनाचा जोर आणि वर मराठी गोरागोमटा बामन बोलतोय म्हणल्यावर नक्कीच खरं असणार! राजकीय तत्त्वज्ञान , कोणते का असेना, पचवायला फार जड असते म्हणून ते जेव्हा हस्तिदंती मनोर्यातून खाली आणतात तेव्हा त्यात चिकार भेसळ झालेली असते.
जे लोक आयुष्यभर एकच राजकीय तत्त्वज्ञान घेऊन चालतात त्यांचे ठीक, पण जे 'अधिक अनुभवांनंतर उदार' होतात तेव्हा त्यांना त्या भेसळीचा काँट्रास्ट फारच प्रकर्षाने जाणवायला लागतो. लेखकाच्या बाबतीतही तेच झाले आहे. कारण अशा काँट्रस्टवर भूतकाळातल्या व्हिलनचे चरित्रण चालू झाले कि त्यात टिका करायला जागा उरत नाही, जे न व्हावे.
मलाही असे विचार सुचतात का पाहतो. हे केवळ विचार आहेत, सत्य नाही. केवळ साधर्म्य साधायचा प्रयत्न. ---> एकेकाळी ऐश्वर्या आपली सून व्हावी म्हणून तीव्र इच्छा असणारे सलिम खान, आज जेव्हा ऐश्वर्याच्या मुलीला त्यांची नात, फुकटात, आपल्या संपत्तीचा केवळ ५% भाग देऊ जात आहे तेव्हा कोकलत आहेत ...हा एक विनोदच आहे!!!
या खंडीत भारताच्या समर्थनाचा फंडामेंटल क्रायटेरिया आहे वाटते. यामधे लेखकाने बरीच लै मोठी विधाने केली आहेत -
१. सर्वात जास्त ओब्जेक्शनेबल - अखंड भारताचा निवडून आलेला उमेदवार (पी एम) जर मुसलमान राहिला असता तर तो हमेशाच हिंदूप्रती हरामखोर राहिला असता असे का? मध्ययुगात काही मुसलमान राजे (वाईट) असणे वेगळे आणि स्वतंत्र भारताचा डेमोक्रॅटिक मुस्लिम लीगचा मुस्लिम पी एम तसा असणे वगळे.
२. १२% मुस्लिम असताना भारतात राज्य करणारी काँग्रेस हिंदुच नाही म्हणणे हे ही धाडसच. सगळीकडे काय भगवा रंग मारला पाहिजे का? दोन मल्लांच्या फायटीत तिसरा (एकगठ्ठा मुस्लिम) शिट्ट्या मारू लागला म्हणजे शिट्ट्या मारणारा कुस्तीत कोणाचा विजय व्हावा हे ठरवतोय. (आपण शिवाजी पार्क ला वाढलेले म्हणून एक गोष्ट सांगतो. कधी लातूरला या. एखाद्या रँडम म्हातार्याला कमळावर शिक्का मारायला सांगा. 'नगं बाबा, रजाकार येतील पुना' असं उत्तर येण्याची शक्यता आजही बरीच आहे.) २००२ चा दंगा इतका प्रसिद्ध असताना, माध्यमांनी मोदींना वाइट झापले असताना आज तो सर्वात फेमस पी एम उमेदवार आहे.
३. मुस्लिम खरोखरच चांगले सत्ताधारी असले, कुण्या का पक्षाचे असेना, तर त्यांना पुढे जाऊ देण्यात काय वाईट आहे? चांगले सत्ताधारी जाऊ द्या, केवळ मुसलमान चांगले (शब्द चुकला वाटतं) मतदान करतात म्हणून त्यांचे उमेदवार निवडून आले तर काय वाईट आहे? इतकी भिती का? नेहमी पाकिस्तानकडे का पाहता? मलेशियाकडे का नाही?
४. भारतीय दंगलींचं प्रमाण (१९४६-४७-४८ सोडून) स्वातंत्र्यानंतर जास्त आहे. भीषणता देखिल जास्त आहे. फाळणी नावाच्या वेळी जी कटूता निर्माण झाली ती अभूतपूर्व आहे.
५. फाळणी झाली नसती तर ३-४ युद्धं झाली नसती.
६. आणि मुसलमानांचे असे टक्के का मोजता? जास्त % मंजे जास्त डेंजर!
जाऊ द्या, मी स्पष्ट म्हणतो, मुस्लिमांचं भय असणे किंबा त्यांच्यावर (सहदेशी म्हणून हो) प्रेम नसणे या दोन गोष्टी फाळणीचे समर्थन करणारांची मूळ मानसिकता दाखवतात.
आता एकदा फाळणी झालीच आहे तर -
१. ज्यांना एकत्र राहायचे होते त्यांना ते मिळाले, ज्या मुस्लिमांना सवते (आपल्या धर्माच्या नावाने, राजधर्माने, इ) राहायचे होते त्यांना ते मिळाले. पण ज्या हिंदूंना सवते राहायचे होते त्यांना ते मिळाले नाही. सवते राहू इच्छिणारे हिंदू कमी आहेत म्हणून त्याचा अर्थ त्यांची मागणी गैर आहे असा होत नाही. एखादेवेळी 'आज' ती असंभव आहे म्हणा, पण अशी 'शुद्ध' इच्छा असणेच अनैतिक्/बेकायदेशीर्/घटनाविरोधी/नॉन्-सेक्यूलर/भांडखोर्/भेदभावी/इ इ आहे म्हणणे अन्याय्य, एकतर्फी आणि अनैतिक आहे.
गांधीजींची हत्या आणि त्यांचा वैचारिक विरोध एकत्र चर्चू नये. नथूरामाशी डिसअलाइनमेंट करण्यातच विरोधकांची ९०% उर्जा जाते. माझ्या विचारांचा स्रोत नथूरामचे पुस्तक वा शिवाजी पार्क वरचा कॅरमचा अड्डा नसताना सुद्धा मी त्यांच्या राजकीय निर्णयांवर घणाघाती टिका करू शकतो, and it may hold some water. आणि हो अखंड भारत काही नागपूरच्या लोकांचा कॉपीराईट नाही, it may make a great social, economic and political sense to some, which should be taken with due regard.
26 Oct 2013 - 1:22 pm | खटासि खट
राजघराणे कोण म्हणून प्रोफाईल चाळली तर डॉ अभिराम दीक्षित हे नाव दिसलं. ऑर्कुटपासून हे नाव वाचनात आहे असं वाटलं. या नावावरून टक्कल असलेले, गोल काड्यांचा चष्मा असलेले कुणी असतील ही अपेक्षा फोल ठरली.
लेखाबद्दल :
१. अत्यंत प्रामाणिक
२. विचारांची प्रचंड वावटळ दिसतेय.
३. जवळपास या पिढीतल्या सर्वांचीच संभ्रमित अवस्था शब्दबद्ध झाली आहे.
४. प्रचारकी विचारांना त्यागून विश्लेषणाकडे वाटचाल हा प्रवास आवडला
त्याचबरोबर काहीशी लांबण लावल्यासारखं वाटलं. मुद्देसूद असलं तरीही काटछाट करणे शक्य आहे असं वाटतं. जेणेकरून लेख नेमकेपणाने पोहोचेल.
26 Oct 2013 - 2:30 pm | एस
तूर्तास केवळ पोच.
28 Mar 2020 - 7:25 pm | srahul
एक प्रश्न मला नेहमी पडतो तो म्हणजे जिना हे गांधींना फक्त हिंदूंचे नेते असे संबोधत. स्वत: गांधीजी मात्र स्वत:ला सर्व भारतीयांचा नेता मानत . त्या काळात स्वा.सावरकर हे स्वत:ला हिंदूंचा नेता मानत . परंतु इतिहासात सावरकर आणि जिना यांची भेट किंवा चर्चा झाल्याचे वाचायला मिळत नाही.....दोघांनी एकमेकाला दुर्लक्षीत केले का एकमेकांना भेटायला दोघांचा अहंकार आडवा आला?
28 Mar 2020 - 11:13 pm | हुप्प्या
जर फाळणी झाली नसती आणि भारत अखंड राहिला असता तर काय झाले असते हे केवळ अंदाज आहेत. ते तसेच झाले असते ह्याची खातरजमा करायचा कुठलाही मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे कितीही अभ्यासू माणूस असला तरी हे अंदाज केवळ अंदाज आहेत. ब्रह्मवाक्य नाही.
जर फाळणी झाली नसती तर कदाचित कडव्या मुस्लिम विचारांचा नाश झाला असता. कदाचित राज्ये जास्त स्वतंत्र/स्वायत्त असती. कदाचित सरहद गांधी वगैरे राजकारणापासून धर्म वेगळे ठेवणारे लोक पुढे आले असते. कदाचित प्रत्येक प्रांताच्या प्रांतिक अस्मिता जसे भाषा, संस्कृती जास्त प्रबळ असत्या आणि त्यातून मुस्लिम देश वगैरे विचार पराभूत झाले असते. कुणास ठाऊक.
गांधी नि:शस्त्र होते आणि त्यांना मारणे भ्याडपणाचे वगैरे. ठीक. मग पंजाब, बंगाल, सिंध आणि पाकिस्तानातील अन्य भागातील हिंदूना कुठलेही संरक्षण न देता, त्यांच्यावर फाळणीचा, भीषण अत्याचाराचा, देशोधडीला निर्णय लादणार्या काँग्रेस आणि गांधींचे काय?
आज कश्मिरचे ३७० हटवल्यावर त्यांना विश्वासात घेतले नाही अशी बोंब मारणारे काँग्रेसी, फाळणीच्या वेळेस पंजाब, बंगाल सिंधमधील हिंदू लोकाना विश्वासात घेतले होते का? फाळणीच्या वाटाघाटीत मुस्लिम लीग होते मग तसेच हिंदुत्त्ववादी पक्ष का नव्हते? हिंदूंचे प्रतिनिधित्व काँग्रेसने का केले?
खुट्ट झाले की उपोषण करणार्या लोकांनी फाळणी होऊ नये म्हणून कुणी उपोषण का नाही केले? चले जाव सारखी भारतव्यापी चळवळ का नाही केली? निमूटपणे नांगी का टाकली? सत्ता मिळवण्याकरता?
29 Mar 2020 - 6:54 am | चौकस२१२
"फाळणी झाली हे एकप्रकारे बरेच झाले" हे आत्ता कळतंय .. त्यामुळे अखंड भारत परत करावा याला पाठिंबा असणारे फार कमी मिळतील...तेव्हा लेखाने सर्वांचे ( म्हणजे संघ परिवाराला पाठिंबा देणाऱ्या सर्वांना असे गृहीत धरा ) मत सध्या "अखंड भारत करा" असे गृहीत धरून टीका करून नये .
पण जेव्हा झाली तेव्हा दोन तीन कारणामुळे त्या पिढीला वाईट वाटणे साहजिक होते हे हि लक्षात घ्यायला नको का?
१) तेव्हा मुख्य लक्ष्य हे स्वातंत्र्य हे होते आणि तेव्हा "जागतिक इसलमीकरण " चा जोर पुढे येवडः तीव्र होईल याची कल्पना नवहती
२) कोणाहली घराची वाटणी होताना एक प्रकारचे दुःख होतेच तसे तेव्हा झाले असणारच आणि रणनीती म्हणून १ मोठ्या देशापेक्षा २ छोटे देश होऊन आपली जगातील पत कमी होईल असे हि जाणकारानं वाटले असेल.
गांधी बरोबर कि चूक याला फक्त बरोबर किंवा फक्त चूक असं म्हणणे म्हणजे एका बाजूची आंधळी भक्ती होईल.
दुर्दैवाने गेली ७० वर्षे, त्त्यांच्याबद्दल कुठलेही प्रश्न विचारले कि "काय हे महान आत्मा राष्ट्रपित्या बद्दल असे कसे बोलूच शकता " असे दरडावले जायचे .. कितपत यौग्य होता असा एकांगी पण?
निदान आता या बाबत खुली चर्चा तरी होतीय ...
गांधीनी स्वान्त्र्यसाठी जी पद्धत वापरली ती कदाचित इतर राज्यकर्ते ( डच ) असते तर प्रभावी ठरली नसती
आणि आज तर नाहीच नाही .
गांधी कितीही बरोबर असले तरी त्यावेळचे जहाल आणि मवाळ वादात गांधींनी अतिशय शिताफीने जहाल वाद्यांना बाजूल सारले ...हे मान्य करायला पाहिजे गांधी भक्तांनी .
भारतीय हिंदूंच्या नैसर्गिक सहिष्णुतेचा फायदा इतर घेत असताना गांधींसारख्या नेत्यांनी बरेचदा जी पडखाऊ भूमिका घेतली ती लाखो भारतीय जनतेला आवडली हि नव्हती ( आणि ते सर्व काही चड्डीवाले नव्हते सर्वसामान्य भारतीय हि होते) याकडे कसे डोळेझाक करता येईल ?
समोर शत्रू तुमहाला मारायला उभा असताना आपण हुशारी वापरून 2 गोष्टी करू शकतो
१) अरे ला कारे करणे
२) १) जमत नसेल तर योग्य वेळी माघार घेऊन मग परत शक्ती जमवून हल्ला करणे
पण याऐवजी ३) म्हणजे शत्रूचे मन वळवू . कधीतरी तो थांबेल .. अशी धारणा ठेवणे हा अडाणीपणाचाच प्रकार म्हणावा लागेल
दुर्दवीणे गांधींचं विचारसरणीला हरवायला लोकशाही मार्गाने पाहिजे हिते , त्यानं मारून नाही ...
पण जसे त्यावेळीस "भारतीय राष्ट्रीय काँग्रेस " हा एकमेव धागा स्वान्त्र्यलढ्यासाठी होता आणि ध्येय फक्त स्वान्त्र्य होतं तेव्हा , गांधींना असे हरवणे शक्य नव्हते