१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती.
असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची.
अॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी)
सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!)
आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम.
१. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट.
२. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते.
३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत.
४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता.
५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता.
६. मराठीत टाईप करण्यासाठी -
अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन
क) AnySoftKeyBoard - Devanagari
ड) Lipikaar Hindi Keyboard Free
मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले.
७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो.
८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता.
९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर.
१०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता.
११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त.
१२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता.
१३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :)
१४. TED - Ideas worth spreading :) :)
बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा.
- सुझे !!
प्रतिक्रिया
25 Apr 2015 - 10:01 pm | आनंदी गोपाळ
२ दिवस जमलं नाही इथे यायला.
उद्या रवीवार आहे. थोडा वेळ हाती मिळेल असे वाटते. ही थींम कशी तयार करायची व वापरायची त्याचा धागा/प्रतिसाद देतो इथेच.
वर दिलाय तो जुना एस्सेस होता. आता सध्या थोडी नवे बदल केले आहेत.
25 Apr 2015 - 10:25 pm | श्री
नक्की द्या, वाट पाहतोय
28 Apr 2015 - 3:42 pm | मदनबाण
थीम खरेच खूप सुंदर आहे ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots erupt
28 Apr 2015 - 12:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझा फ़ोन रुट आहे. मी रुट एक्सप्लोलर मधुन अनेकदा इनबिल्ट रिंग टोन बदलल्या आहेत. चोप्य पस्ते करुन.
पण आता ते कै होत नै ये. या पेक्षा काही सुपाय उपाय आहे का ?
-दिलीप बिरुटे
30 Apr 2015 - 12:09 pm | घन निल
फोन रूट केल्यावर पुन्हा कस्टम रोम टाकणे गरजेचे असते का ?
1 May 2015 - 5:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाही. पुन्हा कशाला टाकायची कष्टम रोम.
फोन रुट करणे आणि कष्टम रोम टाकणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
कष्टम रोम टाकण्यासाठी फोन रुट आवश्यक असतो इतकेच.
-दिलीप बिरुटे
10 Jun 2015 - 3:48 pm | घन निल
ट्राय करून बघतो !
17 Jun 2015 - 6:26 pm | घन निल
एच टी सी ने स्वतः काही तरी टूलकीट बनवले आहे असे कळले.. बघतो हे पण वापरून
4 May 2015 - 1:46 pm | arun jaykar
सप्रेम नमस्कार,
माझ्याकडे micromax canvas HD A116 मोबाईल आहे.त्याची ओ एस Android ४.२.१ अपडेट केलेली आहे.ram १ जीबी आहे. त्याची फोन मेमोरी १ जीबी आहे. internal sd card memory २ GB व external memory expandable upto ३२ GB आहे. मी त्यामधे १६ जीबी चे मेमोरी कार्ड टाकलेले आहे. Default write disc ही external sd card सिलेक्ट केलेली आहे.
इंटरनल sd card मेमोरी पूर्ण रिकामी अाहे. मी प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केलेले apps प्रथम फोन मेमोरीमधेच इन्स्टॉल होतात व नंतर मुव्हेबल apps हे external sd कार्डमधे मूव्ह करता येतात.
आता फोन मेमोरी फक्त १०० mb शिल्लक आहे.
प्रॉब्लेम इथून पुढे सुरु होतो. मला आता आणखी apps डाऊनलोड करता येत नाहीत. उदाहर्णार्थ Facebook डाऊनलोड करताना "Error while downloading "Facebook" There is insufficient space on the device " असा मेसेज येतो. माझया मोबाईलमधे २ जीबी इंटरनल sd card मेमोरी रिकामी आहे. तिचा वापर मी app इन्स्टॉल करण्यासाठी कसा करु शकतो ? तिचा वापर करुन फोन मेमोरी वाढवता येईल काय ? कसा ?
Internal sd कार्डची २ जीबी मेमोरी वापरून फोन मेमोरी वाढवता येईल काय ? जेणेकरुन मला आणखी apps install करता येतील.
कृपया मार्गदर्शन करावे, ही विनंती.
आपला नवीन सदस्य,
अरुण जायकर.
4 Jul 2015 - 4:47 pm | अमोल मेंढे
सेटींग मध्ये जा
अॅप्स मध्ये ऑल टॅब सिलेक्ट करा
गुगल प्ले स्टोर सिलेक्ट करा
अनइन्स्टाल अप्डेट्स करा
सेम गुगल प्ले सर्विसेस सोबत करा
नविन अॅप डाऊन्लोड होईल
10 May 2015 - 12:07 am | रॉजरमूर
radio off
परवापासून फोन वर outgoing call चे बटण दाबल्यावर किंवा इनकमिंग call आल्यावर recive केल्यावर
"Radio off " असा संदेश येतोय त्यामुळे फोन कुठे लागत ही नाही आणि recive पण होत नाहीये .
android version ४.२. २ jelly bean
फोन Aeroplane Mode वर नाहीये .
काही setting चा घोळ असेल का ?
अर्थात factory reset चा पर्याय आहेच पण setting मध्ये काही गडबड झाली असेल तर थोडक्यात काम
होईल म्हणून हा प्रश्न .
कुणाला आलाय का हा प्रॉब्लेम कधी ?
17 May 2015 - 11:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असा कै प्रॉब्लेम आलेला नाही.
-दिलीप बिरुटे
17 May 2015 - 11:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किटक्याटसाठी ४.२.२ साठी स्थिर कष्टम रोम आहे का ?
सर्वांच्या ह्यांडसेटसाठी चालेल अशी ?
-दिलीप बिरुटे
17 May 2015 - 4:21 pm | arun jaykar
पीसीचा वापर न करता अंड्रॉइड मोबाईलद्वारेच मोबाईलच्या एस डी कार्डवरील डिलीट झालेल्या फाईल परत रिकव्हर करता येतील का ? कशा ?
17 May 2015 - 4:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्ले स्टोअरवरुन मोबाईल फोन डाटा रिकव्हरी नावाचं अॅप्लीकेशन घ्या.
डिलिट झालेल्या फायली रिकव्हर होतील.
-दिलीप बिरुटे
17 May 2015 - 6:42 pm | arun jaykar
बिरुटेसाहेब त्वरित दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. तुम्ही सांगितलेली सर्व अप्लीकेशन प्ले स्टोअरवरुन इन्स्टॉल करुन पाहिली परंतु सर्वांनाच मदतीसाठी कॉम्प्युटरची मदत लागते.पीसीच्या मदतीशिवाय डायरेक्ट मोबाईलद्वारे रिकव्हरी करणारे एखादे एअँप नाही का.
12 Jun 2015 - 8:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पीसीच्या मदतीशिवाय मोबाइलवरच होतं
Diskdigger हे अपलीकेशन टाका. फोन रुट आवश्यक आहे माझ्या फोनवर हेच आहे आणि ते उत्तम काम करतं.
दिलीप बिरुटे
21 May 2015 - 2:31 pm | पाटील हो
सिंगल सीम मोबाईल वर दोन whatsapp अकौंट .
http://thepsycraft.com/wmapp
वेवास्तीत चालतात , मी अजून वपरतोय ( सर्विस expiration २ मे २०१६ )
OGWhatsapp चा आलटर्नेतीव म्हणून वापरता येतो .
12 Jun 2015 - 8:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक सिम कार्ड्स नंबर दोन मोबाईलवर वाट्सअप चालले पाहिजेत असं शोधा ?
-दिलीप बिरुटे
2 Jun 2015 - 3:51 pm | अमोल मेंढे
आमचेकडे सर्व प्रकारचे अॅन्ड्रॉइड अप्लीकेशन्स प्रो मिळतील. तसेच मोबाइल बद्दल काही अडचण असल्यास संपर्क करावा. फुकटात मदत करण्यात येईल.
11 Jun 2015 - 10:56 am | arun jaykar
How to control use of internet by verious apps on mobile ? And how to grant Internet access to a perticuler app only ? I want to stop access like Whatsapp and other apps to increse the internet speed while browsing and downloading.
11 Jun 2015 - 2:48 pm | सुनिल साळी
जी पी एस नेव्हिगेशन साठी एक जबराट अप्लीकेशन -> ओ एस एम अँड
इंटरनेटची गरज नाही. ऑफलाईन अप्लीकेशन आहे. मला किल्ले भटकंती करताना ह्याची खूप मदत होते. मात्र
जी पी एस ची रेन्ज असणे आवश्यक आहे. आपण जी पी एस ट्रेल आधी ट्रेस करुन घेतल्यास रस्ता चुकन्याची सुतराम शक्यता नाही. एकदा वापरुन पहा.
1 Jul 2015 - 12:06 am | रॉजरमूर
म्हणजे GPS साठी internet आवश्यक नाहीये का ? मग खालील परिस्थितीत या साठी उपयोग होईल का ?
उदा . १. आपण रेल्वेत प्रवासात आहोत. मोबाईल ला रेंज नाही म्हणून इंटरनेट ही बंद आणि रात्री वरच्या बर्थ वर झोपलेलो आहोत अशा वेळी गाडी नेमकी कोणत्या स्टेशनावर आहे किंवा कुठल्या
गावापाशी आहे याची नेमकी माहिती मिळत नाही . आणि बाहेर अंधारात ते दिसत ही नाही.
जुन्या नोकिया च्या साध्या फोन मध्ये ही छान व्यवस्था होती मोबाईल मनोऱ्याच्या लोकेशन नुसार मोबाईल च्या होम स्क्रीन वरच आपण नेमक्या कोणत्या गावात अथवा गावाजवळ किंवा शहरातल्या कुठल्या भागात आहोत .
हे अचूक कळायचे अर्थात तेव्हा फोनला इंटरनेट नव्हतेच त्यासाठी फक्त setting मध्ये जाऊन cell info display ON ठेवायला लागायचे .
आताही android साठी याच नावाने किंवा तत्सम भरपूर app आहेत पण त्याला इंटर नेट आवश्यक आहे .
२. मोबाईल ला जरी रेंज असली तरी मधल्या बऱ्याच गावात ३ G नसते त्यामुळे गुगल map व इतर app काम करत नाही .
३. आपण नेट pack टाकला नसेल किंवा संपला असेल तर ?
अशा वेळेस अजून कोणती app आहेत जी स्थान दर्शक (location finder) म्हणून offline काम करू शकतात ?
1 Jul 2015 - 6:48 am | कंजूस
ही अॅपस( फ्री ,विंडोज) फक्त GPS वर offline चालतात.तुमच्या android वर आहेत का पाहा. एक दोन MB ची आहेत. [app name] [developer name] 1 A route tracker...pure 22 2 GPS Sattelite ......KarhuKoti 3 Maps+...................Live Tiles 4 GPS Tracker.........Maiya 5 Track Finder GPS Free.....Apps Destination हे अॅप वाहनाचा वेग दाखवते Driving Forces..........5ST मॅपस ( google maps ,Nokia maps वगैरे) import करून वापरणारी बरीच अॅपस आहेत परंतू ती इंटरनेट वरच चालतात म्हणून देत नाही.
1 Jul 2015 - 8:46 am | आनंदी गोपाळ
जीपीएससाठी इंटरनेट आवश्यक नाही.
मात्र सॅटेलाईट फिक्स मिळणे आवश्यक असते. यासाठी प्रवास सुरू करण्याआधी जीपीएस सुरू करून ठेवावे लागते, हलत्या गाडीतून चट्कन फिक्स मिळत नाही. त्याचप्रमाणे हँडसेटच्या दर्जानुसार किती लवकर मिळेल ते ठरते.
तात्पर्य, मोबाईलची बॅटरी बोंबलत राहते.
ऑफलाईन नॅव्हिगेशन मॅप्सची अनेक अॅप उपलब्ध आहेत. मी सिजिक वापरतो. मात्र हे फुकट नाही. तसेच (एस्डी कार्डवर) जागाही भरपूर खाते.
1 Jul 2015 - 10:21 am | कंजूस
आताचे नवीन क्वाड कॅार प्रसेसर(क्वालकॅाम उत्तम) झटकन सटेलाइट लॅाक करतात.मी। दिलेली अॅप फक्त gps वरही मॅप (2G)टाकतात.Android बॅटरी किलर आहेच.
1 Jul 2015 - 10:24 am | कंजूस
आपण ट्रेन मधुन जातो तेव्हा केवळ उत्सुकता म्हणून मॅप पाहतो, driving guidance नको असतो.अर्थात फार डिटेल मॅप नसला तरी चालतो.
3 Jul 2015 - 9:53 pm | रॉजरमूर
नाही हो .
पूर्ण map बद्दल नाहीच म्हणत आहे .
माझा प्रश्न लक्षात आला नाही बहुतेक .
पूर्वी नोकीया त जसे आपण कुठल्या गावात आहे हे साध्या handset च्या होम स्क्रीन वर दिसत असे .
ते मोबाईल टावर location दर्शवायचे अर्थात . पण त्यावरून कळायचे .
तसे दर्शवणारे एखादे app आहे का ? इंटरनेट शिवाय चालणारं ? फ़क़्त गाव समजलं तरी पुरे .
अनेकदा रेल्वे ने प्रवास करताना खास करून रात्री ही समस्या येते म्हणून विचारले .
3 Jul 2015 - 11:09 pm | आनंदी गोपाळ
एक जुना नोकिया घेऊन टाका की लोकेशन पहाण्यापुरता? ;)
5 Jul 2015 - 6:15 am | कंजूस
%%पूर्ण map बद्दल नाहीच म्हणत आहे . माझा प्रश्न लक्षात आला नाही बहुतेक .%%
या अॅपमध्ये टुलबारमध्ये एक वर्तुळ असते ते दाबले की तुमचे लोकेशन च्या जागी मॅपवर मध्यवर्ती दिसत राहते. समजा मॅप नाही आला तर दोन तीन मिनिटे डेटा इंटरनेट ओन करा की सर्व मुख्य नावे येतात आणि वीस एक किमी चा मॅप मिळून जातो.५०kbफक्त जातात.एक दोनवेळा ट्राइअल करा कोणते अॅप चांगले आहे ते कळेल.
3 Jul 2015 - 11:11 pm | आनंदी गोपाळ
१. प्रत्येकाजवळ तो लेटेस्ट प्रोसेसर नसतो.
२. उत्सुकता म्हणून बोगी अटेंडंटला विचारले तरी स्टेशन कोणते आले ते समजेलच की ;)
11 Jun 2015 - 8:31 pm | arun jaykar
मी मोबाईलवर २ जी इंटरनेट वापरतो. पण ब्राउजिंग करताना किंवा डाऊनलोडिंग करताना मोबाईल मधील व्हॉटस् अँपसारखी इतर अँपही इंटरनेट वापरतात.त्यामुळे मला मिळणारी स्पीड कमी होते.
इंटरनेटचा इतर अँपकडून होणारा वापर बंद करुन हव्या असणार्या अँपपुरता वापर चालू ठेवणारे असे एखादे अँप प्ले स्टोअर वर किंवा इंटरनेटवर आहे का ?
असल्यास कृपया माहिती द्यावी.
12 Jun 2015 - 8:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोबाइलच्या सेटिंग डाटा यूजेस मधे गेलो की ओव्हर व्ह्यू आणि आपण जी सिमकार्डवरील नेट वापरतो ते दिसतं त्यातील एक सलेक्ट केलं की त्या खाली मोबाइलवर चालणारी अप्लिकेशन ची नावं दिसतात उदा. वाट्सप त्यावर क्लिक केलं की त्या खाली एक पर्याय Restrict background data त्या समोरील चौकानात टिक केलं की तुमचं वाट्सअप बंद होऊन ब्राउजिंगला तुम्ही मोकळे. :)
-दिलीप बिरुटे
12 Jun 2015 - 8:21 am | कंजूस
ट्रेकींग चा रूट ट्रेस करण्यासाठी विंडोज वर एक A route tracker आहे इकडे Android वर आहे का पाहा.दोन अडिच तास वापरूनही बॅटरी पाच टक्केच उतरते.रूट सेव होतोच.ओफलाइन चालते.Updated
13 Jun 2015 - 4:34 pm | सुनिल साळी
A route tracker Android वर आहे. पण यात आधीचे सेव्ह केलेले रुट इम्पोर्ट करता येत नाही. ओ एस एम अँड मध्ये अशी व्यवस्था आहे.
12 Jun 2015 - 5:29 pm | arun jaykar
बिरुटेसाहेब धन्यवाद.
नवीन माहितीबद्दल आभार. पण यासाठी प्रत्येक वेळी बराच वेळ लागत आहे. एक सोडून इतर सर्वांचे इंटरनेट अँक्सेस बंद करणारे असे एखादे वन टच अँप आहे का ?
18 Jun 2015 - 5:51 pm | जादू
असे अँप आहे का? आपणास हवे त्यानाच फक्त कळेल की आपण वाट्सअप
वर आहोत. म्हणजे आपला नंबर जरी कोणाकडे सेव्ह असेल तरी त्यास कळणार नाही कि हया व्यक्तीकदे (नंबरवर) वाट्सअप चालू आहे.
28 Jun 2015 - 5:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धाग्याला माहितीची विट लावत जा हो !
-दिलीप बिरुटे
30 Jun 2015 - 1:15 pm | कपिलमुनी
OTG support हा हार्डवेअर बेस्ड आहे की सॉफ्टवेअर बेस्ड ?
नवीन ओएस टाकून OTG वापरता येते का?
1 Jul 2015 - 10:21 am | सुहास झेले
हे हार्डवेअर बेस्ड फिचर आहे... ओएस अपग्रेड करून काही फायदा नाही ...
5 Jul 2015 - 6:25 am | कंजूस
हे OTG supported फोन असला तर --
१)फोनच्या मेमरीमधून पेन् ड्राइववर केबल जोडून डेटा पाठवता येतो का? अथवा/आणि
२)पेन ड्राइवचा डेटा थेट फोन मेमरीत घेता येतो का?
३)समजा असं करता येत असेल तर फोन मेमरी करप्ट होण्याचा धोका वाढतो का?
5 Jul 2015 - 4:27 pm | सुहास झेले
हो दोन्ही प्रकारे डेटा ट्रान्स्फर करता येतो....
पेन ड्राईव्ह वायरस स्कॅन केलेला असेल तर काही प्रॉब्लेम होणार नाही... फोनमध्ये ही वायरस असू शकतो त्याचीही काळजी घेतलेली बरी :)
1 Jul 2015 - 12:28 am | श्रीरंग_जोशी
मिपावर सर्वाधिक प्रतिसाद संख्येचे पहिले तीन धागे:
काल पर्यंत क्र. २ वर हा व काश्मीरचा धागा होता. आज काश्मीरच्या धाग्याला मागे टाकले.
अर्थात काश्मीरच्या धाग्याला सक्तीची निवॄत्ती दिली गेली नसती तर चित्र वेगळे असते.
या विक्रमाबद्दल धागाकर्ते सुहास झेले, सर्व प्रतिसादकर्ते व मिपावरील सर्व अॅन्ड्रॉइडप्रेमींचे हार्दिक अभिनंदन अन पंचशतकासाठी शुभेच्छा.
बाकी मिपावर ब्लॅकबेरी १० वापरकर्ते एवढे वाढावेत की त्यासाठी स्वतंत्र धागा निघावा अशी इश्वरचरणी प्रार्थना :-) .
1 Jul 2015 - 10:23 am | सुहास झेले
सर्वांना धन्यवाद... :) :)
अवांतर : लवकरच ब्लॅकबेरी अॅन्ड्रॉईड फोन लौंच करत आहेत :)
28 Jul 2015 - 6:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिनंदन सुहाससेठ हा धागा मी खुपच इंजॉय केला. मला अँड्राईड काय आहे हे मला माहितीच नव्हतं तेव्हा याच धाग्यावर अँड्रॉइडची ओळख झाली. नोकीया हे पहिलं प्रेम होतं. त्यातही सीस फायली खटपट करुन कष्टम रोम टाकायचो. पण अँड्राईडने मला खुप समृद्ध केलं. चोथा केला अॅप्लीकेशन्सचा, मोबाईल अनेकदा हँग झाला. रात्र रात्र जागावं लागलं, फोन कंपनीची सर्वीस चांगली होती म्हणुन कधी कधी फोन सॉफ्टवेअर सर्वीस स्टेशनला टाकून मिळाले. काही हँडसेट म्हणजे किमान तीन कंपनीलाही झेपले नाही इतके कोमात गेले. काही रिप्लेस करुन दिले. एकुणच खुप मजा आली. देहभान हरवुन तांत्रिक युगात वावरायला मजा आली. थॅक्स..सुहाससेठ.
>>>>> लवकरच ब्लॅकबेरी अॅन्ड्रॉईड फोन लौंच करत आहेत :)
नही, नही, नही.....! असेच असेल तर आम्हीही या धाग्यावरुन रजा घेतो. :(
कर चले हम फिदा...
-दिलीप बिरुटे
4 Jul 2015 - 2:44 pm | तुषार काळभोर
१) लुमिया विंडोज मोबाईलः बिल्ट-इन जे मॅप्स अॅप्लिकेशन दिले आहे, त्यात प्रीलोडेड मॅप्स येतात. जरी जुन्या वर्जन मध्ये नसले तरी, महाराष्ट्र+गोवा मॅप्स ~२५० एम्बी मध्ये डाऊनलोड होतात. प्रत्येक राज्यासाठी वेगळे पॅकेज आहे. काही राज्यांचे तर <५० एम्बी आहे.
२) अॅन्ड्रॉईड मोबाईलः याच्यावर जे अॅप आहे ते मला लई आवडलंय. "Sygic"
सर्व देशांसाठी वेगवेगळे मॅप्स घ्यावे लागतात. आधी सर्वच देशांचे मॅप्स विकत मिळायचे. पण भारतातून (कदाचित) शून्य प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी भारताचे मॅप्स फुकट उपलब्ध करून दिलेत. प्रॉब्लेम एकच आहे. ते राज्यांचे स्वतंत्र मॅप्स देत नाहीत. पूर्ण भारताचा नकाशा डाऊनलोड करावा लागतो. त्यामुळे साईझ जवळ जवळ ८०० एम्बी आहे.
सिजिकचे मॅप्स, युजर इंटरफेस, नॅविगेशन इ सर्व उच्च दर्जाचे आहे. लुमियाचे बरेच बेसिक आहे.
पण वरील दोन्ही सुद्धा ऑफलाईन चालतात. (मोबाईलची २जी/३जी रेंज जाऊद्या, सिम कार्ड नसलं तरी चालतात.
डायरेक्ट आभाळाखाली असल्यास २-३ सेकंदात जीपीएस लॉक होऊन आपण नकाशावर दिसतो. चालत्या कारमध्ये १ मिनिटापर्यंत वेळ लागू शकतो.
4 Jul 2015 - 9:27 pm | रॉजरमूर
छान उपयुक्त माहीती Sygic बद्दल
धन्यवाद .........!
11 Jul 2015 - 10:08 pm | सुहास झेले
“इतिहासमित्र” हे इतिहासाचा अभ्यास करणार्या तरुणांकरीता बनवलेले अॅप असून, यामध्ये निरनिराळ्या हिंदू आणि मुसलमानी कालगणना, मोडी लिपीचा इतिहास, इतिहासाचा अभ्यास कसा करावा, शिवचरित्राची कालसूची, छत्रपती आणि पेशव्यांच्या मुद्रा, १२ महाल आणि १८ कारखाने, ऐतिहासिक आकडेमोड आणि त्याशिवाय कठीण शब्दांचे अर्थ दिले आहेत.
हे अॅप माझे मित्र कौस्तुभ कस्तुरे ह्यांनी बनवले आहे. ज्यांचा उल्लेख राजवाडेंच्या लेखात केला होता.
डाउनलोड लिंक - Itihaas Mitra
12 Jul 2015 - 6:36 am | कंजूस
अॅपसंबंधी प्रश्न ( फक्त android app बद्दल नाही)
न्युज पेपरची त्यांनीच बनवलेली अॅप एवढी चांगली का नसतात?उदाहरणार्थ: TOI ,The Hindu वगैरे .बातम्या लवकर आणि सर्व नाही येत. परंतू यांचे bookmark करून refresh करणे सोयीचे पडते!!
दोष अॅपच्या कोडमध्ये असेल अथवा पेपरवालेच अॅप ला माहिती feed करत नाहीत?
12 Jul 2015 - 12:01 pm | सुहास झेले
TOI, ndtv बद्दल तरी काही प्रॉब्लेम जाणवला नाही..एकदा अॅपडेटा डिलीट करून बघा सेटिंग्जमधून किंवा फ्रेश इंस्टॉलेशन करून बघा...
12 Jul 2015 - 1:22 pm | कंजूस
ओके नवीन TOI डाउनलोड करून पाहतो.मी बुकमार्क अथवा RSS वापरतो
12 Jul 2015 - 1:22 pm | कंजूस
ओके नवीन TOI डाउनलोड करून पाहतो.मी बुकमार्क अथवा RSS वापरतो
12 Jul 2015 - 5:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Titanium Backup प्रो व्हर्जन फुकट आहे का कुठे ?
-दिलीप बिरुटे
12 Jul 2015 - 7:13 pm | अत्रुप्त आत्मा
ते नंतर!!!
आधी, नाबाद 500... हे धत्ताड तत्ताड तत्ताड तत्ताड!
सत्काराला या हो जे पी ssssss :-\
12 Jul 2015 - 7:22 pm | श्रीरंग_जोशी
मिपाच्या संपूर्ण इतिहासात कुठलाही वादग्रस्त विषय नसताना पंचशतक केलेला हा पहिलाच धागा आहे.
अत्यंत उपयुक्त माहितीने भरलेला हा धागा अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो व या प्रकारच्या धाग्यांसाठी नवे मापदंड प्रस्थापित करो ही आकाशातल्या देवाकडे प्रार्थना.
सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन.
13 Jul 2015 - 10:35 am | सुहास झेले
हे बघा चालतंय का: Titanium Backup
28 Jul 2015 - 6:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्स...! जमलंय. :)
मंडळी, वाट्सअॅप प्लस कुठे मिळेल, सावन क्रॅक व्हर्जन कुठे मिळेल, ओला कॅब अॅप्लीकेशन टाकल्यावर १२५ रुपये फुकट जमा होतात. या आणि अशा गोष्टी मिळविण्यासाठी 'तुमच्या अँड्राईडसाठी' आमच्या सुहाससेठचा धाग्यावर लक्ष ठेवा आणि वाचत राहा. लिंक लवकरच देण्यात येईल. :)
-दिलीप बिरुटे
22 Aug 2015 - 11:27 am | कानडा
ओला कॅब टाकतांना कुणाचा ओला रेफरल कोड टाकला तर रू. ३००/- चे कुपन मिळते जे पहिल्या राईड साठी वापरता येते. (माझा कोड M0AN3R)
25 Jul 2015 - 5:48 am | देव मासा
एंड्रॉइड ऍप बाबतित प्रो म्हणजे काय हो ? जे ऍपस मोफत मिळतं नाही ते का ? म्हणजेच जे सशुल्क आहेत ते का? तसेच गण्यांची प्लेलिस्ट सहज बनवता येईल आणि इतर ऍप वापरताना
बैकग्राउंडला वाजत राहील असा एखादा
म्युझिक प्लेयर सुचवा .(मोफत)
28 Jul 2015 - 6:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> एंड्रॉइड ऍप बाबतित प्रो म्हणजे काय हो ?
प्रो म्हणजे अधिक फिचर्स असलेले विकत मिळणारे अॅप्लीकेशन.
>>> जे ऍपस मोफत मिळतं नाही ते का ?
हो.
>>> म्हणजेच जे सशुल्क आहेत ते का ?
हो.
>>>> बैकग्राउंडला वाजत राहील असा एखादा
म्युझिक प्लेयर सुचवा
मी Winamp वापरलं आहे. काही एमपीथ्री प्लेयर मोबाईल स्क्रीन लॉक केलं की मागे वाजणारी गाणी बंद होऊन जातात. आता असे हे प्लेयर कोणकोणत्या हँड्सेट्सला सपोर्ट करते ते मला माहिती नाही. असे प्लेयर वापरणा-यांनीच ती माहिती इथे शेअर केली पाहिजे.
27 Jul 2015 - 4:12 pm | उपयोजक
म्युझिक्समॅच हे उपयोजन वापरून पहा.
28 Jul 2015 - 1:01 pm | महेश-मया
माझा मायक्रोमॅक्स युनाईट २ मोबाईल आहे तो कसा रुट करायचा?
28 Jul 2015 - 6:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किंग रुट हे मोबाईल अॅप्लीकेशन वापरा त्याने फोन रुट नाहीच झाला तर व्ही रुट, आय रुट हे संगणकावर चालणारे अॅप्लीकेशनस वापरा फोन रुट नाहीच झाला तर जरुर सांगा, आपला फोन रुट करुनच राहु, हाय काय अन नाय काय. :)
-दिलीप बिरुटे
28 Jul 2015 - 6:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किंगरुट या मोबाईल अॅप्लीकेशनचा पत्ता. आणि संगणकावर चालणारं अॅप्लीकेशन आय रुटचा हा पत्ता.
शेठ फोन रुट केल्यावर काय काय करणार ते जरुर सांगा. कस्टम रोम टाकणार असाल तर स्टेबल रोम कोणती, कोणत्या कंपनीच्या हँडसेटला या रोम चालतात, असं काही करणार असेल तर जरुर सांगा. वाट पाहतोय.
कष्टम रोम सर्वच हँससेट्सना चालत नाही, हँडसेट डेड होऊ शकतो तेव्हा अशी खटपट करणा-यांनी सर्व सावधानता बाळगुनच हा खटाटोप करावा.
-दिलीप बिरुटे
28 Jul 2015 - 6:16 pm | arun jaykar
माझ्याकडे micromax A ११६ canvas HD मोबाईल आहे. मी तो रुट करण्याच्या विचारात आहे. कोणी केला आहे का ?
कोणाला माहीत असल्यास कृपया सविस्तर माहिती द्यावी. तसेच रुट केल्यानंतर पुढे काय काय व कसे कसे इन्स्टॉल करावे याची कृपया इत्यंभूत माहिती द्यावी. मी पूर्णता अनभिद्न्य आहे.
धन्यवाद.
28 Jul 2015 - 6:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मायक्रोमॅक्स मी वापरत नाही, तो रुट केला नाही. आत्ताच वर एका प्रतिसादात फोन रुट करण्याची माहिती दिली आहे त्याने फोन रुट होईल. फोन रुट करण्याचा फायदा हेही १)दुवे चाळावेत. २) दुवा
एकदा फोन रुट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते नक्की ठरवा. फोन रुट करणे म्हणजे फोनची वारंटी घालविणे आहे. फोन अनरुटही करता येतो तो भाग वेगळा.
रुट केल्यानंतर फाँट बदलता येणे, कष्टमरोम टाकता येणे, काही अॅप्लीकेशन इन्स्टॉल करण्यासाठी फोन रुट आवश्यक असतो त्यासाठी मदत होते. होम लॉन्चर बदलता येते, अजून बरंच काही पण तुम्ही पूर्ण अनभिज्ञ असाल तर एकदमच मोठा प्रयोग करु नका जसे रोम टाकणे वगैरे हँडसेट डेड होऊ शकतो.
-दिलीप बिरुटे
28 Jul 2015 - 7:08 pm | arun jaykar
माझ्याकडे micromax A ११६ canvas HD मोबाईल आहे. मी तो आता रुट करण्याच्या विचारात आहे. कोणी केला आहे का ?
कोणाला माहित असेल तर कृपया मार्गदर्शन करावे. रुट केल्यानंतर पुढे काय काय करावे. त्यानंतर काय काय इन्स्टॉल करावे व कसे करावे याची इत्यंभूत माहिती द्यावी
28 Jul 2015 - 7:34 pm | arun jaykar
बिरुटेसाहेब,
मला फोन रुट करुन त्याची फोन मेमोरी वाढवायची आहे व त्यामधे जास्त व रुटेड फोनमधेच इन्स्टॉल होणारी काही apps टाकायची आहेत. माझी फोन मेमोरी ४ जीबी असूनही कंपनीने फक्त १ जीबी जागा ओ एस व apps इन्स्टॉल करण्याकरिता वापरली आहे.२ जीबी जागा intetnal sd card व १ जीबी जागा गायब आहे. त्यामुळे नवीन app instal करताना phone memory full असा मेसेज येते.
मला os साठी व app install करण्यासाठी फोन मेमोरीमधे पार्टीशन करुन os साठी व apps install करण्यासाठी जागा वाढवायची आहे.
कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद...
28 Jul 2015 - 8:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोन रुट करून मेमरी वाढविता येणार नाही, पण फोन रूट केल्यामुळे इंटरनर मेमरीवर असलेले फारसे उपयोगात नसलेले एप्लीकेशन्स काढून टाकता येतील फोन मेमरीतील जागा रिकामी करता येईल.
धाग्याच्या सुरुवातीला कुठे तरी मेमरी कार्डला पार्टीशन करून फोन मेमरीवर इनस्टॉल होणारी एप्लीकेशन्स एस डी कार्डवर इनस्टॉल करता येतात थोड़ी जागा होते असा अनुभव आहे.
-दिलीप बिरुटे
28 Jul 2015 - 10:38 pm | arun jaykar
बिरुटेसाहेब, आपण कॉम्प्युटरमधे जसे एकूण हार्डडिस्कमधील हवी तेवढी जागा पार्टीशन करुन os साठी व apps install करण्यासाठी "C" ड्राईव्हच्या रुपात वापरतो तशी फोन मेमोरीची ४ जीबी जागा (हार्ड डिस्कची) आपल्याला हवी त्या साईजमधे पार्टीशन करता येत नाही का ?
29 Jul 2015 - 3:19 pm | नया है वह
हवी तेवढी जागा पार्टीशन करुन apps install करण्यासाठी "C" ड्राईव्हच्या रुपात वापरतो तशी sd मेमोरी कार्डची आपल्याला हवी त्या साईजमधे पार्टीशन करता येते.
28 Jul 2015 - 11:06 pm | चतुरंग
जुना आहे 'सामसूम गॅलॅक्सी एस'. अँड्रॉईड वर्जन २.३.६
मराठी फाँट दिसत नाही. मराठी कळफलक दिसतो परंतु मराठी अक्षरे स्क्रीन्वरती उमटलेली सगळी दिसत नाहीत बर्याच अक्षरांऐवजी चौकोन दिसतात. काय केले म्हणजे हा प्रश्न सोडवता येईल?
29 Jul 2015 - 8:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोन रूट करा त्यानंतर रूट एक्सप्लोलर एप्लीकेशन टाका. Droidhindi.ttf किंवा devnagari.ttf फॉण्ट इंस्टाल करा.
रुट एक्सप्लोलर उघडून फ़ोन सिष्टिम मधे फॉण्ट या फोल्डर मधे वरील फॉण्ट टाका. आणि एक्सप्लोलर मधून बाहेर पडल्यावर फोन रिस्टार्ट करा. चौकोनी डबे जाऊन मराठी शब्द दिसायला लागतील. शुभेच्छा रंगासेठ.
-दिलीप बिरुटे
29 Jul 2015 - 10:54 pm | arun jaykar
ठीक आहे. मी तसेच करतो. आता रुट कसा करु ते सांगा.
10 Aug 2015 - 7:46 am | arun jaykar
करु की नको करता करता शेवटी मी माझा micromax A116 रुट केलाच. तोही सहजपणे. वापरले framaroot app.
आता आणखी काय काय करु शकतो ?
धाग्यावर अशी शांतता का ? तुटला की काय ?
14 Aug 2015 - 1:57 am | पिलीयन रायडर
इथे रुट करणे ह्यावर फार चर्चा झालेली दिसतेय
मान्यवरांनी माझेही शंका निरसन करावे!
जुलै मध्ये नवर्याने US मध्ये Amazon वरुन Lenovo K3 Note मागवला. आता सध्या मी तो वापरतेय. त्याला कधी काही त्रास झाला नाही. मला मात्र खालील प्रॉब्लेम्स येत आहेत.
१. बारिक सारिक गोष्टी चीनी भाषेत आहेत. कुणाचाही नंबर डायल केला की सिटीचे नाव चायनीज मध्ये. कॉन्टेक्ट्स मध्ये यल्लो पेजेसचा टॅब चायनीज. काही अॅप्सची नावं (क्लिन मास्टर) चायनीज. डीफॉल्ट भाषा इंग्लिश आहे तरीही.
२. ह्या नंतर त्रास सुरु झाला ते अॅटोमॅटिक अॅप्स डाऊनलोड होण्याचा त्रास. कुठलेही चित्र विचित्र चायनीज अॅप्स (त्यात अश्लील अॅप्सही येतात मध्येच) आपोआप येतात. मी ते कितीही वेळा उडवले तरी परत हजर. रोज नव नवे अॅप्स येतात. कधी इंग्लिशही असतात.
३. क्रोम उघडलं की आपोआप एकामागे एक ३-४ साईट्स ओपन होतात. गुगल प्ले स्टॉअरची साईट ओपन होऊन अॅप्स दिसतात.
४. चेपु ओपन केलं की खाली चायनीज अॅड्स येत आहेत.
५. मोबाईलमध्ये जो इन्स्टॉल्ड अॅण्टीव्हायरस आहे तो म्हणतो की कंपनीने आधीच डालो करुन दिलेले थीम सेंट्र्स, ट्विटर हे मालवेअर आहेत. आम्ही उडवु शकत नाही. काही तरी "रुट" करण्या विषयी येतं.
नेट्वर शोध घेतला तर अनेकांना हा त्रास आहे आणि तो मोबाईल "रुट" करुन काही प्रमाणात दुर झालाय.
एक अॅप आहे लिनोव्होचं (|लेनोवो कंपॅनियन) त्यात मोबाईल डायग्नोस्टीक होते. त्यात मोबाईल रुटेड - येस असं दिसतं.
मला ह्या मोबाईलवर अजिबात खात्री नाही. माझा डेटा सेफ आहे असं वाटत नाही.
काय करावे?
(रुट करणे म्हणजे काय असावे ह्या विचारात) पिरा
14 Aug 2015 - 9:40 am | सुहास झेले
इतके सगळे प्रॉब्लेम आहेत...म्हणजेच ओरिजिनल फोनमध्येच गडबड असावी किंवा फोन रूट केला गेला असावा आणि नवीन ओएस गंडली असावी. पुन्हा एकदा रूट करायचा प्रयत्न करून बघा.
रूट केल्याने तुम्हाला फोनच्या सिस्टीमचा पूर्णपणे एक्सेस मिळतो, जो मूळ ओएसमध्ये नाही मिळत. तुम्हाला खूप ऑप्शन्स मिळतात ओएस निवडीसाठी. अनेक फ्री रॉम्स इंटरनेटवर उपलब्ध आहेत. :)
14 Aug 2015 - 6:26 pm | पिलीयन रायडर
करायचं कसं असतं ते?
14 Aug 2015 - 6:33 pm | सुहास झेले
इथे बिरुटे सरांनी माहिती दिली आहे...
21 Aug 2015 - 10:34 am | सुहास झेले
22 Aug 2015 - 9:17 am | arun jaykar
पिराजी तुमच्या मोबाईल ची सेटींग चायनिजमधेच असून यावर रुट करणे हा पर्याय नाही.
यासाठी प्रथम तुम्ही कॉन्ट्याक्ट इत्यादीचे ब्याकप घ्या. नंतर settings मधे जाऊन factory reset मारा. Reset मारताना विचारल्यानंतर English भाषा set करा व factory reset पूर्ण करा. तुमचा प्रॉब्लेम दूर होईल.
24 Aug 2015 - 9:11 am | पिलीयन रायडर
केलंय ते मी.. तरीही काही काहीच ठिकाणी चायनीज भाषा आहे.
रूट करुन पाहिनही मी (मला त्यातलं काही कळत नाही तरी समजा ट्राय करु...)
पण लिनोव्हो ह्यात मदत करु शकत नाही का? त्यांच्या कस्टमर केअरने ह्यावर मला सोल्युशन द्यायला हवे ना.
22 Aug 2015 - 10:03 am | arun jaykar
माझ्याकडे ३२ जीबी चे class १० मेमोरी कार्ड आहे. ते मला फोन मेमोरी वाढविण्यासाठी पार्टीशन करायचे आहे. त्यासाठी २ पार्टीशन कराव्या लागतील.तर जास्तीत जास्त फोन मेमोरी वाढवण्यासाठी कोणते पार्टीशन किती gb चे करावे?
फोन मेमोरीसाठी fat 32 पार्टीशन वापरली जाते की ext २ पार्टीशन वापरली जाते ?
22 Aug 2015 - 1:13 pm | सुहास झेले
फोन मेमरी १ किंवा १.५ जीबी वाढवा.. बाकी स्टोरेजसाठी वापरा. ह्याहून मोठे पार्टीशन मी ट्राय केले नाही. गुगल बाबाला विचारावे लागेल. खूप एॅप्ससुद्धा उपलब्ध आहेत स्टोरवर ह्यासाठी.
फाईल सिस्टीम Ext २ वापरली जाते...
22 Aug 2015 - 6:54 pm | arun jaykar
सुहास साहेब मी फोन मेमोरीसाठी कोणते फाईल एक्स्टेन्शन वापरु ? Fat ३२ की ext २
22 Aug 2015 - 7:14 pm | सुहास झेले
फोन मेमरी FAT३२ आणि एसडी कार्ड मेमरी Ext २... ही लिंक बघा इथे स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे :)
How to Partition SD Card and Use Link2SD in any Android Phone with Screenshots
24 Aug 2015 - 8:20 am | arun jaykar
धन्यवाद
25 Aug 2015 - 11:26 am | मंदार पवार
एखादे घरगुती उपचारासाठी आर्युवेदीक App सुचवा.
25 Aug 2015 - 12:59 pm | arun jaykar
Swapper app आणि link २ sd मधे काय फरक आहे.तसेच फोन मेमोरी व रॉम मधे काय फरक आहे.
Swapper ने रॉम व link २ sd ने फोन मेमोरी वाढते असे वाचले आहे.
दोन्ही app वापरुन रॉम व फोन मेमोरी या दोन्ही गोष्टी वाढवता येतात का.
दोनही वापरण्याची कोणती पद्धत आहे.
26 Aug 2015 - 10:15 am | जव्हेरगंज
Android kitkat 4.4 वरुन SD card मधील files delete करता येत नाहीत .
म्हणजे inbuilt applications मधून होतात मात्र third party app जसे की x-plore, ms player , quickpic, यामधून rename , delete काहीच करता येत नाही .
कृपया सोपा उपाय सुचवा. फार अडचण होत आहे .
4 Sep 2015 - 1:38 am | बहुगुणी
आस्की (Advertising Standards Council of India) यांचं ASCIOnline हे अॅप पाहिलं. चांगलं वाटलं. तुम्ही एखादी अवास्तव/ खोटी/ दिशाभूल करणारी जाहिरात पाहिली तर तिचं प्रकाशचित्र या अॅप मधून ASCI ला पाठवू शकता आणि त्यांनी त्याचा पाठपुरावा करेपर्यंत माहिती मिळवू शकता.
7 Sep 2015 - 9:33 pm | स्वप्क००७
फोन रूत करन्याचे फायदे
१) सिस्तीम आप्स काधुन ताकु शकता
२) xposed module इन्स्ताल करुन कस्तम रोम चे फीचर्स आनु शकता.
7 Sep 2015 - 10:55 pm | कंजूस
%Android kitkat 4.4 वरुन SD card मधील files delete करता येत नाहीत .
म्हणजे inbuilt applications मधून होतात मात्र third party app जसे की x-plore, ms player , quickpic, यामधून rename , delete काहीच करता येत नाही .%%%%----एका सैनिकास एकाच सार्जंटची आज्ञा घेता येते तीनचारांची नाही.फाइल अॅपसचं असंच आहे.
10 Sep 2015 - 8:02 am | जव्हेरगंज
अहो पण जुना सैनिक सगळ्यांच ऐकायचा.(४.२ मध्ये)
10 Sep 2015 - 7:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नव काही ? हाऊ टू अपग्रेड न्यु ओस ऑन अँड्राईड ?
४.४.२ ला अपग्रेड करायचा कै नवा फॉर्म्युला ?
-दिलीप बिरुटे
11 Sep 2015 - 5:04 pm | नया है वह
हे cross platfrom app जे कोणतीही फाईल wi-fi द्वारे ट्रान्स्फर करते. no data charges.
ट्रान्स्फर फाईलस
from Lumia to android, from Android to Lumia
from Lumia to Apple, from Apple to Lumia
from android, to Apple, from Apple to android,
बहुतेक वेळा from Android to Lumia ट्रान्स्फरला काही अडचणी येऊ शकतात (वैयक्तिक अनुभव)
बाकी मस्त अॅप १gb फाईल काही ५-१० mins. मधे ट्रान्स्फर होते
23 Sep 2015 - 2:28 pm | कानडा
हे अॅप Windows वर सुद्धा चालते. Windows PC ते अॅन्ड्रॉईड आणि vice-versa चालते.
http://www.shareitforpc.com/2015/03/official-shareit-for-pc-download.html
23 Sep 2015 - 12:13 pm | अमित मुंबईचा
गो स्टोरीज हे नवीन अप प्ले स्टोर वर उपलब्ध आहे. यामधे रत्नाकर मतकरी, विजय तेंडुलकर, द मा मिरासदार यांच्या कथा ऑडियो स्वरुपात अतुल कुलकर्णी, जितेन्द्र जोशी, ऐश्वर्या नारकर वगैरे कलाकार मंडळींनी सदर केल्या आहेत. सध्या तरी कॉंटेंट फार नाही परंतु छान आहे.
लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.sandeep.gostories3&hl=en
23 Sep 2015 - 6:10 pm | स्वप्क००७
कोणाकडे जर android 2.3 version असलेला फोन असेल तर format करु नका गुगल लोगिन ला एरर येतो. xda-developers.com विचारले असता असे कळले कि security reason google has stopped access to lower version of android. मी हे सांगत आहे ह्याचे कारण कि मझ्या कडे असलेला जुना फोन galaxy s वर मी CM7 आनी darkyrom (GB 2.3) टाकण्याचा प्रयत्न केला असता गुगल लोगिन करताना एरर आला. नंतर जेव्हा त्यामध्ये मी CM9 ROM टाकला तेव्हा गूगल लोगिन झाले.
30 Sep 2015 - 10:42 am | पैसा
माझ्याकडे ही अजून एक लै जुना व्हिडिओकॉन ए१५ जिवंत आहे. स्पेअर म्हणून ठेवला होता. परवा पाहिले तर गूगल लॉग इन होईना. त्याचं काय करू प्रश्न पडला होता. आता अजून जरा आळशीपणा करते. अँड्रॉईड २.३ वाल्या ३.५ इंच स्क्रीनवाल्या फोनसाठी कोणते रॉम उपलब्ध आहे? जरा शोधून लिंक देऊ शकता का?
29 Sep 2015 - 4:05 pm | कपिलमुनी
मोबाईलवर youtube चे व्हिडीओ कसे download करायचे ?
कोणते टूल वापरतात ?
29 Sep 2015 - 6:58 pm | नया है वह
१. Browser वरुन youtubeचे व्हिडीओ सुरु करा.
२.लगेच एक व्हिडीओ icon Browserच्या तळाला येइल.
३. त्यावर क्लिक्/टच करा
४. पोप अप येइल Play/watch offline
५. सीलेक्ट watch offline
६. download सुरु होईल
29 Sep 2015 - 6:49 pm | स्वप्क००७
tubemate app डाउनलोड करा फ़रर्फ़ोक्ष अथवा क्रोम वरून. ह्या app द्वारे विदेओ डाउनलोड करू शकता
19 Nov 2015 - 11:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय नवं आलं का ?
-दिलीप बिरुटे
19 Nov 2015 - 12:22 pm | अनुप ढेरे
अॅंड्रॉइडवर ऑफलाइन मॅप्स आणि नॅविगेशन साठी चांगलं अॅप कोणचं?
19 Nov 2015 - 8:05 pm | नया है वह
गूगल मॅप्स आता ऑफलाइन सुद्धा!
19 Nov 2015 - 8:41 pm | तुषार काळभोर
Offline Maps
19 Nov 2015 - 1:36 pm | मदनबाण
Exclamation mark on cellular network icon :- हे सध्या पाहतो आहे, हा लॉलिपॉपचा बग आहे की फिचर ?
इथे जाउन आलो :- https://code.google.com/p/android/issues/detail?id=79546
Marshmallow मधे फिक्स करण्यात आले आहे म्हणे ! कोणाला यावर अधिक माहिती आहे का ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tail wags the dog
19 Nov 2015 - 2:55 pm | कानडा
माझ्या cyanogen 12 (over lollipop) मधे ते दिसते जेव्हा डेटा बंद असतो. कुठल्याही प्रकारचा डेटा (२जी, ३जी, वाय-फाय) सुरु असेल तर ते exclaimation mark जाते.
---
कानडा
19 Nov 2015 - 3:03 pm | मदनबाण
त्याचा संबंध डेटा शी आहे
हो, ते माहित आहे, पण हे फिचर आहे ? का बग ते जाणुन घ्यायचे होते.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tail wags the dog
22 Nov 2015 - 10:04 pm | पैसा
माझा अँड्रॉईड वन कार्बन आता ६.० वर आहे. ५.१ आणि ५.२ असतानाही असे काही येत नव्हते.
24 Nov 2015 - 9:22 am | मदनबाण
हा बहुधा ५.१.१ ला दिसणारा प्रकार आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev
19 Nov 2015 - 9:14 pm | श्रीरंग_जोशी
काही दिवसांपूर्वीच ब्लॅकबेरी प्रिव्ह हा अॅन्ड्रॉइडवर चालणारा फोन लॉन्च झाला आहे.
ब्लॅकबेरी कंपनीने प्रथमच इतर कुणाची ऑपरेटिंग सिस्टिम वापरून फोन काढला आहे. एज स्क्रीन व स्लायडींग क्वेर्टी किबोर्ड अशी वैशिष्ट्ये असणारा हा एकमेव उपलब्ध फोन आहे. त्याखेरीज याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षितता.
या फोनचे एक परिक्षण जालावरून साभार.
ब्लॅकबेरी १० ओएसच्या चाहत्यांसाठी ही सकारात्मक घडामोड नसली तरी यामुळे ब्लॅकबेरी कंपनी टिकून राहण्यास मदत होणार असेल तर ते स्वागतार्हच आहे.
20 Nov 2015 - 4:12 am | कंजूस
#bb-android-phone.
android सुरक्षित? bb messages सुरक्षित असतील.
20 Nov 2015 - 4:21 am | श्रीरंग_जोशी
ब्लॅकबेरीने थेट गुगलबरोबर काम करून सिक्युरिटी फिचर्स बनवले आहेत.
स्रोत: BlackBerry Priv Review: BlackBerry May Win You Back With Android
20 Nov 2015 - 8:17 am | कंजूस
encryptionमुळे bbचे पॅकेज महाग ठेवले होते.आताचं माहित नाही.हा फोन value -for-money शोधणाय्रा गिह्राइकास पसंत पडणे कठीण आहे.बाकी स्लाइडर फोन त्रास देतात असा समज आहे.
20 Nov 2015 - 10:16 am | श्रीरंग_जोशी
माझ्या सध्याच्या फोनपूर्वी मी ब्लॅकबेरी टॉर्च ९८१० वापरत होतो ज्याला स्लाइडर किबोर्ड होता. त्यामुळे कधी त्रास झाल्याचे आठवत नाही.
प्रिव्हच्या स्लाइडर किबोर्डचा आणखी एक महत्वाचा उपयोग म्हणजे त्याला आपण ट्रॅकपॅडसारखे वापरू शकतो. म्हणजे ब्राउझिंग करताना वर खाली स्क्रोल करताना ते किबोर्डद्वारेच करता येतं, स्क्रीनवरून बोटं फिरवायची गरज नाही. तसेच फोनची उंची वाढल्यामुळे मान फार खाली न वाकवता स्क्रीनवरचे वाचता येईल. याखेरीज किबोर्ड शॉर्टकट्स वापरण्याची सुविधाही आहेच.
अमेरिकेत एटीअॅन्डटी दोन वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टवर अडीचशे डॉलर्सला मिळणार आहे. काही महिने थांबल्यास ही किंमत यापेक्षा कमी होइलच. मला वेळ भेटला की मी एटीअॅन्डटीच्या दालनात जाऊन डेमो घेईनच.
20 Nov 2015 - 10:47 pm | तुषार काळभोर
नोकिया एन९०० चा अतिशय सुंदर अनुभव आहे.
हे सर्व असेच्या असे एन९०० साठीसुद्धा!
20 Nov 2015 - 10:51 pm | श्रीरंग_जोशी
इ तो हमे पुराने जमाने का फोनवा लग रहा है...
तुम्ही अजुनही वापरताय का? मी ११०८च्या पलिकडे कधी पोचलोच नाही...
20 Nov 2015 - 11:21 pm | तुषार काळभोर
मार्च २०१० मध्ये घेतला होता. साडेतीन वर्षे वापरला. एकदा टेरेसवरून पडल्याने स्क्रीन फुटली आणि गेला तो :(
३२जीबी इंटर्नल स्टोरेज (त्यात मी १६जीबीचं मेमरीकार्ड्पण टाकलं होतं), २५६ एम्बी रॅम, ३जी (मी बेसेनेलचं ३जी वापरायचो, एकदम झकास!), ५ मेपिचा उत्कृष्ट दर्जाचा क्यामेरा. द्याट फोन वॉज वे अहेड ऑफ इट्स टाईम. बिच्चारा अँड्रॉईडच्या झंझावातात टिकला नाही.
21 Nov 2015 - 3:03 am | श्रीरंग_जोशी
आजच्या काळात साडेतीन वर्षे एकच फोन. त्या फोनचा अपघाती मृत्यू झाल्याने अधिक वापरला गेला नाही.
माझाही सध्याचा फोन (झेड १०) अडीच वर्षांपासून वापरात आहे. एकदम सुदृढ आहे. वार्धक्याच्या खुणा अजिबात दिसत नाहीयेत.
22 Nov 2015 - 4:30 pm | योगी९००
मिपावर माझ्यासारखा एन ९०० वाला भेटला...
मी २०१० ला घेतला होता. अजुनही चालतोय. सध्या तो फोन मिडीया सर्वर म्हणून वापरतो.
22 Nov 2015 - 9:42 pm | तुषार काळभोर
लई म्हणजे लई आवडायचा..
22 Nov 2015 - 8:40 pm | मदनबाण
आजचे अॅप :-
आपण आत्ता पर्यंत बॅटरी सेव्हींग आणि टास्क किलर अॅप्स पाहिली आहेत, यात एक नवी भर...
APUS Booster+|Speed Up Phone
डीप मेमरी क्लिअर करण्यार्या बर्याचश्या अॅप्सना रुट अॅक्सेस लागतो, पण रुट अॅक्सेस शिवाय सुद्धा डीप मेमरी फ्रीअप करण्या मधे हे अॅप चँप आहे,वन टच मधे मेमरी रिलीज होते आणि पर्फोमन्स बुस्ट होतो. तुम्हाला आवश्यक असणारी अॅप्स तुम्ही किल होण्या पासुन वगळु शकता.अॅप्सना ऑटो स्टार्ट होण्या पासुन रोखण्याचे काम हे अॅप करते त्यामुळे बॅटरी ड्रेन कमी होउन एकंदर फोनचा परफॉर्मन्स स्मुथ राहतो. { मी हे सध्या वापरतोय आणि अनुभव एकदम मख्खन आहे. :) }
एक वेगळे अॅप :-
Carat
तुमच्या फोनची बॅटरी नक्की कोणत्या अॅप्समुळे जास्त ड्रेन होते ? हे समजुन घेण्यासाठी तुमच्या वापरा नुसार पर्सनलाइज रिपोर्ट जनरेट करुन देण्याचे काम हे अॅप करते.आठवड्याभरात जमेल तसे हे अॅप दिवसातुन एकदा तरी रन करावयास हवे{ डेटा / वायफाय अॅक्सेस गोळा केलेला डेटा सेंड करण्यासाठी आवश्यक आहे} ! रिपोर्ट जनरेट झाल्या नंतर बॅटरी कंझ्युम करणार्या अॅप्सचा नक्की अंदाज तुम्हाला येइल.
हे अॅप बनवणारे कोण आहेत ? त्यांच्या बद्धल थोडेसे :-
Carat started at the AMP Lab, UC Berkeley, in collaboration with University of Helsinki. It is under active development by a team of researchers in the NODES group, Department of Computer Science, University of Helsinki. We are constantly making improvements, adding features, and giving you more knowledge about how your device is using energy. Remember, knowledge is power!
{ मी वापरण्यास आणि समजुन घेण्यास आताशी सुरुवात केली आहे, नक्की काय आणि कसा रिपोर्ट जनरेट होतो आणि नक्की कशी आणि काय माहिती मिळते त्या बद्धल उत्सुक आहे. }
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the bubble bursting for India's online start-ups?
24 Nov 2015 - 9:34 am | मदनबाण
आजचे अॅप :-
वर दिलेल्या अॅप्स प्रमाणेच हे टास्क किलर आणि एक प्रकारे बॅटरी सेव्हर अॅप्स आहेत.
१ } Greenify :- या अॅप चे वैशिष्ठ म्हणजे तुम्ही अॅप्स सिलेक्ट करुन ती hibernation करुन टाकु शकता. त्यामुळे जो पर्यंत तुम्ही स्वतःहुन ती अॅप्स सिलेक्ट करुन चालु /ओपन करत नाहीत तो पर्यंत ती बॅकग्राउंडला रन होणार नाहीत.ऑटो hibernation करणार्या बर्याचश्या अॅप्सना रुट अॅक्सेस लागतो, पण Greenify मधे हे विदआउट रुट साध्य करता आले आहे, पण यासाठी तुम्हाला पॅटर्न लॉक किंवा पिन लॉक डिसेबल ठेवावे लागेल. माझे मॅन्युअल hibernation करुन काम भागते आहे.
२} ES Task Manager (Task Killer ) :- तुम्हाला इस फाईल एक्सप्लोरर तर ठावूक असेलच... त्याच अॅप बनवणार्यांचे हे अगदी लाईट { जवळपास ७०० केबी फक्त ! } टास्क किलींग अॅप आहे. हे एक मस्ट हॅव अॅप आहे. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev
23 Dec 2015 - 7:24 pm | पंतश्री
मदनबाण साहेब इतकी चागली माहिती साथि दुसरा धागा उघडलात तर वचायला सोप जाईल
22 Dec 2015 - 6:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
या सायटीवरुन आपल्याला काही पेड अॅप्लीकेशन्स फुकट मिळतील.
आपण आपल्या जवाबदारीवर टाकावेत. फोन हँग झाला. काळा पडला. तर मी जवाबदार नाही. :)
-दिलीप बिरुटे
23 Dec 2015 - 8:59 pm | कंजूस
टास्क किलिंग म्हणजे काय ,ते का करावे लागते?
बॅकग्राउंला अॅप का चालू ठेवावी लागतात?कोणती?नाही चालू ठेवली तर काय होईल?
24 Dec 2015 - 12:15 pm | सुहास झेले
काही अॅप्स बंद केल्यानंतरही त्यांचे काही प्रोसेस सुरूच असतात...त्यासाठी टास्क किलिंग वापरले जाते. त्यामुळे रॅम फ्री होतो आणि मोबाईलची बॅटरी ही वाचते थोड्याप्रमाणात... :)
24 Dec 2015 - 12:33 pm | मदनबाण
@पंतश्री
धन्यवाद. आपली सुचना चांगली आहे,परंतु सर्व नविन अपडेट्स हे नेहमी धाग्याच्या शेवटी दिले जातात त्यामुळे ते शोधण्यात अडचण येत नाही. तसेच संपुर्ण धाग्यात हवी ती माहिती चाळण्यास एकाच धाग्याचा उपयोग होतो व शक्यतो आधी दिलेली माहिती परत देण्याचे टाळता येते. मान्य आहे धाग्याची पाने वाढल्या नंतर धागा उघडण्यास वेळ लागतो,तरी सुद्धा सर्व माहिती एकत्रपणे एकाच धाग्यावर पटकन शोधता आणि वाचता येते.बाकी झेले अण्णांनी यावर विचार करावा कारण हा धागा त्यांचा आहे आणि मी फक्त प्रतिसाद देणारा आहे. :)
@ कंजूस मामा
टास्क किलिंग म्हणजे काय ,ते का करावे लागते?
आपण ओपन केलेल्या अॅप्समुळे { तसेच बाय डिफॉल्ट रन होणार्या } रन होणार्या प्रोसेसेस /सर्व्हिसेस आपल्या निवडी नुसार बंद करणे म्हणजे टास्क किलींग. समजा आपण विंडोज मधे टास्क बार वर राईट क्लीक केलेत आणि मग स्टार्ट टास्क मॅनेजरवर क्लीक केलेत तर विंडोज टास्क मॅनेजर उघडते. त्यात प्रोसेसेस या टॅबवर गेल्यावर रन होण्यार्या प्रोसेसेस दिसतात. समजा माझे फायरफॉक्स काही कारणाने हँग झाले आहे आणि मला ते डेस्कटॉप वरुन बंद करता येत नाही, अश्यावेळी ती टास्क एंड प्रोसेस किंवा एंड प्रोसेस ट्री हा पर्याय निवडुन { प्रोसेस सिलेक्ट करुन राईट क्लीक केल्यावर} ती प्रोसेस किल करता येते, ज्यामुळे फायरफॉक्स बंद करता येइल. यामुळे रॅम आणि प्रोसेसर लोड रिलीज करता येते. हेच काम तुम्ही अॅनड्रॉइडवर करता.
बॅकग्राउंला अॅप का चालू ठेवावी लागतात?कोणती?नाही चालू ठेवली तर काय होईल?
बरीचशी अॅप्स बॅग्राउंडला चालु राहतात कारण त्यांची ती गरज असते, उदा. व्हॉट्सअॅप जसे तुम्ही नेटला कनेक्ट होतात तसे तुम्हाला अपडेट्स मिळतात आणि नोटिफिकेशन मेसेज आणि टोन ऐकायला मिळते,कारण ते बॅग्राउंटला अॅक्टीव्ह आहे.
पण जर मी ही प्रोसेस किल केली तर मला अपडेट्स मिळणार नाही,परंतु माझी रॅम आणि प्रोसेसर फ्रीअप होइल ज्याचा परिणाम अर्थातच बॅटरीवर होतो.
Android 6.0 Marshmallow मधे Doze मोड दिला आहे, ज्यामुळे बॅटरी परफॉर्मन्स इंप्रुव्ह होतो.
अधिक इकडे :- Inside Marshmallow: What is Doze, how do I use it and what does it do?
How to turn off doze mode for specific apps in Android Marshmallow
Doze app brings Android 6.0 Marshmallow’s best feature to older phones
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- श्री गुरु दत्ता,जय भगवंता... :- Ajit Kadkade
24 Dec 2015 - 4:22 pm | कंजूस
हायला हे मोठेमोठे टास्क-किलींग वगैरे नावं वाचून किती घाबरलो होतो! हे तर विंडोजच्या सेटिंग्जमध्ये जाऊन अगोदरच केलं आहे.
27 Dec 2015 - 1:41 pm | उगा काहितरीच
मोटो ई रूट करण्यासाठी कुणी मदत करेल काय ? नेटवर वाचून भरपूर प्रयत्न केले पण जमलं नाही.
5 Jan 2016 - 9:12 pm | श्रीगुरुजी
थोडी तांत्रिक मदत हवी आहे.
Using Java, how to send a string/text from a laptop to an Android phone over wireless connection such as BlueTooth?
22 Jan 2016 - 7:07 pm | मदनबाण
माझी प्रोग्रॅमिंग बॅकग्राउंड नाही, तरी सुद्धा खालील दुव्यानी मदत होते का ते पहा :-
Connecting to Bluetooth devices with Java
Android Bluetooth Example
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Just Can't Get Enough... :- The Black Eyed Peas
22 Jan 2016 - 7:27 am | मदनबाण
@उगा काहितरीच
मोटो रुट करणे अवघड आहे,असे जालावरुन कळले आहे. अजुन यावर अधिक वाचायला हवे. काही कंपन्यांचा रुट करण्याला विरोध नसतो, तर काही कंपन्यांना फोट रुट होउ नये असे वाटते आणि तसा त्यांचा प्रयत्न देखील असतो.
आजचे अॅप :-
Standby Touch Advanced :- वन टच स्क्रीन लॉक करण्यासाठीचे अॅप.सॉल अॅप साईझ :- 140k आणि नो बॅटरी कंझप्शन.
तुमचा अॅन्ड्रॉईड फोन तुम्हाला नेव्हिगेशन मधे अधिक जलद करता येउ शकतो...
आता हे कसे करायचे ?
खालच्या स्टेप्स फॉलो करा...
सेटिंग्स => अबाउट फोन => बिल्ड नंबर => टॅप ७ टाईम्स ऑन बिल्ड नंबर => थीस विल एनेबल डेव्हलपर ऑप्शन इन सेटिंग्स.
आता सेटंग्स मधे डेव्हलपर ऑप्शन दिसायला लागेल.
सेटिंग्स => डेव्हलपर ऑप्शन => इथे तुम्हाल पुढील ३ पर्याय दिसतील.
१} Window animation scale
२}Transition animation scale
३}Animator duration scale
वरील तिन्ही स्केलची डिफॉल्ड व्हॉल्यू १x आहे, जी बदलुन 0 करावी. { सर्व ऑप्शन्सची }
फोन २दा रिबूट करावा...
फरक लक्षात येइल... ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Just Can't Get Enough... :- The Black Eyed Peas
22 Jan 2016 - 10:49 am | राजाभाउ
माझ्याकडे ASUS Zenphone 5 आहे. काहीही केलं तरी ह्या लेकाला माझा पीसी ओळखतच नाही. अंतरजाला वरील सर्व उपलब्ध उपाय करुन पाहीले पण काही उपयोग नाही. मझ्या पीसीचे युसबी पोर्ट चांगले आहे फोन म्ध्ये काही बिघाड असेल तर माहीत नाही. माझा पीसी जुना आहे (पी४) , त्याला वायफाय नाही त्यामुळे गाणी, व्हिडो वगैरे हिकड तिकड करण फारच कटकटीच आहे.
यावर कुणाला काही उपाय माहित आहे का ? किंवा एखादे अॅप कि जे वायफाय शिवाय फोन आणि पीसी ला जोडु शकेल ?
22 Jan 2016 - 6:43 pm | मदनबाण
तुमचा फोन दुसर्या कुठल्या पीसीला जोडुन पाहिला आहेत का ? तसेच फोनसाठीचे ड्रायव्हर्स पीसी मधे इन्स्टॉल आहेत का ? कारण जर तसे नसेल तर पीसी फोनला डिटेक्ट करण्यास असमर्थ होउ शकेल...
अधिक मदत इथे मिळते का ते पहा :-
ASUS PC Link
Asus Zenfone 5 not detected by computer
Zenfone 5 and 4 not detecting in PC with USB cable
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Just Can't Get Enough... :- The Black Eyed Peas
22 Jan 2016 - 7:08 pm | संदीप डांगे
माझा सॅमसंग नोट अचानक ३० तारखेला रात्री बंद पडला. मेकॅनिककडे घेऊन गेलो तर त्याने सांगितले सेम केस तीन-चार नोट्ससोबत झाली आणि त्याच्याकडे त्याच एक-दोन दिवसात आलेत दुरुस्तीला. अजून एकानेही त्याचा सॅमसंग असाच बिनाबातका बंद पडला सांगितले. आज वीस दिवस होउनही मेकॅनिक (जो खरंच मास्टर आहे) त्यालाही तो सुरु करता आलेला नाही. सॅमसंगने जुने फोन इन्टर्नेट द्वारे बंद करून ग्राहकांना नविन फोन घेण्याचे आरंभले आहे काय?
22 Jan 2016 - 7:39 pm | मदनबाण
सॅमसंगने जुने फोन इन्टर्नेट द्वारे बंद करून ग्राहकांना नविन फोन घेण्याचे आरंभले आहे काय?
हा.हा.हा... ह्याची शक्यता नाही,फोन अपडेट झाल्यावरही असे प्रॉब्लेम्स येउ शकतात. बाकी या बाबतीत नो आयडीया.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Just Can't Get Enough... :- The Black Eyed Peas
7 Mar 2016 - 4:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही नवीन अप्लिकेशन्स आलीत काय ?
-दिलीप बिरुटे
7 Mar 2016 - 8:21 pm | उपयोजक
नवी आणी जुनी पण फारशी माहित नसलेली अशी आहेत भरपूर आहेत स्वतंत्र धागा काढू की यातच लिहू असा प्रश्न पडला आहे.इथे मोबाईल रूट करण्याविषयीच जास्त माहिती मिळतेय.
7 Mar 2016 - 8:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एंड्राइड म्हटलं की सुहास झेले यांचा धागाच सर्वांना आठवतो. तुम्ही इथे सर्व अप्लिकेशन्स जी हटके आहेत आणि फ्री आहेत क्र्याकही अप्लिकेशनही चालतील तेव्हा याच धाग्यात लिहावे.
-दिलीप बिरुटे
7 Mar 2016 - 9:01 pm | उपयोजक
एका अॅप बद्दल मदत हवी आहे.मायक्रोसॉफ्ट वर्ड च्या अॅपमधे मराठी पेस्ट केले की चौकोन चौकोन दिसतात यावर उपाय काय
7 Mar 2016 - 9:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऑफ़ीस सूट मधील व्हर्जन ८.५.४६५७ वापरतो त्यात कॉपी पेष्ट केलं तरी चौकोन दिसत नाही. एक तर ऑफीस सूटचं व्हर्जन अपडेटून घ्या किंवा हा सिष्टिम फॉण्टचा तर इशु नाही ना ते एकदा तपासून पाहा.
-दिलीप बिरुटे
3 Apr 2016 - 11:53 pm | मदनबाण
आजची अॅप्स :-
१} Clean Master Lite
Clean Master बहुतेक आधी इथे देउन झाले आहे, याचेच लाईट व्हर्जन उपलब्ध आहे, जे मी सध्या वापरुन पाहतो आहे.
२} AVL
तुम्ही आत्ता पर्यंत बरेच वेगवेगळे अँन्टीव्हायरस वापरुन पाहिले असतील, हे करत असताना तुमच्या एक लक्षात आले असतील की त्या अँन्टीव्हायरस मध्ये इतर अधिकचे फिचर्स सुद्धा दिलेले असतात, ज्याचा तुम्ही वापर करालच असे नाही.
मग तुम्हाला फक्त अँन्टीव्हायरसच हवा असेल तर ? याचे उत्तर अर्थातच AVL आहे, ज्याचे मुख्य लक्ष अँन्टीव्हायरस इंजिन हेच आहे. आत्ता पर्यंतचा अनुभव उत्तम आहे.
३} All India Radio Live
आकाशवाणीचे ऑफिशिअल अॅप, जे एका दुसर्या धाग्यात दिले होते, तेच इथे परत देत आहे.
४} iNVH
मध्यंतरी आमच्या इथे रहदारीचा आवाज कमालीचा वाढला होता, त्यामुळे माझे टाळके १-२ जाम सटकले होते ! नक्की किती DB आवाज आहे हे मोजण्यासाठी हे अॅप मी वापरुन गोंगाट मोजण्याचा प्रयत्न केला होता. बॉश { Bosch } या कंपनीचे हे ऑफिशिअल अॅप आहे.
५} Adobe Photoshop Lightroom
फोनवरच काढलेले फोटो आणि इतर इमेजेस एडिट करण्याचे अॅप. अजुन जास्त वापरुन पाहिलेले नाहीये.
जरासे वेगळे अॅप्स :-
मध्यंतरी मी मेडिटेशन रिलेटेड अॅप्स शोधत होतो आणि शोध घेत असतानाच मला खालील २ अॅप्स मिळाली जी मी सध्या वापरुन पाहतो आहे.
१ } Water & Gong ~ Relaxing sounds
मनाला शांत करण्यासाठी मनुष्य प्राणी बरेच उपाय करतो, त्यात मी सुद्धा आलो ! ;)
वाहत्या पाण्याचा आवाज किंवा नुसत्या पाण्याचा आवाज मनाला शांतता प्रदान करतो, त्यामुळेच मी हे अॅप निवडले.
यात वॉटरफॉल / समुद्राचा / बांबु फाउंटनचा /वाहत्या पाण्याचा / पावसाचा अश्या प्रकारे आवाज तुम्हाला ऐकावयास मिळतील शिवाय जोडीला गाँग साउंड सुद्ध्या आहे. हे सगळे साउंड्स तुम्ही तुमच्या गरजे नुसार कस्टमाईज करु शकता. मला हे अॅप फार आवडले. :)
२} Brain Waves - Binaural Beats
Brain Waves आणि Binaural Beats वर मी बर्याच काळा पासुन वाचन करत आहे, आणि याचा मेडिटेश मध्ये कसा वापर करता येइल ? या शोधात असताना मला हे अॅप मिळाले.
स्वतःला हवी ती Binaural Beats फ्रिक्वेन्सी तुम्हाला या अॅप मधे सेट करता येते आणि सेव्ह सुद्धा करता येते. बाय डिफॉल्ट काही फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत. सध्या थिटा फ्रिक्वेसीवर मेंदू खपवणे चालु आहे.
जालावर Theta waves and meditation असा शोध घेतल्यास अनेक प्रकारची रोचक माहिती आपणास मिळु शकेल.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज कुणीतरी यावे... :- मुंबईचा जावई
6 Apr 2016 - 6:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोणी शामशुंग मोबाईलला CyanogenMod टाकलं आहे का ? अनुभव कसा आहे ?
25 Jun 2016 - 9:06 am | कंजूस
मित्राने सहा महिन्यांपूर्वी मायक्रोमॅक्सचा सायनोजनवर चालणारा मोबाइल घेतलेला होता.android सारखी ओएस असणे आणि android os असणे यात फरक आहे सर.गुगल प्रॅाडक्टस - ब्लॅागर,डॅाक,प्लस फुल असेलच असं नाही अथवा काही लोचा असू शकतो.त्याच्या मोबल्यात गुगल स्टोर उघडले की पन्नास एमबी डेटा उडतो.हे मायक्रोमॅक्सने टाकलेल्या अॅडसमुळे पण असेल.
25 Jun 2016 - 6:56 pm | आनंदी गोपाळ
मी स्वतः युरेका प्लस वापरतो आहे. उत्तम फोन आहे. सायनोजेनमुळे ५० एम्बी डेटा उडत नाही.
डेटा नक्की कोणतं अॅप वापरतंय ते सेटिंग्जमधे पहा. प्ले स्टोअर चालू केल्यावर भरपूर डेटा उडत असेल, तर नक्कीच प्लेस्टोअरमधे ऑटो अपडेट सुरु असणार. ते सेटिंग आधी बदला.
सायनोजेन फोनला रूट केल्यावर वॉरंटी व्हॉईड होत नाही. आधी रूट करून ब्लोटवेअर, नको तो कचरा उडवा.
25 Jun 2016 - 9:53 pm | कंजूस
होय त्यांचा युरेका प्लस आहे.मित्राला सांगतो अॅप्स चुक करायला.थँक्स.स्क्रिन रेझ 800x400 आहे ना?
26 Jun 2016 - 5:46 pm | आनंदी गोपाळ
1080 x 1920 pixels