शिपल्यातुन अलग जसा मोती.......

शितल's picture
शितल in जनातलं, मनातलं
30 Jun 2008 - 6:54 pm

मित्राला माझी बाईक हवी होती, म्हणुन मी त्याला, मला बस स्टॊप वर सोडा्यला सागितले, कॊलेजला बसने जाण्याची ही पहिलीच वेळ होती,आणि बस मधील गर्दी पाहुन परत बाईक कोणालाही द्यायची नाही असे मनात ठरवुन बस मध्ये कसाबसा चढलो, डाव्या साईडच्या बस सीट वर तु बसलेली होतीस, मी तुझ्या शेजारी लटकत होतो, बस चालु झाली, बसच्या प्रवासाची सवय नसल्याने हातातील दोन नोटबुक खाली पडल्या, त्या नेमक्या त्तुझ्या आणि माझ्या पायाच्या मध्येच पडल्या, त्या उचलण्यासाठी वाकण्याचा एक दोन वेळा प्रयत्न केला पण खुप गर्दी असल्याने मला वाकता ही येत नव्हते, हे तुझ्या लक्षात आले आणि तु मला ती उचलुन हातात दिलीस, आणि देताना एक मद स्मित केलेस, मी तुला थॆक्स म्हणालो, तेव्हा मी तुझ्या चेह-याकडे पाहिले, तुझ्या बोलक्या डोळ्यात मी हरवुन गेलो आणि त्या स्मित हस्याने तर मला भुरळच घातली, त्या नतर मी किती वेळा तुझ्या चेह-याकडे चोरून पहात होतो, हे माझे मलाच ठाऊक,

शिपल्यातुन अलगत जसा मोती जसा बाहेर यावा
तशी तु माझ्या आयुष्यात आलीस,

आणि त्या दिवसा पासुन माझ्या बसच्या प्रवाला सुरूवात झाली, तुझ्यासाठी तुला पाहण्यासाठी मी नेहमी बसने येऊ लागलो, आता मला बसचा प्रवास ही तुझ्या सोबतीने आवडु लागला होता, तु कॊलेजच्या स्टॊपला उतरायचीस, त्या स्टॊप पर्यत मी बसने यायचो, आणि त्या स्टॊप पर्यत माझी बाईक मी मित्राला घेऊन यायला सागायचो, तु कॊलेज मध्ये जाई पर्यत मी बाईक वरून तुझ्या चेहरा पाहण्यासाठी दोन/तीन फे-या मारायचो. तु मात्र मैत्रीणीच्या घोळक्यात हसत हसत, मला व्यवस्थित दुर्लक्षुन निघुन जायचीस.

तुझ्या वर केलेल्या प्रेमात मी माझाच न उरलो,

तुझ्या लेखी मात्र तुझ्यावरच्या माझ्या प्रेमाला काहीच किमत नव्हती

तुला पाहण्यासाठी सकाळचे १० कधी वाजतात ह्याची मी वाट बघत असायचो, कधी कधी तेवढा ही धीर निघायचा नाही, आणि मग तु बसस्टॊप वर यायच्या आधी मी तुझ्या घरा पासुन थोड्या अतरावर एक मोठे झाड होते त्या झाडाच्या अडोशाला राहुन मी तुझी वाट पहायचो, आणि तुझ्या मागे मागे तुला न कळेल एवढे अतर ठेवुन मी बसस्टॊप पर्यत यायचो.

तु बस मध्ये चढताना तुला कोणाचा धक्का लागु नये म्हणुन माझ्या हाताचे अलगत सरक्षण ही मी तुझ्या मागे राहुन तुला देत होतो, पण तुला ह्याची जाणीव ही नसायची. बसमध्ये आणि कॊलेज मध्ये माझ्या मित्राणा एव्हाना मी तुझ्यासाठी कसा वेडा झालो आहे याची प्रचिती आली होती. त्यामुळे मला ते बस मध्ये तुझ्या आजुबाजुला बसायला, उभारायला जागा द्यायचे. पण तु मात्र मैत्रीणीशी बोलत, तर कधी खिडकीतुन बाहेर बघत माझ्या कडे मुद्दाम दुर्लक्ष करायचीस आणि मी मात्र तु माझ्याकडे पाहुन केलेल्या मद स्मिताची दुस-यादा वाट पहात होतो, ते आता एक स्वप्न हो ऊन बसले होते, स्वप्नात कितीदा तरी हेच स्मित हास्य यायचे आणि माझी झोप उडुन जायची.

विरहाच्या अग्नीत मात्र मी दिवसरात्र जळत होतो,

तुझ्या टपो-या काळ्याभोर डोळ्यात मी माझ्यासाठीचे प्रेम पाहण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र तुझ्या डॊळ्यात मला कॊणतेच भाव दिसत नव्हते.
आता मात्र मी मित्राच्यात चेष्टेचा विषय बनत चाललो होतो, आणि माझ्यासाठी तु एक स्वप्न बनली होतीस. मला आठवते, बस मध्ये एकदा मी लवकर चढुन मी आपल्या दोघासाठी एक सीट पकडली होती, तु समोर आल्यावर तुला माझ्या शेजारी बसण्याची डोळ्यानी खुण केली होती आणि तेव्हा तु माझा पोपट केला होतास, तु तुझ्या मैत्रीणीला माझ्या शेजारी बसायला सागुन तु माझ्या पुढच्या सिटवर बसली होतीस, आणि मागे वळुन माझ्या चेहराचा रग कसा झाला आहे हे पाहायला विसरली नाहीस.

तुझा हा माझ्यासाठीचा दृष्टपणा मला जाणवत होता, पण आता तु मला विरोधाने का जमेत धरत होतीस हे माझ्यासाठी खुप होते.

विरह काय असतो हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही म्हणतात त्याची अनुभुती मला येत होती,
आणि पराजित ही मी माझ्याच प्रेमाकडुन होत होतो.

तुझ्या वर केलेल्या प्रेमात मी माझाच न उरलो.

एक दिवस मला बसला यायला वेळ झाला, आणि बस गेली, तु ही त्या बसे मध्ये होतीस, मला माझा खुप राग आला, आणि मला खुप चुकल्या चुकल्या सारखे वाट्त होते, आज तु मला दिसली नव्हतीस, मी माझी बाईक घेऊन जेवढ्या फास्ट तुझ्या कॊलेजच्या स्टॊप पर्यत पोहचता येईल त्याचा प्रयत्न करत होतो आणि बस तुझ्या कॊलेजच्या स्टॊपला थाबलेली मला जरा दुरूनच दिसली आणि मी इतका फास्ट आलो की बाईकचे पुढचे चाक बसच्या स्टेपसला लागले आणि समोर पाहतो तर तु खाली उतरायला पाय उचलेला, तुझ्याकडे पाहुन फक्त हुश्य असे शब्द माझ्या तोडातुन बाहेर पडले, आणि पुढच्या प्रसगानी तर मला वेडच लावले, तु माझ्याकडे पाहुन तेच स्माईल दिलेस ज्या क्षणाची मी कित्येक महिने वाट पाहिली होती.

माझे स्वप्निल मन आज पुन्हा हरकुन गेले
स्वप्नात जे रोज मी पाहिले तुझे तेच
हास्य आज मी जागेपणी माझ्या नेत्राने पाहिले.

आताशा मला रविवारची सुट्टी ही नको हो ऊ लागली, तुझ्या घराच्या आसपास फे-या हो ऊ लागल्या, पण मला तु काही कधी दिसली नाहीस, मग सोमवारची सकाळच तु बस स्टॊपवर येई पर्यत मन तुझ्याकडे आणि डॊळे तुझ्या वाटेवर पेरलेले असायचे.

बसमध्ये तुझ्या मैत्रीणी तुला कोप-याने खुणवुन सागायच्या कसे मी तुझ्याकडे सारखे पहात आहे, आणि तु मग चोरून माझ्याकडे एक कटाक्ष टाकायचीस की खरेच मी तुझ्याकडे सारखा पाहतो का ते पाहण्यासाठी आणि मी ते डोळ्याच्या कोप-यातुन हळुच पहात असायचो.

झेडुची केशरी फुले ओवता ओवता पाढरा दोराही केशरी झाला
तसा माझ्या प्रेमाचा रग ही तुझ्या चेह-यावर दिसु लागला.

मला ही असे वाटायला लागले होते की कुठेतरी माझ्या बद्दल तुझ्या मनात प्रेम वाटु लागले आहे, आणि एके दिवशी मी तु यायच्या आधी बसस्टॊप पासुन तु मला दिसशील एवढया अतरा तुला न दिसेल असा उभा राहिलो, बस आली तशी तु नजरेने मला शोधत होतीस, तुझी शोधक नजर आता अस्वस्थ दिसायला लागली होती, बस मध्ये तुझ्या मैत्रीणी चढल्या तरी एका मैत्रीणीला घेऊन तु जरा बाजुला थाबलीस, ती बस निघुन गेली, तुझ्या चेह-यावरचे भाव मला समजत होते, दुसरी बस लागली आणि तुला मी समोरून येताना दिसलो तेव्हा तुझ्या चेह-यावरचा आनद, वरवरचा खोटा राग, आणि तुझी ही प्रेमाची चोरी मला सापडल्याने नजरेत आलेला लाजरा पणा मला जाणवला आणि तु माझ्या प्रेमाचा स्विकार केलास ह्याची मला पावती मिळाली.

आता तुझ्या प्रपोज केल्यावर आता निदान थप्पड तरी मिळणार नाही ह्याची खात्री झाल्यावर, मी मित्राच्या सोबतीने एक दिवस हे धाडस केले आणि तुझा होकार मला पुन्हा त्याच हस्यातुन मिळाला.
आता बसनी येण्याचा हेतु साध्य झाला असल्याने बस रामराम ठोकला आणि तु ही बस स्टॊप वरून बस ने न जाता माझ्या बाईकवरून कॊलेजला जाऊ लागलीस. म्हणुन मी आज तागायत त्या बसचा रूणी आहे.

समाजलेख

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

30 Jun 2008 - 7:07 pm | आनंदयात्री

>>कोणाचा धक्का लागु नये म्हणुन माझ्या हाताचे अलगत सरक्षण ही मी तुझ्या मागे राहुन तुला देत होतो,

कसे कळ्ळे बॉ आमचे हे बारकावे तुला ?

>>तुझ्या वर केलेल्या प्रेमात मी माझाच न उरलो.
>>झेडुची केशरी फुले ओवता ओवता पाढरा दोराही केशरी झाला

छान लिहलय शितल !
अभिनंदन !

मदनबाण's picture

30 Jun 2008 - 7:53 pm | मदनबाण

व्वा ताई सॉलिड लिखेला है तुम...
पुरा इस्टोरी इन डिटेल..क्या बात है.....
आता तुझ्या प्रपोज केल्यावर आता निदान थप्पड तरी मिळणार नाही ह्याची खात्री झाल्यावर
हे मात्र खरं आहे..च्यामारी ह्याचा पोरांना लय धाक असतो,,सर्वांन समोर इज्जत चा फालुदा होतो ना...तरी काही गडी यातही अनुभवी असुन नवीन नवीन पाखरांच्या मागावर असतात.

(योग्य बसच्या शोधात)
मदनबाण.....

प्राजु's picture

30 Jun 2008 - 7:56 pm | प्राजु

आवडली..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वरदा's picture

30 Jun 2008 - 8:07 pm | वरदा

तु तुझ्या मैत्रीणीला माझ्या शेजारी बसायला सागुन तु माझ्या पुढच्या सिटवर बसली होतीस, आणि मागे वळुन माझ्या चेहराचा रग कसा झाला आहे हे पाहायला विसरली नाहीस.

सह्ही पोपट एकदम्...बिच्चारा मजनू...

मस्त मज्जा आली..कॉलेजचे दिवस आठवले.....

इनोबा म्हणे's picture

30 Jun 2008 - 9:46 pm | इनोबा म्हणे

तु बस मध्ये चढताना तुला कोणाचा धक्का लागु नये म्हणुन माझ्या हाताचे अलगत सरक्षण
हा हा हा! मस्त निरीक्षण आहे तुझे.

झेडुची केशरी फुले ओवता ओवता पाढरा दोराही केशरी झाला
तसा माझ्या प्रेमाचा रग ही तुझ्या चेह-यावर दिसु लागला.

मस्तच...

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

यशोधरा's picture

30 Jun 2008 - 9:55 pm | यशोधरा

आवडलं गं शीतल... मस्त लिहिलंस :)

विसोबा खेचर's picture

1 Jul 2008 - 12:18 am | विसोबा खेचर

वा शीतल!

अंमळ मजेशीर लिहिलं आहेस! छान वाटलं...!:)

अरुण मनोहर's picture

1 Jul 2008 - 4:03 am | अरुण मनोहर

हे मस्तच! >>>पण आता तु मला विरोधाने का जमेत धरत होतीस हे माझ्यासाठी खुप होते.

पहले इनकार फीर इकरार..... the saga continues!

ऋचा's picture

1 Jul 2008 - 10:07 am | ऋचा

सहीच झालयं ग!!!
तु बस मध्ये चढताना तुला कोणाचा धक्का लागु नये म्हणुन माझ्या हाताचे अलगत सरक्षण

हे असं आहे तर!!!
:) :)

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विजुभाऊ's picture

1 Jul 2008 - 10:38 am | विजुभाऊ

माताय.........मानले बॉ.....
झेडुची केशरी फुले ओवता ओवता पाढरा दोराही केशरी झाला
तसा माझ्या प्रेमाचा रग ही तुझ्या चेह-यावर दिसु लागला.
हे केशरी धागे.......गुरफटुन जायला होते. ह........हः

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अनिल हटेला's picture

2 Jul 2008 - 3:47 pm | अनिल हटेला

शितल!!

छान आणी हलकी फुलकी कथा ...

पन ही " पी एम टी "होती का......

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

मनस्वी's picture

2 Jul 2008 - 4:09 pm | मनस्वी

>>झेडुची केशरी फुले ओवता ओवता पाढरा दोराही केशरी झाला
छान लिहिलंएस शितल.

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."