मिपावर लिहीणं धोक्याचं!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जे न देखे रवी...
3 Jul 2008 - 10:27 am

("सोळावं वरीस धोक्याचं" या लावणीवरून स्फूर्ती घेऊन,)

मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||

कथा-लेख मी कसा लिहू?
प्रवासवर्णन कसा करू?
जागोजागी उभे "समीक्षक",
निशाण बांधून मोक्याचं |

मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||

ओढ लागली खरडीची
धम्या-डॉन्याच्या गंमतीची
इनोबाही इथे नाचतो,
बँडेज सावरत गुढघ्याचं |

मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||

तात्याची खादाडी खरी
वरदा टाईम-पास करी
नाना चेंगट गुह्य उकलती,
"समभागां"च्या मटक्याचं |

मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||

चतुरंगाची बुद्धिबळं
विजुभाऊचं स्वप्न खुळं
स्वातीबाई कट्लेट तळते,
कोंबडी सोडून हाडकाचं |

मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||

आचरटपणा सोड बरा
पिकल्या केसां जाग जरा
डांबिसकाका, मनात भय धर,
सरपंचांच्या फटक्याचं |

मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||

(निवेदनः आमचे हे पहिले-वहिले विडंबन आमचे या विषयातले मानसगुरू श्री केशवसुमार यांच्या चरणी अर्पण!! कवितेत वर्णन केलेल्या व्यक्तींना प्रार्थना: कृपया, कृपया, ह. घ्या!!:))

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

3 Jul 2008 - 10:31 am | मदनबाण

जबरा.... अजुन काय म्हणणार..

(नमस्कार माझा तया विडंबनास) असे म्हणणारा.....
मदनबाण.....

मनिष's picture

3 Jul 2008 - 11:18 am | मनिष

जय पिडाकाका! :)

अरुण मनोहर's picture

3 Jul 2008 - 10:32 am | अरुण मनोहर

आयला हे पिवळ ड्यांबीस पन मानसाले टरकून असतय हे माहीतच नव्हत. हे सरपंच पन पोहोचलेले मांत्रीक दिसतात.

भाग्यश्री's picture

3 Jul 2008 - 10:32 am | भाग्यश्री

व्वा...फार छान! चपखल विडंबन!:)

http://bhagyashreee.blogspot.com/

अमोल केळकर's picture

3 Jul 2008 - 10:42 am | अमोल केळकर

चालीत मस्त बसलय

अमोल

सखाराम_गटणे™'s picture

3 Jul 2008 - 10:45 am | सखाराम_गटणे™

जबरा ऐकदम,
सकाळ ची चांगली सुरवाआट झाली.

सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

छोटा डॉन's picture

3 Jul 2008 - 11:10 am | छोटा डॉन

आता चक्क विडंबन !!!
तुमच्या व्यक्तीमत्वातला नवाच पैलु कळाला.
मला आधी शिर्षक वाचुन वाटले की पुन्हा एक "धराधरी आणि आपटाआपटीचा विषय" दिलात की काय ?
पण मस्त जमले आहे ....

चतुरंगाची बुद्धिबळं
विजुभाऊचं स्वप्न खुळं
स्वातीबाई कट्लेट तळते,
कोंबडी सोडून हाडकाचं |

हे भारीच ....

आचरटपणा सोड बरा
पिकल्या केसां जाग जरा

आणि हे काय? डायरेक्ट पिकल्या केसांचा उल्लेख !!!
म्हणजे आपण कबुल करता की आपले वय झाले ...
मग आधी माझ्याबरोबर "काका पणाबद्दल" एवढा वाद घातला त्याचे काय ?
[ पुन्हा तेच , कॄपया ह. घ्या. ]

पहिले-वहिले विडंबन आमचे या विषयातले मानसगुरू श्री केशवसुमार यांच्या चरणी अर्पण!!

जय हो गुरुदेव !!!

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनस्वी's picture

3 Jul 2008 - 11:22 am | मनस्वी

पिडाकाका पहिलं विडंबन छान जमलं आहे. आवडलं.

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

II राजे II's picture

3 Jul 2008 - 11:27 am | II राजे II (not verified)

नाना चेंगट गुह्य उकलती,
"समभागां"च्या मटक्याचं |

हा हा हा .... जबरा !!!

=))

राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

अवलिया's picture

3 Jul 2008 - 12:21 pm | अवलिया

यु टु ब्रुट्स

नाना

वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

प्रमोद देव's picture

3 Jul 2008 - 11:27 am | प्रमोद देव

पिडांश्री मस्त केलंय विडंबन!
इथे सगळे छुपे रुस्तम दिसताहेत :?

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

बेसनलाडू's picture

3 Jul 2008 - 11:43 am | बेसनलाडू

आवडले.
(बिनधोक)बेसनलाडू

प्रगती's picture

3 Jul 2008 - 11:47 am | प्रगती

कथा-लेख मी कसा लिहू?
प्रवासवर्णन कसा करू?
जागोजागी उभे "समीक्षक",
निशाण बांधून मोक्याचं |

घाबरलेली प्रगती. :S

अवलिया's picture

3 Jul 2008 - 12:20 pm | अवलिया

नाना चेंगट गुह्य उकलती,
"समभागां"च्या मटक्याचं |

अरे काय हे ?

उगाचच नाकाला पारंबी आली असं वाट्त

नाना

वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

केशवसुमार's picture

3 Jul 2008 - 1:00 pm | केशवसुमार

वत्स डांबिसकाका,
एकदम डांबिस विडंबन.. झकास.. आवडल.. चालू द्या.. =D>
(मानस गुरू)केशवसुमार :B
स्वगतः लेका केश्या तुला गुरू म्हणून सगळ्यात जास्त तुझीच खेचलीय कळतयं का तुला उगाच हुरळून जाऊ नको:W

यशोधरा's picture

3 Jul 2008 - 1:17 pm | यशोधरा

मस्त! मस्त!! मस्त!! :)

सहज's picture

3 Jul 2008 - 1:28 pm | सहज

जबरी विडंबन. मानसगुरूंचे नाव काढलेत!!!!

जय हो!!

सखाराम_गटणे™'s picture

3 Jul 2008 - 1:39 pm | सखाराम_गटणे™

>>आचरटपणा सोड बरा
>>पिकल्या केसां जाग जरा

तुम्हीच जर आचरटपणा सोडला तर आम्ही कोणाच्या तोडांकडे बघायचे ?
नका आम्हाला पोरके करु :(

सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

विसोबा खेचर's picture

3 Jul 2008 - 1:52 pm | विसोबा खेचर

अरे डांबिसा, अलिकडे तुझ्या प्रतिभेला काव्याचे हे नवेच घुमारे फुटलेले मी पाहतो आहे. याआधी गोलकाची अंगावर येणारी एक सुंदर कविता अन् आता हे हसरेखेळते विडंबन!

क्या बात है. सह्ही केलं आहेस विडंबन. आपण साला मनापासून दाद देतो....!

डांबिसकाका, मनात भय धर,
सरपंचांच्या फटक्याचं |

अरे नाही रे बाबा! सरपंच उगाच कशाला कुणाला फटके मारतील? आणि तुला तर नाहीच नाही! :)

आपला,
(डांबिसाचा फ्यॅन!) तात्या.

स्वाती राजेश's picture

3 Jul 2008 - 3:56 pm | स्वाती राजेश

डांबिस काका सही जमले आहे...
मजा आली वाचून....
:) :) :)

पद्मश्री चित्रे's picture

3 Jul 2008 - 3:57 pm | पद्मश्री चित्रे

जागोजागी उभे "समीक्षक",
निशाण बांधून मोक्याचं

नि पटलं पण

फुलपाखरु's picture

3 Jul 2008 - 5:15 pm | फुलपाखरु

लई भारी! :)

नारदाचार्य's picture

3 Jul 2008 - 5:28 pm | नारदाचार्य

धोकादायक दिसतो...
व्यक्तिचित्रं लिहितो, मध्येच भावनीक लेख लिहितो. आता विडंबन आणि त्यात जाता-जाता खेळीमेळीत एकेकांची मापं काढून गेला आहे.
मान गये उस्ताद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jul 2008 - 7:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कथा-लेख मी कसा लिहू?
प्रवासवर्णन कसा करू?
जागोजागी उभे "समीक्षक",
निशाण बांधून मोक्याचं |

हा हा हा :) हे बाकी खरं आहे !!!! विडंबन आवडले.

चतुरंगाची बुद्धिबळं
विजुभाऊचं स्वप्न खुळं
स्वातीबाई कट्लेट तळते,
कोंबडी सोडून हाडकाचं |

क्या बात है! एकदम टेरिफिक!!
तुमचं हे विडंबन वाचून आणि गुरु-शिष्यातलं प्रेमळ नातं बघून, आम्हाला झट्क्यास एक कडवं आठवलं ते इथे टाकतोय.

'केशा' करतो विडंबनं
फाडे शायरी अन् कवनं
'पिडा'सारखे वत्सही मिळता
आम्ही कोपर्‍यात बसायचं
मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं ||

चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Jul 2008 - 10:36 pm | llपुण्याचे पेशवेll

कथा-लेख मी कसा लिहू?
प्रवासवर्णन कसा करू?
जागोजागी उभे "समीक्षक",
निशाण बांधून मोक्याचं |

हे काही इतके पटले नाही मला.

अवांतरः
बाकी पिडाकाका तुम्ही कशाला उगाच ते लिहिण्याच्या वगैरे भानगडीत पडता. ते प्रमाचे क्लास तुमचे उत्कृष्ठ चालत आहेत ना! कशाला ते प्रवास वर्णन आणि काय ते लिहिता, त्यापेक्षा प्रेम आणि पोरी पटवणे याबद्दल पाठ्यपुस्तके लिहा ना. मी तर त्याचा वाचक आणि वितरक म्हणून नक्की आहे. :)
(ह.घ्या.हे. वे. सां. न. ल.)

पुण्याचे पेशवे

सखाराम_गटणे™'s picture

3 Jul 2008 - 11:17 pm | सखाराम_गटणे™

अवांतरः
बाकी पिडाकाका तुम्ही कशाला उगाच ते लिहिण्याच्या वगैरे भानगडीत पडता. ते प्रमाचे क्लास तुमचे उत्कृष्ठ चालत आहेत ना! कशाला ते प्रवास वर्णन आणि काय ते लिहिता, त्यापेक्षा प्रेम आणि पोरी पटवणे याबद्दल पाठ्यपुस्तके लिहा ना. मी तर त्याचा वाचक आणि वितरक म्हणून नक्की आहे. Smile
(ह.घ्या.हे. वे. सां. न. ल.)

मिपा वर बरेच त्या क्लास चे विद्यार्थी आहेत.

(ह.घ्या.हे. वे. सां. न. ल)

सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

सर्किट's picture

3 Jul 2008 - 10:55 pm | सर्किट (not verified)

डांबिसा , हितच जरा टेका
मिसळ्पाव ओका (बोका)
तुम्हाविण काका

...

- सर्किट

ऋषिकेश's picture

3 Jul 2008 - 11:19 pm | ऋषिकेश

सह्ही!!!!
खूप आवडलं विडंबन :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

शितल's picture

3 Jul 2008 - 11:34 pm | शितल

काका, मस्त विडबन जमले आहे

धनंजय's picture

4 Jul 2008 - 12:53 am | धनंजय

पिडांना कसला धोका!

मस्त.

विजुभाऊ's picture

4 Jul 2008 - 6:56 pm | विजुभाऊ

अहो डाम्बीसाचा पिंड वेगळा
सांगता येणार नाही केंव्हा
फेडुन तुमचे नेसुचे ते
करील तुम्हा येडा खुळा....
जी रं जी जी रं जी जी.......
:::::::::डाम्बीस काकाच्या वगात शिट्ट्या फुंकणारा विजुभाऊ

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

पिवळा डांबिस's picture

6 Jul 2008 - 7:49 pm | पिवळा डांबिस

अभिप्राय दिलेल्या (व न दिलेल्या) सर्व वाचकांचे आभार!
विडंबनात वर्णन केलेल्या माझ्या मिपा मित्रमैत्रिणींना त्यांनी ही थट्टा दिलदारपणे घेतल्याबद्दल विशेष धन्यवाद!
असाच लोभ असू द्यावा!

थट्टेखोर,
पिवळा डांबिस

वरदा's picture

7 Jul 2008 - 10:14 pm | वरदा

काका तुम्ही एवढं छान विडंबन करता? माहितच नव्हतं....मस्तच आहे....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

स्वाती दिनेश's picture

23 Sep 2008 - 11:41 am | स्वाती दिनेश

हे माझ्या नजरेतून कसं काय सुटलं ?
मस्तच आहे.. कटलेटच्या निमित्ताने का होईना नजरेला आणून दिल्याबद्दल धन्यु सुलेशबाबू..
स्वाती

विजुभाऊ's picture

23 Sep 2008 - 12:00 pm | विजुभाऊ

हे माझ्या नजरेतून कसं काय सुटलं ?

एवढ्या उशीरा प्रतिसाद म्हणजे
हे कटलेट च्या ऐवजी लेट कट झाले :)

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत