आवडलेली गाणी : ये मौसम रंगीन समा

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
15 Dec 2012 - 12:37 pm

गाणी वाजवायला शिकताना काही साधीसोपी पण एकदम मूड बदलून टाकणारी गाणी सतत मन वेधून घेत राहिली. या गाण्यात फार काही उच्च नाही पण त्यांच्या साधेपणामुळेच ती गुणगुणाविशी वाटतात. कामात सुद्धा ती बॅकग्राउंडला चालू असतील तर वातावरण लाईट राहतं.

पूर्वी मोठ्या स्टुडिओजमधे चित्रपट निर्मितीची वेगवेगळी कामं एकाच ठिकाणी चाललेली असायची. एकदा एक दिग्गज निर्माता स्टुडिओत फेरफटका मारत होता. तो गाण्याच्या रेकॉर्डिंग रूमपाशी थबकला. एक नामचीन संगीतकार तितक्याच प्रतिभावंत गायिकेला गाण्याची चाल बर्‍याच वेळेपासनं समजावून देत होता. निर्मात्यानं त्याला विचारलं `भाई बात क्या है? इतनी देर क्यों लग रही है गाना बिठानेमे? तर संगीतकार म्हणाला, `क्या कहूं, मेरा कंपोझिशन इनके गलेसे निकल नही रहा' त्यावर निर्माता म्हणाला, `तो फिर कंपोझिशन बदलो, अगर इस हुनरकी गानेवाली वो गा नही सकती तो पब्लिक उसे कैसे गुनगुनाएगी?'

जुन्या गाण्यांच एक आहे, कलाकार आणि पिक्चरायझेशन खास नसलं तरी गोडी अवीट आहे. पाहण्यापेक्षा ती ऐकायची गाणी आहेत.

जमेल तशी आवडलेली गाणी आणि त्यांची सौंदर्यस्थळं देण्याचा हा प्रयत्न

संगीतकार : रवि - गायक : मुकेश आणि सुमन कल्याणपूर - गीत : गुलशन बावरा - सिनेमा : मॉडर्न गर्ल

गाण्याची मजा काय असेल तर अत्यंत सोपा ठेका आणि तितकीच सोपी तरी कमालीचा परिणाम साधणारी काव्यरचना.
`तेरा मेरा मेरा तेरा प्यार है' यात स्वरांची आणि शब्दांची जी विलोभनीय सरमिसळ आहे ती ऐकण्याजोगी आहे.आणि मुकेश बरोबर सुमननी ती ज्या मजेत गायली आहे त्यात या गाण्याची सगळी खुमारी आहे.

ये मौसम रंगीन समा ठहर ज़रा ओ जाने जां
तेरा मेरा मेरा तेरा प्यार है तो फिर कैसा शरमाना
(इथला फिलर ऐकण्यासारखा आहे)

रुक तो मैं जाऊँ जाने जां मुझको है इनकार कहाँ
तेरा मेरा मेरा तेरा प्यार सनम ना बन जाए अफ़साना

(आता हे इंटरल्यूड ऐका, एकदम जबरदस्त!)

ये चाँद ये सितारे कहते हैं मिलके सारे
आजा प्यार करें
(हा फिलर बघा)

ये चंदा बैरी देखे ऐसे में बोलो कैसे
इक़रार करें

दिल में है कुछ कहे ज़ुबां
प्यार यही है जाने जां

तेरा मेरा मेरा तेरा प्यार है तो फिर कैसा शरमाना

(हे इंटरल्यूड म्युझिक देखील मस्त आहे)

ये प्यार की लम्बी राहें बाहों में डाले बाहें
कहीं दूर चलें
(रेकॉर्डला या ओळी आहेत त्यामुळे गाण्याची मजा वाढलीये)

बैठे हैं घेरा डाले ये ज़ालिम दुनिया वाले
हमें देख जले

(नीट लक्षपूर्वक ऐकलं तरच समेवर येण्यासाठी केलेलं हे म्युझिक ऐकू येतं)

जलता है तो जले जहां
ठहर ज़रा ओ जाने जां

तेरा मेरा मेरा तेरा प्यार है तो फिर कैसा शरमाना

शेवटचा गाणं संपतानाचा म्युझिकपीस पुन्हा पहिल्या इंटरल्यूडची आठवण करून देतो! आणि वाटतं पुन्हा ऐकदा ऐकावं हे गाणं! आजपर्यंत दिडदोनशे वेळा तर हे गाणं मनलावून ऐकलं असेल पण कधीही आणि कुठेही ती सुरावट कानावर आली तर सगळं थांबवून पुन्हा ती ऐकावीशी वाटते. न जाणो एखादी अजून न समजलेली नजाकत अजून कुठेतरी लपलेली असेल!

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

15 Dec 2012 - 1:00 pm | सुहास..

छान !!

एक आमचे ही आवडते , पण निशब्द करणारे म्हणुन काहीच लिहीत नाही. :)

पहिल्यासारखी कर्णमधुर गाणी आता कोनि बनवत नाही.

यसवायजी's picture

15 Dec 2012 - 5:01 pm | यसवायजी

आणखी ४०-५० वर्षं गेली की, आजच्या गाण्यांना सुद्धा कर्णमधुर म्हणतील..
जसं "ते पुणं आता राहिलं नाही" हे वाक्य कित्येक पिढ्या ऐकवतच आल्यात. आणी आपण पण ऐकवु पुढच्या पिढिला.. तसच काहितरी..

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Dec 2012 - 3:16 pm | श्री गावसेना प्रमुख

पहिल्यासारखी कर्णमधुर गाणी आता कोनि बनवत नाही.

खरय , पण आपण कुठे अगोदरच्या सारखे वागतो,त्यामुळे जुनीच गाणी ऐकुया,

जोयबोय's picture

15 Dec 2012 - 4:02 pm | जोयबोय

सहमत.
जाने कहा गये वो दिन >>>>>>>>>>>>>>>>

फारएन्ड's picture

16 Dec 2012 - 12:04 am | फारएन्ड

मस्त गाणे आहे हे, बर्‍याच दिवसांनी ऐकले. सुमन कल्याणपूरचा आवाज वाटला नाही हा कधी. आत्ता पुन्हा ऐकून चेक केले तर तिचाच असावा असे दिसते. तरी बराच वेगळा वाटतो तिच्या इतर गाण्यांपेक्षा. रवि ची खूप सुंदर संगीताचे पिसेस असलेली गाणी फारशी नसावीत.

खरय , पण आपण कुठे अगोदरच्या सारखे वागतो,त्यामुळे जुनीच गाणी ऐकुया,>>> हे सही आहे :)

चौकटराजा's picture

16 Dec 2012 - 5:51 am | चौकटराजा

रवि ची खूप सुंदर संगीताचे पिसेस असलेली गाणी फारशी नसावीत. बापरे ! फारएण्ड साहेब हे फारच धाडसाचे विधान झाले. रवि साहेब शंकर जय, ओपी नय्यर या इतके पिसेस स्पेशालिस्ट नसतीलही.पण आपण जर कधी
भेटलात तर बोलू रवि या विषयावर ! तूर्तास काही पिसेस फेम गाणी रविंची
कौनन आया के निगाहोमे- पियानो.
आगे भी जाने ना तू - गिटार
बार बार देखो- गिटार , अ‍ॅ़कॉर्डियन
ए मेरे जोहर जबी- मेंडोलिन
चौदहवी का चांद हो - गिटार
तोरा मन दरपन कहलाये- सितार
ये जल्फ अगर खुल्के - सारंगी
किसी पत्थरकी मूरतसे - पियानो

चौकटराजा - हो ते लिहीताना तसे वाटले म्हणून लिहीले होते, पण ही गाणी नक्कीच चांगली आहेत. 'तोरा मन दर्पन कहलाये' पूर्वी ऐकलेले अचानक एक दिवस पुन्हा ऐकले/पाहिले आणि नव्याने काहीतरी साक्षात्कार झाल्यासारखे आवडले. मग कितीतरी वेळा यू ट्यूब वर पाहात होतो. चाल तर सुरेख आहेच पण मधे मधे वाद्यांच्या पिसेसचे तुकडे जे ऐकू येतात त्याला तोड नाही (मला बरीचशी वाद्ये पटकन ओळखू येत नाहीत). बाकी वरच्या लिस्टमधली गाणी आवडतात पण त्यांची चाल सोडली तर बाकी संगीत अजून तेवढे मला क्लिक झालेले नाही (येथे नक्की काय म्ह्णायचे आहे त्याला चपखल शब्द आत्ता सुचत नाहीत). बहुधा 'तोरा मन' सारखीच कधीतरी अचानक क्लिक होतील. साधारणपणे माहीत असलेली गाणी अचानक कधीतरी क्लिक होतात आणि मग त्यातील शब्द, चाल, संगीत, कलाकारांचा अभिनय सगळे किती सुंदर आहे आणि इतके दिवस कसे निसटले असे जाणवते. 'जो वादा किया वो निभाना पडेगा', 'दो नैना एक कहानी' ई. गाणी (रवीची नाहीत हे माहीत आहे) पण अशीच अचानक क्लिक झालेली!

बाकी त्यावेळचे इतर दिग्गज सोडले तर तुलनेत रवीची गाणी म्हणजे साहिरच्या सुंदर शब्दांना योग्य चाल लावणे हेच मुख्य काम असल्यासारखी वाटायची. ते मत अन्यायकारक आहे हे आता लक्षात येते.
(तर थोडक्यात म्हणजे तुझा मुद्दा मान्य! बाकी रवीच काय, इतर संगीतकारांबद्दलही बोलण्यासाठी भेटायला आवडेल :))

फारएन्ड's picture

16 Dec 2012 - 7:45 am | फारएन्ड

चुकीची पडली बहुधा. दोन कंस एकत्र झाल्याने तसे झाले असेल :)

Dhananjay Borgaonkar's picture

16 Dec 2012 - 9:02 am | Dhananjay Borgaonkar

शंकर-जयकिशन आणि रफी साहेब यांचं काँबीनेशन खल्लास..तोड नाही त्या सगळ्या गाण्यांना.
वसंतराव देशपांडे, मालिनी राजुरकर यांनी गायलेल सर्व काही.
अलीकडल्या काळात राहुल देशपांडे, महेश काळे आणि आनंद भाटे यांची गायकी खुप आवडते.
क्या बात हे साहेब, ऐन सवाईच्या वेळेला हा धागा काढलात.

अनिल तापकीर's picture

16 Dec 2012 - 9:23 am | अनिल तापकीर

मला ही जुनी गाणी खुप आवडतात.

संजय क्षीरसागर's picture

16 Dec 2012 - 10:33 am | संजय क्षीरसागर

>`ए मेरे जोहरा जबी- मेंडोलिन!'

मनीषा's picture

16 Dec 2012 - 11:25 am | मनीषा

छानच आहे हे गाणे ..

मला आवडलेले हे एक
http://www.youtube.com/watch?v=-6TTKHBiT6Y

मराठी_माणूस's picture

16 Dec 2012 - 11:15 pm | मराठी_माणूस

छान गाणे.
आपल्या कडे मिळणार्‍या साध्या ट्रेमेलो हार्मोनिका साठि एकदम सुयोग्य गाणे