एक होता "महामानव"
आयुष्यभर त्याने संत साहित्याचा अभ्यास केला. प्रचार केला.
खास करून व्यभिचार आणि भ्रष्ट आचाराला वीरोध केला.
व्यभिचारींची "मदत" घेण्यास नकार दिला.
त्यांच्या आचरणाने शिकवणीने आम्ही सारे भारुन गेलो. आम्हाला ते अवतार पुरुषच वाटायचे.
मग ---
आम्ही गावातल्या काही लोकांनी एकत्र येउन त्यांच्या विचारांचा कार्याचा प्रसार करण्यासाठी आणि त्यांच्या कायम वास्तव्यासाठी एक (वास्तु) असावी अशा दुहेरी हेतुने एक "आश्रम" (विनोबा भावे) डोळ्यासमोर ठेउन उभा केला.
त्या सत्पुरुषाला आम्ही (बाबा) म्हणत असूं
आमच्या या आश्रम कल्पणेने बाबा अंतरी "समाधान" पावलेले दिसले.
कालांतराने त्या "आमच्या" बाबांचं निधन झालं
आम्ही अंत्यसंस्कार करुन तेथेच त्या आश्रमाचं (समाधि वास्तुत) रुपांतर केलं.
आज त्या (समाधीचं) मंदिर झालंय अन्
बाबांना "देव" करुन "गप्पं" केलंय.
----
आयुषभर बाबांनी ज्यांना हेतूत: दूर ठेवलं तेच आमच्या नकळत येथे आले.
आमच्या बाबांचा मरनोत्तर "अवतार" म्हणुन मिरवुं लागले.
"एक अंगानं "कृष" असलेली मरतुकडी लग्न होउच शकणार नाही अशी मुलगी आणि एक धूर्त चेटुक जाणनारा माणुस दोघेही कोकणातल्या मातीतले."
पुर्वजन्म-रहस्य जाणतो असे सांगणारे,
म्हणे पूर्व-जन्मी हा राधा होता आणि ती कृष्ण.
फक्त "लींग" बदल एव्हडाच काय तो या जन्मी फरक.
पूर्व जन्मीच्या या राधा आणि कृष्णाचा "सहवास" आम्हाला खटकला नाही,
सुरवातीला हा त्यांचा सहवास आम्हा कोणालाच "व्यभिचार" वाटला नाही.
मग प्रश्न जेव्हा श्रेयाचा, मालकी हक्काचा आला आणि धात झाला.
उशीरा का होइना पण कळले, ना "तो राधा होती, ना "ही" कृष्ण.
तो त्यांचा पुर्व नियेजित कट होता "व्यभिचारच" होता,
("हे त्यांनीच त्यांच्या एका गलीच्छ भाषेतल्या सर्वासमोर झालेल्या भांडणात उल्लेख केला.")
आज बाबांची दोन "मंदिरं" आहेत, एक त्या मुलीचं दुसरं चेटुक जानना-या त्याचं -
त्या दोघांकडे भरपुर अनुयायी आहेत. संपती पैसा आहे.
दोन्ही मंदिराचा ताबा ज्या तत्वाला "बाबांचा" प्रखर विरोध होता अशाच (व्यभिचारी) तत्व विरोधी अशा वर ऊल्लेख आलेल्यांचा आहे.
आमचे बाबा हरले आहेत, सगळ्या संतांच्या, अगदी देवांच्यासुद्धा नशिबी हेच आहे.
त्त्यांचीच आता आवतरनं चालतात, म्हणे बाबा त्यांच्याच अंगात येतात.
गंडे दोरे "आशीर्वाद" म्हणुन देतात.
अनपेक्षित पैसा हातात आला ते यांच्या "गंडे-दोरे" आणि आशिर्वादानेच
" श्रीमंत-भक्त" झाले. असं दोन्ही कडचे सांगतात.
तेच आज या मंदिरांचे विश्वस्त झाले.
आश्रमाला दान दिलेल्या जमिनीचे "मालक" मात्र अडगळीत गेले.
मराठीतल्या "देऊळ" शिनेमात हेच आहे.
शिनेमा कपोल कल्पित आहे, पण हे एक सत्य आहे.
प्रतिक्रिया
14 Jan 2013 - 7:30 pm | किसन शिंदे
नेमकं कशाबद्दल लिहलंय? आणि ते राधा आणि कृष्णाची काय भानगड आहे?
14 Jan 2013 - 7:54 pm | गणपा
¿¿¿¿¿¿¿¿¿
येवढा क्रिप्टिक बाऊंसर मास्तरानी पण कधी नाय टाकला. :(
14 Jan 2013 - 9:33 pm | सोत्रि
अगदी हेच लिहीणार होतो!
-(क्रिप्टीक) सोकाजी
14 Jan 2013 - 8:04 pm | समयांत
अअं काय आहे हे?
कविता?
मी सुध्दा मनातलं जनासाठी असा काहीसा धागा उघडला होता आधी.
आणि आता हे काय आहे.. :(
14 Jan 2013 - 8:17 pm | सामान्य वाचक
थोडे उलगडून सांगाल का?
14 Jan 2013 - 9:44 pm | दादा कोंडके
पण हे विशेषण आवडलं. ;)
16 Jan 2013 - 4:13 am | स्पंदना
केव्हढा राग आहे शब्दा शब्दात.
सगळीकडे हेच घडतय. "देव" बनवुन देव्हार्यात ठेवला की गप तोंड मारुन बसतो असाच अनुभव आहे.
16 Jan 2013 - 9:01 am | मनीषा
तुमच्या मनातल काहीच समजलं नाही हो :(
कृपया रहस्यभेद करावा ..
17 Jan 2013 - 1:04 pm | विलासिनि
सत्य जाणून घ्यायला आवडेल. वरील लेखावरून काहीच कळ्ले नाही.
17 Jan 2013 - 3:36 pm | दादा कोंडके
लेट द ब्याग कम आउट ऑफ द क्याट.