मोनालीसा

कौस्तुभ's picture
कौस्तुभ in जे न देखे रवी...
30 Jun 2008 - 11:31 am

मोनालीसा

तू उतरावीस माझ्या कवीतेत
जशी मोनालीसा व्हिन्सीचा चित्रात

टिपून घेता यावेत तुझा मनाचे सर्व बारकावे
तुझा गुढ गुपीतांसकट
माझा कवीतेत
जे ताडता येणारही नाही कदाचीत
तुझा शरीरावर हक्क असणर्यालाही
अगदी मोनालीसासारखे...

तू होऊ शकत नाहीस माझी
मान्य
पण दूर उभे राहूनही तुझा इतके जवळ जाता यावे
माझा कवीतेतून
की,
पुढे इतीहासाने विस्मरावे तुझे
आप्त,कुळ,गाव
तुझा उगम तुझा अस्त
ते सुरु व्हावे फक्त माझापासून
अन संपावे माझाबरोबर
अगदी मोनालीसासारखे...

आता एक कर ,माझ्यासाठी
रडू नकोस,
मला तुला रडवे बघून
कवीता नाही करता येणार
दाब सारे अश्रू
स्वस्थ हो तुझा संसारात
आणि हास
अगदी मोनालीसासारखे...

हे शब्दब्रम्हा दे मज सिद्धहस्त कुन्चला
तीचे हे लाघव रुप पेलण्यासाठी
रक्त तर माझे मी घालतच आहे
तिचे गुलाबी हास्य खुलवण्यासाठी
मिसळू दे मला प्रत्येक ओळीत
दिसू दे मिही सर्वांना तुझावरचा कवीतेत
अगदी प्रतीबिंबासारखा...
.
.
.
जसा
व्हिंसी मोनालीसाचा चित्रात
व्हिंसी मोनालीसाचा चित्रात

-- कौस्तुभ

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

फटू's picture

30 Jun 2008 - 12:36 pm | फटू

अगदी ओघवत्या शब्दांमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत....

पण हे शब्दब्रम्हा दे मज सिद्धहस्त कुन्चला ही ओळ खटकली... पुर्ण कवितेच्या ओघवत्या शैलीमध्ये थोडी "ऑड" वाटली...

असो... लिहित राहा...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्राजु's picture

30 Jun 2008 - 2:15 pm | प्राजु

अगदी सहज......! कविता.. आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अजिंक्य's picture

30 Jun 2008 - 4:13 pm | अजिंक्य

छान आहे कविता!

विसोबा खेचर's picture

1 Jul 2008 - 12:26 am | विसोबा खेचर

आयला! लै भारी वाटते आहे ही कविता...

पण खरं सांगायचं तर आमच्या अंमळ डोक्यावरूनच गेली. काही टोटल लागली नाही...

आपला,
(अंमळ अजाण!) तात्या.

कौस्तुभ's picture

2 Jul 2008 - 9:50 am | कौस्तुभ

सर्वांचे मनापासुन आभार!

स्वाती राजेश's picture

3 Jul 2008 - 4:02 pm | स्वाती राजेश

छान लिहिली आहे...
अवांतरः कालच मोनालिसाचे पेंटीग (पॅरीस्)मधे पाहिले.