You Must See..

मुरलीधर परुळेकर's picture
मुरलीधर परुळेकर in जनातलं, मनातलं
30 Nov 2012 - 12:35 pm

तो आणि ती आज दोघेही घरात आहेत. Week End आहे ना आज ! तिचा खरं तर मुड होता outing ला जायचा, मस्तपैकी हिंडायचा.

पण तो जाम कंटाळलाय, त्याला आज घरीच थांबायचय. त्यामुळे ती जाम फ़ुगलिये. त्याला माहिती आहे, उगाच लाडी-गोडी करायला लागलो तर फ़क्त भांड्यांचाच आवाज येइल आणि आपल्या अरसिकतेवरच्या व्याख्यानाचा !!

त्याच्या डोक्यात वीज चमकते ! तोही गुश्श्यातच सांगतो, “मी आलो पेपर आणतो corner वरुन !”

बाहेर पडतो तसा तो १५ मिनिटात घरीही येतो पण अतिशय घामघुम झालेला…
छातीवर हात, वेदनाग्रस्त चेहरा “अगं इकडे ये” म्हणून असहाय्यपणे ओरडतोय. “काय झालं?” ती पळत बाहेरच्या खोलीत येते, घाबरते “पाणी आणते” म्हणत आत पळते. हातात ग्लास घेऊन बाहेर येते तर हा निपचीत पडलेला !! जवळ जाते “अरे ऊठ, ऊठ” म्हणत त्याला हलवू लागते. डॉक्टराना फोन करावा का शेजा-यांना मदतीला बोलवावं तीला काहिच सुधरत नाहीये. डोळ्यातून पाण्याच्या धारा तर कधीच्याच सुरु आहेत ! छातीवर डोकं टेकून ती ठोके ऎकण्याचा प्रयत्न करु लागते ! इतक्यात तिच्या वेणीला कसलासा स्पर्श होतो. ताडकन उठते आणि बघते तर हा आपला गालात हसत हातातला गजरा तिच्या वेणीत माळू पहातोय. नव-यावरचा सगळा राग विसरून त्याला घट्ट बिलगून week end celebrate करणारी ती कधी दिसलीये तुम्हाला ?

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

त्यांचं love marriage ! अगदी picture मधल्यासारखं, पळून जाऊन केलेलं !! आता तो दवाखान्याच्या corridor मधे येरझा-या घालतोय. चेह-यावर प्रचंड ताण !! कपाळावर आलेल्या घामकडे तर त्याचं लक्षही नाही. हाताच्या बोटांशी त्याचा चाळा सुरु आहे पण लक्ष मात्र operation theater कडे !
त्याच्या डोळ्यांसमोर चित्र येताहेत ती, दोघांनी मिळून केलेल्या बाळच्या स्वागताच्या तयारीची ! सजवलेल्या घराची, पाळण्याची !! त्याला आठवतोय तिने त्याला “ही बातमी” सांगितली तो दिवस ! तो अक्षरश: नाचला होता घरभर !! आणि अचानक थांबलाही होता तिला प्रचंड हसताना बघून तिच्या जवळ जात काळजीने तिच्याकडे बघत स्वत:शीच पुटपुटला होता,”आता असं नाही चालणार, जपायला हवं हिला आता !”

तिचे डोहाळे पुरवायला, चहाही न करणारा तो आता नवनव्या recipes बनवायला शिकला होता पुस्तकात बघून बघून ! त्याला cooking करताना बघून तिच्या डोळ्यातून टचकन पाणी यायचं ! त्याचे ओठ आपल्या कपाळावर टेकले कि तिला आणखीच गहिवरुन यायचं.

आणि आज ’तो’ दिवस, तिच्या पोटात दुखायला लागलं आणि याच्या डोळ्यात पाणी जमायला लागलं. कसं बसं ते रोखत तो तिला घेऊन इथे आला ! तिला operation theater मधे घेउन डॉक्टरनी त्याला बाहेरच थांबायला सांगितलयं ! स्वत:वरच चिडून तो स्वत:लाच म्हणतोय,” जन्मोजन्मि साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या पण इथे तिच्या सोबत राहु शकत नाही !!”

इतक्यात OT च दार ऊघडून एक नर्स बाहेर आलिये, एक इवलंस गाठोड घेऊन. तो पळतच तिथे पोहोचतो. त्या इवल्याशा जीवाला नर्सने त्याच्या “बाबा” कडे सोपवलय! तो “त्याला” घेऊन तिच्याकडे जातो. दोघे एकमेकांकडे फ़क्त बघताहेत. डोळ्यातून गळणा-या पाण्याच दोघानाही भान नाही.

तिच्या जवळ जाऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवत “Thanks” म्हणणारा तो कधी दिसलाय तुम्हाला?

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

त्यांच्या लग्नाचा आज पन्नासावा वाढदिवस !! पण दोघेही एकमेकांच्या नकळत, चोरून, फोनच्या वाजण्याची वाट बघताहेत. दोन्ही मुलं इंजिनियर !! मोऽठ्या कंपनीत, वरच्या पदावर, गलेलठ्ठ पगार घेत काम करताहेत, तेही अमेरिकेत !!!

पण एवढी हुशारी असताना आई-बापाला लग्नाच्या वाढदिवशी फोन करायची अक्कल नसावी. दोघही असचं विचार करताहेत पण एकमेकांना कळणार नाही अशा बेताने !!

तिला आठवतयं पोरांच्या शिक्षणासाठी तिच्या “यांनी” खाल्लेल्या खस्ता. पोराना पैसा कमी पडू नये म्हणून अंगात ताप घेऊन केलेले ओव्हरटाइम! दोन शर्ट आणि दोन पॅंट यावर काढलेली १० वर्ष !! नाटकं, गाण्यांची प्रचंड आवड असताना मारलेलं मनं !!! आणि पोरांची शिक्षणातली प्रगति बघून खुलणारा चेहरासुध्दा !!!

आणि त्याला आठवतिये ती , ’ती’ ! त्याच्या प्रत्येक सुखात, दुखा:त साथ देणारी ती.. पै-पै साठवत त्याच्या ४५ व्या वाढदिवसाला त्याला नवी पॅंट आणि शर्ट घेऊन देणारी. तो ’तापला’ की रात्ररात्र जागणारी…. पोरांसाठी स्वत:ची हौस-मौज बाजूला ठेवणारी…. पोरं काय शिकताहेत हे कळत नसलं तरी ती मोठी होताहेत हे बघून खुश होणारी…… आपल्या आणि पोरांच्या आनंदात आनंद मानणारी…….

पण दोघांच्याही मनात एकच प्रश्न “आता खरंच मोठ्या झालेल्या आपल्या पोरांना हे काहीच कळलं नसेल ?” इतक्यात दारावरची बेल वाजते. तो आपले अस्वस्थपणे चॅनेल बदलत T.V. बघण्याचा आव आणतोय. दार उघडून कोण आलय हे सुद्धा बघण्याची त्याची इच्छा नाही. ती आतून येते दार उघडण्यासाठी तीही तितकीच निरुत्साही !! पण बेल वाजते तर दार उघडायचा उपचार तरि करायला हवा म्हणून ती दार उघडते. आणि “अहो !” इतकाचं बोलून ती आश्चर्यमुग्ध होते. “काय झालं हिला ?” म्हणून ’हे’ तिकडे जातात. आणि दारात बघतात ! त्यांची दोन्ही पोरं आईला नमस्कार करताहेत. भरलेल्या डोळ्यांनी कृतकॄत्य नजरेनी एकमेकांकडे बघणारे ते दोघे कधी दिसलेत तुम्हाला ??

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

स्पा's picture

30 Nov 2012 - 12:39 pm | स्पा

सहीच

आवडलं

पहिले दोन प्रसंग जाहिरातीत पाहिल्याचे स्मरते.
तिसरा आठवत नाही.
जाहिरातींना घातलेलं शब्दांच वेष्टन छान आहे.

ह भ प's picture

30 Nov 2012 - 1:05 pm | ह भ प

डब्लूडब्लूडब्लूडॉटमस्तचडॉटकॉम

मुरलीधर परुळेकर साहेब, खुप खुप आवडल.
विशेषतः तिसरा प्रसंग फारच सुंदर लिहिला आहात. तो प्रसंग वाचताना टचकन डोळ्यात पाणी आल तेही आनंदाने. इतक सुंदर लिहिला आहात.
तुम्हाला धन्यवाद.

मालोजीराव's picture

30 Nov 2012 - 2:39 pm | मालोजीराव

खरच सुरेख !!!

बायडी's picture

30 Nov 2012 - 1:34 pm | बायडी

एकदम झक्कास........
खुप सुन्दर लेखन.

मी-सौरभ's picture

30 Nov 2012 - 1:39 pm | मी-सौरभ

प्रवाही लेखन आहे...
पण चायला असले प्रसंग आपण तरी नाय पायले ब्वॉ.....खोटं कशाला बोला??

बॅटमॅन's picture

30 Nov 2012 - 1:43 pm | बॅटमॅन

गोग्गोड आहे, पण छान आहे :)

अगदी अगदी गोडी जरा जास्तच आहे, पण लिखाणाची पद्धत आवडली.

अविनाश लोंढे.'s picture

30 Nov 2012 - 2:03 pm | अविनाश लोंढे.

मस्त आहे..!!!

स्वप्नरंजन वाटले. बाकी लिखाण मात्र ओघवते आहे.

- पिंगू

सुहास झेले's picture

30 Nov 2012 - 3:06 pm | सुहास झेले

मस्त... छान वाटलं :) :)

अन्या दातार's picture

30 Nov 2012 - 5:32 pm | अन्या दातार

झकास रे मित्रा!
फक्त इतर धाग्यांवरही प्रतिसाद दिसावेत ही सूचना

जेनी...'s picture

30 Nov 2012 - 11:11 pm | जेनी...

शेवटचा प्रसंग वाचताना आईपप्पांची आठवण आली .:(

सद्ध्या आम्हि तिनहि भावंडं त्यांच्यापासुन लांब (अमेरिकेत) आहोत .

पण पप्पांच्या वाढदिवसाला असच सर्प्राइझ द्यायच जोरदार प्लानिंग चालु आहे :)

अचानक भेटलं कि फार भावुक होतात ते .

खुप छान भावना मांडल्या आहेत .

मला कदाचित "भरलेल्या डोळ्यांनी कृतकॄत्य नजरेनी एकमेकांकडे बघणारे ते दोघे "
बघायला मिळतिल असं वाटतय :)

किसन शिंदे's picture

1 Dec 2012 - 8:51 am | किसन शिंदे

वर पिंगु म्हणतोय त्याप्रमाणे स्वप्नरंजनच आहे नाहीतर वयाच्या ६०व्या वर्षी आपल्या आई-वडीलांना घराच्या बाहेर काढणारा मुलगा मला दिसला नसता.

जयवी's picture

1 Dec 2012 - 10:08 am | जयवी

सुरेख लिहिलं आहे.... !!
प्रत्येक प्रसंगात उतरलेल्या भावना अगदी आतपर्यंत पोचल्या ... :)

वपाडाव's picture

6 Dec 2012 - 4:40 pm | वपाडाव

मस्त लिखाण... ओघवतं... थोडक्यात अन टापटीप...

कोल्हापुरवाले's picture

6 Dec 2012 - 5:09 pm | कोल्हापुरवाले

एमोश्नल केल राव !!

अविनाश पांढरकर's picture

6 Dec 2012 - 5:30 pm | अविनाश पांढरकर

एकदम झक्कास........
खुप सुंदर लेखन.

दादा कोंडके's picture

6 Dec 2012 - 6:31 pm | दादा कोंडके

कसलं मुळमुळीत लिहलय. वाचवत नाहिये. ऐंशी-नव्वदीच्या दशकात एखाद्या आठवी-नववी मधल्या बावळट मुलीने वपुंचं एखाद-दुसरं पुस्तक वाचून लिहिल्यासारखं झालयं.

पहिल्या प्रसंगातल्या आळशी नवर्‍याचं नाटक कळल्या कळल्या बायको पेकाटात लाथच घालेल.

"जन्मोजन्मि साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या पण इथे तिच्या सोबत राहु शकत नाही !!”

आ रा रा रा.... म्हणजे नवरा भारतात रहात असला पाहिजे. पुढचं गोग्गोड वर्णन वाचू शकलो नाही. पण त्यांचं बाळ चोरीला वैग्रे गेलं असतं तर थोड रियलिस्टीक झाला असता लेख.

"आणि दारात बघतात ! त्यांची दोन्ही पोरं आईला नमस्कार करताहेत."

बाबौ. हॉस्पीटल मध्ये तळमळत पडलेल्या आईवडीलांना बघायला येत नाहीत हो परदेशी स्थाईक झालेली मुलं आणि इथं पंण्णासाव्या वाढदिवसाला येतात म्हणे. आईवडिलांवर प्रेम असलेली मंडळी उतरत्या वयात कायम त्यांच्याबरोबर राहतात हो, उगीच तीच्या_ला ३६४ दिवस लांब राहून एकदिवस त्यांचा कृतकृत्य की काय डोंबलाचा चेहरा बघण्यासाठी एक दिवस सरप्राइज देत नाहीत.... अरारारा. कलियुग हो कलियुग....परमेश्वरा...

रणजित चितळे's picture

6 Dec 2012 - 7:04 pm | रणजित चितळे

मध्येच मुलांना शिव्या घालायला सुरवात करणार तेवढ्यात शेवटास ते येतात हे बघून खूप बरे वाटते. मस्त