फुन्सूक वांग्डू...... गब्बर सिंग.... अजय राठोड... वगैरे वगैरे

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
15 Dec 2012 - 3:34 pm

लेखाची शीर्षक वाचून काहीतरी सरमिसळ झाल्यासारखे आहे.
चित्रपटातील व्यक्तीरेखा त्यांच्या स्वभावासहीत तुमच्यापर्यन्त पोहोचते अशा फारच कमी व्यक्तीरेखा लिहील्या गेल्या आहेत. अशी एखादी व्यक्तीरेखा चांगल्या कलकाराला मिळाली तर तो त्याचे सोने करतो.

थ्री इडियट्स चित्रपटातील अमीर खान ने रंगवलेला फून्सूक वांग्डू. ही व्यक्तीरेखा त्यापैकी एक.
चित्रपटात फून्सूक वांग्डू चे जे चित्रण रंगवलेले आहे त्या नुसार.
संवेदनशील परंतु अगदी प्रॅक्टीकल. स्वतःच्या मर्यादांचे पूर्ण ज्ञान असलेला तरीही नवनवे प्रयोग करून पहाणारा.
प्राध्यापकांच्या ज्ञानाबद्दल आदर असणारा पण पोथीनिष्ठता नाकारणारा. असा आनंदात जगणारा तरुण
लेखकाने हे पात्र ज्या खुबीने रंगवलेय त्याला दाद मिळते. फुन्सूक चे रणछोडदास चांचड म्हणुन वाववरणे. ते तसे वावरत असताना आपल्या असामान्य बुद्धीची जाणीव असतानाही त्याचा कुठेही बडेजाव स्तोम न माजवता हा तरूण सहजपणे जगतोय. जो क्षण त्याला मिळालाय तो आनंदात जगतोय. छोट्या छोट्या गोष्टीत त्यावेळेस आवश्यक असणारा हजरजबाबीपणा आणि उपलब्ध साधनांचा वापर करण्याची बुद्धी्ए तो मुद्दाम होऊन करतो असे नाही. ते त्याला सहजपणे सुचते.कथानकात असे बरेच प्रसंग आहेत की त्यावेळेस फुन्सूक चे हे गुण दिसून येतात. उदा: हॉस्टेल मधील रॅगिंग असो किंवा मित्रच्या वडीलाना स्कूटरवरून हॉस्पिटलमध्ये दाखल करणे असो.
त्या पात्राचा मिश्कीलपणामागे काही हेतू आहेत. तो कोणाला दुखावण्यासाठी नव्हे तर त्यापासून त्याने काही धडा घ्यावा म्हणून मिश्कीलपणा करतो. चतूर चे पाठ केलेले भाषण हा चित्रपटातील हायलाईट ठरावा इतका झकास प्रसंग. चतुर ची भूमीका करणार्‍या कलाकाराने देखील तो प्रसंग एकदम झक्कास रम्गवलाय.
दुसर्‍या एका प्रसंगात वर्गात " फरहान नायट्रेट , प्रीराजूनायझेशन " वगैरे डेफिनेशन सांगून शिक्षण कसे ठोकळेबाज आहे. लोक विचार न करता केवळ कोणीतरी सांगितले म्हणून त्या शब्दात अर्थ असेल मानून अभ्यासाला लागतात पोथिनिष्ठपणा वर खरपूस तीका करतो. अर्थात आपल्या शिक्षणपद्धतीचा असला भोंगळपणा हा अविभाज्य भागच आहे.या पोथिनिष्ठपणाबद्दल हा प्रसंग झणझणीत अंजन घालतो.
केवळ पुस्तकी शिक्षण नको तर रोजच्या वापरात /उपलब्ध असलेले रीसोर्सेस वापरून रोजचे आयुष्य सहज बनवणारे तंत्रज्ञान उपलब्ध झाले पाहिजे यावर भर देतो.
मुद्दाम नव्हे पण सहज जाताजाता फून्सूक बर्‍याच गोष्टी सांगतो.उदा: शिक्षण आवड म्हणून शिका. पैसा,यश आपोआप मिळेल हे सांगतो. तसेच यश हे केवळ अचीव्हमेंट्स ( पैसा ,घर गाडी ) यात मोजण्यापेक्षा किती आनंदात जगताय यात मोजा असे सांगतो.
फून्सूक चे बरेच पैलु सांगता येतील. लेखकाने त्याला एकदम असामान्य हीरो बनवलेले नाहिय्ये. जगाद्विख्यात संस्थेत यश मिळत असूनही फून्सूक च्या डोक्यात कधी हवा जात नाही. त्याला सदैव परिस्थीची जाणीव आहे. आपल्याला जे शिकायला मिळाले ते दुसर्‍या कोणाच्या तरीमुळे शिकायला मिळालेले आहे ही उपकाराची जाणीव त्याला कुठेनाकुठे सतत आहे. उपकारकर्त्याला जे द्यायचे ते देवूनही तो दिल्या वचनाला जगणारा आहे. त्यासाठी मित्र , प्रेयसी इतकेच काय तर तुमच्या आमच्या साठी जगायला अत्यावष्यक असणारी डिग्री या सर्वांचा मोह तो सोडून देतो.
मात्र विद्यापीठाची डिग्री नसल्यामुळे आपले काही अडणार नाही याचाही त्याला विश्वास आहे. आपल्यासारख्या लोकाना जाताजाता मदत करतो.
स्वतःच्या मर्यादा ओळखून असणारे हे व्यक्तीमत्व कितीही काल्पनीक असले तरीही आपल्याला फून्सूक आपल्यातला वाटतो.तो जमीनीवरचा वाटतो. अर्थात अमीरखानने आपण अमीरखान असल्याच्या खुणा या पात्रावर लादल्या नाहीत. डुबी डुबी या ड्रीम साँग मध्येसुद्धा तो अगदी सर्वसाधारण आपल्यातलाच वाटतो.
चित्रपटाच्या कथेत फून्सूक हे मध्यवर्ती पात्र असले तरीही कथेतील घटना इतर पात्रांशी संबंधीत आहेत हे अतर्क्य वाटले तरीही चित्रपटात खरे आहे.
खरे तर या चित्रपटातील प्रत्येक प्रसंगावर एकेक वेगळी कथा लिहीता येईल. इतके सुंदर प्रसंग कथेत आहेत. पात्र कुठे मेलोड्रामॅटीक न करता हे प्रसंग लेखकाने त्यातला सच्चेपणा जपलाय. उदा: फहरान च्या वडीलानी त्याला आणलेला लॅपटॉप परत करून कॅमेरा आणायची परवानगी देणे.हा त्या चित्रपटात मला सर्वात जास्त आवडलेला प्रसंग.
राजूला नोकरीची ऑफर मिळते तो प्रसंग , करीना कपूर( तिचे चित्रपटातील नाव विसरलो) चे वाग्दत्त नवर्‍याने दिलेले घड्याळ हरवले असे साम्गते तो प्रसंग.
राजेश खन्नाच्या आनंद चित्रपटील आनंद या जिंदादिल व्यक्तीरेखेशी फून्सूक ची तुलना करता येईल. अर्थात त्या त्या काळातले सम्दर्भ लक्षात घेवूनच.
अशा व्यक्तीरेखा दीर्घकाळ लक्षात रहातात. त्या नायकाच्या नावाने नव्हे तर व्यक्तीरेखीच्या नावाने चित्रपटाच्या पडद्याच्या बाहेर येवून आपल्या सोबत वावरतात.

शोले मधला गब्बर सिंग. ही अशीच एक व्यक्तीरेखा. अर्थात फुन्सूक आणि गब्बर ची तुलना नाही.
गब्बर एक डाकू. लोकाना भय दाखवले की ते आपल्याला हवे ते देतात. या तत्वावर भरवसा ठेवणारा. त्याला शासन सरकार वगैरे काही असते याची पर्वाच नाही.
मानसशास्त्रीय दृष्टीने विचार केला तर थोडासा सर्कीट,किंचीत वेडसर आहार भय निद्रा या प्रबीज जाणीवांखेरीज इतर कोणत्याच जाणीवा न ठेवणारा.गब्बर हा लार्जर दॅन लाईफ वाटण्यापेक्षादेखील तशी झाक असलेली आपल्या समाजातील एक व्यक्ती वातू लागते. अटक केल्या नंतरही आपल्याला पैरो मे बेडी हाथो मे हथकडी चारचार आदमी जकडे हुवे. असे त्या अवस्थेचे वर्णन करताना गब्बर ला जणू सुचवायचे असते की मी मोकळा असतो तर ठाकुरला तेथेच आडवा केला असता.
गब्बरचे संवाद सुद्धा अगदी तुटक तुटक तीन चार शब्दांची वाक्ये. एखाद्या मतीमंद मुलाप्रमाणे. लांब वाक्य रचायला बुद्धीचा वापर करावा लागतो. मुंदूची तेवढी प्रगत अवस्था असावी लागते. गब्बरच्या व्यक्तीरेखेचा इतक्या बारकाईने विचार लेखकाने केलाय. गब्बरच्या हावभावांचा हालचालींबद्दल वेगळे बोलुया. तम्बाखु मळताना् हातात गोळ्यांचा पट्टा घेवून चालताना, डोळ्याच मधूनच चमकणारी किंचीत वेडसर झाक हे अमजदखानच्या अभिनयाचे पैलु आहेत. ते दिग्दर्शकाचे पैलु आहेत
आपण केवळ लेखकाने रंगवलेली व्यक्तीरेखा म्हणून विचार करतोय. लेखकाला खलनायक म्हणून गब्बरची व्यक्तीरेखा लार्जरद्यान लाईफ करता आली असती. कृरकर्मा म्हणून दाखवताना त्याला हिंसाचाराचा आविष्कार दाखवता आला असता.
तीन सहकार्‍यांची हसत हसत केलेली हत्या वगळता गब्बरला कुठेच खुनशी वगैरे दाखवलेला नाहिय्ये. तो स्त्रीलंपट दाखवलेला नाही नायीका हेमा मालीनीला पळवून नेतो तेंव्हाही तो बलत्कार वगैरे करेल असे वाटत नाही. किंवा त्याच्या तोंडी "मोग्यांबो खुश हुवा." वगैरे फालतु भरड दिलेली नाहिय्ये. गब्बर ला शहरी जीवनाचा स्पर्ष ही झालेला नाहिय्ये. गब्बर अजूनही मनाने आदीम जमान्यातच जगतोय हे आपल्या जाणवते.
तीस वर्षांनंतरही गब्बरची मोहिनी मनावरून उतरत नाही हे त्या लेखकाचे यश आहे. लेखकाने त्या व्यक्तीरेखेत जान ओतलेली आहे.
ए सी पी अजय राठोड ही अशीच एक व्यक्तीरेखा...त्या बद्दल पुन्हा कधीतरी.

वावरविचार

प्रतिक्रिया

Atish's picture

15 Dec 2012 - 6:01 pm | Atish

Mast ha! 3 idiots pic dolysamor aala!

अन्या दातार's picture

16 Dec 2012 - 1:12 am | अन्या दातार

गब्बरबद्दल अजून लिहायला हवे होते विजुभौ.

सरमिसळ झाल्यासारखे झाले आहे खरे.

मुद्दाम नव्हे पण सहज जाताजाता फून्सूक बर्‍याच गोष्टी सांगतो.

आमिर ने संपूर्ण सिनेमा गाजवला आहे तो रणछोडदास चांचड म्हणून. कारण फून्सूक वांग्डू ही व्यक्तिरेखा चित्रपटात अगदी शेवटी आहे. साधारण १०-१५ मिनीटे.

- (इडियट) सोकाजी

स्पंदना's picture

16 Dec 2012 - 5:19 am | स्पंदना

लिखाण व्यक्तीरेखा उभी करण्यावर आहे अन ते जमलय.

आवड्या. खरच गब्बर असा खदखद हसताना गोळ्या झाडतो ना की क्षण्भर समजत ही नाही .

पैसा's picture

22 Dec 2012 - 11:06 pm | पैसा

आमिरची इडियट व्यक्तिरेखा आवडली. पण गब्बारबद्दल अजून खूप काही लिहायला हवे होते आणि अजय राठोडची वाट बघत आहेच!

सुहास..'s picture

23 Dec 2012 - 10:26 am | सुहास..

फुन्सुक छानच !!

अशीच जॉन मक्लेन पण येवु द्यात

डाय हार्डचा डाय हार्ड फॅन
वाश्या

छोटा डॉन's picture

27 Dec 2012 - 11:31 am | छोटा डॉन

हेच म्हणतो.

ह्याशिवाय इतर कुणी 'इथन हंट, टोनी स्टार्क'बद्दल लिहणार असेल तर उत्तम असे सुचवतो.

स्वगत : च्यायला मला खुप दिवस झाले 'शेल्डन कुपर, लिओनार्ड, राज, हॉवर्ड आणि पेनी' बद्दल लिहायचे आहे, कधी मुहुर्त मिळतोय कुणास ठाऊक ? :(

- छोटा डॉन

मी-सौरभ's picture

27 Dec 2012 - 12:36 pm | मी-सौरभ

आम्ही वाट बघू...
दुसर काय करु शकतो म्हणा.

'शेल्डन कुपर, लिओनार्ड, राज, हॉवर्ड आणि पेनी'

जगातभारी चौकडी आहे राव ही.............काय सीरियल तेचायला एकच नंबर!!!!!! लिहा लिहा लौकर लौकर :)

छोटा डॉन's picture

27 Dec 2012 - 1:41 pm | छोटा डॉन

मुहुर्त सापडला आहे.
नववर्षाच्या मुहुर्तावर हा लेख नक्की हजर होईल असे सांगतो.

- (बिग बँग चा चाहता) छोटा डॉन

बॅटमॅन's picture

27 Dec 2012 - 2:06 pm | बॅटमॅन

लेखाच्या परतिक्शेत !!!!

( बिग बँगचा उतावीळ चाहता ) बॅटमॅन.

विजुभाऊ's picture

26 Dec 2012 - 12:09 am | विजुभाऊ

काही चित्रपटात एखादी वेगळी भूमीका असते. भूमीका म्हणून ती कलाकाराच्या वरचढ ठरते. आणि भूमीकेच्या नावाने लक्षात रहाते. हे लेखकाचे येश आहे.
मला आठवणार्‍या अशा काही भूमीका : आनंद ,गुड्डी , शराबी मधला ओम प्रकाश , मुकद्दर का सिकम्दर मधील जोहरा बाई ,बबली ,

विजुभाऊ's picture

26 Dec 2012 - 12:11 am | विजुभाऊ

अरे हो लगे रहो मुन्ना भाई मधला मुन्नाभाई , सर्कीट आणि तो सरदारजी सुद्धा

मृत्युन्जय's picture

27 Dec 2012 - 12:10 pm | मृत्युन्जय

या स्गळ्यात क्लिंट इस्टवूडच्या फिस्टफुल ऑफ डॉलर्स मधील अनामिक भूमिकेकडेही लक्ष वेधू इच्छितो. :)

परिकथेतील राजकुमार's picture

27 Dec 2012 - 12:31 pm | परिकथेतील राजकुमार

कोणीतरी 'तुंग्रुस' विषयी देखील लिहावे.

देव (देव्-डी): अभय देओल
बना (गुलाल): के के मेनन

त्या त्या वेळेपर्यंत तरी एरवी कॉमेडीसाठी प्रसिद्ध नसलेले पण अचानक कॉमेडीमधे जबरदस्त जमून गेलेले काही लोक आणि त्यांच्या व्यक्तिरेखा:

-उदय शेट्टी (नाना पाटेकर) वेलकम
-मिस्टर लांबा, इंडियन अ‍ॅम्बॅसिडर - (विक्रम गोखले, दे दनादन)
-खडकसिंग (ओम पुरी - हेराफेरी #१)

परिकथेतील राजकुमार's picture

27 Dec 2012 - 2:38 pm | परिकथेतील राजकुमार

मिस्टर लांबा, इंडियन अ‍ॅम्बॅसिडर - (विक्रम गोखले, दे दनादन)

विक्रम गोखले सारख्या दिग्गजाला अशी भूमीका स्विकारलेली पाहून पहिल्यांदाच शरम वाटली होती.

गवि's picture

27 Dec 2012 - 2:41 pm | गवि

पण जमलीय भारी ना?

परिकथेतील राजकुमार's picture

27 Dec 2012 - 2:43 pm | परिकथेतील राजकुमार

मला खरच नाही आवडली ती भूमीका. डोक्यात गेली. :(

मी-सौरभ's picture

27 Dec 2012 - 4:29 pm | मी-सौरभ

प्.रा. शी सहमत त्यापेक्षा महेश मांजरेकर रेडी मधे आणि वाँटेड मधे पण मस्त काम करुन गेलाय

बॅटमॅन's picture

27 Dec 2012 - 2:43 pm | बॅटमॅन

हो. शिवाय इन एनी केस, गडीमाणसांची फालतू कामे करणार्‍या लक्ष्यापेक्षा ही अस्ली कामं कदीपण लय भारी!!

माझ्यामते श्री. गोखलेंनी नेहमीच आवर्जून आणि उघडपणे सांगितलं आहे की ते "व्यवसाय" म्हणून अभिनयाकडे पाहतात आणि व्यावसायिकदृष्ट्या योग्य अशी मिळेल ती भूमिका करण्यात त्यांना कधी अडचण कमीपणा वाटलेला नाही. ते याबाबत फार प्रॅक्टिकल आहेत.

छोटा डॉन's picture

27 Dec 2012 - 2:46 pm | छोटा डॉन

गविंशी सहमत आहे. विक्रम गोखलेंचा रोल भारी जमलाय त्यात.

बाकी मला हंगामा मधला शक्ति कपुरचाही रोल आवडला होता .... खुन खराबे के खानदान से ताकुकात रखनेंवाला.

- छोटा चेतन

परिकथेतील राजकुमार's picture

27 Dec 2012 - 2:48 pm | परिकथेतील राजकुमार

गडीमाणसांची फालतू कामे करणार्‍या लक्ष्यापेक्षा

असो....

नो कॉमेंटस. :)
आपल्या मताचा आदर आहे.