ओरिगामी प्रदर्शन

सुधांशुनूलकर's picture
सुधांशुनूलकर in जनातलं, मनातलं
4 Dec 2012 - 7:35 pm

|| श्री गुरवे नमः ||

ओरिगामी मित्र या संस्थेतर्फे मुंबईमध्ये ‘वंडरफोल्ड २०१२’ हे वार्षिक ओरिगामी प्रदर्शन आयोजित केलं आहे. शुक्रवार, ७ डिसेंबर ते सोमवार, १० डिसेंबर या चार दिवशी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळात प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे कला अकादमीमध्ये हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाला येण्याचं समस्त मिपाकरांना आग्रहाचं वैयक्तिक निमंत्रण.

.

प्रदर्शनाव्यतिरिक्त ओरिगामी शिकण्यासाठी सशुल्क कार्यशाळाही घेण्यात येतील. प्राथमिक (एलिमेंटरी), मध्यम (इंटरमीजीएट) आणि विशेष (स्पेशल) अशा तीन स्तरांवरच्या कार्यशाळा आहेत. ओरिगामीचे कागदही उपलब्ध असतील.

मिपाकरांना माझी एक विनंती : शनिवारी आणि रविवारी येणार असाल तर मला नक्की कळवा, म्हणजे आपली भेट होईल.

सुधांशुनूलकर
ओरिगामी मित्र
९८६९४२८५०३.

कलामाहिती

प्रतिक्रिया

विलासराव's picture

5 Dec 2012 - 9:00 am | विलासराव

मी येईल रविवारी.

ज्ञानराम's picture

5 Dec 2012 - 9:19 am | ज्ञानराम

वरती दिलेलं इनविटेशन दिसत नाही :(.

श्री गावसेना प्रमुख's picture

5 Dec 2012 - 9:24 am | श्री गावसेना प्रमुख

मी देतो
1
कार्यक्रमाला सह्कुटुंब यायच ह,पत्रीका मिळाली असे समजुन घ्या राग नसावा लोभ असावा.

सुधांशुनूलकर's picture

5 Dec 2012 - 6:47 pm | सुधांशुनूलकर

क्षमस्व. काय गडबड झालीये ते समजत नाही.

तरी, श्री गावसेना प्रमुख यांनी खाली लिहिल्याप्रमाणे,
कार्यक्रमाला सह्कुटुंब यायचं हं, पत्रिका मिळाली असं समजून सर्वांनी नक्की या. राग नसावा, लोभ असावा.

सुधांशुनूलकर.

अन्या दातार's picture

5 Dec 2012 - 8:40 pm | अन्या दातार

संध्याकाळी ६ ही बंद होण्याची अति-लवकर वेळ नाही का वाटत??:-(
जमल्यास रविवारी चक्कर टाकेनच.

अभ्या..'s picture

6 Dec 2012 - 2:18 am | अभ्या..

यायला जमणार नाही म्हणून वाईट वाटतंय खूप. :(
खूप खूप शुभेच्छा या उपक्रमाला. :)