"दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी |
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||
ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |
खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||
रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |
प्रलायाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || "
कवि गोविंद.... महाराणी ताराराणी बद्दल आणखी काही माहिती असेल तर्,कृपया सांगावी....
प्रतिक्रिया
10 Dec 2012 - 12:07 pm | मालोजीराव
छत्रपती ताराराणी
-छत्रपतीसेवेसी ठाई तत्पर मालोजीराव निरंतर
10 Dec 2012 - 5:11 pm | बॅटमॅन
मालोजीराव, हे चित्र नेटवर एकदोन ठिकाणी पाहिलेय, पण वरिजिनल कुठेय? शिवाय चित्रावरुन एखाद्या राजपूत राणी/राजकन्येचे वाटतेय. ताराराणींची वेशभूषा चित्रात दाखवल्याप्रमाणे राजपूत पद्धतीची असेल असे संभवत नाही.
10 Dec 2012 - 12:53 pm | विजय_आंग्रे
छत्रपती ताराराणी यांच्याबद्दल अधिक माहीती तुम्हाला इथे मिळेल. (सदर दुवा 'मायबोली.कॉम' या संस्थळावर जातो)
10 Dec 2012 - 3:07 pm | मालोजीराव
या लेखात लेखकाने नको ते अकलेचे तारे तोडलेत...तो लेख वाचण्यापेक्षा न वाचलेला बरा !
10 Dec 2012 - 4:24 pm | भीमाईचा पिपळ्या.
संपादित
10 Dec 2012 - 5:09 pm | बॅटमॅन
बामणग्रस्त वेबसाईटींवर येणे बरे जमते मग.
10 Dec 2012 - 6:15 pm | मालोजीराव
चुकीच्या धाग्यावर आलात....कुणीतरी परा च्या धाग्या ची लिंक द्या रे यांना :P
...परा कॉलींग...
11 Dec 2012 - 12:22 pm | परिकथेतील राजकुमार
पुन्हा एकदा आंतरजालावरती आणि विशेषतः मिपावरती 'आमच्या लोकांवरती' झालेल्या अन्याय पाहून संताप आला. असो. अहिंसा हा धर्म असल्याने शांत राहात आहोत.
बाकी मालोजीराव आजकाल लिंक द्यायच्या तर त्या फक्त 'प्रतिष्ठीत आणि अधिकारी' लोकांच्या लेखनाच्या देत जा बरे. कारण बाकीच्या लोकांचे लेखन आणि त्यावरचे प्रतिसाद अजून अंधारातच आहेत. आता ते उजेडात आणायचे तर आम्हाला एक तर अधिकार मिळवायला हवेत, किंवा कुणा पाठीला साबण चोळणार्याला धाडून आमच्या लेखांवरती 'अरेच्या अजूनही हे लिखाण का दिसत नाहीये ?' , 'हे लिखाण कसे वाचता येईल?' तत्सम टैपातल्या प्रतिक्रिया देण्याची सोय करावी लगेल. ;)
11 Dec 2012 - 2:21 pm | मालोजीराव
होय तर, वरील मान्यवर संपादकांस विचारायला गेलेही असतील कि त्या धाग्यावरील (गायब झालेल्या ) लिखाण आणि प्रतिक्रिया कश्या पाहता येतील ?
...आणि त्यावर मंडळाकडून 'ह.भ.प. पराभाऊ यांचा दुर्मिळ लेख आणि प्रतिक्रिया पंचतत्वात विलीन झाल्या ' असा अध्यात्मिक प्रतिसादही येऊ शकतो ;)
11 Dec 2012 - 2:27 pm | परिकथेतील राजकुमार
किंवा त्यांचा लेखनरुपी आत्मा मिपाचे शरीर सोडून विश्वसंचार करतो आहे असे देखील सांगता येईल.
10 Dec 2012 - 1:02 pm | बाबा पाटील
धन्यवाद विजयराव.....
10 Dec 2012 - 5:59 pm | हारुन शेख
फक्त कवितेचे एक कडवे टाकून काय अपेक्षा करता. कमीत कमी जर तुमच्याकडे पूर्ण कविता आहे तर पूर्ण टंकायची तसदी घ्याल कि नाही. शिवाय हे कडवे कुठल्या तर्हेने प्रासंगिक आहे म्हणून फक्त तेव्ह्डेच प्रकाशित करता आहात. आत्ताच्या काळात मुघल कोण ? आजही तुम्हास कुराणे खंडावीशी वाटतायत का ? कवी गोविंद मला आवडतात आणि त्यांच्या काही पंखाच्या कविता जसे ' सरस्वतीची भूपाळी' 'सुंदर मी होणार' मला आवडतात. पण त्यांनीही काही कविता मेळ्यात गायची पदे म्हणून लिहिल्या आहेत. त्या कवितांचे साहित्यिक व ऐतिहासिक मूल्य त्या अनुषंगानेच ठरवावे. 'रणाविण स्वातंत्र्य कोण मिळाले' किंवा ' कोठे काळा राम, करितो बंड गुलाम' या त्यातल्या काही. ताराबाईंबद्दल वसंत कानेटकरांनी त्यांच्या एका पुस्तकात खूप छान प्रकरण लिहिलंय असे आठवते . नाव आत्ता आठवत नाही. मिळाल्यास बघा. चित्रे खूप मस्त होती त्यात.
10 Dec 2012 - 6:19 pm | मालोजीराव
शांत व्हा मालक...भाषा अलंकारिक आहे समजून घ्या...शब्दशः अर्थ घेऊ नका !
कुणी तरी यांना धनाजीच्या 'माझं हे सारं सामान गं सखू' ची लिंक द्या....रेफरन्स साठी ;)
10 Dec 2012 - 6:22 pm | बॅटमॅन
+१.
हेच म्हणतो. बाकी लिंक ती कञ्ची म्हंता ;)
11 Dec 2012 - 2:32 pm | चेतन
कविता केव्हा लिहली गेली त्यानुसार त्याचा विचार व्हावा. आत्ताच्या काळात मुघल कोण ? या प्रश्नालाच काही अर्थ नाही. असो आणि तसाही धाग्याकर्त्याचे मागचे धागे पाहुन हा प्रश्नच का पडावा?
आत्ता 'रणावीण' ची आठ्वण काढलीच आहेत तर चार कविता प्रसिध्द करण्यासाठी जी जन्मठेप झाली त्यापैकी ही एक कविता. आता त्याचे साहित्यीक मुल्य "मेळ्यात गायची पदे" म्हणुन ठरवाव का हा प्रत्येकाचा विचार आहे.
असो..
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना।
असा भूतकालीन सिद्धांत जाणा।
स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मीळाले
चेतन
11 Dec 2012 - 2:35 pm | परिकथेतील राजकुमार
भारताला.
दे दी हमे आझाली बिना खडग बिना ढाल...
11 Dec 2012 - 2:35 pm | परिकथेतील राजकुमार
*आझादी
10 Dec 2012 - 7:13 pm | बाबा पाटील
च्या मारी,मी माहिती मागवली,तर कुनी कुनी त्यातुन काय अर्थ काढायला सुरुवात केली राव्,स्वताच्या इतिहासाबद्दल माहिती मागवली तर्,ती द्यायची सोडुन बाकीची उलाढाल कशाबद्द्ल हो भाउ ? महाराणी ताराबाईंनी अत्यंत हिमतीने हे मराठी राज्य टिकवले,त्या रणरागिणी बद्दल उभ्या महाराष्ट्राच्या मनात आत्यंतिक आदर आहे,पन त्यांचा पराक्रम हा बराचसा अप्रकाशित आहे, त्यांच्या बाबतचे फारसे साहित्य उपलबद्ध नाही,निदान माझ्या तरी वाचनात आले नाही,त्यामुळे म्हटले मिपाकरांकडुन काही माहिती मिळाली तर येथे ती सोडुन फुकटच्याच तलवारी पाजरल्या जातायेत्,काही सन्मानिय अपवाद सोडुन....धन्यवाद.
10 Dec 2012 - 7:40 pm | मालोजीराव
छत्रपती ताराराणी भोसले यांचा जन्म १६७५ साली सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पोटी झाला.छत्रपती राजाराम महाराजांशी त्यांचे लग्न १६८३-८४ च्या सुमारास झाले.९ जून १६९६ रोजी त्यांना शिवाजी हा पुत्र झाला.
१७०५ साली त्यांनी मोघलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून पन्हाळा ही राजधानी बनविली.
संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या मदतीने राणीने मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम यशस्वीरित्या पुढे नेला.
१७०७ साली शाहू महाराज सुटून आल्यावर वारसाहक्क संघर्षामध्ये शाहूंचा विजय झाला आणि २ गाद्या तयार झाल्या कोल्हापूर आणि सातारा.नंतर राजकारण आणि सत्ता यांच्यामध्ये ताराराणीचा प्रभाव कमी होत गेला.ताराराणींचे निधन ९ डिसेंबर १७६१ रोजी झाले.
21 Dec 2012 - 4:18 pm | नन्दादीप
माझ्या माहीतीनुसार रामराजे गादीवर असतानाच संताजी घोरपड्यांचा "खून" झाला. त्यामुळे ""संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या मदतीने राणीने मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम यशस्वीरित्या पुढे नेला"" असे मला नाही वाटत.
10 Dec 2012 - 7:48 pm | बाबा पाटील
मालोजीराव धन्यवाद....
10 Dec 2012 - 9:28 pm | रामदास
तेव्हा या पुस्तकाची पाने वाचनीय वाटली . A Social History of the Deccan, 1300-1761: Eight Indian Lives, Volume 1By Richard M. Eaton
21 Dec 2012 - 6:30 pm | चित्रगुप्त
आमची आवड चित्राविषयी...
जुन्या काळी भारतात ज्याला यथातथ्य व्यक्तिचित्रण (प्रत्यक्ष व्यक्तीच्या समोर बसून केलेले) म्हणता येइल, असे फारसे असलेले दिसत नाही. त्या त्या शैलीतील ठराविक संकेतांप्रमाणे चित्रण केले जायचे. मुख्य म्हणजे तेंव्हा फोटोग्राफी, वर्तमानपत्रे इ. नसल्याने अमूक व्यक्ती खरोखर कशी दिसते, हे फक्त प्रत्यक्षात बघणारालाच कळायचे. त्यामुळे खुद्द चित्रकारांनाच अमूक व्यक्ती प्रत्यक्षात कशी दिसते, हे ठाऊक नसायचे. 'छत्र-चामरधारी' 'कमलनयना' 'पीतवसना' अश्या शाब्दिक वर्णनांना अनुसरून साचेबद्ध चित्रण केले जायचे. त्यामुळे ही चित्रे कलात्मक दृष्ट्या सुंदर असली, तरी त्यांना तसे ऐतिहासिक मूल्य फारसे नसते.