नमस्कार मिपाकरहो ,
बरयाच दिवसापासून आपणाशी संवाद साधण्याची सुप्त इच्छा होतिच. पण काही धाडस झाले नाही .पण झाले असेकी आठ दिवसा पूर्वी काही मिपाकर औरंगाबाद येथे येणार असल्याचे आपले मिपाकर मित्र प्रा .डॉ दिलीप बिरुटे ह्यांच्या कडून समजले . तेव्हाच ठरवले कि काही झाले तरी त्या सर्वांची भेट घ्यायची. श्रुती कुलकर्णी,किसन शिंदे, वल्ली, धनाजीराव आणि प्राडॉ. पण तरी त्यांच नियोजन व माझी सुट्टी ह्याचा मेळ काही बसवता आला नाही.तरी हि मनात ठाम निश्चय केला कि काही झाले तरी भेट तर घ्याचीच. डॉ बिरुटे मात्र दोन दिवस अंजीठा, वेरूळला त्यांच्या सोबतच होते .तसे मी त्यांना फोन करुन कळविले त्याच परतीचा प्रवास चालू झाला तेव्हा औरंगाबाद सोडताना त्यांची भेट घेणे मला शक्य झाले त्त्यांची ओळख करून घेतानां ID मागचा चेहर तसेच एक व्यक्तिम्त्व म्हणून कसा आहे हे कळाले, ती सर्व मिपाकर मंडळी म्हणजे आपले किसान शिंदे ,वल्ली ,धनाजीराव ही होय ,ह्या सर्वाना भेटून अतिशय आनंद वाटला फारसा वेळ देऊ शकले नाही. परंतु तरीही ह्या आभासी जगताचे कुतूहल होतेच आपण सर्वांच्या भेटी मुले मला काही माणसे न बघताही न भेटताही कधी मैत्रीचे संबंद प्रस्थपित होऊ शकतात ह्याची नव्यानेच जाणीव झाली . मिपा मुळे माणुस माणसाशी जोडल्या जातोय तेहि एका वैचारीक पातळीवर ह्याचेही नवल वाटले .
तसे मी आपल्या सर्व मिपाकरांच्या लेखनाचा तसेच मुखत्वे करून प्रतीसादाचाही आनंद सातात्याने गेले वर्षभरापासून घेत आहे . तसे वर्ष भरात एक वाचक म्हणून चागंलीच रमले .बरेच काही मिळाले अगदी पाकृ. पासून ते एखाद्या गहन विचारा परेंत . मिपाकारांचा स्नेह असाच सर्वांशीच व्रुधिगत होत राहो . आज आपल्या सर्वांच्या भेटीमुलळे मी बोलती झाले त्यासाठी ध्यान्यावाद .मिपाच हा प्रवास असाच चालू राहो हि एका वाचक मिपाकाराची सदिइच्छा.
प्रतिक्रिया
23 Dec 2012 - 3:43 pm | बिपिन कार्यकर्ते
नीट सविस्तर लिहा की... पाहिजे तर या नविन मित्रांची मदत घ्या! ;)
बाकी धनाजीराव अजून आहेत याचा आनंद काय वर्णावा! ;)
23 Dec 2012 - 6:31 pm | पैसा
धन्या काल फेसबुकवर दंगा करत होता, त्याला पण आला तर मिपावर स्वागत म्हणावं लागेल.
श्रुती, स्वागत. पहिल्यांदाच मराठी टाइप करताना कंटाळा येतो हे खरंच, लवकर जास्त टायपायला लागा बघू!
23 Dec 2012 - 6:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> धनाजीराव अजून आहेत याचा आनंद काय वर्णावा !
भेट झाल्यावर पहिला वहिला प्रश्न असाच होता.
मस्त माणूस आहे. वाचन दांडगं आहे, मतं रोखठोक आहेत.
मस्त गप्पा झाल्या.
[तसा मला भेटाबिटायचा लै कंटाळा. पण, किसन,वल्ली,धनाजी धनाजीची मस्त नवी कोरी गाडी, आणि धनाजीच्या भावालाही भेटून मात्र आनंद झाला.]
-दिलीप बिरुटे
23 Dec 2012 - 5:03 pm | समयांत
पहिल्यांदा लिहीलंय अगदीच थोडकं लिहीलंय. असो फोटोमुळे काही बात बनलीय. मी मिपावर नवीन आहे, मिपाकरांच्या गाठभेटीचं मलाही अप्रूप आहे. भावना मांडल्याबद्दल धन्यवाद :)
अभिनंदन.
23 Dec 2012 - 6:40 pm | रेवती
वृत्तांत आटोपता घेतला असला तरी फोटू छान आलाय.
23 Dec 2012 - 11:18 pm | दादा कोंडके
हे शालजोडीतले आहेत का हो? ;)
23 Dec 2012 - 8:01 pm | पिंगू
एकच फोटू पण छान आला आहे. त्या फोटुमध्ये मी पण असतो.. पण अलहिदा..
- पिंगू
25 Dec 2012 - 6:15 am | अत्रुप्त आत्मा
@त्या फोटुमध्ये मी पण असतो.. पण अलहिदा>>> +1
संताजी धनाजीच्या मधे अगोबा फसल्यासारखा वाट्टोय. ;-)
25 Dec 2012 - 6:39 am | शरद
मग द्याकी पाठवून माझ्याकडे. देतो त्यांच्यात चिकटवून. हा.का. ना. का.
शरद
23 Dec 2012 - 8:23 pm | प्यारे१
चान चान :)
24 Dec 2012 - 12:07 pm | ५० फक्त
धन्या बिचारा डुआयडिने लॉगइन होताना रेडहॅड पकडल्यासारखा दिसतोय.....
24 Dec 2012 - 12:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> धन्या बिचारा डुआयडिने लॉगइन होताना रेडहॅड पकडल्यासारखा दिसतोय.....
खरं का काय ? :) तरी मला वाटलंच मिपाचं व्यसन लागल्यावर माणूस असा कसा बाहेर राहू शकतो ? ;)
-दिलीप बिरुटे
24 Dec 2012 - 12:28 pm | सूड
किसनाच्या पायाखाली वीट होती का फोटो काढताना ?
24 Dec 2012 - 1:02 pm | ५० फक्त
नाही ती वीट आगलावेंनी लाटणेंना फेकुन मारली म्हणे...
24 Dec 2012 - 6:38 pm | वपाडाव
लय भारी...
25 Dec 2012 - 1:23 pm | रुमानी
सर्वाना मनापसुन ध्यन्यवाद !
@पिंगू आपन आला असतात तर आपली हि भेट झालि असति.
@पहिल्यांदाच मराठी टाइप करताना कंटाळा येतो हे खरंच, .........अगदि खार्र्र्र्र्र्र्र्र्र...!
25 Dec 2012 - 2:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिलं वाहिलं लेखन चांगलं जमलं आहे, नियमित लिहित राव्हा.
पुलेशु.
लेखनातली किरकोळ दुरुस्ती अशी की मी अजिंठ्याला गेलो नव्हतो.
-दिलीप बिरुटे
25 Dec 2012 - 3:58 pm | लीलाधर
छान छान पुलेशु :)
25 Dec 2012 - 7:47 pm | धन्या
तो शब्दप्रयोग "छान छान" असा नसून चान चान असा आहे.
बादवे, सरांनी मस्त सरबराई केली औरंगाबादला. पाहूणचार करावा तर बिरुटे सरांनी. धन्यवाद सर, आमची आमची वेरुळ अजिंठा ट्रीप अविस्मरणीय करण्यासाठी.
श्रुतीतै, तुम्हालाही भेटून आनंद झाला.
26 Dec 2012 - 1:20 am | किसन शिंदे
+१०००
त्याचबरोबर श्रुतीतैंना भेटूनही आनंद झाला.
26 Dec 2012 - 8:52 am | प्रचेतस
हेच म्हणतो.
अजिंठा, वेरूळ, देवगिरीची सहल अविस्मरणीय ठरली.
30 Dec 2012 - 9:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही दोस्तांनी जरा जास्तच कौतुक
केले आहे. धन्स.:)
25 Dec 2012 - 9:44 pm | निवेदिता-ताई
फोटु चान चान
26 Dec 2012 - 12:02 pm | विश्वनाथ मेहेंदळे
चार मिपाकर भेटले तुम्हाला, त्यातले ३ संपादक. सुख सुख म्हणतात ते वेगळे काय असते? पहिल्या फटक्यात आतल्या गोटातच गेलात की हो ;-)
30 Dec 2012 - 5:28 pm | निनाद मुक्काम प...
विमे
ह्यापुढे त्याच्या लेखनावर प्रतिसाद देतांना ह्या गोष्टींची जाणीव ठेवा
तुमचा हितचिंतक
निमुपोज
30 Dec 2012 - 5:26 pm | निनाद मुक्काम प...
सुरवातीला लेखनाचा कंटाळा येतो हे मान्य
पण बिनधास्त लिहायचं
अशुद्ध शुद्ध चा सुरवातीला फारसा विचार करू नका
थोड्याच दिवसात मिपाकरांचे प्रतिसाद डॉ चा सल्ला ह्याने शुद्ध लेखन बर्यापैकी सुधारते.
30 Dec 2012 - 10:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> थोड्याच दिवसात मिपाकरांचे प्रतिसाद डॉ चा सल्ला ह्याने शुद्ध लेखन बर्यापैकी सुधारते.
या वाक्यातले डॉ. म्हणजे मी असेल तर माझे दोन शब्द-
सोप्या पद्धतीने मराठी लिहिता यावं आणि अधिकाधिक शुद्ध शब्द लिहिण्यासाठी मदत व्हावी म्हणून मराठी लोकांसाठी अव्याहतपणे आपलं कामकाज सांभाळून फायरफॉक्ससाठी मराठी डिक्शनरी चे अॅडवन देणारे श्री शंतनु ओक यांचे आभार मानले पाहिजे. आत्ताच त्यांनी मराठी ऑफलाइन शुद्ध शब्द लिहिण्यासाठी अॅटो करेक्टची सुविधा देणारे सॉफ्टवेअर तयार केले आहे. सोप्या पद्धतीने मराठीत लेखन [दुवा मायबोलीवर जातो. दुवा वगळला तरी हरकत नाही] मराठी माणसाला करता यावे हाच त्यांचा उद्देश. मला त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या मेहनतीबद्दल नेहमीच आदर वाटतो, वाटला आहे. बघा त्यांनी तयार केलेलं सॉफ्टवेअर फूकट आहे, पटलं तर वापरावं आणि फीडबॅक द्यावा, इतकेच.
-दिलीप बिरुटे
31 Dec 2012 - 1:15 am | निनाद मुक्काम प...
आभासी जगतात नव्याने लिहायला लागलेल्या मिपाकारच्या शुद्धलेखनाचे अनेक जण
वाभाडे काढतात पण त्याचवेळी डॉ सारखी माणसे देवदुता सारखी मदतीला धावून येतात.
31 Dec 2012 - 9:04 pm | भिकापाटील
छान!
डॉ. खुन्नस दिल्यासारखे पहात आहेत का ;)
31 Dec 2012 - 9:35 pm | धन्या
डॉ. आणि खुन्नसचा काही म्हणजे काही संबंध नाही. सरांच्या ईतकी दिलखुलास माणसं खुप कमी असतात. सर खुन्नस देत आहेत असं म्हणणं म्हणजे चहासुद्धा न पिणार्या व्यक्तीला पावशेर मारुन आला काय असं विचारण्यासारखं आहे. :)
बारा साडेबाराची वेळ होती आणि आम्हा सर्वांचे चेहरे पूर्व दिशेला होते. कदाचित सूर्यप्रकाशामुळे चेहरा आक्रसला असेल.
31 Dec 2012 - 9:54 pm | पक पक पक
धनजीरावांची तब्येत सुधारल्या सारखी वाट्तेय..... ;)
31 Dec 2012 - 10:04 pm | धन्या
कुणाला कशाचं तर ईयेंटी स्पेशालिस्टला घशाचं.
श्रुतीतैंनी पहिला वहीला धागा काढला तर्त्याचं कौतुक र्हैलं बाजूला. भिका पाटलांना डॉ. खुन्नस का देत आहेत हा प्रश्न पडला आहे तर पक पक पक ला धनाजीची तव्येत सुधारल्यासारखी वाटत आहे.:)
1 Jan 2013 - 1:49 pm | पक पक पक
श्रुति तैंच्या धाग्यावर तुम्ही नाही का डॉक्टरांच कौतुक करताय... ;)
3 Jan 2013 - 3:36 pm | प्रभाकर पेठकर
आखाती वास्तव्यामुळे मिपाकरांच्या भेटीचे योग फार कमीच येतात. हे योग अधिक यावेत असे मनापासून वाटते. पुढच्या भारतभेटीत अगदी ठरवून जंगी कट्टा करूयात.
4 Jan 2013 - 6:24 pm | किसन शिंदे
कधी येताय?